Dec 01, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???( भाग ३)

Read Later
काय फरक पडतो???( भाग ३)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

कैवल्य खूप टेन्शन मध्ये असतो, आई काय बोलेल या विचाराने.संध्याकाळच्या जेवणानंतर कैवल्य आई ला नेहमी सारखी मदत करतो आणि आई ला सगळं आवरून झालं की डोक्याला कोमट तेलाने मॉलिश करशील का अस विचारतो.तर आई लगेच हो बोलते आणि सगळं आवरून झाल्यावर वाटीत तेल घेऊन येते. कैवल्यची आई तेल लावता लावता कैवल्य कडे बघत होती………. तर, बाप लेकाच्या काहीतरी आपल्या खाणा खुणा चालू होत्या.
काय चाललय तुम्हा दोघांचं."कैवल्यची आई"
ते......काही नाही...... असचं आपलं."कैवल्यचे बाबा"
हो ना......कुठे काय......ते......किती दिवसांनी तुझ्या हातून मॉलिश करून मिळतं आहे..... बरं वाटतंय जरा.....कामाचा लोड पण खूप असतो ना हल्ली.... त्यामुळे डोकं पण खूप दुखतं.... आज बरं वाटते आहे जरा."कैवल्य"
हो गं....... माझं कोकरू ते.....काय त्या मेल्या बॉस लोकांना गरज आहे एवढं काम करून घेण्याची....माझा लेक म्हणजे काय....गुरं-ढोरं वाटली होय, राब राब राबवून घेतो मेला......"कैवल्य ची आई"(नाक मुरडत आणि कपाळावर आठ्या पाडत बोलते.)
मी काय म्हणतो.........एखादी छान अशी मुलगी बघून आता आपल्या लेकाचे दोनाचे चार हात करून टाकू....तिशी उलटत आली आता त्याची." कैवल्य चे बाबा"
अगदी........माझ्या मनातलं बोललात बघा......मी आठ दिवसांपूर्वीच दादा जवळ आपल्या निर्मला बद्दल विचारलं होत....परक्याची पोरं घरात घेऊन येण्यापेक्षा घरातल्या लेकीलाच सून करून घेऊया म्हणते मी......."कैवल्य ची आई"
आईच्या अशा बोलण्याने कैवल्यचे तर अगदी अवसानचं गळून पडले कारण कैवल्य आणि त्याचा भाऊ लहान असताना त्यांच्या आजोबांनी म्हणजे च कैवल्यच्या वडिलांच्या वडिलांनी त्यांना भर पावसात घराबाहेर काढले होते त्याच्या वडिलांची नोकरी सुद्धा नव्हती. अशातच सहा महिने कुठलीही कुरबुर न करता मामांनी त्यांना आधार दिला होता. त्याचा वडिलांना नोकरी मिळवून दिली आणि आता त्यांचे उपकार फेडायची वेळ आली तर मी किंवा आई बाबा नाही कसं म्हणणार.......आणि त्यातच निर्मलाला आईची माया माहीतच नाही कारण तिचा जन्म होऊन पंधरा दिवसातच तिची आई तिला सोडून देवाघरी गेली होती.निर्मला च्या आई ला डॉक्टरांनी आधीच सांगितल होत तुम्ही मुलं जन्माला नाही घालू शकत कारण त्यांनी गरोदर राहणं म्हणजे दोघांच्याही जीवाला धोका होता.पण तरी स्वतःच्या मुलाच्या हट्टापायी तिने मुलं जन्माला घालायचा निर्णय घेतला आणि तो ही नवऱ्याच्या नकळत,कारण तिला माहीत होतं जर का खरं काय ते सांगितलं तर तिचा नवरा यासाठी कधीच मंजुरी देणार नाही. शेवटी जे व्हायचे तेच झाल.निर्मला झाली आणि पंधरा दिवसातच पोरीला आणि नवऱ्याला पोरकं करून गेली....(म्हणतात ना....बाप गेला की आई मुलांना सांभाळू शकते पण माय गेली की नवरा पण पोरका होतो,कारण बायको ही पत्नी कमी आणि आई जास्त असते)
सावत्र आई ने निर्मला चे हाल करू नये म्हणून त्यांनी दुसरं लग्न पण नाही केलं. उभं आयुष्य लेकीसाठी जाळून टाकलं.त्याच वेळेस कैवल्य च्या आईने तिच्या भावाला वचन दिलेलं की, काही झालं तरी तुझी लेक माझ्या घरची सून होईल.आज ती वेळ आली होती.
कैवल्य बराच उशीर शांत राहिला आणि शेवटी त्याने सांगितलंच.
आई......माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत."कैवल्य"
काय????? हे काय बोलतोयस तू....बरा आहेस ना??? अहो..... ऐकताय ना काय बोलतोय हा??"कैवल्यची आई"
हो ऐकल सगळं आणि मला माहित होतं आधीच.....फक्त तुला कस सांगावं हे कळत नव्हतं त्याला. "कैवल्य चे बाबा"
कळत नव्हतं की मुद्दाम त्याची साथ देताय???? अहो...माझ्या दादाने आपल्या अडचणीच्या वेळी किती मदत केली आपल्याला हे विसरलात का तुम्ही???त्याचे हे असे पांग फेडणार का आपण??आणि अहो मी शब्द दिला आहे त्याला...... की त्याची निर्मलाच आपल्या घरची सून होईल."कैवल्य ची आई"
तुझ्या शब्दापायी मुलाचं आयुष्य खराब करणार आहेस का? आणि आपल्याला मदत केली म्हणून त्याची परतफेड करायला आपल्या मुलाच्या आयुष्याचा बळी देणं कितपत योग्य आहे."कैवल्य चे बाबा"
हो मान्य आहे...... पण अहो.... ती पोरं आता आस लावून बसली असेल हो.......नाही......ते काही नाही... ती कोण मुलगी असेल तिला नकार दे??? आणि माझा निर्णय तुला मान्य नसेल तर या घरातून चालता हो..."कैवल्य ची आई"
आई.....अगं पण माझं काय??मला तरी विचार ना मी खुश आहे का??आणि लग्न झालंच तर मी तिला उपरं सुख तरी देऊ शकणार आहे का?? नाही आई.....अगं या निर्णयाने ना ती सुखी होईल ना मी.....मग ही तडजोड हवीच कशाला!!!!! मी बोलतो हवं तर मामाशी पाहिजे तर त्याची हात जोडून त्याच्या पाया पडून माफी मागतो."कैवल्य"(रडकुंडीला येऊन बोलत होता.)
नाही कैवल्य......तू अस काहीच करणार नाही... माझा निर्णय झाला आहे,आणि तुला तो मान्य असेल तर ठीक आहे नाही तर तू जाऊ शकतोस." कैवल्य ची आई"
ठीक आहे आई......तू जसं म्हणशील तसचं होईल....असं ही.... मी आणि मधुरा ने ठरवलंच होत दोघांपैकी एका ही घरून जर नकार आला तर आपल्या वाटा आपण वेगळ्या करायच्या, कारण घरच्यांना दुखावून आम्हाला आमचं विश्व नाही उभारायच आहे. मी मधुराला तसं फोन करून कळवतोच."कैवल्य"(एवढं बोलून कैवल्य तिथून निघून जातो)
कैवल्य चे बाबा समजावण्याचा खूप प्रयत्न करतात पण कैवल्यची आई तयारच नसते.
कैवल्य चे बाबा कैवल्यच्या खोलीत जातात....तर कैवल्य गॅलरीत उभा राहून एकटक आकाशाकडे बघत असतो असतो.त्यांचा धीर च होत नाही त्याच्याशी बोलण्याचा पण तरी ते पुढे जाऊन हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि हाताच्या पाचही बोटानी त्याचा खांदा घट्ट पकडतात.तसं एवढा वेळ थांबवून ठेवलेला हुंदका बाबांच्या मिठीत मोकळा होतो.
शांत हो बाळा.....असं करून कसं चालेल....."कैवल्य चे बाबा"
हम्मम्म....."कैवल्य"
मधुरा ला फोन करून कळव काय ते......ती वाट बघत असेल तुझ्या फोनची,आणि थोडा आराम कर..जास्त रडू नको तुला च त्रास होईल आणि तुला त्रास झालेलं मधुरा ला नाही आवडणार."कैवल्य चे बाबा"(एवढ बोलून ते कैवल्य च्या रूम बाहेर येतात.)
इकडे मधुरा सविता ताईना जेवणार नसल्याचं सांगते, आणि हॉल मध्ये येरझाऱ्या घालत काळजीत असते.एवढा उशीर झाला एक फोन ही घरच्यानी केला नाही आणि एवढी कसली शॉपिंग आहे काही कळतच नव्हतं तिला..एव्हाना रात्रीचे साडे दहा वाजत आले होते. ती पप्पा ना फोन करायला जाणार इतक्यात तिला गाडी चा आवाज आला तशी ती परत थांबली. पप्पा,मम्मी,आणि दोन्ही भाऊ घरात आले तशी मधुराने प्रश्नावली च त्यांच्या समोर धरली.दोन्ही भावांनी मिळून तिला आधी शांत राहायला सांगितलं. घरच्यांसोबत एक व्यक्ती अजून होती ती म्हणजे पप्पांच्या खास फ्रेंड चा मुलगा नितेश.......... सगळे खरेदी करून घरी निघणारच होते की नितेश आणि त्याचे वडील त्यांना भेटले.थोड्या फॉर्मल गप्पा झाल्या आणि नितेश च्या वडिलांनी नितेश साठी मधुरा चा प्रस्ताव समोर ठेवला. सगळे एवढे खुश होते की कोणालाच अस वाटलं नाही की एकदा मधुराला पण विचारावं.थोडक्यात सगळं बोलून झाल्यावर सगळे एका पंचतारांकित (फाईव्ह स्टार ) हॉटेल मध्ये जेवले आणि घरी आले नितेश चे वडील घरी गेले पण मधुरा च्या भावांच्या आग्रहाखातर नितेश एका रात्री साठी मधुरा च्या घरी आला होता.

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading