Dec 06, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???(भाग ६)

Read Later
काय फरक पडतो???(भाग ६)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/ 

मधुरा ऑफिस मध्ये येऊन पुन्हा कैवल्यला फोन करते पण अजूनही त्याचा फोन बंदच येत असतो. मधुरा नेहमीप्रमाणे तिची सगळी काम आटोपून निघायची तयारी करत असते तेवढ्यात तिला एका अननोन नंबर वरून फोन येतो.
हॅलो.......

हॅलो.......हां कोण.....???"मधुरा"

मी पंकज......कैवल्य चा कलीग....."पंकज"

हां......बोला ना..."मधुरा"
 

मी कैवल्य सोबत आहे.आमच्या ऑफिस च्या शेजारी एक फाईव्हस्टार हॉटेल आहे तिथेच.तुम्हाला जमेल का आता इथे यायला???प्लिज.......मी फार काही सांगू शकत नाही....फक्त तुम्ही या इकडे."पंकज"
 

हो येतेच मी........"मधुरा"(मधुरा एवढं बोलून लगेच कैवल्य च्या ऑफिस च्या दिशेने निघते.)

मधुरा तिथे पोचून पुन्हा पंकज ला कॉल करते.

हॅलो.......हा मी आली आहे इकडे.तुम्ही कुठे आहात??"मधुरा"

आलात का???? बरं मग वरती 3rd फ्लोअर ला या रूम नंबर 305 मध्ये. "पंकज"
 

ओके......"मधुरा"

मधुरा लगेच वरती जाते आणि रूम नंबर 305 चा दरवाजा नॉक करते,तस लगेच पंकज दार खोलतो.
मधुरा इकडे तिकडे बघतच आत जाते आणि बघते तर काय??????कैवल्य बेड वर निपचित पडलेला असतो.
त्याला तसं बघून मधुरा टेन्शन मध्ये येते आणि पंकज ला हे सगळं काय आहे विचारते.
कैवल्य आणि पंकज लहानपणापासूनचे मित्र आणि एकाच ऑफिस मध्ये कलीग सुद्धा त्यामुळे आई आणि त्याची लग्नावरून रात्री जी काही बाचाबाची झाली ते सगळं पंकज मधुराला थोडक्यात सांगतो.एकंदरीत सगळा प्रकार लक्षात येताच मधुरा कैवल्याच्या शेजारी जाऊन बसते......

तिच्या बॅग मधून ती वही पेन काढून एक चिट्ठी लिहुन एका एनवोलप मध्ये ठेवून तो एनवोलप ती पंकज कडे देते आणि काही न बोलताच तिथून निघून जाते. जाण्याआधी ती एकदा कैवल्यच्या डोक्यावरून हात फिरवून त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवून पाणावलेल्या डोळ्यांनी तिथून काढता पाय घेते.

जवळपास सहा तासांनी कैवल्यला जाग येते.त्याची  सगळी नशा उतरलेली असते पण डोकं मात्र खूप जड झालेलं असत.

पंकज लिंबू पाणी ऑर्डर करतो आणि काही वेळातच रूम ची बेल वाजते.वेटर लिंबू पाणी घेऊन आलेला असतो.पंकज दारातूनच वेटरच्या हातातला ट्रे घेऊन दार लावून घेतो. कैवल्य बेड ला मागे टेकून वरती सिलिंक कडे नजर लावून शून्यात बघत बसला असतो. तेवढ्यात पंकज लिंबू पाण्याचा ग्लास त्याच्या समोर धरतो. कैवल्य भरलेल्या डोळ्यांनीच तो ग्लास घेतो आणि घटाघटा लिंबूपाणी पिऊन ग्लास काही सेकंदातच रिकामा करतो.
पंकज कैवल्यला घरी फोन करून आज येत नाही असं कळवायला सांगतो. पंकज ने आधीच सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगून आजची रात्र कैवल्य सोबत राहणार असल्याच कळवतो. कैवल्य ऑफिस च्या कामासाठी आज बाहेर असल्याचा फोन आला होता अस बाबा कैवल्य च्या आई ला सांगून कैवल्यच्या खोलीत जातात, कारण दहा च्या सुमारास कैवल्यचे वडील त्याच हॉटेल मध्ये येऊन कैवल्यची हालत बघून गेले होते पण बायको आणि मुलगा दोघेही हट्टी असल्यामुळे त्यांचं दोघांपुढे ही काही चालेना. बिचारे खूप हतबल होते पंकजने त्यांना फोन करून बोलवून घेतलं होतं कदाचित ते काही करू शकतील एवढीच त्या मित्राची अपेक्षा होती त्यांनी पण त्याचं दुःख पंकज कडे व्यक्त करत लेकाच्या अश्या अवस्थेला बघून रडू लागले.
रात्री साडेबारा च्या सुमारास कैवल्य पण त्याच्या बाबांना फोन करून आज जास्तीच काम आहे तर येणार नाही असं सांगतो. त्याच्या त्या फोन वर बाबा फक्त हुं असच उत्तर देतात आणि फोन कट करतात.
पंकज दालखीचडी ऑर्डर करतो पंधरा मिनिटांनी वेटर ऑर्डर घेऊन येतो दोन प्लेट मध्ये दालखीचडी वाढतो आणि दोन ग्लास भरतो पाण्याचे आणि निघून जातो.कैवल्य ची जेवायची इच्छा नसते पण दिवसभर त्यांनी काही खाल्लेलं नसतं आणि त्यात ड्रिंक केलेली असते त्यामुळे त्याला खूप अशक्तपणा जाणवत असतो पण तो तस दाखवत नाही,पण म्हणतात ना मित्रांना काही नाही दाखवलं तरी ते त्यांना कळतच...... शेवटी मित्रच ते......

पंकज जबरदस्तीने त्याला खिचडी खाऊ घालतो आणि स्वतःही खातो, कारण कैवल्यच्या कळजीने तो पण उपाशीच असतो.

दोघेही खिचडी संपवतात.जवळजवळ अर्ध्या पाऊण तासांनी वेटर त्या प्लेट्स घ्यायला येतो.

कैवल्य टीव्ही वर न्युज बघत बसला होता पण त्याच लक्ष मात्र दुसरीकडेच होतं. वेटर निघून गेला तसं पंकजने मुळ मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली.

कैव्या......काय यार तू पण...... बास ना....आता हे सगळं थांबव यार......"पंकज"

सोपं नसतं रे सगळं.......किती स्वप्न बघितली होती आम्ही..."कैवल्य"

अरे स्वप्न असतातच मोडायला.....म्हणून तर त्यांना स्वप्न म्हणतात.....आणि सगळी स्वप्न पूर्ण कशी होणार??......"पंकज"

कैवल्य पंकज च बोलणं ऐकत असतो पण विचार फक्त मधुराचा असतो. पंकज च्या ही गोष्ट लक्षात येते तेंव्हा पंकज त्याच्यापुढे मधुरा ने दिलेलं एनवोलप देतो आणि गॅलरीत निघून जातो.कारण त्याला माहित असत त्या पत्रात जे काही लिहिलं असेल त्यामुळे त्याचा मित्र खूप जास्त दुःखी होणार आणि आणखीन च रडणार त्याला त्याच्या मित्राच दुःख बघायची हिम्मत नसते आता.

कैवल्य पत्र उघडून बघतो आणि अक्षरा वरून च ओळखतो की मधुरा येऊन गेली होती. तो एक नजर पंकज कडे बघून पत्र वाचू लागतो.

Dear,
Kaivaly
          हे बघ.......घरी जे झालं ते झालं त्या विषयाचा स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि आपलं ठरलं होतं ना.....दोन्ही घरून परवानगी असेल तरचं आपण आपलं आयुष्य सुरू करायचा.हे अस ड्रिंक करून स्वतःला त्रास करून घेऊन तु आपल्या प्रेमाला, आपल्या दोघांच्या नात्याला इजा पोहचवतो आहेस.आईला हे सगळं समजलं तर ती आपल्या लग्नाला तयारही होईल पण तिच्या मर्जीविरुद्ध आणि फक्त तुझ्या सुखासाठी.......तुझ्या अश्या वागण्याने आपलं लग्न जरी झालं तरी आई मला कधीच स्वीकारणार नाही......त्या मला कधी त्यांची सून मानणार नाहीत.

मला माहित आहे हे बोलणं खूप सोपं आहे पण आपल्याला हे करावंच लागेल आणि "प्रेम म्हणजे काय असतं रे.....आपल्या माणसाचं सुख आणि त्याच्या सुखात आपलं सुख बघणं....... ही भावना म्हणजेच प्रेम असतं ना....."तूच बोलतोस आणि तूच विसरतोस.तू निर्मला सोबत लग्न कर आणि आपलं जे काही होत ते सगळं विसरून जा......थोडं अवघड आहे पण अशक्य नाही!! कदाचित निर्मला तुला माझ्या पेक्षा जास्त प्रेम करेल माझ्या पेक्षा जास्त जपेल......आणि काय फरक पडतो आपल लग्न नाही झालं तर.....लग्न म्हणजेच सगळं काही नसतं ना रे........
तू घरी जाऊन आई ला निर्मला सोबतच्या लग्नासाठी तयार आहेस अस सांग आणि मूव्ह ऑन कर. तुझ वर्तमान आणि भविष्य फक्त आणि फक्त निर्मला आहे.... मी नाही.

कदाचित आपला एकमेकांसोबतचा प्रवास इथपर्यंतच होता.आपल्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत आणि हो या पुढे तू कधीच ड्रिंक किंवा इतर कुठलीही नशा करायची नाही समजलं ना????

काळजी घे स्वतःची आणि निर्मलाला तिच्या वाट्याच सगळं सुख दे कारण प्रत्येक मुलीला फक्त आपल्या माणसाची सोबत, प्रेम आणि तिच्या हक्काचा वेळ हवा असतो मग बघ.... तुला सुद्धा तिचा सहवास आवडू लागेल.

हे पत्र वाचून झालं की फाडून टाक आणि फक्त आजची रात्र खूप रडून घे आणि मोकळा हो तुझ्या मनात कुठल्याही प्रकरचा माझा विचार आपलं प्रेम आजच्या रात्री पुरताच येउदे. आईला हो सांगताना मनात मला आणू नको आणि इथून पुढे कधीच मला तुझ्या आयुष्यात आणू नको अगदी तुझ्या विचारात आणि आठवणीत सुद्धा....

                                                         मधुरा
 

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
तब्येत ठीक नसल्या कारणाने कथा पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व.????????????
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading