Dec 01, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???(भाग १)

Read Later
काय फरक पडतो???(भाग १)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कैवल्य आणि मधुरा ची भेट कॉलेज च्या एका कार्यक्रमादरम्यान झाली होती.त्या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीतून प्रेमात कधी झाले हे दोघांना देखील समजले नाही. 
मधुरा चांगल्या......मोठ्या घरातली आणि पाच पिढ्यांनंतर जन्माला आलेली  एकुलती एक मुलगी.चार भावांची लाडकी बहीण.सगळं कसं अगदी तिच्या मनासारखच होणार.घरात जेवण,भावांची खरेदी,आईवडिलांची खरेदी सगळं हिच्या पसंतीचे........पण लाडात वाढलेली असून खूप शिस्तप्रिय होती.घरात कामाला नोकर माणसं होती पण कधी त्यांच्या जवळ नोकर माणसं असल्यासारखा व्यवहार नाही केला.एका नामांकित कंपनीची मालकीण होती पण श्रीमंतीची घमेंड.......अजिबात नव्हती. अभ्यास, स्वयंपाक,कला-क्रीडा,बागकाम,गोरगरिबांना मदत,देवधर्म,नाती-गोती, या सगळयात हुशार होती म्हणजे कसं अगदी....... सर्वगुणसंपन्न.कुणालाही लगेच भावणारी,हवीहवीशी होती मधुरा......
तिच्या नावाप्रमाणेच मधुर.…....
अशी ही मधुरा आणि कैवल्य विश्वासाच्या झाडाला प्रेमाचा हिंदोळा बांधून त्यावर हळुवार.......झोके घेत पुढील भविष्याची स्वप्न रंगवत होते. दोन वर्षे झाली होती दोघांच्या या नात्याला पण दोघांनी आपली मर्यादा कधीच ओलांडली नाही.दोघांच्या लग्नाला दोन्ही घराची मनापासून संमती असेल तरच लग्न करायचं. जमेल तेवढं आपलं प्रेम त्यांना प्रेमाने समजावून त्यांना तयार करायच आणि तरी जर का घरच्यांना हे मान्य नसेल तर आपल्या वाटा वेगळ्या करायच्या असा निर्णय दोघांनी घेतला होता.त्रास तर होईल थोडा.... पण काही केल्या घरच्यांची मनं दोघांनाही दुखवायची नव्हती.कैवल्य ने सेटल झाल्यावर घरी आईवडील,भाऊ आणि बहिणीला सगळं सांगायचं ठरवलं. यात आणखी दोन वर्षे गेली.कैवल्य ने स्वतःचा वन बीएचके फ्लॅट चांगल्या मोठ्या सोसायटी मध्ये बुक केला होता.पगार पण चांगला होता.फ्लॅट हफत्यांवर घेतला असल्यामुळे कैवल्य च्या हातात जास्त पैसे राहत नव्हते.घरी आई ला पैसे आधी एवढेच देत होता पण त्याच्या स्वखर्चाल जास्त पैसे उरत नव्हते.त्याला लग्नानंतर मधुरा चा खर्च कसा झेपेल याचीच चिंता होती कारण मधुरा लाडाकोडात वाढलेली मुलगी होती हे त्याला चांगलंच माहीत होतं.कैवल्य फार टेन्शन मध्ये होता.कैवल्य चे बाबा आणि कैवल्य यांच्यामध्ये बापलेकाच्या नात्यासारखच एक गोड निरागस मैत्रीचं नातं जास्त होत त्यामुळे कैवल्य ची मनस्तिथी त्यांना थोडी फार अवघडलेली वाटत होती. कैवल्याच्या बाबांनी संध्याकाळी त्याला एका कॉफी शॉप बाहेर मधुरा सोबत बोलतांना बघितलं. मधुरा आणि कैवल्य मध्ये वाद होत आहेत असं त्यांना जाणवलं कारण मधुरा डोळे पुसत होती आणि कैवल्य समजावू पाहत होता.शेवटी कैवल्य मधुरा ला एकटं टाकून तिथून निघून गेला. मधुरा बराच वेळ जागच्या जागी उभी होती.कैवल्य निघून गेला त्याच दिशेने एकटक बघत डोळे पुसत होती.रहदारीचा रस्ता असल्याकारणाने ती कसा बसा तिचा हुंदका आवरत होती. तिला असं रडताना बघून कैवल्य च्या बाबांनी एक पाण्याची बॉटल घेऊन तिच्यापुढे धरली.कैवल्य च्या बाबांना अस अचानक समोर बघून मधुरा गोंधळते आणि डोळ्यातलं पाणी पुसते.मधुरा आणि कैवल्यचे बाबा या आधी दोन तीन वेळा भेटलेले असतात आणि कैवल्य ने मैत्रीण आहे असं सांगून दोघांची भेट घालून दिलेली असते.
कैवल्यचे बाबा तिला राडण्यामागच आणि कैवल्यचं असं तडकाफडकी निघून जाण्याचं कारण विचारतात.मधुरा तर आधी सगळं लपवण्याचा प्रयत्न करते पण बाबा तिला सगळं खरं खर सांग असं म्हणून बजावतात.
तशी मधुरा सगळं सांगते.बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला शांत करतात. दोघे पुन्हा त्या कॉफी शॉप मध्ये जातात बाबा स्वतःसाठी आणि मधुरा साठी कॉफी ऑर्डर करतात.
"हे बघ बाळा......कैवल्य तुझ्यासाठी आणि तुझ्या भविष्यासाठी असं बोलला असेल कारण तू मोठ्या घरातली एखाद्या राजकुमारी सारखी वाढलेली मुलगी आहेस.तुमच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आणि मोठमोठ्या खोल्या असलेली घरं आहेत.घरं कसली बंगला(महालच)आहे तुमचा,आणि आमचं राहत घर दोन खोल्यांच त्यात तुला ऍडजस्ट होता येणार आहे का?प्रेमात अश्या सगळ्या शपता वैगरे घेणं ठीक आहे पण शेवट पर्यंत निभावता आलं पाहिजे."कैवल्य चे बाबा
"बाबा.....तुम्ही मला माझ्या वडीलांसारखे आहात. मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार.मी आहे त्या परिस्थितीत कैवल्य सोबत राहायला तयार आहे माझ्याकडून मी सगळे प्रयत्न करेन पण कैवल्य आता नाही ची रट लावून बसला आहे. आणि मोठ्या घराचं बोलाल तर मला त्याची अजिबात सवय करून घेतली नाही मी......हा आता एकुलती एक मुलगी म्हणून माझ्या आईबाबांनी भावांनी माझे खूप लाड केले आहेत पण मी लाडवलेली अजिबात नाही. कैवल्य जसा मला ठेवेल तशी मी राहायला तयार आहे फक्त त्याची साथ हवी."मधुरा
"ठीक आहे......... मी कैवल्यशी बोलतो आज"कैवल्य चे बाबा
एवढं बोलून बाबा मधुरा चा निरोप घेतात.बाबांजवळ बोलून तिला ही थोडं हायस वाटते. मधुरा घरी पोचते आणि कैवल्य ला फोन करते पण कैवल्य काही केल्या तिचा फोन उचलत नव्हता.मधुरा उदास होऊन न जेवतात झोपून जाते.रोज उशिरापर्यंत जागणारी मधु आज लवकर कशी झोपली म्हणून तिचे पप्पा तिला बघायला तिच्या खोलीत आले त्यांना वाटलं तिला बरं वाटत नसेल म्हणून ते तिची विचारपूस करायला गेले.पन मधुरा झोपली होती त्यांनी तिच्या डोक्याला हात लावून पाहिलं........ताप वैगरे नाही ना....... पण तस काहीच नव्हतं म्हणून ते गुपचूप दार बंद करून खोलीबाहेर आले.बाहेर हॉल मध्ये सगळे चिंतेत होते की मधुरा लवकर का झोपली पप्पा हॉल मध्ये येतात आणि मधुरा झोपल्याच सांगतात.मधुरा नसल्याने सगळेच घासभर खाऊन झोपायला जातात आपापल्या खोलीत.सकाळी मधुरा उठते तर फोन वर पंधरा नोटिफिकेशन असतात आणि त्या कैवल्य च्या असतात.मधुरा लगेच कैवल्य ला फोन करते.
"हॅलो........"कैवल्य
"हम्मम्म्मम......"मधुरा
आता राग आलाय म्हंटल्यावर कुठली गर्लफ्रेंड लगेच बोलणार आहे....... थोडा तरी भाव खाणारच ना.....????????
"अगं राणी........बोल आता....रात्री पासून तर फोन करत होतीस मग आता काय झालं आमच्या बाईसाहेबांना......"कैवल्य
"हो का.......लवकर आठवण आली हा.... राणी ची........."मधुरा
"अगं....... मी जरा.........पण ते जाऊदे......बाबा तुला कुठे भेटले!"कैवल्य
"तिथेच........जिथे तू मला एकटीला टाकून गेलास......."मधुरा
"टाकून गेलो.........ए टाकून बिकून नाही गेलो हा.....जरा टेन्शन होत गं....... कसं सांगू तुला......जाऊदे सोड तो विषय.......काल साठी सॉरी........"कैवल्य
"काय????परत बोल ऐकू नाही आलं मला."मधुरा
"हो का........बरं मग आता नीट ऐक.......umhaaaaaaaaa........I Love You माझी राणी..........आता पण सॉरी ची गरज आहे का??"कैवल्य
"कैवल्य.........बाय..........ठेवते मी फोन"(मधुरा लाजतच फोन कट करते) फोन वर दिलेल्या kiss ने........मधुरा चे गाल नुसते लाजूनच लाला झाले होते.ती एखादया पक्ष्यप्राणाने तिच्या मोठ्या.......बेड वर दोन्ही हात लांब करून गोल गोल फिरत होती आणि लाजत होती. तेवढ्यात तिच्या रूम च्या दारावर टकटक ऐकू येते.मधुरा मोठा........श्वास घेते आणि थोडी नॉर्मल होते.
"पप्पा तुम्ही.......या ना आत...."मधुरा
"कसं वाटतय आता तुला......काल माझं कोकरू एवढं शांत का बरं होतं??कोणी काही बोलले का तुला???की कामात काही झालं??"मधुरा चे पप्पा
"अहो नाही....... तसं काही नाही.......वर्कलोड मुळे जरा थकले होते......म्हणून झोपली लवकर.....बाकी काही नाही..."मधुरा
"नक्की ना बेटा........."मधुरा चे पप्पा
"हो पप्पा.....नक्की....चला आता मला खूप भूक लागली आहे...... सविता काकींना निरोप द्या मला त्यांच्या हातचं गरम गरम थालपीठ आणि दही हवंय ब्रेकफास्ट ला....."मधुरा
"ओके मॅडम..... जशी तुमची आज्ञा........"मधुरा चे पप्पा
(एवढं बोलून ते तिथून निघून जातात आणि त्यांच्या कूक आहेत सविता त्यांना सगळ्यांसाठी थालपीठ बनवायला सांगतात.)
……………………………
क्रमशः
या कथेचे सगळे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत तरी कथा पोस्ट करताना लेखिकेच्या नावासहित करावी.साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे.कथा कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करत राहा.
धन्यवाद.????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading