Dec 01, 2021
Kathamalika

काय फरक पडतो??? (भाग १४) अंतिम

Read Later
काय फरक पडतो??? (भाग १४) अंतिम

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/
 

भाग ९
https://www.facebook.com/581606972323826/posts/1055565224927996/

भाग १०
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-10_5254

भाग ११
https://www.facebook.com/581606972323826/posts/1058459074638611/

भाग १२
https://www.facebook.com/581606972323826/posts/1060582481092937/

भाग १३

https://www.facebook.com/581606972323826/posts/1062070617610790/

दोन महिन्यानंतर
###########

नितेश कॉन्फरन्स मिटिंगसाठी पंधरा दिवस जपानला   जातो म्हणून मधुरा आणि परी मुंबईला येतात. मधुरा तिच्या घरी म्हणजे मम्मी पप्पांकडे आठ दिवस राहून मग सासरी यायचं अस ठरवते.........जेणेकरून दोन्ही कडे वेळ देता येईल. परी आणि मधुरा च्या येण्याने घरी एखादा सण असल्यासारख वाटत होतं सगळ्यांना.

चार दिवस छान गेले.अचानक बाहेर गार्डन  मध्ये सगळे जण मज्जा मस्ती करत असताना मधुराला चक्कर येते.सगळ्यांना वाटते मधुरा परी सोबत मस्ती करते.... '  1 पण परी च्या खूप वेळा उठवण्याने सुद्धा मधुरा हलत नाही. तेंव्हा मात्र सगळे घाबरतात.मधुराचे पप्पा पटकन गाडी काढतात आणि दोन्ही भाऊ मधुरा ला उचलून गाडीमध्ये व्यवस्थित झोपवतात. मधुरा चा मोठा भाऊ तीच डोकं आपल्या मांडीवर घेऊन तिला सारखं उठवण्याचा प्रयत्न करत असतो, तर दुसरा भाऊ तिच्या हातापायाचे  तळवे घासत असतो. मधुरा चे पप्पा ड्राइव्ह करता करताच मधुरा ला आवाज देतात. पण मधुरा मात्र हुं नाही की चू नाही. इकडे मधुरा ची आई तिच्या घरच्यांना कळवते.

परी पण खूप घाबरलेली असते.तिला फार काही कळत नसलं तरी तिची मम्मा बोलत नाही एवढंच समजत असत. मधुराला जवळच तोंडारे प्रायव्हेट इस्पितळात दाखल करतात.मधुराच्या सासरकडची  मंडळी पण लगोलग इस्पितळात येतात. डॉक्टर तिला आतमध्ये घेऊन चेकअप करून अर्जंट सोनोग्राफी करावी लागेल असं सांगतात. सोनोग्राफी होते आणि रिपोर्ट येतात.मधुरा थोड्या वेळाने शुद्धीवर येते.डॉक्टर पुन्हा तिचं चेकअप करून तीला ती आई होणार असल्याचं सांगतात.मधुरा साठी तर आकाश ठेंगण होत.पण तिला लगेच लक्षात येत की नितेश कधी बाप होऊ शकत नाही आणि ती विचारात जाते.तिला या गोष्टीवर विचार करताना बघून डॉक्टर तिला विचारात.

काय झालं.........एवढी आनंदाची बातमी आणि तुझ्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह का?? "डॉक्टर"

डॉक्टर..........नितेश म्हणजे, माझे मिस्टर त्यांना अपत्य सुख नाही........तसे त्यांनी रिपोर्ट करून कन्फर्म केलं आहे.... म्हणजे.........खरं तर मी प्रेग्नंट आहे त्यामुळे  मला शब्द सुचत नाही आहेत......"मधुरा" (डॉक्टर तिला पाणी देतात. थोडं पाणी पिऊन तिला बर वाटते आणि ती बोलायला सुरुवात करते.)
 

माझं आणि नितेश च लव्ह मॅरेज म्हणजे तस नितेशच मागणं आधी मला आलं होतं, पण माझं एका मुलावर प्रेम होतं त्यामुळे मी नितेशला नकार दिला.ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्या घरून आमच्या लग्नाला परवानगी भेटली नाही आणि म्हणून आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. त्या मुलाचं त्याच्या मामेबहिणीशी लग्न झालं.त्याला विसरण्यासाठी मी बेंगलोर ला गेले आणि पुन्हा माझी भेट नितेश सोबत झाली.कामानिमित्त रोज भेटणं आणि बोलणं होऊ लागलं आमचं. त्यातच मी एकदा माझ्या एक्स च फेसबुक चेक केलं त्यात त्याचे त्याचा बायको सोबत चे फोटो बघितले. मनात विचार आला आपणचं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि आता त्रास का करून घेतोय. या सगळ्या विचारात मी मूव्ह ऑन होण्याचं ठरवलं.माझ आणि माझ्या एक्स बद्दल नितेश ला मी सगळं आधीच सांगितलं होतं आणि त्यावेळी खरं तर नितेशला ही लग्न करायचं नव्हतं कारण तो कधीच बाप नाही होऊ शकत आणि ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती....... तरी मी त्याच्याशी लग्न केलं. त्यानंतर आम्ही  एका मुलीला दत्तक घेतल आणि अचानक आता ही प्रेग्नंसी......... म्हणजे हे कसं शक्य आहे. मी स्वतः त्याचे रिपोर्ट बघितले आहेत."मधुरा"
 

तुला जर माहीत होतं तो बाप नाही होऊ शकत तरी तू का लग्न केलंस???" डॉक्टर "

मुलं म्हणजे सगळं काही नसतं ना..........आणि तो मला व्यक्ती म्हणून खूप आवडतो.......आणि बाळाचं बोलाल तर आम्ही एका निष्पाप, निरागस मुलीला खूप सुख देतोय आमचं पालकत्व तिच्या भोवती फिरतय..."मधुरा"

सगळं माहीत असून एवढं मोठं पाऊल उचलायला खूप हिम्मत लागते मधुरा...........आणि तुमच्या प्रेमानेच तुझ्या नवऱ्यामध्यला सगळ्या त्रुटी भरून निघाल्या......अजून काय पाहिजे......"डॉक्टर"

मला DNA TEST करून घ्यायचे आहेत डॉक्टर............"मधुरा"

What............ पण का??? "डॉक्टर"
 

डॉक्टर......... ज्या मुलावर माझं प्रेम होतं तो पण बेंगलोर ला शिफ्ट झालाय.म्हणजे त्याची ट्रान्सफर झाली आहे तिकडे....... आणि त्याच अधून मधून घरी येणं होतं आमच्या.......त्यात साधारण.......दोन महिन्यांपूर्वी घरी नितेश नसतात एक रात्र तो आमच्या घरी थांबला होता आणि माझी प्रेग्नंसी पण दोन महिन्यांचीच आहे तर..........म्हणजे आमच्यात काही झालं नाही....... म्हणजे कधी काही होणारच नाही...... पण तरी नितेश ला डाऊट नको कुठला.........म्हणून मला करून घ्यायचे आहेत.तसा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्याचा पण तरी........ समजतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते........मधुरा भुवया उंचावत डोळे बारीक करून डॉक्टरांना समजवण्याच्या भाषेत बोलत होती.
 

डॉक्टर पण रेडी झाल्या DNA TEST साठी पण प्रेग्नंसी बद्दल घरात कोणाला सांगू नये असं ही तिने डॉक्टरांना सांगितलं होतं.

थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येऊन मधुरा ठीक असल्याच सांगतात.

मधुरा ला लगेच घरी सोडण्यात येत. निघायच्या आधी ती डॉक्टरांचा नंबर घेते आणि नितेश आला की रिपोर्ट करायला येते अस सांगते.इकडे नितेश ला त्याची मम्मी  फोन करून सगळं सांगते, तसं नितेश त्याच्या मिटिंग पुढे ढकलून लगेच मुंबईला येण्याची तयारी करतो.दोनच दिवसात नितेश मुंबईत पोचतो आणि डिरेक्टली मधुराच्या घरी जातो. नितेश चे मम्मी पप्पा पण तिकडेच असतात.
 

मधुरा तिच्या खोलीत बेड वर बसून तिच्या आणि नितेश च्या बाळाची स्वप्न रंगवत बसलेली असते.मधुरा च्या खोलीचं दार उघड असल्याने नितेश हळूच बघतो मधुरा जागी आहे की झोपली आहे. बघतो तर काय ही एकटीच पोटावरुन हात फिरवत हसत असते.नितेश ला मधुरा कडे बघून फार हसू येतं.

 

हे बरं आहे......... आमच्या जीवाला घोर लावून राणीसरकार एकट्यातच हसताहेत. एवढा कोणता जोक झाला की एकटीच हसतेस हा........."नितेश"

 

नितेश.............तू........तू कधी आलास???" मधुरा"

तेंव्हाच.......जेंव्हा तू स्वतःशीच हसत होतीस."नितेश"
नितेश तिच्या बाजूला बेड वर येऊन बसतो.

नितेश च्या या बोलण्यावर मधुरा त्याच्या कुशीत शिरते. नकळत तिच्या डोळ्यांत पाणी येत.तिच्या त्या अश्रुंचे थेंब नितेश च्या हातावर पडतात.तस नितेश तिला आणखी जवळ घेऊन काय झालं विचारतो.तशी मधुरा काही नाही म्हणून नितेशला आणखी घट्ट मिठी मारते. दोघेही बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात.मधुराला त्याला सांगायचं असतं की तो बाबा होणार आहे, पण मनात भीती ही असते.ती स्वतःच्या मनाला आवर घालून ती आता ठणठणीत असल्याचं सांगते. नितेश मग मधुरा ला खाली घेऊन येतो. सगळे मिळून डिनर करतात नितेश तिथेच राहतो आणि त्याचे मम्मी पप्पा घरी जातात.सगळे त्यांना राहण्यासाठी आग्रह करत असतात पण दुसऱ्या दिवशी नितेशच्या पप्पांची डॉक्टर ची अपॉईंमेंट असते.
 

परीला झोपवून नितेश आणि मधुरा दोघेही प्रेमाच्या गप्पा मारत असतात.मधुरा ला खूप मन असत सांगण्याचं पण तिचा नाईलाज असतो. नितेशचा तिच्यावर विश्वास आहे हे माहीत असूनही तिला कुठली रिस्क घ्यायची नसते.दोघेही गप्पा मारत रात्री झोपतात.मधुरा सकाळी उठून सगळं आवरून घेते आणि डॉक्टर ना हॉस्पिटलमध्ये येण्याबाबत विचारते. डॉक्टर संध्याकाळी येण्यासाठी सांगतात.

 

मधुरा आणि नितेश हॉस्पिटलमध्ये पोचतात तशी नर्स नितेश चं रक्त घेण्यासाठी त्याच्या जवळ जाते तसा नितेश नर्स ला तो पेशंट नसल्याचं सांगतो. तेवढ्यात मधुरा येते.

अरे रुटीन चेकअप करून घ्यायला काय हरकत आहे........ म्हणून मीच सांगितलं त्यांना तुझं रक्त घेण्यासाठी.आता मलाच बघ ना कशी अचानक चक्कर आली त्यादिवशी. "मधुरा"

बरं....... मॅडम.......करु आपण टेस्ट....."नितेश"
(मनात कुठलीही शंका न आणता नितेश रक्त घ्यायला नर्स ला परवानगी देतो. आणि मधुरा स्वतःही आपले रक्ताचे सॅम्पल देऊन लॅब बाहेर येते.)

नितेश आणि मधुरा डॉक्टर च्या केबिन मध्ये जाऊन डॉक्टरांशी बोलून घेतात. डॉक्टर मधुरा ला जमेल तेवढा आराम करण्यासाठी सांगतात.मधुरा नितेश ला बाहेर जायला सांगते.

डॉक्टर.......... DNA TEST चे रिपोर्ट कधी पर्यंत भेटतील??? "मधुरा"

उद्या संध्याकाळी भेटतील....... पण तू येऊ नको घ्यायला मी रिपोर्ट तुझ्या घरी पाठवेन.तुला खरंच आरामाची गरज आहे मधुरा..….."डॉक्टर"
 

नाही नको...........मी स्वतः येईन आणि मी फार दगदग नाही करणार......प्लिज डॉक्टर.......!! "मधुरा"
 

बरं....... पण एकटी येऊ नको...कोणाला तरी घेऊन ये सोबत..."डॉक्टर"
 

हो डॉक्टर.......चला येते मी....."मधुरा"

दोघेही घरी जातात पण मधुरा च मन एका ठिकाणी स्थिर नव्हतं.नितेशला तिची अस्वस्थता दिसत असते.

काय झालंय तू एवढी टेन्स का दिसतेस."नितेश"

काही नाही........थोडं थकल्या सारख वाटतंय......"मधुरा"
 

चल बस इथे........ मी जरा तेल लावून देतो तुझ्या केसांना......थोडं बरं वाटेल......"नितेश"
 

हम्म....ठीक आहे."मधुरा"

मधुरा पण लगेच बसते कारण तिला पण रिलॅक्स व्हायची खूप गरज असते.

नितेश छान पैकी हळुवार तिच्या केसांना तेल लावून हलक्या हाताने डोक्याची मसाज करतो.मधुरा ला पण खूप बरं वाटतं.नितेश डोकं घासून देईपर्यंत विचारात असलेली मधुरा नितेशच्या मऊसूत स्पर्शाने शांत झोपी जाते.नितेश पण तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि परी ला घ्यायला जातो.

परी......चल पिल्लू........रात्री मम्मा भरवायला नाही म्हणून थोडूसाच भातु खाल्ला आहेस तू.......आता दुधात चॉकलेट होरलेक्स टाकायचं आणि पटापट फिनिश करून झोपायचं........काय????"नितेश"
 

इवलीशी परी दूध तर पिते पण झोपायला मात्र आजीआजोबांची कुशी पाहिजे असा  हट्ट करते. मग काय लेकीच्या हट्टापुढे कुठल्या बापाच कधी चाललं आहे का??? तर नितेश च चालणार होतं........मग नितेश ने परी ला मधुराच्या मम्मी पप्पांच्या खोलीत नेलं.दोघे पण तिला छान गोष्टी सांगून झोपवतात.इकडे नितेश पण त्यांच्या खोलीत येतो.मधुराच्या अंगावर पांघरून घालून नितेश त्याच्या लॅपटॉप वर थोडं काम करत बसतो.रात्री बऱ्याच उशिरा नितेश झोपायला जातो.
 

मधुरा ला पहाटे सगळ्यांच्या आधी जाग येते.ती उठते आंघोळ करून देवासमोर दिवा लावते आणि मग सगळ्यांसाठी किचन मध्ये प्रत्येकाच्या आवडीचा नाष्टा बनवते. नितेश साठी रवा इडली,परी साठी निर डोसा, मम्मी च्या आवडीचे दडपे पोहे,पप्पांना उडीद डाळ टाकून केलेला उपमा आणि दोन्ही भावांसाठी आणि तिच्या साठी  स्पेशल पनीर चीज सँडविच बनवते. सगळेजण उठून आंघोळया करून आपापल्या रूम मधून खाली येतात.मधुरा किचन मध्ये सगळा नाश्ता व्यवस्थित डायनिंग टेबल च्या मधोमध अरेंज करून ठेवते. आज बऱ्याच दिवसांनी सगळे जण असा आपापल्या आवडीचा नाश्ता करणार होतं आणि ते ही मधुराच्या हातचं म्हणजे सोन्याहून पिवळं........
 

सगळे जण  यथेच्छ नाश्ता करतात. मधुराचे भाऊ आणि पप्पा नाश्ता करून ऑफिसला जातात.नितेश पण त्याच ऑफिसच काम घरूनच करत असतो. सकाळच्या एवढ्या हेवी नाश्त्यामुळे नितेश ने दुपारी सादच काही तरी खाण्याची इच्छा व्यक्त केली आणि मधुराला ही सादस जेवण च हवं होतं म्हणून मग दुपारची खिचडी मधुरा ची मम्मी स्वतः बनवते.मुगाची डाळ,तांदूळ आणि हळद मीठ टाकलेली मऊ मऊ खिचडी...... त्यावर तुपाची धार,सोबत भाजलेला पापड आणि थंडगार दही.........

 

जेवण झाल्यावर मधुरा गार्डन मध्ये बसली असते. तेवढ्यात मागून नितेश येतो.

काय गं......... काय झालं आहे का??? काल पासून बघतोय मी......तू कुठल्याश्या विचारत आहेस. कसलं दडपण आहे का?? "नितेश"

नाही रे.......तस काही नाही...... पण हा थोडं टेन्शन आहे........पण काळजी नको करू मी ठीक आहे.... बरं माझं सोड.......संध्याकाळी आपण हॉस्पिटलमध्ये जातोय रिपोर्ट घ्यायला आहे ना लक्षात!! "मधुरा"
 

हो लक्षात आहे..... म्हणून तर संध्याकाळचं काम पण आताच उरकून घेतलं आहे..."नितेश"

बरं......"मधुरा"

दोघेही गार्डन मध्ये फिरत असतात.पण मधुरा मात्र शांतच असते.एवढं विचारून पण काही सांगत नाही म्हंटल्यावर नितेश पुन्हा तिला काही विचारत नाही पण त्याला तिच काळजीत असणं समजत होत.
 

संध्याकाळी दोघेही हॉस्पिटलमध्ये पोचतात.डॉक्टर ओटी मध्ये असल्यामुळे नर्स त्यांना बाहेर थांबायला सांगते.तासाभरात डॉक्टर फ्रेश होऊन केबिन मध्ये येतात तशी नर्स त्यांना, डॉक्टर आत बोलवत असल्याचं सांगते.मधुरा आणि नितेश आतमध्ये जातात. डॉक्टर रिपोर्ट खोलून बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर गोड अशी स्माईल येते. त्या मधुरा कडे बघतात आणि एक नजर नितेश वर पण टाकतात.त्याला तर काही कळतच नसत काय चाललंय ते.
 

मधुरा.......ये आत.......चेक करते तुला......"डॉक्टर"
मधुरा उठून बाजुला पडद्या मागे असलेल्या बेड जवळ जाते. डॉक्टर पुन्हा तिच्या कडे बघून हसतात आणि तिच्या गालावर हात ठेवून तिला सांगतात.......

अगं....... एवढं टेन्शन घेऊ नको........तुझ्या साठी आनंदाची बातमी आहे. खरं तर ही बातमी मी त्या दिवशीच दिली होती पण तुला शंका होती पण आता कुठलीच अडी ठेऊ नको........रिपोर्ट नितेश सोबत मॅच झाले आहेत.अभिनंदन मधुरा........तू आई होणार आहेस........"मधुरा"

मधुराच्या डोळ्यातून तिचा आनंद हा अश्रूंच्या रुपात वाहत  होता...मधुरा डॉक्टरांना कडकडून मिठी मारते आणि थँक्स बोलते. डॉक्टर पण तिचे डोळे पुसून तिला चेक करून घेतात.
मधुरा बाहेर येते तिचे भरलेले डोळे आणि चेहऱ्यावर आनंद बघून नितेश ला काही कळतच नसत कालपासून विचारात असणारी आज अचानक एवढी खुश कशी????
मधुरा नितेशच्या बाजूला जाऊन बसते.एवढ्यात डॉक्टर हात धुवून येतात आणि त्यांच्या खुर्चीवर बसतात.
 

अभिनंदन मिस्टर इनामदार.............तुम्ही बाबा होणार आहात......."डॉक्टर"

काय????

समजून न समजल्यासारखं नितेश बोलतो आणि मधुरा कडे बघतो मधुरा लाजेनी नजर खाली करून हसते. पण नितेश ला या गोष्टीवर विश्वास नसतो.

डॉक्टर मधुरा चे प्रेग्नंसी रिपोर्ट आणि DNA TEST चे रिपोर्ट दाखवून सगळ नीट समजावून सांगतात.मधुरा ला काही व्हिटॅमिन आणि कॅल्शियम च्या गोळ्या लिहून देतात आणि रोज दुधात टाकून पिण्यासाठी प्रोटीन पावडर सांगतात.तिने कधी काय खाल्लं पाहिजे आणि तिची घ्यावयाची काळजी अश्या सगळ्या गोष्टी डॉक्टर जातीने नितेशला आणि मधुराला समजावतात. वय जास्त झाल्यावर आई आणि बाळाला होणार त्रास याकडे लक्ष देता डॉक्टरांनी मधुराची जास्त काळजी घ्यायला सांगितली नितेशला.नितेश सगळं लक्ष देऊन ऐकतो आणि डॉक्टर जे सांगतीलं जसं सांगतील तसं करेन अस मधुराला आशवस्त करतो.

दोघेही डॉक्टरांचा निरोप घेऊन निघतात आणि डॉक्टरांच्या सांगण्यानुसार दर महिन्याच्या ठराविक अश्या तारखेला चेकअप आणि सोनोग्राफी साठी येऊ अस सांगून बाहेर नर्स करवी मधुराची फाईल बनवून घेतात.

मधुराला खूप भूक लागलेली असते म्हणून दोघेही हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या हॉटेल मध्ये जातात. मधुराला जे खावंसं वाटते ते तो मागवायला सांगतो. मधुरा स्वीट कॉर्न सूप आणि पनीर टिक्का मागवते.नितेश तर फक्त मधुरा कडे बघत असतो.त्याला खूप आनंद झालेला असतो पण त्यापेक्षा जास्त मधुरा चा राग आलेला असतो कारण ती त्यांच्या बाळाचे DNA TEST करून घेते.
 

काय झालं.......तू खुश नाही का???? "मधुरा"

हो खूप खुश आहे मी.......जो आनंद मी तुला देऊ शकत नाही.........हे माहीत असून तू माझ्याशी लग्न केलंस आणि आता आपल्याला बाळ होणार आहे म्हंटल्यावर तू त्याचे DNA चे रिपोर्ट करावे???? का मधुरा???? कशासाठी??? "नितेश"

तू बाप होणार नाही हे सगळ्यांनाच माहीत होतं.....तसे तू रिपोर्ट्स पण केले होते आणि तरी मी प्रेग्नंट कशी हा प्रश्न जर कोणाला पडला तर..!!!!! आणि दोन महिन्यापूर्वी कैवल्य एक रात्र आपल्या बंगलोरच्या घरी राहूनही गेला आहे.....कधी तुझ्या मनात शंका आली तर.....या गोष्टीमुळे आपल्यात दुरावा किंवा गैरसमज नको म्हणून हा अट्टाहास केला......"मधुरा"
 

म्हणजे....... तुला वाटत की माझा तुझ्यावर विश्वास नाही.... असेच ना??? "नितेश"

असं नाही अरे......प्लिज असा विचार नको आणू तू मनात आणि सोड ना तो DNA चा विषय........काय फरक पडतो ??? "Test केले तर......सोड ना आता......."मधुरा"
 

मधुराला जास्त त्रास नको म्हणून नितेश तो विषय तिथेच संपवतो.दोघेही खूप खुश असतात.नितेश मधुरा ला गाडीत बसवून मिठाईच्या दुकानात जातो आणि मधुराच्या आवडीच्या सगळ्या मिठाई एक एक किलो घेतो. शिवाय घरच्यांच्या आवडीचे पण काही नमकीन घेतो.बिल पेड करेपर्यंत नितेश मधुरा च्या मम्मी पप्पा आणि दोन्ही भावांना परीला घेऊन ताबडतोब त्याचा म्हणजे नितेशच्या घरी येण्यासाठी सांगतो.अचानक नितेश च्या अश्या सांगण्याने त्यांना वाटते त्यांच्याकडून काही चुकलं की काय........पण ते काही न विचारता नितेश च्या घरी पोचतात.

 

सगळे आल्यावर मधुरा आणि नितेश दोघे मिळून ही गोड बातमी सगळयांना सांगतात. सगळे खूप खुश होतात.लेक आई होणार ही भावनाच मधुराच्या मम्मी च्या डोळ्यातला आनंद सांगत असते.
 

नितेश पण वर्षभरासाठी मुंबईतूनच काम करणार असतो आणि वर्षभर तो बाहेर कुठल्याही ऑर्डर घेणार नसतो.नितेश ही गोड बातमी कैवल्यला पण सांगतो.मधुराची गोड बातमी कळताच निर्मला आणि कैवल्य लहान्या कौस्तुभ ला घेऊन मधुराच्या सासरी मधुराला भेटायला येतात. निर्मला मधुरासाठी स्वतःच्या हाताने गुलाबजामुन,ओल्या नारळाच्या वड्या,गोड आंबट तिखट लोणच, आणि काही चटपटीत पदार्थ जे तिला खाऊ वाटतील असं सगळं घेऊन येते.मधुराला बघताच निर्मला तिला कडकडून मिठी मारते आणि दोघांचही अभिनंदन करते. थोड्या गप्पा मारून दोघेही सगळ्यांचा निरोप घेऊन निघतात.
 

बघता बघता मधुराला सातवा महिना लागतो.सगळ्यांची ओटी भरणीची तयारी चालू असते.अस तर सगळं डेकोरेशन हे आधीच सगळ्यात चांगल्या आणि महाग डेकोरेटर्स ना दिल होतं.......पण तरी बाकी सगळी तयारी करायची होती.निर्मला पण घरीच काही पदार्थ बनवते. सगळे मिळून मधुराचं डोहाळे जेवण करतात.तिचे सगळे लाड पुरवतात.मधुराची सासू,आई आणि निर्मला सगळे जण मिळून तिला हवं नको ते सगळं देतात.बाळ पण या सगळ्याचा मनमुराद आनंद घेत असतो.मधुराच्या पोटात गोल गोल फिरणं.फुटबॉल खेळणं,नितेश तर हे सगळं खूप एन्जॉय करत असतो आणि छोट्या परीला ही मज्जा येत असते.

असचं नितेश आणि मधुरा गॅलरीत रात्री अडीच वाजता गप्पा मारत बसलेले असतात. मधुराला फालुदा खायचा असतो म्हणून नितेश जवळच असलेल्या एका हॉटेल मधून फालुदा घेऊन येतो.मधुरा फालुदा खात असते तर नितेश बाळाच्या पोटातल्या गमतीची मज्जा घेत असतो.एवढ्यात मधुराची पानमोकली फुटते.दोघांनाही हे नवीन असल्याने त्यांना काही समजत नाही....... म्हणून नितेश मधुराला नीट बसवून पटकन त्याच्या मम्मी ला बोलावून आणतो.नितेशची मम्मी समजून जाते की आता मधुराच्या डिलिव्हरीची वेळ झाली आहे.त्या लगेच मधुराला काळीमिरीचा चहा करून देतात.आणि नितेशला गाडी काढायला सांगतात.नितेश गाडी काढेपर्यंत त्याची आई छोट्या मोठ्या वस्तू पटकन एका बॅग मध्ये भरते आणि मधुराच्या मम्मी ला फोन करून कळवते.
सगळे हॉस्पिटलमध्ये जातात. मधुराला पोट दुखू लागत तशी ती कळवळते.

आई गं..........मम्मी........आह...........ओरडून ओरडून मधुरा चा घसा कोरडा पडतो.मधुरा थकते. पाच मिनिटं तिच्या कळा थांबतात आणि त्यानंतर जी कळ येते त्यातच ती सुटते......बाळाच्या रडण्याचा आवाज बाहेर वाट बघत असलेल्या घरातल्याना ऐकू जातो. मधुरा सुखरूप सुटली म्हणून सगळे देवाचे आभार मानतात.थोड्यावेळाने नर्स बाळाला घेऊन येते.
 

अभिनंदन......... मुलगा झाला आहे.....सांगून नर्स बाळाला नितेशच्या हातात देते.बाळाला बघून सगळ्यांच्याच डोळ्यात आनंदाश्रू येतात.बाळाच्या इवल्या इवल्या हातानी नितेश च बोट पकडलं होतं. नितेशला खूप गहिवरून येतं तशी तो  पप्पांना मिठी मारतो.सगळेच आळीपाळीने बाळाला घेतात आणि त्याच खूप कौतुक करतात.
 

मधुराला पण काही वेळाने दुसऱ्या वोर्ड मध्ये शिफ्ट करतात. निर्मला आणि कैवल्यला पण कळवण्यात येत.दोघे पण बाळाला बघायला येतात.नेहमी सारखंच येताना निर्मला डिंकाचे आणि मेथीचे लाडू घेऊन येते सोबत आलं घातलेला चहा सुद्धा थर्मास मध्ये घेऊन येते.ती स्वतःच्या हातानी तिला खायला भरवते.बाळाला दुधाजवळ घ्यायला मधुराला मदत करते. थोडा वेळ थांबून दोघेही घरी जाण्यासाठी निघतात कारण कौस्तुभ च्या पण खाण्याची वेळ झाली होती त्यात ती कधीच चुका करत नसे.

 

चार दिवसांनी मधुराला घरी सोडतात. घरी बाळाचं स्वागत अगदी जंगी होतं. बारा दिवसांनी बाळाचं बारसं करून त्याच नाव स्वप्नील अस ठेवण्यात येत.
हळू हळू स्वप्नील मोठा होऊ लागतो त्याने पण छान बाळसं धरलं होतं.
 

सहा महिन्यांचा स्वप्नील मधुराच्या कुशीतच दूध पिता पिता निजला होता. नितेश हळुवार पणे स्वप्नील च्या डोक्यावरून हात फिरवत होता.

थँक्स मधु......... तू माझ्या आयुष्यात आलीस म्हणून हा क्षण आज मी अनुभवतोय......थँक्स अलोट....... "नितेश"

थँक्स का बोलतोयस????? हे आपलं प्रेमच आहे ज्यामुळे तुझ्यातला बाप होण्याच्या इच्छेला देवानी पण कौल दिला."मधुरा"
 

हो ना..... आता आपली फॅमिली पूर्ण झाली.मी खूप खुश आहे मधु........"नितेश"
 

मी पण......."मधुरा"

काय फरक पडतो?? कैवल्य माझ्या आयुष्यात नसण्याने...... काहीच नाही.....आज खरच मी खूप खूश आहे कारणं तुझ्या सारखा समजून घेणार आणि सपोर्ट करणारा व्यक्ती माझा जोडीदार आहे."मधुरा"

समाप्त......
ही कथा कशी वाटली हे तुमच्या कमेंटद्वारे जरूर कळवा.
कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावासाहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????
 


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading