Dec 06, 2021
Kathamalika

काय फरक पडतो??? (भाग ९)

Read Later
काय फरक पडतो??? (भाग ९)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/

मधुरा बंगलोरला शिफ्ट होऊन तीचं नवीन ऑफिस जॉईन करते.मधुराचं काम एकदम चोख असत त्यामुळे तिला दोन महिन्यातचं प्रमोशन मिळते,आणि ती ब्रँच मॅनेजर च्या पोस्ट वर रुजू होते.
पोस्ट वाढली की अर्थातच जबाबदारी वाढते. मधुरा अगदी मन लावून काम करत असते.एवढ्यात तिची नजर उंचपुऱ्या, गोरागोमटा, सिल्की केसांचा,फॉर्मल कपड्यात आपल्या शर्ट च्या बाह्या फोल्ड करत असलेल्या नितेश वर पडते. बऱ्याच मुलींची नजर देखण्या नितेश वर खिळलेली असते हे मधुरा च्या लक्षात येतं.

फुल टी-शर्ट, ढोपर्यापर्यंत टाईट सिल्की असा स्कर्ट,पोनिटेल आणि लाईट असा मेकअप केलेली
मधुरा केबिन मधून बाहेर येऊन नितेश च्या मागे उभी राहते.त्याचा आणि रिसेप्शनीस्टचा, मधुराला भेटण्यावरून वाद होत असतो.मधुरा मागे उभी राहून त्यांचं बोलणं ऐकत असते.

हे बघा सर......तुमची अपॉइंटमेंट नाही आणि मी तुम्हाला कशी परमिशन देणार......आम्हाला पण वरती उत्तर द्यावी लागतात.......प्लिज सर अंडर्टस्टँड.......तुमची स्वतःची कम्पनी आहे पण आम्ही नोकर माणस......सर प्लिज मला समजून घ्या..."रिसेप्शनीस्ट"
 

मला माहित आहे सगळं,पण मी तुमच्याच कामासाठी आलो आहे. मला खूप अर्जंट काम आहे तुमच्या मॅडम जवळ.मी माझी काम सोडून इथे आलोय आणि मी जरी मालक असलो तरी माझ्याही हाताखाली कित्येक माणसं आहेत ज्यांची घरं....... मी देतो त्या पगारावर चालतात. जेवढी गरज तुम्हाला तुमच्या कामाची आहे तेवढीच गरज माझ्या कंम्पनीतल्या माणसांना या मिटिंगची आहे.......प्लिज तुम्ही तुमच्या मॅडम ना सांगा. आणि तुम्हाला जर कामातून काढून टाकल ना तर मी तूम्हाला आमच्या कम्पनी मध्ये घेईन मग तर झालं. "नितेश"

पण तो रिसेप्शनीस्ट ऐकायला तयारच नव्हता. शेवटी नितेश मागे वळून निघायला जातो आणि समोर बघतो तर काय???????मधुरा उभी होती आणि ती गालातल्या गालात हसत होती.

मधुरा............ तू.........इथे.......व्हॉट अ प्रेझेन्टे सरप्राईस.?????? एवढं बोलून तो मधुराला मिठी मारतो.

मधुरा आणि नितेश ला एवढं जवळ बघून एवढा वेळ नितेश ला नजर रोखुन पाहणाऱ्या सगळ्या जणी आपापल्या कामात डोकी खुपसतात.

मधुरा रिसेप्शन जवळच उभ्या असलेल्या पियून ला दोन कॉफी तिच्या केबिन मध्ये आणायला सांगते.

काही वेळात पीयुन दोन कॉफी आणि कुकीज घेऊन मधुराच्या केबिन मध्ये येतो.नितेश कुठेही त्याच आडनावं लावत नसतो त्यामुळे रिसेप्शनीस्टला त्याची खरी ओळख माहीत नसते. मधुरा केबिन मधूनचं बाहेर रिसेप्शनीस्टला फोन करून  इनामदारांची फाईल घेऊन आतमध्ये बोलावते. तो बिचारा घाबरतचं डोर नॉक करून आतमध्ये येऊ का विचारतो.मधुरा येस बोलते, तसा तो दबकतच आत येतो. हातातली फाईल मधुरा समोर डेस्क वर ठेऊन दोन्ही हात मागे एकावर एक ठेवून मान खाली घालुन उभा असतो.त्याला अस बघून नितेश ला हसू आवरत नाही म्हणून तो उठून उभा राहतो,आणि त्या रिसेप्शनीस्टच्या बाजूला जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवतो.तसा तो आणखीनच घाबरून त्याची हात जोडून माफी मागु लागतो.

नितेश त्याचे दोन्ही हात खाली घेऊन त्याला बोलतो.

अरे मित्रा या आपल्या कंपन्या तूमच्या मुळे मोठ्या होतात.तुम्ही आमचे नाही तर आम्ही तुमचे देणेकरी लागतो.तुमच्या मुळे आमच्या घरात चूल पेटते.अरे आम्ही तर नावाला मालक आहोत पण खरी मेहनत तुम्ही इथे बसून आणि कामगार तिथे बारा तास राबून ओव्हर टाईम काम करून आम्हाला मालक बनवता.आम्ही मालक....... कारण कंपनी आमच्या नावावर पण याचे खरे हकदार तुम्ही आहात परत असे कोणासमोर हात जोडू नको...."नितेश"

नितेशच बोलणं ऐकून रिसेप्शनीस्ट जरा निर्धास्त होतो,मग मधुरा बाहेर जाऊन नितेश ची सर्वांशी ओळख करून देते.

जरा सगळ्यांनी इथे लक्ष द्या.......
हे आपल्या कंपनीचे नवे पार्टनर मिस्टर नितेश...........नितेश इनामदार........आठवड्यातून एकदा केंव्हाही हे इथे येऊन काम कस चालू आहे ते चेक करतील. मधुराने आधीच मागवून ठेवलेला बुके ती आणायला सांगते आणि तो बुके ऑफिसच्या सगळ्या स्टाफ कडून तो बुके ती नितेश ला देऊन त्याच स्वागत करते. वेलकम होईस्तोवर लंचब्रेक झालेला असतो.सगळेजण आपापला टिफिन घेऊन कँटीनमध्ये जातात.मधुरा कँटीन मधून दोन नॉनवेज थाली तिच्या केबिन मध्ये मागवते.

बर आता  तू....
इथे कसा ते सांग."मधुरा"

आपण नंबर तर एक्सचेंज केले पण मी गेले दोन महिने खूपचं बिजी असल्याने मला काही कॉल करायला जमलंच नाही. ऑफिस चा आणि माझा काडीमात्र संबंध नाही हे तर तुला माहीतच आहे म्हणजे मीचं तस सांगितलं आहे तुला.पण मध्यंतरी पप्पांना बर नव्हतं त्यामुळे हा सगळा डोलारा मी माझ्या हातात घेतला.

तुला सगळं खरं सांगीतल आहे, हे जेंव्हा मी पप्पांना सांगितलं तेंव्हा आमच्यात वाद झाले आणि तो वाद इतका टोकाला पोचला की मी कायमचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आईला खूप त्रास झाला पण पप्पांचा अहंकार त्याचा आड येत होता.मी तिकडून निघून आमच्या इथल्या फार्महाऊस वर शिफ्ट झालो.

आठ एक दिवसांनी आईचा फोन आला.पप्पांना पॅरॅलीस चा झटका आल्याने ते हॉस्पिटलाईज होते.मी तडक माझ्या सगळ्या ऑर्डर्स माझ्या असिस्टंट ला हँडल करायला दिल्या आणि इथून निघून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेलो.

स्वतःला हेल्पलेस समजत भरल्याडोळ्यांनी ते माझ्याकडे बघत होते.किती वाईट वागले तरी शेवटी माझे वडील ते....मी पण मागचं सगळं विसरून त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये वेळ घालवू लागलो.वीस दिवसांनी त्यांना घरी सोडलं. पहिले त्यांच्या सगळ्या गोष्टी मीच करत होतो पण अचानक कंपनी बंद पडायच्या मार्गावर आहे असं समजलं आणि घरात कोणाला या बद्दल काही न सांगताच इथे आलो आणि तुमच्या या कंपनी सोबत हातमिळवणी केली.सध्या तरी कंपनी स्थिरस्थावर आहे. अजून तरी यातलं पप्पांना काही माहित नाही कारण त्यांचा मुलगा या नात्याने सगळे निर्णय मी परस्पर घेतले आहेत. म्हणूनच आठवड्यातून एकदा चक्कर मारायचा निर्णय घेतला आहे.ज्या दिवशी माझ्या ऑर्डर्स नसतील तेंव्हा तेंव्हा मी इथे येत जाईन. आणि आता तर मला काळजीच नाही कारण तू इथली सगळी जबाबदारी संभाळतेस.

नितेश च बोलणं ऐकून मधुरा त्याला अजून खंबिर होण्यासाठी सांगते.

एवढ्यात पियुन त्यांची ऑर्डर घेऊन येतो. झणझणीत सुकं मटण,स्टीम राईस,तांदुळाच्या दोन पांढऱ्या शुभ्र भाकऱ्या,चिकनचा रस्सा,कांदा-लिंबू आणि ओल्या नारळाच्या दुधात उकळलेल्या कोकमाचा रस घालुन केलेली आंबट तिखट अशी गुलाबी रंगाची सोलकढी त्यावर एक कोथिंबीरीचं हिरवागार पान सजवलं होतं.थाळी बघूनच नितेश त्यावर तुटून पडतो. दोघेही यथेच्छ जेवणाचा आस्वाद घेतात. रोज एकटीच जेवणारी मधुराही आज पोटभर जेवते. आज नितेश चा ऑफिस मध्ये येण्याचा पहिलाच दिवस असल्यामुळे त्यांचं जास्त काही कामाच बोलणं होत नाही. महत्वाच्या गोष्टींवर तेवढं नितेश ला कॉन्सनट्रेट करायला सांगते.नितेश मधुराच्याच केबिन मध्ये बसून काही फाईल चेक करत असतो आणि मधुरा कॉन्फरन्स हॉल मध्ये एका महत्वाच्या मिटिंग साठी गेलेली असते. मिटिंग जवळपास दोन तास चालते त्यानंतर थोडं डिस्कशन करून साडेचारच्या सुमारास मधुरा तिच्या केबिन मध्ये येते. नितेश मधुराची वाट बघत बसलेला असतो.

सॉरी............. कंटाळा आला असेल ना..... एकट्याला बसून, पण काय करणार मिटिंग संपली लवकर, पण समोरच्या पार्टीला सगळ्या गोष्टी नीट समजवेपर्यंत उशीर झाला.तू कॉफी घेतलीस का???? थांब मी सांगते. "मधुरा"

मधुरा दोन कॉफी आणि सँडविच ऑर्डर करते.उरलेली सगळी काम आटपून मधुरा निघायची तयारी करते.सगळा ऑफिस स्टाफ ओलमोस्ट त्यांच्या वेळेत निघालेला असतो. सगळ्यावर फायनल नजर टाकून थम्ब देऊन मधुरा आणि नितेश दोघेही ऑफिस मधून निघतात.

ऑफिस खाली येताच नितेश मधुराला तिच्या फार्महाऊस वर डिनर साठी इनवाईट करतो. मधुरा पण तयार होते.संध्याकाळी साडे आठला मधुरा नितेश च्या फार्महाऊस वर पोचते. मोठा प्रशस्त हॉल,डायनिंग रूम, स्विमिंगपुल,आणि पाच बेडरूम असा त्यांचा फार्महाऊस मधुराला खूपच आवडतो.

नितेश स्वतः ज्युस करून घेऊन येतो.त्याने सगळी जेवणाची तयारी केलेली असते. अगदी स्टार्टर पासून ते मेनकोर्स पर्यंत सगळं त्यानी स्वतःच्या हातांनी बनवलं होत. मधुरा ला फिश फ्राय खूप आवडते हे त्याने तिच्या फेसबुक अकाउंट वर वाचलं होतं.नितेशने तिच्या आवडीचा पनीर टिक्का विथ पुदिना चटणी आणि दही वडे असा स्टार्टर बनवला होता आणि मेनकोर्स मध्ये तिच्या आवडीचा बांगडा फ्राय, कोळंबीच आंबट,आणि स्टीम राईस असा फक्कड बेत केला होता. ज्युस घेऊन झालं आणि दोघेही त्यांच्या टेरेस वर गप्पा मारत बसले होते.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मधुराने तिची आणि कैवल्य ची ट्रॅजीडी सांगितली.नितेश ला तर आताच्या काळात पण अशी माणसं असतात यावर विश्वासच बसेना. पण प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे आपल्या माणसाचं सुख असतं एवढं मात्र त्याला कळलं.
 

दोघेही साडेनऊ दहा च्या सुमारास स्विमिंगपुल जवळच जेवायला बसतात.मधुराच्या आवडीचा मेनू असल्याने ती मस्त...... पोट जाम होईस्तोवर जेवते. नितेश आईस्क्रीम ऑफर करतो पण मधुरा ची इच्छा नसते. अकरा वाजता नितेश जातीने तिला घरी सोडायला जातो. तिला सोडून तो घरी येतो आणि निवांत बेड वर पडून त्या दोघांच्या मनाच्या मोठेपणाबद्दल विचार करत असतो. तो ही मग वडिलांसोबत चांगलं वागायचं त्यांना दुखवायच नाही असं ठरवतो आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने मधुरा जरा उशिराचं उठते आणि फ्रेश होऊन तिच्या पप्पांना फोन करून नितेश बद्दल सगळं सांगते आणि त्याच्या वडिलांना भेटून यायला आठवण करून देते.नितेश चे पप्पा मधुराच्या पप्पांचे मित्र असतात म्हणून ते त्यांना भेटायला त्यांची विचारपूस करायला नितेश च्या बंगल्यावर जातात.

इकडे मधुरा आणि नितेश दर शनिवारी ऑफिस च्या कामानिमित्ताने भेटत असतात. कधी बाहेर तर कधी ऑफिसमध्ये तर कधी लंच मिटिंगसाठी.सोमवार ते शुक्रवार तो त्याच आवडीचं म्हणजे मेकअपच्या ऑर्डर्स, त्याचे शोज,ब्राईड,याकडे फोकस करतो. या सगळ्यात तीन महिने उलटून जातात.

मधुराला कैवल्यची आठवण येते म्हणून ती त्याच फेसबुक अकाउंट ओपन करून बघते तेंव्हा तिच्या लक्षात येत की ती बंगलोरला शिफ्ट झालेल्या आठवड्यातच कैवल्य लग्न  करतो.त्याने निर्मला सोबतचे शिमल्याचे फोटो अपलोड केलेले असतात. मधुरा फेसबुक बंद करते आणि तिच्या मिटिंगसाठी रेडी व्हायला जाते.

इकडे नितेश मधुराच्या प्रेमात असतो.जी गोष्ट आपली नाही त्याचा तो विचार करत असतो. मधुराला नितेश ची ही द्विधा मनस्थिती समजत असते. अनाहूतपणे तो तिची खूप काळजी घेऊ लागतो.

क्रमश:
कथेचा पुढचा भाग हा शेवटचा असेल त्यामुळे, हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading