Dec 06, 2021
Kathamalika

काय फरक पडतो??? (भाग ७)

Read Later
काय फरक पडतो??? (भाग ७)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/
 

मधुराचं पत्र वाचून कैवल्य पाठमोऱ्या असलेल्या पंकजला मागून मिठी मारतो आणि रडू लागतो.त्याच्या रडण्यापूढे पंकज पण हतबल होतो त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो पण कैवल्य काही केल्या ऐकेना. त्याला समजूनच घ्यायचं नव्हतं मुळी. तो राहून राहून सारखा पंकज ला एकचं प्रश्न विचारत होता " का??असं वागली मधुरा"
त्याचा या प्रश्नाच उत्तर तर पंकजकडे  ही नव्हतं पण तरी तो कैवल्यला सावरण्याचा प्रयत्न करत होता शेवटी कैवल्यने मधुराचं पत्र पंकज ला वाचायला दिल.

पंकज पत्र वाचता वाचता रडू लागतो आणि कैवल्यला पुनः जवळ घेतो. अर्धा पाऊण तास असाच निघून गेलेला असतो एव्हाना रडून रडून डोळ्यातलं पाणीही आटल होतं, विरहाच्या अश्रुंचे थेंब चेहऱ्यावर त्यांच्या सुकलेल्या खुणा ठेऊन गेल्या होत्या, हुंदके देऊन घशाला कोरड पडली होती. बराच वेळ शांत राहून मनात काही ठरवून कैवल्य उठतो आणि थंड......पाण्याचा शॉवर घेऊन बाथसुट घालून बाहेर येतो.रात्रीचे दोन वाजलेले असतात. पंकज तिथेच उभा असतो. कैवल्य त्याच्या शेजारी येऊन उभा राहतो.

आज पौर्णिमा आहे ना......."कैवल्य"

हो.......पण का असं विचारतोस........"पंकज"

रोज अंधारलेल्या आकाशात आज लख्ख प्रकाश आहे ना म्हणून विचारलं!!!!" कैवल्य" (वर आकाशाकडे बघत बोलला)

आता काय करायचं ठरवलं आहेस?? "पंकज"

त्याग........आमच्या प्रेमाचा, नात्याचा,आठवणींचा,आमच्या स्वप्नांचा....... सगळ्या गोष्टींचा त्याग करायचं ठरवलं आहे.

खर तर चूक माझीचं आहे कारण मधुरा जे काही वागली ना ते माझ्यामुळे. मीच बोललो होतो तिला जे काही करायचं ते सगळ्यांच्या संमतीने......पण मला कुठे माहीत होतं पुढे खरचं आमच्या वाटा वेगळ्या होणार ते........अरे गेली सहा वर्षे आम्ही एकत्र आहोत.एकमेकांची सुख दुःख आम्ही दोघांनी वाटून घेतली.....रुसवे-फुगवे, मनवण, या सगळ्या गोष्टी एकत्र जगलोय आम्ही........आम्ही सहा वर्षे एकत्र होतो पण प्रेमात कधी वाहवत नाही गेलो. प्रेमाचं पवित्र नातं होत आमचं त्यात चुकीचं नाही वागलो कधी. माझी खूप इच्छा असायची मधुरा सोबत प्रेमाच्या सर्व परीसीमा ओलांडायची पण मधुरा मात्र मला स्वतःवर ताबा ठेवायला सांगायची.

अरे....... कित्येक रात्री आम्ही एकत्र घालवल्या आहेत पण तिने स्वतःचा तोल कधीच ढळू दिला नाही. कसं विसरायचं हे सगळं. आणि खरंतर हे सगळं नाही झालं तेच बर होतं असं वाटतंय आता कारण जर शरीराने आम्ही जवळ आलो असतो ना तर वेगळं होण्याचा आताच निर्णय कदाचित घेऊ शकलो नसतो आणि जरी घेतला असता तरी कायम अपराध्याची भावना मनात राहिली असती. "कैवल्य"

म्हणजे???? तू  मूव्ह ऑन करायच ठरवलं आहेस का?? "पंकज"

हो........"कैवल्य"

मग.......मधुरा??? "पंकज"

तिने जो काही निर्णय घेतला आहे तो नक्कीच विचार करून घेतला असेल आणि तिच्या निर्णयाचा मी आदर करतो. फक्त तिच्यासाठीच......... तिचा हा निर्णय मी मान्य करतोय. आज याच चंद्राला साक्षी मानून मी मागच सगळं विसरुन पुढचं आयुष्य निर्मला सोबत राहण्याचा आणि तिला सर्वतोपरी खुश ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन अशी शपथ घेतो .(एवढं बोलून कैवल्य ते पत्र शेवटच स्वतःच्या हृदयाशी कवटाळतो आणि दीर्घ.......श्वास घेऊन ओलेत्या डोळ्यांनी फाडून टाकतो.)

हे सगळं बघून पंकज पण भाऊक होतो आणि स्वतःच्या डोळ्यातलं पाणी पुसून कैवल्यला मिठी मारून त्याची पाठ थोपटतो......

रात्री उशिरा दोघेही झोपतात.दिवसभर बसून थकल्यामुळे पंकज लगेच झोपतो पण कैवल्य मात्र झाल्या गोष्टींचा मनातच आढावा घेत असतो आणि त्या विचारातच कधीतरी त्याला झोप लागते.

दोघांचेही डोळे सकाळी आठच्या सुमारास डोरबेल च्या आवाजाने उघडतात.कैवल्य जाऊन दार खोलतो.समोर हॉटेल चा एक माणूस उभा असतो.दहा वाजेपर्यंत आवरून घ्यायला सांगण्यासाठी आलेला असतो कारण त्यांना रूमसर्व्हिसिंग करायची असते. कैवल्य होकारार्थी मान हालवून दार लावून घेतो आणि फ्रेश व्हायला जातो.

बाहेर येऊन कैवल्य पंकज ला उठवतो आणि आवरून घ्यायला सांगतो.पंकज पण उठून आंघोळीला जातो.पंकज येईपर्यंत कैवल्य दोन कॉफी, दोन स्पायसी चीज ग्रील सँडविच आणि ब्रेड बटर ऑर्डर करतो.
कैवल्य टीव्ही चालू करून जुना कुठलातरी पिक्चर बघत असतो एवढ्यात त्यांची ऑर्डर येते.पंकज पण बेड वर येऊन बसतो आणि मस्त पैकी कॉफी आणि सँडविच एन्जॉय करतो. दोघेही रेडी होऊन निघायच्या तयारीत असतात. एवढ्यात दोघेजण सर्व्हिसिंग साठी आलेले असतात. कैवल्य टीप म्हणून दोघांच्याही हातात काही पैसे देतो आणि कैवल्य पंकज तिथून निघतात.काउंटरवर येऊन रूम च पेमेंट आणि काही पैसे तिथे असलेल्या डोनेशन बॉक्स मध्ये टाकून दोघेही हॉटेल च्या बाहेर येतात.पंकज ला मिटिंग असल्यामुळे तो डायरेक्ट ऑफिस ला जातो आणि कैवल्य मात्र आज ऑफिस ला येणार नसल्याचं कळवून घरी जातो.

कैवल्य घरी जातो आणि दारातच त्याला मामाची चप्पल दिसते तस तो काय ते समजून जातो. दारावरची बेल वाजताच निर्मला येऊन दार उघडते. निर्मलाला अस समोर बघून त्याची पार भम्बेरीच उडते, कारण किती काही ठरवलं तरी ठरवलेली गोष्ट करण्यासाठी खूप मोठं धाडस असावं लागतं.लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नाही हे त्याला चांगलंच ठाऊक होत.
 

कैवल्य घरी येऊन आंघोळीला जातो तोवर निर्मला अगदी त्याला आवडते तशी वेलची आणि जायफळ घातलेली कॉफी करून आणते. शेवटी म्हणतात ना घरच्या जेवणाची आणि चहा कॉफी सर नाही हॉटेल मधल्या गोष्टींना अगदी तसचं झालं.कॉफी घेताच कैवल्यला तरतरी आली. मामाने पण त्याच्या कामाची चौकशी केली कैवल्यने पण हसतमुख सगळं व्यवस्थित असल्याचं सांगितलं.
 

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या तशी गाडी मूळ विषयावर येऊन थांबली.

बरं....... कैवल्य.....तुला शशिकलानी(कैवल्य ची आई) सगळं सांगितलंच असेल पण तरी मला विचारायचं आहे तुला.तू निर्मला सोबत लग्न करायला तयार आहेस का????
हे बघ तुम्ही आजकालची पोरं तुम्ही आपला जोडीदार स्वतःच निवडता काय ते लव मॅरेज की काय म्हणतात ते...... आता काय बोलतात ते महत्वाचं नाही पण तुझं बाहेर कोणासोबत काही असेल तर सांग उगाच आम्ही मोठे ठरवतोय म्हणून तू लग्नाला तयार होतोयस अस नको कारण मला शशिकला चा हट्टी स्वभाव माहीत आहे म्हणून विचारतोय.

कैवल्य आई बाबा दोघांकडे एक नजर टाकतो आणि निर्मला सोबत एकट्यात थोडं बोलायचं आहे तर बोलु का अशी परवानगी मागतो.मामा चिंताजनक नजरेनेच परवानगी देतात.कैवल्य च्या आईच्या कपाळावर आठ्या आणि डोळ्यात राग दोन्ही कैवल्य बघून न बघितल्यासारखं करतो आणि आत मध्ये खोलीत निघून जातो.

कैवल्यच्या खोलीत पण गॅलरीत छान अस छोटस गार्डन असत त्यात वेगळवेगळ्या रंगांची आणि जातीची फुलं असतात. निर्मलाला पण फुलांची फार आवड असते.

निर्मला गॅलरीत जाऊन उभी राहते.कैवल्यला खरं तर कळत नसतं काय आणि कसं बोलावं ते कारण त्याला माहित असतं निर्मलाचं त्याच्यावर प्रेम आहे ते.पण तो कधी त्याला माहित आहे हे दाखवून देत नाही कारण त्याला मधुरा आवडत असते पण आता त्यांचं नातचं उरलं नाही म्हंटल्यावर त्या गोष्टींचा काय फायदा.असो.......

कैवल्य निर्मलाला त्याच्या आणि मधुरा विषयी सगळं सांगतो.त्याचा एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागत असतो पण निर्मला थोडी अबोल असल्यामुळे ती फक्त खाली मान घालून सगळं ऐकत होती. तो फक्त आईच्या हट्टा मुळे लग्न करतोय हे ऐकल्यावर ती तिथून निघून जाते.
 

बाहेर आई ला निर्मला चा चेहरा बघून सगळं समजते.ती भावासमोर बोलायचं टाळते. निर्मला काही न बोलताच तिच्या बाबांना तिथून निघण्यासाठी बोलते. आत्या आणि मामांच्या पाया पडून निर्मला तिथून तिच्या बाबांसोबत निघते. ही दोघे गेल्यावर मात्र कैवल्यची  आई फार चिडते.
 

काय बोललास तू निर्मलेला???? "कैवल्य ची आई"

मी काही नाही बोललो..... फक्त माझ्या आणि मधुरा च्या नात्याबद्दल सगळं काय ते खरं खरं सांगून टाकलं. "कैवल्य"

अरे पण का?????  या गोष्टी नंतर पण सांगू शकत होतास ना!!!! "कैवल्य ची आई"
 

हो.......पण मला आत्ताच सांगायचं होत.मला कुठल्याही गोष्टी लपवून ठेऊन तिच्याशी संसार नाही करायचा."कैवल्य"
 

हो रे.......बाबा.......तूच तो मोठा राजा हरिश्चंद्र रे......आणि आम्ही कोण तर खोटे!!!! "कैवल्य ची आई"

हे बघ आई.......निर्मलाचं काय दुसरी कुठलीही मुलगी बघितली असतीस तरी मी हेच केलं असत.मला कुठल्याच गोष्टींची सुरवात लपवाछपवी नी करायची नाही...."कैवल्य"
 

अरे मी कुठे म्हणते नको सांगू.........पण जे काही होतं ते लग्नानंतर सांगायचं. काय त्या मुलीने जादूटोणा केला काय माहिती..... माझ्या मुलाला माझ्याच विरुद्ध केलं......त्या मुलीचं कधीच चांगलं होणार नाही...... वाटोळं होईल मेलीचं....."कैवल्य ची आई"(एवढं बोलून कैवल्य ची आई उर बडवू लागते. आतापर्यंत गप्प असलेले बाबा मात्र फार चिडतात आणि कैवल्यच्या आई च्या एक सणसणीत कानाखाली लगावतात.)

त्या पोरी बद्दल एक चकार वाईट शब्द तुझ्या या घाणेरड्या तोंडातून पुन्हा काढलास तर याद राख.......अगं तुझ्या हट्टापायी माझा लेक निर्मला सोबत लग्न करायला तयार झाला आहे आणि तू बोलतेस या गोष्टी नंतर सांगायच्या!!

आता जो काही निर्णय असेल तो निर्मला घेईल.परत त्या पोरीला किंवा कैवल्य ला काही बोलशील तर लक्षात ठेव.( एवढं बोलून कैवल्यचे बाबा खाली निघून जातात.)

इकडे कैवल्य त्याच्या खोलीत येऊन मधुराचे आणि त्याचे फोटोज बघत असतो आणि ते प्रत्येक फोटो मनात साठवून त्याच्या लॅपटॉप मधून डिलीट करत असतो.या गोष्टी करताना त्याला खूप त्रास होत होता पण पुढे जायचं असेल तर मागचं सगळं खोडावचं लागेल.

बाबांनी हात उचलल्यामुळे आई खूप दुःखी असते आज तर ती चहा करायला सुद्धा गेली नाही किचन मध्ये,मग कैवल्य जाऊन छान पैकी तिला आवडतो तसा आलं,मिरी,घातलेला फक्कड असा दुधाचा चहा आणि त्याच्यासाठी वेलची जायफळ घातलेली कॉफी बनवतो आणि आई च्या खोलीत जातो.
 

आई बेड वर खिडकीकडे नजर लावून पडली होती. कैवल्य आल्याची चाहूल लागताच पाठीवर झोपून उजवा हात स्वतःच्या दोन्ही डोळ्यांवर घेतला. कैवल्य आईच्या बाजूला जाऊन बसला त्याला माहित होतं आई जागी आहे पण बाबांच्या अश्या वागण्याने दुखावली गेली आहे म्हणून तो हळुवारपणे आई च्या डोक्यावरून हात फिरवतो.
 

आई.......ए आई.......उठ......अगं हे बघ तुला आवडते तशी मी चहा करून आणला आहे आणि तो ही मी स्वतःच्या हाताने बनवला आहे. सांग जरा कसा झाला आहे म्हणजे बघ मला जमला आहे का तो.

आई अजिबात हलत नाही ती निपचित पडून असते.
कैवल्य खूपदा उठवतो पण आई उठत नाही शेवटी तो म्हणतो ठीक आहे तुला नाही बघायच माझ्याकडे तर मी निघून जातो.मला वाटलं होतं दोघे एकत्र चहा कॉफी घेऊ म्हणून मी माझ्यासाठी पण कॉफी चा मग इथेच घेऊन आलो होतो.......पण तुझी इच्छा...... जातो मी माझ्या खोलीत एवढं बोलून कैवल्य तिथून निघून जाण्याचं नाटक करतो आणि बेड च्या दुसऱ्या बाजूला खाली जाऊन लपतो.
 

कैवल्य गेला याची खात्री करून आई डोळ्यावरचा हात बाजूला घेते तसा कैवल्य खालूनच बोलतो "झोपलेल्या माणसाला उठवता येत पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही" हे तू मला का बोलायची ते आज समजलं मला.तर अस घेतात का झोपेचं सोंग.
 

तू अजिबातचं बोलत नव्हती तर मला वाटलं तू गेलीस की काय.(कैवल्य डोळा मारतच म्हणतो.तेवढ्यात मागून बाबांचा आवाज येतो.ती कसली जाते एवढ्या लवकर ती गेली तर आपल्याला त्रास कोण देणार एवढं बोलून दोघेही हसू लागतात.)

हा तुम्ही दोघे पण मी कधी वर जाते याचीच वाट बघा.......पण मी एवढ्यात जाणार नाही लक्षात ठेवा.आई चे हे शब्द ऐकून दोघांनाही हसू येतं दोघांना हसताना बघून आई पण हसू लागते.रडून रडून डोळे सुजले होते तिचे.कैवल्य आईच्या मांडीवर डोकं ठेऊन तिला समजावतो.
 

अगं आई या गोष्टी मी आताच सांगितल्या कारण त्या तिला नंतर बाहेरून कळू नये आणि बाहेरून समजा या गोष्टी तिला चुकीच्या पद्धतीने कळल्या तर तिचा उगाच गैरसमज नको तिने माझ्या आणि मधुरा च्या नात्यावर शंका नको घ्यायला म्हणून तिला हे सगळं लग्नानंतर समजलं तर तिला अस नको वाटायला की तिची फसवणूक होते.मला सांग तुला आवडेल का हे???? "कैवल्य" (त्याच्या बोलण्याला कैवल्य चे बाबा पण दुजोरा देत मधुरा तुला वाटते तशी मुलगी नाही आणि तिच्यामुळेच कैवल्य लग्नाला तयार झाल्याचं सांगतात.)

बाबांच्या बोलण्याने कैवल्यचे डोळे भरतात पण कैवल्य डोळ्यातलं पाणी लपवतो आणि नेमकं तेंव्हाच बाबा त्याच्याकडे बघतात पण तो नजर फिरवून लगेच विषय बदली करतो आणि बाबांना पण चहा हवा का अस विचारून आई चा कप आणि त्याचा कॉफी चा मग घेऊन लगेच किचन मध्ये जातो कप आणि मग तो ओव्हन मध्ये गरम करायला ठेवून बाबांसाठीचा चहा चा आणखीन एक कप भरतो आणि पुन्हा तो सगळं एका ट्रे मध्ये घेऊन आई च्या खोलीत जातो. आईची आवडती बिस्कीट,चिवडा आणि वेफर्स तिघेही चहा कॉफी सोबत एन्जॉय करतात. हे करत असताना बाबांचं लक्ष मात्र कैवल्यकडे असतं. ते मनातचं विचार करतात( आजकालची पोरं आई वडिलांचं ऐकत नाहीत पण या गोष्टीला मधुरा आणि कैवल्य अपवाद आहेत. आजही आईवडिलांच्या इच्छा जपणारी मुलं आहेत हे या दोघांमुळे सिद्ध झालं. किती मोठया मनाने दोघेही आपलं एवढ्या वर्षांचं प्रेम कस काय सोडू शकतात. हा विचार करताना त्यांच्या मनात दोघांविषयी ही खूप आदर असतो.त्यांना कैवल्यच्या आनंदमागच दुःख माहीत असतं.)

इकडे मधुरा नेहमीसारखीच वागण्याचा प्रयत्न करत होती पण तिच मनं मात्र कैवल्यची आठवण काढत होत. ती दोघे जगलेले प्रत्येक क्षण तिला आठवत होते. दोन दिवस ऑफिस ला जाऊन तिने आठ दिवसांची लिव्ह अप्लिकेशन दिल आणि लोणावळ्याला त्यांच्या फार्महाऊस वर गेली. मधुराचा चेहरा बघून तिच्या पप्पांना काहीतरी बिघडलं असल्याचं समजत म्हणून ते बाहेरूनच सगळी माहिती काढतात त्यात त्यांना या सगळ्या गोष्टी समजतात.

त्यांना सगळं खरं समजल्यावर दोन्ही मुलांचा खूप अभिमान वाटतो कारण दोघेही पळून जाऊन किंवा कुठे तरी मंदिरात कोर्टात लग्न करू शकले असते पण दोघांनीही कुटुंबाला प्राधान्य देऊन आपल्या प्रेमाचा त्याग केला.त्यांच्या या निर्णयामुळे मधुराच्या पप्पांना कैवल्यला भेटण्याचा मोह आवरता आला नाही.

मधुरा चे पप्पा कैवल्यच्या ऑफिस मध्ये जातात तर त्यांना कळत कैवल्य मिटिंग साठी बाहेर गेला आहे आणि तिथूनचं तो घरी जाणार आहे. मधुरा चे पप्पा त्याच्या घराच्या समोर गार्डन असतं तिथे जातात. तास दीड तास तिथे बसल्यावर सहजच फोन मध्ये फेसबुक वर कैवल्य सबनीस म्हणून सर्च करतात आणि काय आश्चर्य......ज्या कैवल्यची वाट बघत ते गार्डन मध्ये बसले होते तोच कैवल्य त्यांच्यापण आधीच गार्डन मध्ये येऊन बसला होता पण समोर बसलेल्या मधुराच्या पप्पांकडे त्याच लक्ष नव्हतं.मधुरा चे पप्पा मात्र बऱ्याच वेळा त्या मुलाकडे बघून विचार करत असतात का बरं हा रडत असेल त्याला जाऊन विचारावं का?????अस ही त्यांना वाटलं पण ते गेले नाही आणि फोटो बघून त्यांच्या लक्षात आलं की तो का रडत होता.

क्रमश:
कथेचा हा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावसहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.कथेचे पुढील भाग वाचण्यासाठी मला फॉलो करा.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading