Dec 01, 2021
कथामालिका

काय फरक पडतो???( भाग १३)

Read Later
काय फरक पडतो???( भाग १३)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/
 

भाग ९
https://www.facebook.com/581606972323826/posts/1055565224927996/

भाग १०
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-10_5254

भाग ११
https://www.facebook.com/581606972323826/posts/1058459074638611/

भाग १२
https://www.facebook.com/581606972323826/posts/1060582481092937/
 

पॅरिस ला पोहचून दोघेही आपापल्या घरी कळवतात. दोन्ही कुटुंब खूप खुश असतात.राघू मैना दोघेही अगदी मनसोक्त हिंडून फिरून पंधरा दिवसांनी मायदेशी परततात. दोघांनी लग्न जरी केलं असलं तरी नवरा बायको म्हणून जवळ आलेले नसतात.लग्नाच्या आधीच मधुराने नितेश कडे वेळ मागितलेला असतो.नितेशही तयार होतो कारण एवढया वर्षाच प्रेम क्षणात विसरून नवीन आयुष्य सुरू करणं........ खरचं सोपं नसतं. त्याने तो पूर्ण वेळ तिला दिलेला असतो मात्र दोघांमध्ये मैत्री खूप छान असते.

मुंबईला परत आल्यावर दोघे घरच्यांसोबत थोडा वेळ घालवतात आणि मग नितेश मधुरा ला घेऊन तिच्या घरी जातो.चार दिवस तिथे पाहुणचार करून दोघे डिरेक्टली लोणावळ्याच्या त्या आश्रम मध्ये जातात. दोघेही जाताना खूप सारी गिफ्ट्स, चॉकलेट, खेळणी, आणि मुलांना उपयोगी अश्या वस्तू घेऊन जातात.मूलं मधुराला बघून फार खुश होतात.इवलीशी परी आता चालायला लागली होती. मधुरा तिला जवळ घेते आणि नितेश ला सांगते.याच पिल्लुला मला दत्तक घ्यायचं आहे........ हिला ती सगळी सुख द्यायची आहेत ज्याची खरचं ही हकदार आहे. नितेश लगेच परवानगी देतो.दोघे पण सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करून बेंगलोर चा पत्ता देतात.आणि पूर्ण दिवस तिथल्या मुलांसोबत घालवून तिघेही घरी येतात.
 

दारात नितेश मधुरा आणि परीला बघून नितेशचे मम्मी पप्पा निःशब्द होतात.नितेशची मम्मी औक्षणाचं ताट घेऊन येते.तिघांचीही दृष्ट काढुन भाकर तुकडा ओवाळून तिघांना आत मध्ये घेते.मधुरा परी बद्दल घडलेला सगळा प्रकार तिच्या सासरच्यांना सांगते.नितेशचे पप्पा परी च्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि तिचा गोड गोड पापा घेतात तशी परी खुदकन हसते.

एक एक पाऊल टाकून परी अक्खा बंगला फिरायची नितेशची मम्मी तिच्या मागे मागे पळायची.परीच्या येण्याने घराचं अगदी गोकुळ झालं होतं. नितेशचे पप्पा नितेश ची माफी मागतात.त्यांनी स्वतःच्या बाळासाठी त्याला दुसऱ्यांच्या मुलींना पैशात मोजल होतं......ही किती मोठी चूक होती..... हे त्यांच्या लक्षात आलं होतं. नात जुळायला रक्ताचं नाही प्रेमाचं नात जपता आलं पाहिजे हे त्यांना समजल होतं.

 

काही दिवसात तिघेही बेंगलोरला जायला निघणार होते. इकडे नितेशच्या मम्मी पप्पांना परीला सोडवत नव्हतं आणि इकडे परीला मधुरा आणि नितेश सोबत जायचं होतं.मधुरावर खूप जीव होता तिचा. घरातली सगळी नोकर माणसं पण परी जाते म्हणून रडू लागली होती आणि इवलीशी परी सगळ्यांना तिच्या बोबड्या शब्दांत समजावत होती.तिने सगळ्यांसाठी.......तिचा चॉकलेट्स चा बॉक्स रघु काकांच्या हातात दिला आणि सगळ्यांना देऊन तुम्ही पण खावा आणि रडू नका अस सांगत मधुरा चा हात पकडून ती गाडीत बसून आनंदाने सगळ्यांना बाय करत होती.

 

तिघे पण बेंगलोरला पोचले.थोडा आराम करून मधुरा आणि नितेश दोघेही आपल्या कामाला लागले.मधुराने तिचा जॉब सोडला होता. ती आता इनामदारांची कम्पनी घरी बसून सांभाळत होती. आणि नितेश त्याचे क्लाइण्ट बघत होता. फॅशन शो साठी मेकअप आर्टिस्ट म्हणून नितेश ची निवड करण्यात आली होती त्यामुळे तो थोडा बिजी होता.घरून कम्पनी च काम परीची सगळी काम,तिला भरवणं, तिचा सोबत खेळणं या सगळ्या गोष्टी मधुरा करायची.
 

परी आता चांगली हिंडू फिरू लागली होती बोबडे बोल आता स्पष्ट समजत होते.नितेश आणि मधुरा च्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले होते. म्हणून दोघेही मुंबईत येऊन फॅमिली सोबत एन्जॉय करतात.सहा महिन्यात मधुरा नितेशच्या पुरती प्रेमात होती.दोघेही अगदी लैला मजनू झाले होते.मुंबईत आल्यावर क्लाइण्ट सोबत मिटिंग आहे येणार नाही असं सांगून परीला आजी आजोबांसोबत ठेवून ही दोघे लोणावळ्याला फिरायला जातात. त्यांचा मधुचंद्र खऱ्या अर्थाने आज साजरा होणार होता.नितेश सगळी तयारी करून ठेवतो.रूम कशी डेकोरेट करायची...... ते अगदी कुठल्या मेणबत्या लावायच्या इथपर्यंत. मधुरा नितेश ची वाट बघत लॉबी जवळ उभी असते.
 

लोणावळ्याच्या गार वाऱ्यासोबत मधुरा नितेशच्या मिठीत विसावते. दोघेही वेटिंग हॉल मध्येच फ्रेश होतात.रूम सर्व्हिसिंग च काम चालू आहे थोडा उशीर होईल म्हणून आपण डिनर करूनच जाऊ अस नितेश मधुराला सांगतो.मधुरा पण हो ला हो करते. दोघेही सादसं जेवणं ऑर्डर करून जेऊन घेतात. तेवढ्यात रूम सर्व्हिसिंगचं काम पूर्ण झालं तुम्ही आता जाऊ शकता हे सांगायला हॉटेलचा माणूस येतो. दोघेपण पटकन सगळं जेवण संपवून रूम कडे जायला निघतात. रूम मध्ये येताच मधुरा समोरचा नजरा पाहून थक्क होते. आणि लाजतचं नितेशला मिठी मारते.

 

नितेश त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट करतो तशी मधुरा वर बघते.दोघांनाही त्यांचे उष्ण श्वास जाणवत असतात........ एकमेकांच्या हृदयाची धडधड स्पष्ट ऐकू येत असते. नितेश मधुराला त्याच्या दोन्ही हातात अलगद उचलून घेतो आणि बेड वर ठेवतो. मधुरा लाजेनी उजव्या हाताचा आधार घेत उपडी झोपते.नितेश उपडी झोपलेल्या मधुराला सरळ करतो........ती तिचे डोळे घट्ट बंद करते आणि पटकन उठून स्वतःला त्याच्या मिठीत झोकून देते. दोघेही आपल्या हाताची पकड एकमेकांभोवती अजूनच घट्ट करत जातात.तिच्या गालावरून आपला गाल फिरवत नितेश तिच्या ओठांचा ताबा घेतो. एकमेकांच्या मिठीत दोघेही आकंठ बुडालेले असतात.त्यांच्यात प्रेमाचा पाऊस आवेगाने बरसत असतो.मनसोक्त प्रणयसुख घेऊन दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावतात.
 

सकाळी मधुरा उठून आंघोळीला जाते.तिला रात्रीचा सगळा धुंद करणारा खेळ आठवत असतो.ती तशीच स्वतःच्या ओल्या केसांत एक टपली मारून स्वतःला स्वप्नातून बाहेर यायला सांगते. मधुरा आंघोळ करून नितेशला उठवते पण त्याला मधुराला सोडवत नसते.मधुरा बळजबरी त्याला आंघोळीला पाठवते आणि निघायची तयारी करायला घेते.बॅग भरुन झाल्यावर ती रूम मध्येच कॉफी मागवते आणि घरी फोन करून जेवायला येत असल्याच कळवते.मधुरा आणि नितेशचा संसार असाच छान चालू होता सगळे एकमेकांसोबत खुश होते.

इकडे निर्मलाला पण नऊ महिने पूर्ण झाले होते.जेवता जेवता निर्मला च्या पोटात दुखू लागत. कैवल्य लगेच कॅब बुक करतो. निर्मला ची तयारी होण्याआधी दारात कॅब आली असते.कैवल्य निर्मलाला सावकाश चालत खाली आणतो. कैवल्यचे बाबा मागवून रिक्षाने हॉस्पिटलला पोचतात. निर्मला डिलिव्हरी साठी रेडी नव्हती ती खूप घाबरत होती अश्यातच बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अस डॉक्टर सांगतात आणि सी सेक्शन करून निर्मला ची डिलिव्हरी करण्यासाठी कैवल्यची परवानगी असल्याचा फॉर्म भरून त्यावर त्याची ही करून घेतात.दोन तासांच्या ऑपरेशन नंतर निर्मलाला मुलगा झाल्याचं सांगतात.

मुलगा अगदी गोरा पान, सरळ नाक,निर्मला सारखे पिंगळे केसं.सगळे खूप खुश होते.निर्मलाला मात्र बारा टाके पडल्याने नीट उठता ही येत नव्हतं. पाच दिवसांनी निर्मलाला घरी सोडण्यात आलं. घरात बाळ आल्याने सगळे खूप खुश होते. आजीआजोबांचा तर सगळा वेळ आपल्या नातवासोबतच जाऊ लागला. कैवल्य आणि घरचे बाळासोबतच निर्मलाची पण खूप काळजी घेत होते.सिजर झाल्यामुळे तिला हालचाल करणं देखिल कठीण जात होतं.दिवसभर बाळाला दूध पाजताना कैवल्य ची आई बाळाला निर्मलाच्या दुधाजवळ घ्यायची आणि संध्याकाळी मात्र कैवल्य स्वतः बाळाला दुधाजवळ घेत होता. निर्मलाला खूप लाज वाटायची.......... पण कैवल्यचं असं वागणं तिची आणि बाळाची एवढी काळजी घेणं आवडत होतं.

बारश्याच्या दिवशीच कैवल्यला कम्पनी कडून प्रमोशन भेटलं आणि त्याची ट्रान्सफर बेंगलोर ला झाली होती.बारसं व्यवस्थित पार पडलं बाळाचं नाव कौस्तुभ ठेवलं. सगळी पाहुणी मंडळी गेली आणि मग कैवल्यने प्रमोशनचं सरप्राईज घरात सांगितलं.सगळे खूप खुश होते पण कैवल्य थोडा नाराज होता कारण निर्मलाचं सिजर झाल्याने त्याला तिला घेऊन जाता येत नव्हतं.त्याच्या मनाची घालमेल सगळ्यांना समजते.तशी आई बोलते नको काळजी करू....... फक्त तीन महिने काढ कसे तरी.मी निर्मलेला टूनटूणीत करते आणि मग ये तुझ्या लेकराला आणि बायकोला घ्यायला.

कैवल्यला ऑफिसमधून आठ दिवसांची सुट्टी भेटलेली असते.कैवल्य त्याची सगळी पॅकिंग दोन दिवसातच करतो इकडे निर्मला आणि आई कैवल्य साठी चकली,चिवडा,लाडू,तिखट शेव,खाऱ्या पुऱ्या बनवून सगळं पॅकिंग करून एक बॅग रेडी करून ठेवतात. कैवल्यनी बेंगलोर ऑफिस ला फोन करून घरच्या जेवणासाठी काही अरेंजमेंट होईल का आणि बाकी कामासाठी कामवाली या सगळ्याची चौकशी त्यांचा पगार या सगळ्या गोष्टी क्लियर करून कन्फर्म केल्या.
 

आठ दिवसांनी कैवल्य बेंगलोर ला गेला इकडे निर्मलाला त्याच्याशिवाय करमेना कैवल्यची अवस्था पण फार काही चांगली नव्हती. मधुराला सोडल्यावर पण त्याला एवढ वाईट नाही वाटलं जेवढं निर्मलाला सोडून आल्यावर एकटं वाटत होतं. निर्मला आणि कैवल्य वेळ भेटेल तेंव्हा तेंव्हा फोन वर बोलत असतं आणि बाकी वेळ दोघेही कामात गुंतून जात.निर्मलाला तर कौस्तुभ सोबत वेळ पूरतचं नसतो त्याच सगळं करण्यातच तिचा सगळा दिवस जात असतो.नाही म्हणता म्हणता तीन महिने पूर्ण होतात कैवल्य ऑफिसमध्ये पाच दिवसांच्या रजेचा अर्ज टाकतो त्याचा अर्ज मंजूर होतो तसा कैवल्य लगेच बॅग भरायला घेतो.त्याला कधी एकदा निर्मलाला आणि त्यांच्या कौस्तुभ ला बघतो अस झालेलं असतं. तो घरी फक्त आई बाबा आणि मामांना म्हणजे निर्मलाच्या बाबांना तो येणार असल्याच सांगतो....बाकी निर्मला साठी सरप्राईज असत.
 

कैवल्य बुकिंग करून लगेच निघतो.निर्मलाच्या आवडीची कचोरी घेतो आणि टॅक्सी ने घरी पोचतो.दार ठोकताचं निर्मला येते आणि बघते तर काय????? समोर कैवल्य उभा असतो.तीन महिन्याने बघितल्याने तिच्या डोळ्यात पाणी येत तिला रडताना बघून कैवल्यला हसू येते त्याला हसताना बघून निर्मला लटक्या रागानेच आत्याच्या म्हणचे कैवल्यच्या आईच्या कुशीत शिरते. कैवल्यची आई तिला शांत करते. घरातल्या सगळ्याना भेटून त्याला खूप बरं वाटत. दोन दिवसांनी आई आणि निर्मला मिळून बॅग भरत असतात.कौस्तुभ ची औषध त्याचे कपडे स्वेटर आणि इतर लहान सहान गोष्टी सगळ्या व्यवस्थित भरून दुसऱ्याच दिवशी तिघे बेंगलोरला येतात. एक दिवस बेंगलोर बघून निर्मला दुसऱ्या दिवशीच्या टिफिन ची तयारी करायला घेते तो पर्यंत कैवल्य आणि कौस्तुभ खेळत असतात.दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून निर्मला घरातली सगळी काम आवरून घेते.कैवल्य चा टिफिन कपडे,कौस्तुभचे कपडे धुणे या सगळ्या गोष्टी ती लवकरच आवरून कैवल्यला उठवते.त्याची सगळी तयारी करून त्याला बाय करते आणि मग छोट्या कौस्तुभचं न्हाऊ माखू करते.तिचा दिवस तर यातच जात होता.

एक दिवस रविवारच्या सुट्टी ला तिघे पण फिरायला जातात.एका मॉल मध्ये खरेदी करताना कैवल्य आणि मधुरा ची नजरानजर होते.कैवल्य त्याच्या बायको आणि मुलासोबत मॉल मध्ये खरेदीला आलेला असतो. ती कैवल्य कडे बघतचं असते की नितेश परीला घेऊन येतो. तिघेही एकाच कॅफे मध्ये जातात.मधुरा नितेश ला कॉफी ऑर्डर करायला सांगून वॉशरूमला जाते.पाठोपाठ कैवल्यही जातो.खरं तर त्याला अस तिच्या पाठी जायचं नसतं पण मधुरा ला एवढी मोठी मुलगी आहे ही गोष्ट त्याला रुचत नव्हती.

मधुरा.........."कैवल्य"

मधुरा बराच वेळ कैवल्य कडे बघते.

मधुरा..........तुझ्या लग्नाला तर मे बी.......पाच ते सहा महिने झाले असतील ना???? "कैवल्य"
 

हो........मग??? "मधुरा"
 

मग.........तुझी........आय मीन .........तुमची मुलगी एवढी मोठी कशी??? सॉरी.....म्हणजे हा तुझा वयक्तिक प्रश्न आहे...... पण........."कैवल्य"

 

हो.........परी माझी आणि नितेश ची मुलगी आहे....."मधुरा"
 

तेवढ्यात नितेश परी ला घेऊन येतो. तिला पण वॉशरूमला जायचं असतं आणि त्याच वेळी मधुरा आणि कैवल्य च बोलणं त्याच्या कानावर पडते.

हो........परी माझी आणि मधुरा ची मुलगी आहे.

नितेश ला बघून कैवल्य बावरतो. तुझी मधुरा बद्दलची काळजी अगदी रास्त आहे. तुला जर वाटत असेल मी घटस्फोटित आहे किंवा माझी बायको एक मुलगी माझ्या पदरात टाकून गेली आणि मधुरा ने अश्या व्यक्तीशी लग्न केलं तर तुझे विचार चुकीचे आहेत. "नितेश"

कैवल्यची अवस्था कात्रीत पकडल्यासारखी झाली होती कारण बरोबर........हेच प्रश्न त्याला पडले होते पण त्याने त्याच्या मनामधले प्रश्न बोलून दाखवले होते...... उत्तर नव्हतं दिलं.
 

नितेश कैवल्यच्या चेहऱ्यावर पडलेला प्रश्नार्थक भाव बघून हसतं होता.नितेश परीला मधुरा कडे देतो.मधुरा तिला वॉशरूमला घेऊन जाऊन येते.
 

नितेश कैवल्यची चौकशी करतो तेंव्हा त्याला समजते की तो बायको आणि मुलासोबत आला आहे. नितेश स्वतःहून कैवल्यला आम्ही तुम्हाला जॉईन करायचं का अस विचारतो.कैवल्य लगेच हो बोलतो.नितेश त्यांच्या खुर्च्या कैवल्य च्या टेबलजवळ ऍडजस्ट करायला सांगतो आणि त्यांची ऑर्डर पण तिथेच आणायला सांगतो.
 

नितेश.........काय करतोयस?????? "मधुरा"

कुठे काय??? अगं मधु......त्याच्या मनात यावेळी खूप प्रश्न आहेत आणि त्यांची उत्तर त्याला भेटणं खूप गरजेचं आहे.जर का त्याने त्याचे चुकीचे अंदाज लावले तुझ्याबद्दल....... तर त्याला जास्त त्रास होईल.त्याच्या मनात खूप गुंता आहे जो त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय तो गुंता फक्त सोडवतोय मग बघ त्याचा चेहरा कसा खुलेलं ते."नितेश"
 

मधुरा ला त्याच्यावर पूर्ण विश्वास असतो त्यामुळे त्याच बोलणं ऐकल्यावर ती काही बोलत नाही.

इकडे कैवल्य निर्मलाला मधुरा आणि तिचा नवरा आपल्याला जॉईन होत असल्याचं सांगतो.

नितेश,मधुरा आणि परी तिघेही कैवल्यला जॉईन होतात.कैवल्य त्याच्या बायको आणि मुलाची ओळख करून देतो.मधुरा तिच्या नवऱ्याची आणि परी ची ओळख करून देते.परी इवल्याशा कौस्तुभ ला बघून फार खुश होते .मधुरा पण त्याला मांडीवर घेते.मधुराच्या हातात बाळ बघू नितेश ला मधुरासाठी खूप वाईट वाटते दोघे पण एकमेकांकडे बघून नजरेनेच स्माईल करतात.
 

चला तर मग......कैवल्य तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो आता.....
बरोबर आहे तुझं........आमचं लग्न होऊन सहा महिनेच झालेत आणि तरी परी ही आमची मुलगी कशी???
कस आहे मित्रा.......मी आयुष्यात कधीच बाप नाही होऊ शकत........ही गोष्ट माहिती असूनही मोठ्या मनाने माझ्याशी मधुराने लग्न केल.तिला आई होण्याचं सुख मी कधीच नाही देऊ शकत म्हणून मग......... जी गोष्ट नंतर करायची ती आम्ही आताच केली.

तुझी आणि मधुराची ताटातूट झाल्यानंतर मधुरा लोणावळ्याला गेली होती.त्याठिकाणी एका आश्रमात ती तिचा जास्त वेळ घालवू लागली....... जेणेकरून ती तुझ्यातून बाहेर येईल. तिथेच आश्रमच्या बाहेर परीला एक व्यक्ती अगदी तिचा जन्म झाल्या झाल्या च ठेवून गेला होतं.तीच ही परी.जिला आम्ही आमच्या आयुष्यात आमचं छोटस घर पूर्ण व्हावं म्हणून दत्तक घेतली. आता आमचं सगळं काही हिच्या अवती भोवती असतं."नितेश"
 

काही वेळ टेबलवर सगळी शांतता पसरते.......आणि  वेटरच्या आवाजाने भंग होते.

खरं सांगू का ताई......आपली आणि परकी असं काही नसतं......मुलं ही मुलं असतात.आपण जसं घडवू ती तशी घडतात. तुमची परी खूप छान आहे आणि तूमच कुटुंबही फार छान आहे...."निर्मला"
 

अगं........ ताई वैगरे नको बोलू....मधुरा बोल...."मधुरा"
 

तुम्ही मला माझ्या मोठ्या बहीणीसारख्याच आहात......आणि तुमच्या मुळे मला कैवल्य भेटला. तुम्ही माझ्या साठी खूप काही आहात."निर्मला"

बरं........ पण मग ए ताई म्हण.........मग तर झालं...."मधुरा"

हो चालेल....अस म्हणून सगळे कॉफी घेतात आणि निघतात.परी ला कौस्तुभ सोबत आणखी खेळायचं असत पण दुसऱ्या दिवशी काम असल्याने सगळे कसबस तिला समजावत पण ती तयार च नसते.शेवटी नितेश पुढच्या रविवारी पूर्ण दिवस फार्महाऊस वर येण्यासाठी गळ घालतो.कैवल्य तयार होतो तशी परी खूप खुश होते.कौस्तुभ चा गोड पापा घेते आणि नितेश च्या खांद्यावर डोकं ठेऊन परी ची स्वारी घरी जायला तयार होते.

 

दुसऱ्या रविवारी........परी सकाळपासूनच कौस्तुभ च्या वाटेवर डोळे लावून हॉल मध्येच खेळत बसलेली असते. नितेश जेवणाची तयारी करत असतो. एवढ्यात गेट जवळ कॅब येते. मधुरा पटकन पुढे जाऊन निर्मला च्या हातातली बॅग घेते.ज्यात कौस्तुभ चे छोटे छोटे कपडे आणि दिवभराच्या उपयोगी वस्तू असतात. परी कौस्तुभ ला बघून खूप खुश होते. निर्मला कौस्तुभ ला परीच्या मांडीवर देते.कौस्तुभ पण तिच्या कडे बघून छान हसत असतो. नितेश चे सर्वन्ट पाणी आणि ज्युस घेऊन येतात.
 

मग काय दिवसभर गप्पा, कामाचं बोलणं,निर्मला आणि मधुराच्या मूलांबद्दलच्या गप्पा,खाणं पिणं........ यातच कधी संध्याकाळ होते कळतच नाही. दिवसभरात कोणाच्याही मनात कोणाबद्दलही चुकीची भावना किंवा प्रश्न आला नाही कारण चोघेही आपल्या संसारात खूप खुश आणि समाधानी होते. संध्याकाळी निघायची तयारी करत असताना कैवल्यला मामा आजारी असून खूप सिरीयस असल्याचा त्याच्या बाबांचा फोन आला.त्यांनी निर्मलाला ताबडतोब घेऊन यायला सांगितले. कैवल्यने सगळा प्रकार नितेश ला सांगून लगेच घरी जाऊन मुंबईला जाणार असल्याच सांगतो, पण नितेश बोलतो घरी जाऊन वेळ वाया जाईल तुम्ही इथुनच निघा........ मी फ्लाईट ची बुकिंग करून तुला मेल करतो.कैवल्य नितेश ला थँक्स बोलून मिठी मारतो आणि निर्मलाला घेऊन लगेच निघतो.निर्मला पार कोलमडून गेली होती. मधुरा तिला सावरते आणि नितेश ला एरपोर्ट ला तिघांना सोडून यायला सांगते. नितेश कैवल्य चा नंबर घेतो आणि त्यांना सोडून घरी येतो. दिवसभराच्या आनंदावर एका क्षणात दुःखाच सावट पसरलं होत.

 

मुंबईला पोचून निर्मला आणि कैवल्य मामाची (निर्मलाच्या वडिलांची) भेट घेतात.लेकीला आणि नातवाला बघताच त्यांचे डोळे बंद होतात. कैवल्य ची आई निर्मलाला सांभाळते.कैवल्य स्वतःच  सगळे विधी पूर्ण करून नितेश ला  फोन करून सगळं सांगतो.कार्य आणि इतर काही काम आटपून कैवल्य एकटाच बेंगलोरला येतो आणि निर्मलाला थोडे दिवस मुंबईत आईवडीलांकडे ठेवतो.
 

मधुरा आणि नितेश पण विकेंड साठी मुंबईत येतात.दोन दिवस राहून निघत असतात पण परी ला आजी आजोबांसोबत राहायचं असतं म्हणून बेंगलोरला ती दोघेच येतात.परि शिवाय घर दोघांनाही खायला उठलं होतं. मधुरा पण शांत शांत च राहत होती.मग काय नितेश ने मस्त पैकी मूड बनवून मधुरा ला हॅप्पी केलं.दोघेही दोन दिवसांनी जरा तरतरीत झाले होते.शेवटी प्रणयसुख माणसात जोश भरतो ते काही खोटं नाही असं नितेश चेष्टेने बोलतो तशी मधुरा लाजतचं त्याच्या कुशीत शिरते.
 

दोन दिवसांनी नितेश कोलकातासाठी निघाला. तिकडे आठ दिवसांसाठी एक शो होता.ज्या साठी त्याला बोलावलं होतं.मधुराला एकटं ठेऊन त्याला जायचं नव्हतं पण काय करणार????? शेवटी काम केलंच पाहिजे.
 

ज्या दिवशी नितेश जातो नेमकं त्याच रात्री कैवल्य नितेशला फ्लाईट बुकिंग केले होते त्याचे पैसे द्यायला येतो.नितेश नसल्याने मधुरा ला खूप  अॉकवर्ड होत असते.

 

मधुरा त्याला पाणी देते.कैवल्य पैसे देत असतो पण मधुरा घेत नाही. कैवल्य म्हणतो मी नितेश ला फोन लावत होतो पण नॉटरीचेबल येत होता म्हणून डिरेक्टली इकडे आलो.बरं..........मग नितेश आला की येईन मी. मधुरा हो म्हणत निर्मलाची आणि कौस्तुभ ची चौकशी करते. थोडं जुजबी बोलणं झाल्यावर कैवल्य निघतो. कैवल्य बाहेर येतो तर गाड्यांची खूप गर्दी असते चौकीशी केल्यावर समजत पुढे मेन रोड वर खूप मोठा अपघात झाला आहे तरी ट्रॅफिक क्लिअर व्हायला पहाट होईल. मधुरा कैवल्यला आजची रात्र घरी राहण्यासाठी सांगते. खर तर दोघांच्याही मनात नव्हतं पण नाईलाज होता म्हणून कैवल्य थांबला.मधुरा ने नितेश ला फोन करून सांगितलं आणि कैवल्यने निर्मलाला. दोघे एकमेकांना ओळखत असूनही नजर चोरत होते आणि हाच त्यांचा आपल्या जोडीदाराप्रति असलेला एकनिष्ठपणा होता. मधुरा आणि कैवल्य मुकी असल्याप्रमाणे जेवतात. मधुरा त्यांच्या मेड ना सांगून सगळी काम आवरून घ्यायला सांगते.कैवल्य ला वरची खोली देऊन ती तिच्या आणि नितेशच्या खोलीत येते.दोघेही रात्रभर झोपत नाहीत.सकाळी कधी तरी मधुराला डोळा लागतो.कैवल्य सकाळी पाचला उठून त्यांच्या मेड ना सांगून निघून जातो.मधुरा दहा वाजता उठते तेंव्हा तिला कैवल्य गेल्याच समजत.

क्रमश:
कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावासाहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading