Dec 06, 2021
Kathamalika

काय फरक पडतो??? (भाग १२)

Read Later
काय फरक पडतो??? (भाग १२)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/
 

भाग ९
https://www.facebook.com/581606972323826/posts/1055565224927996/

भाग १०
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-10_5254

भाग ११
https://www.facebook.com/581606972323826/posts/1058459074638611/

मधुराचे पप्पा येतात तशी मधुरा तिच्या प
प्पांना मिठी मारून भेटते आणि पुन्हा मागे वळून तिच्या बॅग उचलते तसे मधुराचे पप्पा लगेच बोलतात.

लग्न दिवाळीच्या मुहूर्तावर केलं तर चालेल का??? म्हणजे दोन महिने पुरे पडतील का??? खरेदी आणि इतर गोष्टींसाठी??? आणि मी आजच जाऊन इनामदारशी बोलून घेतो. "मधुरा चे पप्पा"

मधुरा भरल्या डोळ्यांनीच पप्पांच्या गळ्यात पडते आणि कैवल्य बाबा होणार ही बातमी ऐकल्यापासून थांबवलेला हुंदका पप्पांच्या मिठीत मोकळा करते. तिचे पप्पा पण तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात आणि तिला आनंदाने निरोप देतात.

मधुरा बेंगलोर ला पोचते. नितेश तिच्या फ्लाईट टाईम च्या आधीच तिथे पोचलेला असतो. मधुरा लांबूनच नितेश ला हात दाखवते तसा नितेश लगेच पुढे येतो, कारण मधुराची जाताना एक आणि येताना चार बॅग झालेल्या तो बघतो.
आणि हसूनचं विचारतो. कायमची राहायला येते आहेस का?? नाही म्हणजे एवढया बॅग घेऊन आली आहेस म्हणून विचारतो?? नितेश भुवया उंचावतच तिला विचारतो.
 

हो......कारण पुढच्या दोन महिन्यात काय काय करू?????? शॉपिंग करू की तुझ्या फार्महाऊस वर अं......... सॉरी......... आपल्या फार्महाऊस वर शिफ्टिंग करू???? "मधुरा"

तू एकटी का करशील मी करेन की मदत. एवढं बोलून त्याचे डोळे लकाकतात......

काय बोललीस तू????? परत बोल. "नितेश"
 

आकाशवाणी एकदाच होते सारखी सारखी नाही होत."मधुरा"

नितेश त्याच्या केसात दोन्ही हातांची बोटं टाकून घट्ट मूठ दाबतोआणि म्हणतो.........
(आईशपथ............. मधु.........I love you......)
एव्हाना एअरपोर्ट वरची सगळी माणसं त्या दोघांकडे बघून हसत असतात.मधुरा ओशाळते आणि नितेश ला हाताला धरून अक्षरशः खेचत गाडीपर्यत घेऊन जाते.
 

नितेशला गाडीत बसवून ती स्वतः ड्राईव्ह करायला बसते.नितेश नको म्हणत होता, पण आज नितेशचे पाय काही जमिनीवर नव्हते.तो आकाशाला गवसणी घालत होता.मधुरा त्याला बघून खुश होती पण मध्येच तिने कैवल्य चा विषय काढला.

कैवल्य बाप होणार आहे...... आजच समजलं.......त्याला अभिनंदन करून मी घरी आले आणि माझी बॅग पॅक करून खाली हॉल मध्ये पप्पांची वाट बघत बसले.एवढ्यात पप्पा आले............. त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक. रात्री पर्यंत लग्नाला नकार देणारे......निघता निघता लग्नाची तारीख कधी काढायचं म्हणू लागले." मधुरा"
 

काही असो तयार झाले ना????आता त्यात शंका कुशंका काढत बसू नको.नाही तर सासरेबुवा लगेच पलटी मारतील.नितेश मधुराची चेष्टा करत बोलला. मधुरा पण त्याच्या गालावर एक चापट देते.दोघेही घरी पोचतात.

मधुरा फ्रेश होऊन पूलसाईडला पाण्यात पाय टाकून बसलेली असते.नितेश सर्वंट ला सांगून जेवणाच्या प्लेट्स लावायला घेतो. तो स्वतः टेबल डेकोरेट करत असतो.

छान गुलाबाच्या पाकळ्या,त्याच्या बाजूने सुवासिक कंँडल,आणि त्यात मधोमध मधुराची फेव्हरेट फिश थाली.
जेवण बघून तर तिच्या तोंडाला पाणी सुटते. मधुरा आणि नितेश जेवणं आटोपती घेतात.आज मधुरा नितेश च्या फार्महाऊस वरच राहणार असते. दोघे पण रात्रभर गप्पा मारत असतात.काही महिन्यांपूर्वी नितेश बद्दल झालेला तिचा गैरसमज, मग त्याने सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगणं, कैवल्यसोबतची ताटातूट,बेंगलोर ला येणं, स्वतःला कामात झोकून देणं, मग पुन्हा नितेशची भेट,त्यांची जवळीक,प्रेम आणि शेवटी लग्न.........याचा दोघेही आढावा घेत बसलेले असतात. दोघांनाही खरतरं हसू येत होतं स्वतःवर.........सगळ्या गोष्टी आठवताना.पण चला शेवटी मोहीम फत्ते झाली याचा आनंदच होता.
 

मधुरा चे पप्पा नितेश च्या घरी जाऊन पुन्हा नितेश आणि मधुराच्या लग्नाची बोलणी करतात.यावेळी मधुरा ची आई आणि दोन्ही भाऊ पण गेले होते. आपला जुना मित्र सगळं माहीत असून पुन्हा मागणी घालायला कसा आला???? हा मोठा प्रश्नच होता......पण मधुराच्या पप्पांनी सगळ्या गोष्टी थोडक्यात त्यांना सांगितल्या आणि सगळेच खूप खुश झाले. जुनी मैत्री आता नातेसबंधात बदलून आणखी घट्ट होणार याचा खूप आनंद असतो सगळ्यांना.दोन्ही विहिनबाई एकमेकींची गळा भेट घेतात.मधुराच्या आईने त्यांना मिठाईचे बॉक्स आणि फळं दिली. नितेश च्या आईने त्यातला एक बॉक्स खोलून सगळ्यांच तोंड गोड केलं आणि पुढच्या आठवड्यात चेकअप झालं की लगेच दुसऱ्याच दिवशी भटजींना बोलावून दिवाळीत चांगला मुहूर्त आणि तारीख ठरवून जोरदार लग्नाचा बार उडवून टाकू अस ठरवतात.
 

मधुरा आणि नितेश पण त्यांच्या कामाच्या डेडलाईन पूर्ण करण्यात बिजी होतात.जास्तीत जास्त वेळ कामात आणि फक्त शनिवार ची भेट अस दोघे ठरवतात.त्याव्यतीरिक्त फोन वर दोघांचं सतत बोलणं चालूच असायचं.दोघेही त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्न बघत होती.

मधुराचे पप्पा कैवल्यला ही गोड बातमी सांगतात.कैवल्य पण खूप खुश होतो.कारण त्याची खूप जवळची मैत्रीण आज खऱ्या अर्थाने तिच्या आयुष्यात सुखी होणार असते. घरी येऊन कैवल्य ही बातमी आईबाबा आणि निर्मलाला सांगतो. निर्मला लगेच देवासमोर साखर ठेऊन तिच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना करते.

दोन दिवसांनी अचानक निर्मलाला रक्तस्त्राव होऊ लागतो आणि ते बघून निर्मला किचन मध्येच घेरी येऊन कोसळते.रविवार असल्याने कैवल्य घरीच असतो.तो पटकन डॉक्टरांना घेऊन येतो.डॉक्टर चेकअप करून इमर्जन्सी मध्ये सोनोग्राफी करायला सांगतात.या सगळ्या प्रकाराने घरातले घाबरतात.कैवल्य आणि त्याचे बाबा निर्मलाला डॉक्टरांकडे घेऊन जातात.निर्मला ची गर्भपिशवी खूप नाजूक आहे असं त्या रिपोर्ट मध्ये कळत.निर्मलाला कम्प्लिट बेडरेस्ट सांगतात.कैवल्य आणि घरातील सगळेच निर्मला ची खूप काळजी घेत असतात.घरात कपडे-भांडीसाठी बाई लावतात आणि स्वयंपाकाच कैवल्यची आईच बघायची.निर्मलाच खाणं पिणं सगळं बेड वरच होऊ लागलं.
 

इकडे मधुरा आणि नितेशच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असते. नितेश........इनामदारांचा एकुलता एक मुलगा आणि मधुरा सरदेशमुखांची एकुलतीएक लाडाची आणि घरचं शेंडेफळ. लग्न अगदी तोंडावर आलं होतं.बेंगलोर मध्ये ही दोघे शॉपिंग करत होते आणि मुंबईमध्ये त्यांची फॅमिली खरेदी करत होती.मोठ्यांची खरेदी म्हणजे मान-पान, घेणं देणं आणि मोठ्या घरातल लग्न म्हंटल की अपेक्षा पण मोठ्याच असतात.इतर खरेदी दोघे बंगलोरला करतात आणि लग्नाची खरेदी घरातल्यांसोबत करतात.सगळ्या विधींचे ड्रेस,साड्या,त्यावर मॅचिंग ज्वेलरी,नवरीसाठी मंगळसूत्र तिचा सगळा शृंगार या सगळ्याची खरेदी करून सगळे आपापल्या घरी जातात.जी मधुरा नऊ महिन्यापूर्वी लग्नाला नकार देत होती तिच्याच गळ्यात काही दिवसांनी माझ्या नावाचं मंगळसूत्र असेल हा विचार कुठेतरी नितेशला खूप सुखावत होता.

मधुरा आणि नितेश लग्नाच्या आठ दिवस आधी मुंबईला पोचले.ऑफिस मधल्या मोजक्याच लोकांना लग्नासाठी आमंत्रण होतं आणि नितेशने पण त्याच्या जवळच्याच माणसांना सांगितलं होतं. इतर घरातली थोरली मंडळी ती तर उत्सवमूर्तींच्या पण आधीच घरात ठिय्या मांडून होती.घरात घाईगडबड,लगबग,आवराआवर,नवरीची बॅग भरण्यापासून ते इतर सगळ्या गोष्टींना अगदी उधाण आलं होत.
 

मधुरा पण मेकअप साठी ट्रायल घेत होती.उगाच जास्त डार्क किंवा अतिरेक मेकअप तिला नको होता.हळदीच्या आदल्या दिवशी मेहंदीवाली येऊन नवरीच्या आणि सगळ्या पाहुण्याच्या हातावर अगदी वाजत गाजत मेहंदी काढून गेली.हळदी आणि साखरपुडा एकाच दिवशी असल्याने सकाळी लवकरच चुडा भरणीचा कार्यक्रम आटोपून साखरपुड्याची तयारी करायला घेतली.

 

सगळे विधी अगदी रितिरिवाजाला धरून पूर्ण झाले.हो नाय करता करता लगीनघटिका समीप आली.लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज,माहेर लांब असो किंवा जवळ प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा क्षण खूप हळवा असतो.नवरा मंडपात आला मधुराच्या दोन्ही भावांनी नितेशचे कान पिरगळले. त्याला मानात मंडपापर्यंत वाजत गाजत घेऊन गेले.लग्न विधी सुरू झाली.भटजींनी मंगलाष्टके म्हणायला सुरवात केली.थोड्या वेळाने नवरीमुलीला मामाने घेऊन या असा भटजींनी आवाज दिला........तसे मधुराचे दोन्ही मामा मधुरा ला घेऊन आले.
 

मंगलाष्टके पूर्ण होताच सगळ्या हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट घुमू लागला. भांग भरणं, सप्तपदी,सगळं अगदी व्यवस्थित पार पडलं. सगळे विधी करून नवरा नवरी रिसेप्शनसाठी तयार व्हायला गेले.इकडे वऱ्हाडी मंडळी एक एक करून जेवणासाठी लाईन मध्ये उभे होते.मधुराची आई सारखी मधुराच्या सामानावर नजर फिरवत होती. काही महत्वाचं राहायला नको म्हणून. इकडे दोघेही तयार होऊन खाली हॉल मध्ये आले.मधुराला नववधू च्या रुपात बघताच तिच्या पप्पांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळले.नवरा नवरी स्टेज वर गेले तशी सगळ्यांची त्यांना भेटून गिफ्ट आणि आशीर्वाद देण्यासाठी गर्दी झाली. लांबची सगळी मंडळी निरोप घेऊन निघाली.थोड्यावेळाने घरातली मंडळी जेवायला बसली. टेबलखुरच्या मांडून त्याला बाजूनी झालर लावली,गुलाबाच्या पाकळ्यांनी ताटाच्या सभोवताली रांगोळी काढली,आणि छान पैकी ताट भरून सगळ्यांना जेवायला बोलवणं आलं......तसे सगळे डायनिंग हॉल कडे गेले.

नवीन जोडप्याला सगळ्यांनी उखाणा घेण्याचा आग्रह केला.

समज-गैरसमज असतोच सगळीकडे......समज-गैरसमज असतोच सगळीकडे,सगळ्यांच्या साक्षीने घास भरवते.......नितेश.......बघ आता इकडे..

हो नाही....करता करता नकळत बांधली गेली आमची गाठ,मधुराचं नाव घेतो.....वेगळाच आमचा थाट..

उखाणा ऐकून सगळेच टाळ्या वाजवतात. जो क्षण नको असतो आणि हवा असतो असा म्हणजे आपल्या मुलीची पाठवणी.बाप किती मोठा आणि श्रीमंत असुद्या. मुलीची पाठवणी करताना त्याचा जीव जड होतोच.
 

मधुरा सरदेशमुख अखेर इनामदारांची सून होते. नितेश आणि मधुराचं जंगी स्वागत करण्यात येत.दारातल माप ओलांडून...... कुंकवाच्या परातीत पाय ठेऊन एक एक पाय पुढे टाकत घरातली लक्ष्मी सगळीकडे आनंद पसरवत घरात प्रवेश करत असते.
 

गृहप्रवेशानंतर गमतीशीर खेळ खेळून सगळे जण नवरा नवरीला त्यांची खोली दाखवतात. त्यांची थोडी चेष्टा मस्करी करून शेवटी दोघांना एकत्र सोबत ठेऊन झोपायला जातात.मधुरा आणि नितेश दोघे पण चेंज करून बेड वर अंग टाकून देतात.

नितेश मधुराला एक एनवोलप देतो.मधुरा डोळ्यानेच काय आहे म्हणून विचारते.नितेश पण डोळ्यानेच खुणावून उघडण्यास सांगतो.मधुरा दोन्ही खांदे उडवत एनवोलप खोलते.त्यात पॅरिसच पंधरा दिवसांचं पॅकेज असतं.
 

मधुरा खूप हसते. त्यावर नितेश विचारतो काय झालं हसायला. मधुरा म्हणते सकाळी सांगेन सरप्राईज आहे.आता खूप थकली आहे.दोघे पण आराम करू.गुड नाईट.........बोलून मधुरा झोपून जाते.नितेश पण दिवसभराच्या थकव्यामुळे लगेच झोपतो.

सकाळी मधुरा लवकरच उठून शॉवर घेऊन खाली जाते. खाली पूजेची तयारी चालु असते.नितेश पण रेडी होऊन खाली येतो.मधुरा चे घरचे आलेले असतात. भटजी येऊन पूजा विधी सुरू करतात.सकाळी सत्यनारायण आणि रात्री जागर गोंधळ असा पूर्ण दिवस धकाधकीचा जातो त्यात पूर्ण दिवस नितेश मधुराला सरप्राईज बद्दल विचारत असतो.पण मधुरा हा नाही....... की चू नाही. आठ दिवसातच मधुरा आणि नितेश ची पॅरिस ची फ्लाईट असते अस नितेश त्याच्या घरी सांगतो.पॅरिस हे मधुराचं आवडत डेस्टिनेशन असतं आणि Pavilion De La Reine  हे आवडत हॉटेल.छान अस वेलींनी सजलेलं. कारण नितेश चे पप्पा त्यांना फिरायला जाण्यासाठी बुकिंग करू का अस विचारतात म्हणून तो ही सगळी माहिती देतो आणि मधुरा ला या बद्दल लग्नाच्या रात्रीच सरप्राईज दिल्याचं तो सांगतो.त्यांच्या गप्पा चालूच असतात तेवढ्यात मधुराचे मम्मी पप्पा येतात.
 

सगळे त्यांचा पाहुणचार करतात.ते ज्या कामासाठी आलेले असतात तो विषय काढतात.

मधुरा आणि जवाईबापू(नितेश) बसा इथे......" मधुराचे पप्पा"

पप्पा......नितेश च म्हणा मला.जवाईबापू वैगरे नको."नितेश"

बरं...... जशी तुझी इच्छा........चला तर बसा बघू जोडीने.........हां...... आत्ता कसं........ दोघे पण हात पुढे करा......." मधुराचे पप्पा"

दोघेही हात पुढे करतात. मधुराचे पप्पा दोघांचे हात एकमेकांच्या हातावर ठेऊन त्यांच्या हातात एक बॉक्स देतात आणि तो खोलायला सांगतात. मधुरा नितेश कडून  बॉक्स घेते आणि खोलते.........आत मध्ये दोन वाउचर असतात. एक वाउचर ती नितेश कडे देते आणि एक ती स्वतः खोलून बघते. वाउचर खोलून बघितल्यावर दोघांनाही हसू येत.सगळ्यात जास्त तर मधुराला....त्या दोघांना अस हसताना बघून सगळेच संभ्रमात पडतात.नितेश ते वाउचर कसलं आहे ते सांगतो आणि मधुरा काही न बोलता तिच्या रूम मध्ये जाते.कपाटात तिने नितेश साठी घेतलेलं सरप्राईज ती आता त्याला सगळ्यांसमोर देणार असते.

मधुरा खाली येऊन नितेश ला एक एनवोलप देते. नितेश विचारतो काय आहे मधुरा बोलते खोलून तर बघ एक सरप्राईज आहे. सगळ्यांच्या नजरा मधुराच्या सरप्राइज वर असतात. नितेश ते खोलून बघतो तर काय????त्यात पण  तिकीट्स असतात आणि ती पण पॅरिसची आणि त्याच हॉटेल ची. दोघेही खूप हसतात. आणि हा पॅरिस चा सगळा सावळा गोंधळ घरातल्याना सांगतात त्यावर ते पण सगळे हसतात. मधुराचे पप्पा वाउचर देतात त्यामुळे ते कॅन्सल करता येऊ शकत होते म्हणून ते वाउचर कॅन्सल करतात.

मधुराच्या पप्पांना मिटिंग असते म्हणून ते चहा घेऊनच निघतात आणि सोबत तिची मम्मी पण निघते.ही दोघेही तयारीला लागतात. मधुरा पण तीच बुकिंग कॅन्सल करते.सरते शेवटी दोघेही ठरल्या दिवशी घरातल्यांचा आशीर्वाद घेऊन निघतात.सगळे त्यांना बाय करायला एरपोर्टला जातात. त्यांचं विमान पण वेळेत असत त्यामुळे सगळ्या फॉर्मलिटी पूर्ण करून चेकिंग करून दोघेही त्यांच्या पुष्पकविमानात आसनस्थ होऊन त्यांचा मधुचंद्र साजरा करायला पॅरिस ला रवाना होतात.

क्रमश:
कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या नावासाहित करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading