Dec 06, 2021
Kathamalika

काय फरक पडतो??? (भाग ११)

Read Later
काय फरक पडतो??? (भाग ११)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

भाग 1 https://www.facebook.com/581606972323826/posts/1033838273767358/?sfnsn=wiwspwa&funlid=qIdaFHbMD6ibihnO

भाग 2
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-1_4732

भाग 3
https://www.facebook.com/581606972323826/posts/1035841593567026/

भाग 4
https://www.facebook.com/581606972323826/posts/1038468979970954/

भाग ५
https://www.facebook.com/581606972323826/posts/1040012973149888/

भाग ६
https://www.facebook.com/581606972323826/posts/1052270571924128/

भाग ७ https://www.facebook.com/581606972323826/posts/1053797208438131/

भाग ८
https://www.facebook.com/581606972323826/posts/1054967561654429/
 

भाग ९
https://www.facebook.com/581606972323826/posts/1055565224927996/

भाग १०
https://www.irablogging.com/blog/kay-fharak-padtopart-10_5254

पप्पांना कन्व्हेंस करणं म्हणजे खूप कठीण होत,कारण नितेश.........कधीच बाप होऊ शकत नाही हे मधुरा ने त्यांना आधीच सांगितलेलं असत.बऱ्याच दिवसांनी लेक घरी आली आहे म्हणून घरात पंचपक्वानं बनवली जातात आणि ती ही मधुरा च्या आवडीची. सगळेजण छान गप्पा मारत मस्ती करत जेवणं आटोपतात.

दुसऱ्या दिवशी मिटिंग असल्याने मधुरा चे दोन्ही भाऊ प्रेझेन्टेशनची तयारी करायला जातात.इकडे मधुरा पण मम्मी पप्पांच्या खोलीत येते.

पप्पा.......येऊ का आत???नाही म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना होणार????" मधुरा"(मधुरा डोळे किलकिले करून मस्ती मध्ये बोलते.)
 

छे......... गं........ लेकीच्या येण्याने कोणते आईवडील डिस्टर्ब होतं नाही ..... समजलं????"मधुराची आई"
 

मधुरा आता येऊन, बेड वर  दोघांच्याही मध्ये.......हातात हात गुंफून बसते.

हम्मम्म.....तर काय मग......कसा चाललाय राजा राणीचा संसार......."मधुरा"

थट्टा करतेस काय गं आमची........हा!!!! "मधुरा चे पप्पा"

नाही हो खरचं विचारते.......कारण मी आता मूव्ह ऑन करायचं ठरवलं आहे." मधुरा"

काय????????खरचं बेटा........ तू खरचं बोलतेस????
अगं..... असं असेल तर मी आताच तयारीला लागतो.माझ्या लाडक्या लेकीसाठी राजकुमार शोधून आणेन मी.........की माझ्या परी राणी ने ऑफिस मध्येचं कुणी बघितला आहे?????? तसं असेल तर सांग बुआ आधीच........उगाच मागच्या वेळेसारखा गोंधळ नको??? "मधुरा चे पप्पा"
 

खरं तर.......मी हेच सांगायला आली आहे.......मी नितेश सोबत लग्न करायचं ठरवलं आहे....."मधुरा"

काय??????काय बोलतेस काय बेटा.......... अगं.... पण तूच सांगितलं होतं ना मला तो कधीच बाप नाही होऊ शकत....... अगं बाळा त्याच्या सोबत लग्न केलंस तर लोकं तुला नको नको ते बोलतील. जो दोष मुळी तुझ्यात नाहीच आहे..... तो दोष तुला लावतील.बाळा........अगं हे जगं तुला टोमणे मारून,घालूनपाडून बोलून हैराण करून सोडेल.........आपण दुसरा कोण तरी बघू ना......"मधुरा चे पप्पा"( लेक खूप जिद्दी असल्याने तिची मम्मी मात्र तिच्या या निर्णयावर मौन धरून बसते.ती दोघांच्याही बाजूने बोलत नाही आणि दोघांपैकी कोणाचीच समजूत काढत नाही. बाप लेकीचा होणारा वाद ती उघड्या डोळ्यांनी बघत असते.)

अगं तू नुसती बघत काय बसली आहेस बोल ना काही तरी समजावं तिला काही......."मधुरा चे पप्पा"

मी काय बोलू आणि काय समजावू??????? तिच्या प्रत्येक निर्णयात तुम्ही नेहमी तिला सपोर्ट केला आहे ती पण जिद्दी आहे आणि तुम्ही पण.उगाच एकाची बाजू घेऊन मला वाईट नाही व्हायचं...... कारण तिची बाजू घेतली की तुम्ही रागावणार आणि तुमची बाजू घेतली तर ती रागवेल. त्यामुळे तुम्ही दोघचं काय ते बघून घ्या आणि ठरवा. उगाच माझी ओढाताण नको. "मधुरा ची मम्मी)

मधुरा पप्पांना दोन्ही हाताला धरून बेड वर बसवून स्वतः खाली जमिनीवर गुढगे ठेऊन बसते आणि पप्पांचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेते.
 

मला माहित आहे तुम्हाला माझी काळजी आहे. पण खरचं नितेश खूप चांगला मुलगा आहे. बाप होऊ शकत नाही म्हणून त्याच्यातला चांगुलपणा दुर्लक्ष करावा का?? आणि समजा हाच दोष जर का माझ्यात असता आणि हे माहीत असून ही नितेश मला मागणी घालायला आला असता तर तुम्हाला दुःख झालं असत की तुम्ही खुश झाला असतात.
मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मी नितेश सोबत खूप खुश राहीन. तो खूप समजून घेतो मला आणि एवढंच काय तर......त्याला माझा भूतकाळही माहीत आहे आणि तरी तो माझ्यावर मनापासून प्रेम करतो. राहता राहिला प्रश्न तर बाळाचा......ते आम्ही दत्तक घेऊ. बाळाला नऊ महिने गर्भात वाढवून जन्म देणं.........म्हणजेचं आई होणं नाही ना पप्पा........ज्याला कोणीच नाही अश्या बाळाला प्रेम देऊन पण आईच सुख उपभोगता येत ना पप्पा.......आपण तर अशा किती तरी अनाथ आश्रमात जाऊन तिथल्या मुलांना गरजेच्या वस्तू देतो.मग एखाद्याला जीवन दिलं तर काय फरक पडतो??? "मधुरा"
 

माझी उद्या एक महत्वाची मिटिंग आहे मला सकाळी लवकर उठायाच आहे. तुझं झालं असेल तर जाताना दिवे बंद करून दार ओढून घे."मधुरा चे पप्पा"
(मधुरा नाराजीनेच रूम बाहेर येते.)

मधुरा तिच्या रूम मध्ये येते बघते तर फोन वर नितेश चे सत्तावीस कॉल आणि बेचाळीस मॅसेजेस असतात.मधुरा नितेश ला कॉल करते.

Miss you so........Much madhu....
खरचं खूप मिस करतोय मी तुला.पोचल्यावर फोन केलास तेवढाच.......त्या नंतर एक ही कॉल नाही की मेसेज नाही. "नितेश"
 

सॉरी....... खरचं सॉरी........सात महिन्यानी घरी आले होते तर सगळे माझी सरबराई करत होते आणि मी त्यात हरवून गेले होते.जसा तू हरवला होतास.........काल......... अगदी तसचं......"मधुरा"

मधुरा चा रुक्ष  आवाज नितेशला जाणवला.

काय झालं आहे खरं सांग आता???पप्पा काय बोलले ते."नितेश"

मी अजून तरी काही बोलले नाही. उद्या सकाळी बोलेन."मधुरा"

मधु......तुझा आवाजच खरं सांगतोय......पप्पांनी नकार दिला ना???? "नितेश"

हो.......मी खुप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना समजूनच घ्यायच नाही. पण मी ही त्यांचीच मुलगी आहे त्यांच्यासारखीच हट्टी. त्यांना मनवल्याशिवाय मी राहणार नाही."मधुरा"
 

त्यांना जास्त दुखावू नको. त्यांच पण म्हणणं रास्त आहे. आपल्या पेक्षा जास्त पावसाळे बघितले आहेत त्यांनी आणि शिवाय त्यांना त्यांच्या मुलीची काळजी आहेच.आई होणं ही खुप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक बाईचा दुसरा जन्म...........आणि नेमकं हेच सुख तुला नाही भेटणार हे माहीत असून ते कसे तयार होतील." नितेश"
 

तू नको काळजी करू त्या सगळ्याची.मी करते काही तरी."मधुरा"

मधुरा आणि नितेश काही वेळ गप्पा मारून झोपून जातात.

मधुरा सकाळी उठून खाली येते तर पप्पा सकाळी लवकरच ऑफिसला गेले आहेत असं कळतं.मधुरा पण तीच सगळं आवरून त्यांच्या ऑफिसमध्ये जायला निघते.लंचब्रेक मध्ये मधुरा स्वतःच्या हाताने बनवलेला टिफिन पप्पा आणि दोन्ही भावांसाठी घेऊन ऑफिसमध्ये जाते. चौघेही एकत्र जेवतात.
 

मधुरा पप्पांच निरीक्षण करते पण ते मात्र शांतचं असतात.काही वेळात दारावर टकटक ऐकू येते........ तसे पप्पा कम इन म्हणतात आणि..........समोर उभा असतो तो मधुरा चा भूतकाळ.............
 

काही क्षण ती दोघे एकमेकांना बघत असतात......... कारण एक क्षण एकमेकांपासून लांब न राहणारे, एक तासापेक्षा जास्त वेळ एकमेकांवर न चिडणारे........ तब्बल सात महिन्यांनी एकमेकांसमोर आली होतीत.

हो........दारात उभा होता तो दुसरा कोणी नसून कैवल्य होता.आणि तो मधुराच्या पप्पांना भेटायला आला होता.
 

सॉरी......मी चुकीच्या वेळी आलो का?"कैवल्य"

अरे.....नाही ये ना.....प्लिज....."मधुरा चे पप्पा"

कैवल्य पुढे येऊन त्यानी आणलेला मिठाईचा बॉक्स खोलून त्यातली बर्फी काढून मधुरा च्या पप्पांच्या हातावर देतो.

अरे.....वाह.....कशाबद्दल ही बर्फी.......प्रमोशन झालं का ऑफिस मध्ये???"मधुरा चे पप्पा"

हो सर........ असचं समजा हवं तर......पण प्रमोशन ऑफिसमध्ये नाही...... माझ्या आयुष्यात झालं आहे."कैवल्य"

म्हणजे??"मधुरा चे पप्पा"
 

मी.......बाप होणार आहे सर........आणि यापेक्षा मोठं कुठलचं प्रमोशन असू नाही शकत."कैवल्य"

मधुरा सगळं ऐकत असते.कारण कधी काळी ही स्वप्न त्या दोघांनी एकत्र बघितली होती.पण नशिबात वेगळंच होत.

Congratulation कैवल्य........... खूप खूप अभिनंदन तुझं. "मधुरा" (मधुरा स्वतः पुढे येऊन त्या बॉक्स मधील बर्फी कैवल्यला भरवते. बर्फी भरवताना तिचे डोळेही पाण्याने डबडबलेले असतात.कैवल्यचे डोळेही भरतात पण तो त्याच्या वचनाचा पक्का होता. त्यानी मनातूनच मधुराला केलेलं प्रॉमिस निभावत होता.कारण तो हॉटेल मध्ये रडला ती शेवटची रात्र........ त्या नंतर मधुराला परत त्याच्या मनात येऊ दिली नाही त्याने. कैवल्य मधुराला थँक्स म्हणत तिने भरवलेली बर्फी पुन्हा तो तिला भरवतो.मधुरा थोडी बर्फी खाते आणि तिथून डब्बे घेऊन घरी येते.
 

मधुरा नितेश ला फोन करून ऑफिस मध्ये घडलेला सगळा प्रकार सांगते आणि लगेच बंगलोर ला यायला निघते......... तुझ्या हातच जेवण जेवायला अस सांगून होणं ठेऊन देते आणि पॅकिंग करायला घेते. मधुरा चे पप्पा पाठोपाठचं घरी येतात.

मधुरा रेडी होऊन पप्पांचीच वाट बघत असते.

क्रमश:
खरं तर हा कथेचा शेवटचा भाग करणार होते पण कथा पूर्ण होत नसल्याने आणखी एक भाग वाढविण्यात येत आहे.कथा पोस्ट करताना ती लेखिकेच्या
करावी कारण साहित्य चोरी हा कायद्याने गुन्हा आहे तसे आढळल्यास सक्त कारवाई केली जाईल.माझ्या कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद????????

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shravani Lokhande

Housewife

I like reading