Login

काव्यांजली..

खूप प्रेम होतं तिच्यावर...
खूप प्रेम होत तिच्यावर
पण सांगूच नाही शकलो
हीच चूक करून मोठी
तिच्या प्रेमाला मुकलो

झलक तिची पाहण्यासाठी
किती आतुरलेलो असायचो
समोरून येताना दिसली की
उगाच सावरून बसायचो

स्वर्ग ही ठेंगणे वाटायचे
गालात ती हसताना
उगाच हुरहूर लागायची
समोर ती नसताना

निर्णय झाला पक्का
आज ठरवलं भेटायचं
नकार जरी मिळाला
तरी उगाच नाही रेटायचं

बेधुंद तिच्याच विचारात
मी एका जमावात घुसलो
रक्ताने माखलेली पाहून तिला
मटकन खाली बसलो

तिच्या शेवटच्या श्वासावर
नावही माझंच होत
तेव्हाच समजून गेलो
तिचं ही प्रेम होतं

वेदना अंतरीची माझ्या
अंतरीच राहिली
वेदना तिचीही समजून
तिला काव्यांजली वाहिली...

~सौ. प्रणाली चंदनशिवे.