कवितेची कविता

कविता कशी असावी त्याबद्दल
कवितेची कविता

अशी फुलावी कविता जशी चैत्र पालवी यावी
शब्द होऊन प्राजक्तसडा अंगणी पसरावी

अशी बरसावी कविता जसा पावसाळी मेघ
शब्दांच्या जलधारांनी भरावी काळजाची रेघ

अशी लहरावी कविता, जसा खोडसाळ रानवारा
यावी शिरशिरी अंगी, उडता शब्दांचा फवारा

अशी चालावी कविता , जशी धारदार तलवार
कधी पुसावे अश्रु , पदराने मायेच्या अलवार

अशी घुमावी कविता, जसा मंदिरातील घंटानाद
साद घालतात प्रेमाने यावा आतून पडसाद

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार



कवितेची कविता

अशी फुलावी कविता जशी चैत्र पालवी यावी
शब्द होऊन प्राजक्तसडा अंगणी पसरावी

अशी बरसावी कविता जसा पावसाळी मेघ
शब्दांच्या जलधारांनी भरावी काळजाची रेघ

अशी लहरावी कविता, जसा खोडसाळ रानवारा
यावी शिरशिरी अंगी, उडता शब्दांचा फवारा

अशी चालावी कविता , जशी धारदार तलवार
कधी पुसावे अश्रु , पदराने मायेच्या अलवार

अशी घुमावी कविता, जसा मंदिरातील घंटानाद
साद घालतात प्रेमाने यावा आतून पडसाद

@शब्दनक्षत्र ?
©️®️स्वाती सासवडकर कुंभार