कविता रसग्रहण..वारुळ..शांता शेळके..

स्त्री संवादी कविता या शांता बाईच्या अख्त्यारितल्या ..आपलं अस्तित्व विसरून जगणंच विसरणं, स्त्री च्या मनोवस्थेतला अविभाज्य घटक..
. स्त्री चे मनोआवेग अत्यंत संयमित मांडले गेले किंवा अतिशय विदारक पद्धतीने ही मांडले गेले..काळानुसार बदलत गेलेली स्त्री ही परीपक्व वैचारीक बौद्धिक पातळीवर होत गेली.. आर्थिक परावलंबित्व तीनं मोडून काढलं इतकं होऊनही स्वतःचे निर्णय ती अजूनही घेऊ शकते का..?अपवाद आहेतच तरीही पुरुषी अहंकाराचा साक्षात्कार तीला हर घडीला येतोच.. तीचं मानसिक दुबळेपण सतत अधोरेखित केल जातं..माझ्या शिवाय कुणीही नाहीस तू समाजात ही बोच कायम जाणवून दिली जाते..
अगदी स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा असली तरीही पुरूष सहकारीही कोणत्या न कोणत्या कारणानं तीचं मानसिक खच्चीकरण करत रहातात..तीला उध्वस्थ होतांना पाहून अघोरी आनंद ही घेत असतील कदाचित..स्वतःचा स्वाभिमान ,अस्मिता जपण्यासाठी खूप मोठी किंमतही मोजावी लागते ..याची जाणीवही त्याला नसेल तर कृतघ्न याच शब्दाचा वापर करेन मी..
बायकांना समजून घेणं टाळता की पुरुषी मनोवृत्तीचा तो अविभाज्य घटक आहे..? सतत तुमच्या आधारा शिवाय जगणं तीला जमुच नये ही मानसिकता दिसते इथे.. सगळेच पुरुष असे आहेत मुळीच म्हणणार नाही मी ..पण बायको पेक्षा मैत्रीणीचं कौतुक करणाऱ्यांची संख्या जास्त असेल..खूप स्पष्ट लिहीतीय.. किंवा तीला आधार देणारे..ही मनोवृत्ती अन्याय कारकच म्हणावी लागेल.. किंवा तुलना करणं ..
एक निरीक्षण आहे हे..
एकविसाव्या शतकात मुलीला ही तेवढंच स्वातंत्र्य दिलं जातंय हे खरंय पण तीचा गैरफायदा ती घेणार नाही याची जबाबदारी ही पालकांनी घ्यावी.. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.. खूप पुसट रेषा आहेत या...
फक्त एवढंच वाटतं सामाजिक बांधिलकी नावाची चीज आहे अजूनही .. आदर हा मिळवावा लागतो टिकवावा लागतो.. शांता शेळकेंची वारुळ ही कविता वाचतांना हे खूप जाणवतं की स्त्री ही स्वतःच गुरफटून घेते स्वतःला .. आत्मक्लेशाचे मार्ग निवडणं हे तीनं स्वतःच स्विकारलेल दिसतं इथे.. खूप काही सांगून जाणारी आहे ही कविता..

स्वतःच्या अंतर्मनातले द्वंद्व किती प्रभावी मांडू शकतं कुणी.. जाणीवांचे थर पुटांसारखे चढायला लागले की निष्पर्ण होणारा हा आवेग. संथ लयीतला एकेक सांदी कोपरा ती लेपून घेते..अडगळीतले कीत्येक उसासे सोडत... नेणिवांच्या पलीकडचं काहीतरी पहाते...
आक्रंदनांचे अध्याय लिहीतांना परीस्थिती कडे त्रयस्थ पणे पहाणं जमवते.. उपेक्षा ,अपेक्षा यांची सीमा बांधून ठेवते व्यक्त ठराविक मर्यादेतच होत रहाते..
कवियत्रीचं मनस्वी पण गृहीत असतंच. स्वतःचे दुःखातिरेक ही संयमित ठेवत व्यक्त होणं शांता बाईंनी जमवलं..
संध्या छाया जीवनातल्या पडछाया होणार हे निश्चितच पण हा मृत्युयोग सहज स्विकारता येईल का ..?त्या साठी लीहीत रहाणं होतच राहील पण एका वेदनेचा आवाका मांडतांना तोल ही ढळू न देणं ही कसरत केलीही त्यांनी..
वेदनेंचे सोहळे जेंव्हा होतील तेंव्हाच कविता पोहोचू शकते.
हृदयाला भिडते ...ह्या कविता आयुष्याच्या संध्या छायेत शांता बाईंनी लिहील्या असाव्यात ....
स्त्री चं मनोविश्लेषण करणं , तीच्या भावनिक आंदोलनांची दखल घेणं..तीच्या त्यागाची ,समर्पणाची, इती कर्तव्याची जाणीव इतरांनी ठेवणं हे कधी झालंच नाही.गृहीत धरणं तीला आणि त्या कोषात तीनं आनंदानं गुरफटून घेणं आणि नंतर स्वतःच स्वतःच्या पाया भोवतीच्या शृंखला घट्ट केल्या आहेत ही जाणीव..वारुळ आपल्याच पायाशी बांधलं जातंय ही त्यातली शोकांतिका.. एका तक्षकाचा जन्म..

#वारुळ - शांता शेळके

प्रथम तीने आभाळाची कोळीष्टके झाडून टाकली ..
मग दिशा पुसून घेतल्या नीट
प्रदुषित हवेवर तिने शिंपडल्या चार ताज्या झुळुका..
आणि उधळली ओंजळ ओंजळ उन्हे सर्वभर

आभाळाचा निळाभोर रंग लकाकू लागला
आणि दिशा प्रसन्न हसू लागल्या

नंतर तिची नजर खाली वळली
धुळीचा कण न् कण तिने टीपून घेतला
गवताचे पाते नि पाते केले हिरवे लखलखीत

एक कृतार्थ हसू तिच्या ओठांवर उमटले
डोळे कृतज्ञतेने आसमंत निरखित राहीले


तेवढ्यात तिच्या ध्यानांत आले
आपल्या पायांभोवती वारुळ चढायला सुरुवात झाली आहे
आणि तक्षकाचा वंश वाढू लागलाय...
©लीना राजीव.