©®विवेक चंद्रकांत...
तो
मॉलमध्ये होतो.. अचानक तू वापरत असलेल्या सेंटचा सुगंध आला आणि एकदम मन सैरभैर झाले. तू इथे? शक्यच नाही. तू गाव तर काय राज्य सोडून निघून गेलीस 3 वर्षांपूर्वी. आता इथे तुझे कोणीच नाही, इथे कशी येशील? तरीही मन कुठले ऐकतंय? तुला पाहत पाहत पूर्ण मॉल पालथा घातला.. तेही वेगात. पाय दुखू लागले.पण तू कुठेच दिसली नाही. शेवटी बाहेर आलो
मॉलमध्ये होतो.. अचानक तू वापरत असलेल्या सेंटचा सुगंध आला आणि एकदम मन सैरभैर झाले. तू इथे? शक्यच नाही. तू गाव तर काय राज्य सोडून निघून गेलीस 3 वर्षांपूर्वी. आता इथे तुझे कोणीच नाही, इथे कशी येशील? तरीही मन कुठले ऐकतंय? तुला पाहत पाहत पूर्ण मॉल पालथा घातला.. तेही वेगात. पाय दुखू लागले.पण तू कुठेच दिसली नाही. शेवटी बाहेर आलो
निराशेने... थकव्याने कोल्ड ड्रिंकच्या दुकानात बसलो. कोल्डड्रिंक घेऊन थोड जीवाला बरे वाटले तोपर्यंत त्याने गाणे लावले
इश्कमे तो हर चीज मीट जाती हैं
बेकरारी बनके हमे तडपाती हैं
याद याद याद बस याद रह जाती हैं
इश्कमे तो हर चीज मीट जाती हैं
बेकरारी बनके हमे तडपाती हैं
याद याद याद बस याद रह जाती हैं
असंख्य आठवणी जाग्या झाल्या. तुझी माझी कॉलेज मधली पहिली भेट... नजरानंजर.. ती हुरहूर, भीतभीत दिलेली प्रेमाची कबुली.. पिरियड बंक करून कॅन्टीन हातात हात घालून बसणे... ते गैरसमज, ते खोटे रुसणे.
पण म्हणतात नां इश्क और मुष्क छुपाये नही छुपते..
तुझ्या घरापर्यंत खबर गेलीच...
पण म्हणतात नां इश्क और मुष्क छुपाये नही छुपते..
तुझ्या घरापर्यंत खबर गेलीच...
आणि मग तूझ्या घरच्यांनी घेतलेली कडक भूमिका....कोणत्याही परिस्थितीत आपले लग्न न होऊ देण्याची.त्यासाठी मला निर्घृण पणे संपवण्याची योजना.
ती शेवटची भेट कशी विसरू? मला रडून रडून शपथ देऊन तू तातडीने गाव सोडायला भाग पाडलस....आणि स्वतः मग गायबच झालीस. तुझा ठावठिकाणा कळणे शक्यच नव्हते. खरेतर तो कोणालाच कळला नाही.
आजही मी फक्त तू वापरत असलेला perfume चा वास येताच इतका अस्वस्थ झालो. तुला सोडून जातांना काय हालत झाली असेल. आज तीन वर्षे झाली मी तुला विसरू शकलो नाही.घरचे लग्नासाठी मागे लागले आहेत पण मीच टाळाटाळ करतोय. कसे विसरू तुला?
याद याद याद बस याद रह जाती हैं.....
****
ती
ती
तू कावरा बावरा होऊन मला पाहत फिरतोय मॉल मध्ये हे माझ्या लगेच लक्षात आले आणि मी एकदम कोपऱ्यातल्या सेकशन कडे गेले.. तिथेही अगदी आत.. जिथे पटकन नजर जाणारच नाही. नवरा मॉल मध्ये सोडून गेला आणि दहा पंधरा मिनिटात येतो सांगून गेला. पण मला यत्किंचित ही कल्पना नव्हती की तू इथे असशील. आपल्या गावापासून 200- 250 किलोमीटर दूर. थोडीही कल्पना असती तर इथे येणे टाळले असते.
तुला वाचवण्यासाठी किती धडपड केली तुला पूर्णपणे माहित नाही., पण कसेका होईना, तू माझे ऐकले आणि गाव सोडून निघून गेला त्यामुळे जीव भांड्यात पडला. अगदी मान्य की माझे खूप प्रेम होते तुझ्यावर पण त्यापायी तुझा जीव जावा हे मी कसे सहन केले असते.?
तू निघून गेल्यावर लगेचच माझी रवानगी दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या मावशीकडे झाली. तिने एक स्थळ पाहून ठेवले होते. त्या मुलाच्या बायकोने आत्महत्या केली होती. आत्महत्येला जबाबदार म्हणून मुलावर case चालली. त्याची सरकारी नौकरी होती. तो suspend झाला. पण नंतर त्याची निर्दोष मुक्तता झाली. नौकरीही परत मिळाली. तरीपण अश्या मुलाला कोण मुलगी देईल?
माझे लग्न घाईघाईत त्याच्याशी लावण्यात आले. मला तर अगदी आत्महत्या करावीशी वाटतं होती.. एकतर तुझे प्रेम सोडावे लागले त्यात नवरा असा कुप्रसिद्ध. जीवनात तरी काय अर्थ होता? पण आत्महत्या करण्याची हिम्मत झालीच नाही.
आता वाटते झाले ते बरेच झाले...
आता वाटते झाले ते बरेच झाले...
सासरी गेल्यावर मी दडपणाखाली होती.. पण चारच दिवसात लक्षात आले की माझे सासुसासरे आणि नवराही दडपणाखाली होते. सगळे जण माझ्याशी खूप चांगले वागत होते.मग हळूहळू एक एक गोष्टी समजल्या. पहिल्या बायकोला अधूनमधून वेडाचे झटके यायचे. पण तिच्या माहेरच्यांनी हे लपवले आणि ह्यांच्याशी लग्न लावून दिले. पुढे तिने वेडाच्या भरात आत्महत्या केल्यानंतर माझ्या नवऱ्याला आणि सासुसासर्यांना खोटी case करून अडकवले आणि पैश्याची मागणी केली... अर्थात पुढे सगळे स्पष्ट झाले.त्या मुलीचे मेडिकल रेकॉर्ड मिळाले. आत्महत्या वेडाच्या भरात केली हेही सिद्ध झाले. निर्दोष मुक्तता झाली. नौकरी ही परत मिळाली. पण झालेल्या बदनामीचे काय?
त्या संपूर्ण कुटुंबाबद्दल मला सहानभूती निर्माण झाली. शेवटी तेही माझेच कुटुंब नव्हते का? मी सगळ्यांशी चांगले वागत गेले. नवीन सून (खरेतर दुसरी ) चांगली वागते म्हटल्यावर तेही सगळे हळूहळू कोशातून बाहेर पडले. माझे पती तर अगदी माझ्या तालावर नाचू लागले म्हटले तरी चालेल.
त्या संपूर्ण कुटुंबाबद्दल मला सहानभूती निर्माण झाली. शेवटी तेही माझेच कुटुंब नव्हते का? मी सगळ्यांशी चांगले वागत गेले. नवीन सून (खरेतर दुसरी ) चांगली वागते म्हटल्यावर तेही सगळे हळूहळू कोशातून बाहेर पडले. माझे पती तर अगदी माझ्या तालावर नाचू लागले म्हटले तरी चालेल.
तुला कदाचित वाईट वाटेल ऐकून... पण मी खरंच खुश आहे ह्या घरात. प्रेमळ सासुसासरे, जीव लावणारा नवरा. अजून काय हवे. ह्या गावात आलो एका नातेवाईकांच्या लग्नात. तू असा अनपेक्षित भेटशील असे वाटलेच नाही. मी अशी सुखी झालेली तुला पाहवणार नाही म्हणून तुला दिसणार नाही अश्या ठिकाणी लपले. कदाचित तुला वाटतं असेल, तुझ्या आठवणीत मी झुरत असेन, रडत असेन, पण तसे नाहीये...
तुही लग्न करून सुखी हो.
तुही लग्न करून सुखी हो.
मी केलेली कविता तुला आठवत असेल... आपल्या भावी संसाराबाबत... ती आताही माझ्या संसाराबाबत ही लागू आहेच.....
तुझ्या माझ्या प्रेमाचा
रंग गडद व्हावा
मी कविता म्हणावी
तू मारवा गावा....
रंग गडद व्हावा
मी कविता म्हणावी
तू मारवा गावा....
बंद व्हरांडाच्या ग्रीलमधून
येणाऱ्या सूर्यकिरणांच्या नक्षीत
मी मोर शोधावा
आणि तू त्याला पारवा म्हणावा
मी रागाने तुझ्याकडे पाहावे
आणि तू माझ्या लाल झालेल्या
नाकाच्या शेंड्याला
चिमटीत पकडून पुन्हा चिडवावे...
येणाऱ्या सूर्यकिरणांच्या नक्षीत
मी मोर शोधावा
आणि तू त्याला पारवा म्हणावा
मी रागाने तुझ्याकडे पाहावे
आणि तू माझ्या लाल झालेल्या
नाकाच्या शेंड्याला
चिमटीत पकडून पुन्हा चिडवावे...
कधीतरी मी बेसावध असतांना
तू हलकेच मोगऱ्याचा गजरा
माझ्या केसात माळावा
आणि त्या वासात धुंद होऊन
मी तूझ्या मिठीत यावे
तू हलकेच मोगऱ्याचा गजरा
माझ्या केसात माळावा
आणि त्या वासात धुंद होऊन
मी तूझ्या मिठीत यावे
तुझ्या घट्ट मिठीत
भर उन्हाळ्यातही
गारवा यावा
मी कविता म्हणावी
तू मारवा गावा..
तुझीच (आता नसलेली)
**
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
भर उन्हाळ्यातही
गारवा यावा
मी कविता म्हणावी
तू मारवा गावा..
तुझीच (आता नसलेली)
**
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.