Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 22.0

Read Later
कावेरी 22.0


कावेरी

भाग 22

एक मन म्हणाल की कुणाल ला सोडवावं पण स्वार्थी बनून चालणार नव्हतं. आजोबांना ही काहीच करता सोय नव्हती. सगळे तिच्याकडे आशेने बघू लागले की ती कुणाला सोडवेल. कुणालला पूर्ण खात्री होती की ती त्यालाच सोडवेल. पण तिचा एक चुकीचा निर्णय तिच्यावर भारी पडणार होता त्यामुळं तिने सबुरीने निर्णय घ्यायचं ठरवलं.

" आईच्या गावात, इतकी मेहनत आणि हे सगळं.. किती तरी वर्ष लागली असतील ना हे सगळं करायला. " कावेरी उपहासाने म्हणाली.

" ह्म्म्म.. हुशार आहेस. " मांत्रिक म्हणाला.

" अगदी लहान वयात जबाबदारी पडली की लवकरच येते समजदारी. " कावेरी म्हणाली.

" कसली समजदारीची बाता करतेय इकडं जीव अडकलाय ह्या बांधणमुळे. " नितीन तोंडातच पुटपुटला.

" ह्म्म्म, बापाची लेक.. " असं म्हणून जोरात हसू लागला.

" तू ओळखतॊस माझ्या बाबाना " कावेरीने काहीच न माहिती असल्याच्या अविरभावात विचारलं.

" होय.. ओळखतो मीं, मागच्यावेळी मीं खूप जवळ होतो माझ्या सिद्धीच्या. तेव्हा बळी द्यायचे पण नव्हते पण त्याने अगदी नाकी दम आणला होता.

" मीही तेच करायचं विचार करतेय. "कावेरी मनातच म्हणाली.

" विचार देखील करू नकोस. मीं केलेल्या चुका पुन्हा करत नाही. "मांत्रिक म्हणाला.

" हे बघ... तू जो कुणी असशील मला कर्तव्य नाही. सगळ्यांना सोडून दे आणि निमूटपणे निघून जा. मीं आजपर्यंत कुणाचा जीव घेतला नाहीये आणि तशी इच्छा ही नाही. " कावेरी म्हणाली.

" तू  आणि मला टक्कर देणार... तुझी काय औकात माझ्या सिद्धिसमोर.. " आणि जोरजोरात हसू लागला.

" तुझ्या निमंत्रण शिवाय इथपर्यंत पोहोचलेय ना... ह्यातच सगळं आलं समज की." कावेरी तोऱ्यात म्हणाली.

" ऐ मुली... तू.. तुझी अशी अवस्था करायला मला एक मिनिट सुद्धा लागणार नाही. " मांत्रिक जोरात ओरडून म्हणाला.

" कर मग. आहे हिम्मत...? "

" हें अमर सर.. तुझ्यासाठी काम करतात ना.. काय मिळालं त्यांना... काय हो सर.. त्या बुक्स तुम्हीच ठेवत होतात ना मुलांच्या बॅग्स मध्ये... धोकेबाज.. सगळ्यांसोबत फसवणूक करताना लाज नाही वाटली." कावेरी अमरच्या दिशेने जात म्हणाली.

"मीं... मीं.. मीं नाही... मीं चुकलो.. अमरत्व च्या नादात.. "  म्हणतच अर्धमेला अमर बेशुद्ध पडला.

" लय थोबाड चालवतेय.. त्याबद्दल त्यांना मीं ह्या वयात ही तारुण्य दिलय. "

" कुणी सांगितल होत द्यायला. सगळे स्वतःचा स्वार्थ बघतात. त्यांनी त्याचा पहिला आणि तू तुझा बघतोय."

" आजोबा, बघताय ना हा नराधम... तुमच्या मुलाचा खुनी.. आणि तुम्ही असे पाय बांधून उभे आहेत एक जागेवर.  ज्यावर इतकी श्रद्धा आहे तुमची त्याने तरी यावं आपल्या मदतीला. " कावेरी ओरडून म्हणाली.

मंत्रिकाने दोन हाडे भस्म वरून क्रॉस मध्ये फिरवून ते भस्म कावेरीच्या दिशेने फेकलं. पण तिने ते लगेचच बाजूला होऊन चुकवलं आणि भस्म फेकल्या जागी जमिनीवर थोडासा जाळ आणि धूर झाला.

" माझ्या कामा आड येऊ नकोस. मीं खूप मेहनत केलीय ह्यासाठी. पुन्हा एकदा चेतावणी देतोय. "

" तू आमच्या जीवन आड आलास ते चालत आणि आम्ही तुझ्या कामा आड पण नाही यायचं."

" फार बोलतेयस. "

" मीं एक्स्पर्ट आहे त्यात. "

आणि त्याने आपली सारी शक्ती एकवटून अग्निबाण भिरकावला. पण तो चुकवताना तिच्या दंडाला खेटून गेल्याने तिला थोडी जखम झाली. तशी ती त्वेशाने त्याला मारायला धावली पण तिला त्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. इतक्या मेहनतीमुळे डोळ्यावर अंधाऱ्या येत होत्या.

आजोबानी एक क्षण डोळे उघडले आणि बाप्पाचं नामस्मरण करून त्यांच्या झोल्यात हात घातला.त्यातून त्रिशूल काढून कावेरीच्या डोळ्यासमोर चमकवले. आणि त्या त्रिशूलाच पाते लखलखीत झळकून निघाले आणि तिच्या डोळ्यांवरील तिमिरची जागा तेजने झळकली.

तिने त्रिशूल दोन्हीही हातात घेऊन नमन केले आणि त्याचा एक वार जमिनीवर केला. तशी धरणीकपं झाल्यासारखे झाले. त्यामुळं दोन्हीही आजोबांना केलेलं मोहन तुटलं आणि  पुन्हा सावरले आणि त्रिकाल ने डोळे उघडून पाहिलं तर त्याचा अंत समोर दिसू लागला. पण तरीही न डगमगता त्याने त्याच ब्रम्हास्र चालवायचं ठरवलं. संपूर्ण शक्ती एकवटून दोन अग्नीबाण निर्माण केले आणि नितीन आणि कुणालच्या दिशेने वळवले.

आता मात्र कावेरी घाबरली. बांधलेल्या दोघांना ही इतक्यात सोडता येणे शक्य नव्हतं. तरीही दोन्हीही आजोबानी त्या दोघांना सोडवण्यासाठी खांबा आडून धाव घेतली. वेळ स्तब्ध झाला होता. सगळं काही अगदी स्लो मोशन मध्ये होत होत. तिने कुणालच्या दिशेने येणाऱ्या अग्निबाणावर त्रिशूल फेकले आणि नितीन कडे जाणाऱ्या बाणाकडे स्वतः धावली.

आणि अग्निबाण त्रिशूलात विरून गेला पण नितीन कडे सोडलेला मात्र तिने तिच्या अंगावर झेलताना डाव्या दंडाला लागल, जिथे तिचं रक्षकवच बांधलं होत, ते तिचं रक्षकवच लकाकून निघालं. तोपर्यंत आजोबांनी दोघांनाही मुक्त केल आणि नितीन कोसळणाऱ्या कावेरीला पकडायला हात पुढे करून अलगद झेलल. तोपर्यंत कुणाल देखील धावत कावेरी जवळ पोहोचला. घाडगे आजोबानी पुन्हा एकदा त्रिशूल कावेरीच्या हाती दिल आणि डोळ्यांनीच खुणावलं. तिच्या डाव्या दांडाची जखमेने ती अगदी असाहाय्य झाली होती. एक बाजूने नितीन आणि एक बाजूने कुणालने उचललं आणि तिने अगदी जिवाच्या आकांताने ओरडून ते त्रिशूल त्रिकाल मंत्रिकावर फेकले.

\"जय महाकाल \" म्हणत तो जागेवरच तडफडत होता. आणि शेवटी त्याने शेवटची घटका मोजली. दोन्हीही आजोबांनी सगळ्यांना बंधनातून मुक्त केल. त्रिकाल मांत्रिक मेल्याने त्याची माया समाप्त झाली होती. सगळे कावेरीकडे धावले, वेळ न दवडता तिथून बाहेर पडले आणि हॉस्पिटल च्या दिशेने निघाले.

*****

कावेरी हॉस्पिटल च्या स्पेशल रूम मध्ये अगदी आरामात जखम कुरवाळत बसली होती. एक बाजूने आई, काकू, राधिका आणि एक बाजूने इमा, दोघे आजोबांना तिचे लाड पुरवत होते. नितीन नेहमीप्रमाणे तिच्या खोड्या काढण्यात बिझी होता आणि कुणालचे वडिल आणि कुणाल त्यांना धन्यवाद म्हण्यासाठी तथा कावेरीची चौकशी करण्यासाठी आले होते.समाप्त.
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  22
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//