Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 21.0

Read Later
कावेरी 21.0


कावेरी

भाग एकविसावा

" हो, भक्त भगवन्ताला त्यांच्या भक्तीतून नेहमी जागच ठेवतात आणि मग आपण त्याला जागृत देवस्थान म्हणतो. पण ही जागृत देवस्थान आपल्या मनोमनी आहेत. आणि ती नेहमी जागी असायला हवी त्यासाठी भगवत भक्तीच नाही तर आपलं आचरण नेहमी शुद्ध आणि वंदनीय असायला हव. जशी तुम्ही मुलं.. आपल्या मित्रांसाठी अगदी जीवाचं रान करीत आहात. "

तितक्यात घरात फोन खाणानला. कावेरी घाईने फोन उचलायला गेली. रेडिओ स्टेशन मधून कॉल होता आणि त्यांनी ट्रॅकर डिवाईस ट्रॅक केल त्याच लोकेशन देखील तेच सांगितले होत. हे कधी एकदा आजोबांना सांगतेय असं झालं होत कावेरीला.

ती आत येताच आजोबांना गणपतीच्या मूर्ती समोरील थाळी मधून चिट्ठी उचलताना पाहिलं आणि त्यांनी ती उघडून पाहिलं तर त्यात लाल कुंकवाने स्वस्तिक काढलेल होत आणि अगदी मधोमध कावेरी असं नाव दिसलं.

"बाप्पा, तुझा कौल दिला, त्यात शंका नाही पण जमेल का लेकराला. "

" शशां.. बाप्पा वर अविश्वास नको. आधीच खूप गमवून बसलो आपण आता मुलांना नाही गमवायचा. त्यांच्या बरोबरीने आपण लढत द्यायला हवी."

"होय,  मीं प्रशांतला पण बोलवतो." एवढं बोलून ते खोलीतून बाहेर गेले.

" काय झालं आजोबांना, इतकं हताश होऊन बाहेर गेले. " कावेरीने विचारलं.

" काही नाही, नितीन ची काळजी वाटू लागली म्हणून जरा टेन्शन मध्ये आहे. आपल्याला निघायला हवं.  तयारी करा. "

" हो. "तिने ही बाप्पाची मनोमन प्रार्थना केली आणि सगळे सुखरूप घरी येऊ देत अशी प्रार्थना केली.

काहीच वेळात प्रशांत बाहेर येऊन उभा राहिला. आजोबानी त्यांना आत बोलवलं. बाप्पाच्या जवळ सगळे आशीर्वाद घेण्यासाठी उभे राहिले आणि त्या थाळी मधील कुंकूम तिलक सगळ्यांना लावला. कुणी काहीच बोलत नव्हतं पण त्या शांततेत ही कमालीचे संभाषण सुरु होत. दोघाही आजोबानी त्यांचा झोला मध्ये काही सामान भरून घेतलं. आणि कावेरीने घरी जाऊन आजोबांसोबत बाहेर जाते आहे असं सांगून आली. नितीनच्या आजोबानी आईला सतत नामस्मरण आणि भगवत सेवा करायला सांगितले. आजची रात्र थोडं खडतर आहे. आणि नितीन अजून घरी आला नाही म्हणून नितीनला शोधण्यासाठी जातो आहोत. असे काहिबाही तिच्या आईला सांगून निघाले.

सगळे कॉलेज च्या दिशेने निघाले. घाडगे आजोबा आणि नितीन चे आजोबा दोघांचेही सतत नामस्मरण सूरू होत. कॉलेजचा कोपरा अन कोपरा पिंजून काढला. पण काहीच सापडेना. पण त्यांचे ज्ञान चक्षु मात्र तेच ठिकाण दाखवत होते. कॉलेजच्या वर्कशॉप च्या मागे काहीस दाट जंगल भाग होता. त्यांनी तिकडे चेक करायचं ठरवलं. टॉर्च घेऊन ते त्या दिशेने निघाले आणि आणि कावेरीच्या हातातील लोकेटर डिवाईस वाजू लागलं. ती जसा आवाज वाढू लागलं त्या दिशेने जाऊ लागली. तिच्यासोबत आजोबा आणि प्रशांत सर देखील होते.

आणि एक ठिकाणी जाऊन पूर्ण सिग्नल देऊ लागला. पण आस  पास पूर्ण विरळ झाडी आणि गवत होत. ते हातातील दांडूक्याने गवत बाजूला करून काही दिसतय का बघत होते आणि इतक्या प्रयत्न नंतर त्यांना एक पत्र्याचा दरवाजा दिसला. प्रशांत सरांनी त्यांच्या मोबाईल वरून पोलिसांना फोन केला आणि जरा सावधगिरीने तो वरचे वर उघडला.

त्यांनी आत प्रवेश केला, मागोमाग सगळ्यांनी आत प्रवेश केला. डोळ्यासमोर एकच ध्येय होत की मुलाना वाचवायचं त्यामुळे अगदी निडर होऊन आजूबाजूला कानोसा घेत ते त्या पायऱ्या उतरले. काही अंतर खांडर मधून चालत गेल्यावर एक गुहेसारखं गोलाकार बोगदा दिसला. जरा जास्तच कुबट वास येत होता. काही अंतर चालत गेल्यानंतर थोडा मोकळा दगडी हॉल होता ज्यात मशाली भिंतीच्या कोपऱ्यांना जळत होत्या म्हणजे नक्कीच आत कुणीतरी असणार ह्याची जाणीव झाली होती.

जरा आत गेल्यावर चौथरा लागला आणि त्यात ओबडधोबड नक्षीकाम केलेले दगडी खांब होते आणि अमर, आकाश, रुद्रा, विशाल, नितीन आणि कुणाल ह्यांना सगळ्यांना बांधून ठेवलेल होत. ते काही अंशी अगदी शक्तिहीन झाले होते. मधोमध एक मोठं झुंबर होत आणि त्याखाली एक व्यक्ति डोळे झाकून ध्यान मुद्रेत मंडल मांडून यज्ञ करण्यात मग्न होता.

" ह्म्म्म, आपण आलात तर तुम्हाला वाटत तुम्ही सगळ्यांना वाचवू शकाल. " डोळे बंदच होते तरीही तो पुटपुटला. तसे प्रशांत सर त्याला मारायला धावणार तोच कुठून एक सापळा त्यांचा पायात अडकला आणि ते ही खंबाला बांधले गेले.

नितीन चे आजोबांना खूप राग आला, त्यांनी हातातली काठी धाडकन त्या व्यक्तीला मारून फेकली पण त्याने ती शितफिने चुकविली आणि उठून उभा राहिला.

" माझ्या सप्त आहुती तयार आहेत, माझे मालक ह्या जगावर राज्य करायला येणार लवकरच...आणि ते ही एक दिवस आधीच. " आणि तो जखड मांत्रिक जोरजोरात हसू लागला. दोघेही आजोबा त्याला मारायला धावणार पण त्यापर्यंत ते जाऊच शकत नव्हते. त्यांची पाऊल जणू जागेवरून हलू शकत नव्हती. त्यांनी त्याच अवस्थेत ध्यान धारणा सुरु केली आणि त्यांच्या झोल्यात काहीसा चमकू लागलं आणि ते कावेरीच्या नजरेस पडलं.

" तुला जायचंय की थांबायचंय... " त्या मंत्रिकाने विचारलं.

ती काहीच बोलली नाही. ती कुणाल आणि नितीन कडे अगदी आर्त नजरेने पाहू लागली. सगळं बळ एकवटून म्हणाली.

" मला बंदी बनवून दाखव नाहीतर सगळ्यांना सोडव. मीं तुला सोडून देईल नाहीतर गेलास तू कामातून."

तो जोरजोरात हसू लागला.
" तू चिरंगुट...! मला हरवणार.. पुरुषसारखे पुरुष नाही टिकले पुढ्यात माझ्या.. "

ती तितकीच त्वेशाने चाल करून गेली. पण तिचा वार हुकवला गेला.

" चल.. तुला मीं एक संधी देतो, ह्या सगळ्यांपैकी तुला एकाला वाचवण्याची संधी देतो. ह्यापैकी एक तू सोडवू शकतेस आणि जाऊ शकतेस. "

कावेरीने प्रत्येकाकडे बघून विचार करु लागली.


क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  21
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//