Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 19.0

Read Later
कावेरी 19.0


कावेरी

भाग एकोणीस


कावेरी नितीन च्या मागे गेली आणि गेस्ट रूम बाहेर त्याच्यासोबत उभ राहून कान देऊन ऐकू लागली. कुणाल ही तिच्या पाठोपाठ आला.

"तुम्ही दोघ इथं चोरून ऐकताय." कुणाल हळूच फुसफूसला.

" शऊऊउ... " कावेरीने तोंडावर बोट ठेवलं आणि कुणालच तोंडावर हात ठेवून बोलती बंद केली.

वाऱ्याची मंद झुळूक आली. सगळं काही स्लो मोशन मध्ये सुरु झालं. कुणाल एकटक तिला पाहत होता आणि ती उजवीकडे चेहरा करून दरवाजा जवळ भिंतीला कान लावून उभी होती. तिच्या हातांच्या मऊ स्पर्शाने त्याच्या मनात फुलपाखरू उडत होते. तो डोळे बारीक करून हसतमुख ने तिला ताडत होता. तितक्यात नितीनची नजर त्याच्यावर पडली. आणि एकदा कावेरीकडे पाहिलं.

" काही खर नाही ह्याच.." मनातच पुटपुटला आणि डोक्याला हात लावला.

" काय, येडा ए का.. " तीने हळूच विचारलं.

" तो बघ.. " नितीन ने कुणाल कडे निर्देश करत म्हणाला.

तिने लगेच तिचा त्याच्या तोंडावरचा हात काढला. आणि कुणालच्या डोळ्यासमोर हात फिरवला.

कुणाल पुन्हा जमिनीवर आला आणि नितीन आणि कावेरीला एकत्र बघून पुन्हा खिन्न झाला.

त्याच मन म्हणतं होत की ह्या दोघांत असं काही नसेल पण अचानक भयानक समोरच दृश्य बघता त्याची बुद्धी मान्य करेना झाली होती.

तितक्यात आतले सगळे येणारे आवाज बंद झाले आणि दरवाजा उघडण्याचा आवाज आला नी नितीन पॅसेज मधून पळाला. कावेरी देखील पळू लागली पण कुणाल मागेच उभा होता तर पुन्हा मागे जाऊन त्याचा हात खेचून हॉल मध्ये पळत घेऊन आली. नि सोफ्यावर धाडकन बसली. तो ही हे थ्रील अनुभवत होता. तो ही येऊन धाडकन सोफ्यावर बसला. नितीन हसू लागला तसा कावेरीने त्याला \"शऊऊउ\" करून चूप केल.

तितक्यात सगळे बाहेर आले. त्यांनी काही डिसिजन घेतले असावेत आणि कुणालचे वडील देखील कुणाल ला निघण्यासाठी इशारा केला आणि त्याने एकदा कावेरी कडे पाहिलं आणि एकदा बाबाकडे... आणि निमूटपणे त्यांच्यासोबत जाऊ लागला. पण  तो बाहेर जाऊन पुन्हा आत आला.

"नितीन, कावेरी... आपण बाहेर जाऊ या का काहीवेळ.." कुणाल ने आत येताच विचारलं. " आणि तस ही बाबा कार घेऊन गेलेत तर आज तुझी कार घेऊ. "

"हो चालेल ना.. चल काव काव..!" नितीन ला असं पुढील तरतूद लावण्यासाठी घरातून कल्टी मारायची होती.

नितीन ने लगेच चावी घेतली आणि पार्किंग मध्ये गेला. कावेरी देखील तिच्या घरी सांगून आली की ती नितीन सोबत बाहेर जाते आहे. तिघेही निघाले, कावेरी फ्रंट सीट वर बसणार तोच कुणाल फ्रंट सीट वर नितीनच्या बाजूला बसला.

नितीन ने विश्वासात घेऊन सगळं काही सांगायचं ठरवलंच होत. आणि शेवटी त्याचे आणि कावेरीचे वडील देखील अशाच एक कांड चे शिकार झाले होते. त्यामुळे आता कुणालाही त्याच शिकार होऊ द्यायचं नव्हतं.

नितीन आणि कुणाल ने डे वन पासून सगळं आढावा मांडायला सुरुवात केली. नीता आणि प्रशांत सर सोबत केलेलं इन्व्हेस्टिगेशन, घाडगे आजोबांसोबत झालेलं बोलण... आणि त्यानंतर चोरून ऐकलेल्या गोष्टीचा... ह्याला सगळ्यांचा ताळमेळ बांधला आणि कुणाल एक एक गोष्ट नोट करून घेत होता. कावेरीला विचार करून सांकेतिक नंबर आणि भाषेची उकल करण्याची जबाबदारी घेतली.

प्रणिताच्या घरी जाऊन तिला सोबत घेतलं. गाडीतच लॉन्ग ड्राईव्ह वर त्यांचं बोलण होणार होत. प्रणिता सतत सगळ्यांवर नजर ठेऊन होती. तिला नीलम च वागण थोडं वेगळ वाटत होत.  ते तिने नेमक काय काय केल हे सांगितले.

" ओह माय गॉड... म्हणजे रुद्र... नोटबुक त्याच्याकडे गेली म्हणजे काल तो ही गायब झालाय. आणि आज रविवार आहे.. कॉलेज तर नाही. " कावेरी म्हणाली. त्यांनी लगेच कुणालच्या मोबाईल वरून रुद्रच्या घरी फोन केला. पण तो घरी नव्हताच. आणि घरच्यांना कल्पना नव्हती की तो नक्की कुठं गेला. पण घरचे काळजीत पडतील म्हणून त्यांनी काहीही सांगायचं टाळलं.

" गाईझ, माझ्याकडे एक आयडिया आहे. " सगळे कुणाल कडे आशेने बघू लागले.

" काय..? "

" नीता तू नीलम वर बारीक लक्ष ठेव, की ह्यावेळी ती नोटबुक कुणाच्या बॅग मध्ये ठेवतेय. आणि लगेच ती बुक अगदी कुणालाही न कळता माझ्याकडे आणून दे. त्यानंतर मीं गायब होईन आणि मुलं नेमके कुठं आहेत ह्याचा पत्ता लागेल. "

" नाहीं कुणाल, तू का..  आय मिन तुम्ही का..  मीं पण जाऊ शकतो.. " नितीन गिअर बदलत म्हणाला.

" तुच ठिक आहे.. म्हातारा नाहीये मीं.. आणि तुम्ही आहातच की माझ्यासोबत. आणि आपण अमर सर ला काहीच कळू द्यायचं नाही की... आपल्याला काही कल्पना आहे ह्याची. " कुणाल म्हणाला.

" नाही.  दोघ ही नाही. " कावेरी तडक बोलली.

" होय.. आपण रिस्क नको घेऊयात. " प्रणिता ने कावेरीच्या बोलण्याला दुजोरा दिला.

"अरे पण का..? काहीतरी प्लॅन तर करावाच लागेल ना. " कुणाल हताश होत म्हणाला.

" आज विचार करू.. मग ठरवू तोपर्यंत कुणीच आगाऊपणा करायचा नाही. कळलं. छोट्स चुकीचं पाऊल खूप खतरनाक होऊ शकत. " कावेरीने दोघांना ही खडसावून काढलं.

" कुणाल म्हणतोय ते बरोबर आहे आणि जर कुणाल संपर्कात राहू शकला नाही तर असं काहीतरी आपल्याकडे हवं जेणेकरून आपण कुणालपर्यंत पोहोचू शकू. "

" येस.. काव काव.. ट्रानसिस्टर... रेडिओ वेवज ने आपण संपर्कात राहू शकतो. " नितीनची ट्यूब पेटली.

" गाडी फिरव.. रेडिओ स्टेशन ला.  आपण चौकशी करू. मग ठरवू. " कावेरी म्हणाली.

" नीता यु आर ग्रेट... तुम्ही खूप भारी आयडिया शोधून काढलीत. माझं तर डोकंच बंद पडत अशा वेळी. " कावेरी प्रणिता च्या हात हातात घेऊन म्हणाली.

" मीं एकटीच कुठं काय करू शकते. तुम्ही सगळे आहात सोबत. हे आपल्या टीम वर्क आहे. " प्रणिता म्हणाली.

काही काळ का होईना... मिशन मध्ये कुणाल नितीन आणि कावेरी बद्दल सगळं विसरूनच गेला होता.

रेडिओ स्टेशन ला त्यांना आवश्यक ती माहिती आणि डीवाईस दोन्हीही ही मिळालं. पण त्यांनी नेमकी परिस्थिती मात्र सांगितली नव्हती.

आणि नितीन ने कुणाल, प्रनिताला ड्रॉप करून कावेरीला सोडवून घरी आला.


क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  19
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//