Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 18.0

Read Later
कावेरी 18.0कावेरी 

भाग अठरा 

" काव-काव , मला ह्यांच्यावर संशय आहे. काहीतरी नक्कीच आहे. " नितीन आणि कावेरी त्यांच बोलणं चोरून ऐकायला बाहेर उभे होते.

"गप्प उभं राहून ऐक , नाहीतर हाकलून लावतील आपल्याला. " कावेरी हळू आवाजात त्याला दटावत म्हणाली. 

आजोबानी नितीनला संभाषणात मज्जाव केल्याने त्यानं कावेरीला हा स्टंट करण्यासाठी बोलावून आणल होत. होणाऱ्या घटनांचा आढावा घेता मूल जबाबदार झाली होती आणि त्यांना नक्की काय होतंय आणि कशामुळे होतंय ह्याची उत्सुकता देखील होती. पण त्याचा उद्देश एकच कि, जर पकडला गेलो तर कावेरी सोबत असली तर जास्त कुणी काही बोलणार नाही. 

आणि ते अगदी कानात  जीव ओतून ऐकू लागले. 

" नाही, मला आता हे ओझं पेलवत नाही. " श्रीकृष्ण घाडगे काहीसे चिंतेत म्हणाले. 

"पण किश्या , परिस्थिती बघता तुला आरामाची खूप आवश्यकता आहे. " शशिकांत राव म्हणाले. 

"खूप नुकसान होईल जर आज मी शांत बसलो तर... आता इतिहासाची पुनर्र्वृत्ती नकोच ." 

"अरे पण " शशिकांत राव म्हणाले. 

" काका बोलू द्यात त्यांना, कदाचित व्यक्त झाले आणि मनावर ओझं कमी झालं तर त्यांची तब्येतीत सुधार होईल. " डॉक्टरांनी समजावलं . 

" हो रे शश्या, बोलू देत मला." 

" ठीक आहे, पण माझी एक अट आहे कि जास्त त्रास झाला तर मी सांगेल तस आराम करायचा तातडीने ." 

"मंजूर , "

"मी बाहेर थांबतो सर. तुम्ही बोलून घ्या." प्रशांत म्हणाला. 

"नाही सर तुम्ही देखील ऐका , ज जे मला त्यावेळी माझ्या स्वतःच्या मुलासाठी जमलं नाही ते तुम्ही दुसऱ्याचं मुलांसाठी करत आहेत , हा तुमचा मोठेपणा आहे. "

अगदी किर्र्रर्र्र शांतता होती. आणि घाडगे आजोबा बोलू लागले, किंबहुना ते त्यांच्या फ्लॅश बॅक मध्ये गेले. 

" मीं त्यावेळी भाषाशास्त्र आणि सांकेतिक भाषेवर एक ग्रंथ लिहिणार होतो. त्यासाठी जमवलेली  सगळी माहिती आणि ऐतिहासिक कात्रणे जमा केली होती. परंतु लिहिताना ती प्रत्येक गोष्ट सार्थ असावी म्हणून प्रयोग ही केले काही. माझा मुलगा सागर, तुझा अमोल, सुधीर आणि दत्ता हे चौघे बालपणीचे मित्र होते. त्यावेळी माझ्याकडे एक मुलगा शिकण्यासाठी आला होता. नाही, खरतर तस तो म्हणाला, पण त्याचा उद्देश काहीसा वेगळाच होता. अमर, अगदी तसाच... दिसायला..

साधारण पाच वर्षे तो माझ्या सोबत राहिला. त्यानंतर तो अचानक निघून गेला. आणि त्यानंतर माझा मुलगा सागर, तुझा अमोल आणि सुधीर तिघे ही एका ऍक्सिडेंट मध्ये गेल्याच समजलं. पण खरतर तो अपघात नव्हता. त्याने तोच अभ्यास वापरून त्यात काळ्या जादूचा प्रयोग करून मुलांच अपहरण करून वापरला होता. आणि त्यातच आपली मुलं गेली. तुझा नातू आहे तुला त्यामुळं तू मुलाच्या दुःखातून सावरलास पण मीं... मीं कुणाकडे बघून सावरू... नव्याने लग्न ठरलेलं सागरच आणि त्याची होणारी पत्नी सुद्धा कित्येक वर्षे अचेतन अवस्थेत होती. आणि शेवटी तिच्या घरच्यांनी तिला ही संपवलं. आणि हे सगळं मला अवचित कळलं. तेव्हापासून मला सतत असं वाटत की मीच जबाबदार आहे ह्या सगळ्यां गोष्टीला.

"तुच सांग शश्या मीं कसा माफ करू स्वतःला. तरीही मीं खूप शोध घेतला ह्या गोष्टीचा की, कुठेतरी काहीतरी मिळेल आणि मीं त्याला शिक्षा देईल. पण तसा योगच आला नाही, कारण तो कधी दिसलाच नाही, किंबहुना सापडला सुद्धा नाही, आणि आज पंधरा वर्षांनी तो समोर दिसला, ते ही अगदी त्याच रूपात जसा तो तरुणपणी होता."

*****

"ओह माय गॉड, म्हणजे आपले दोघांचे बाबा ह्याच खेळाचे शिकार झाले होते." नितीन शॉक होत म्हणाला.

कावेरी मात्र वेगळ्याच विश्वात पोहोचली होती. तिला हे सगळं ऐकून भोवळ येत होती पण नितीन ने तिला सावरले आणि हॉल मध्ये नेऊन सोफ्यावर बसवून प्यायला पाणी दिल.

" नित्या, बाबा... मीं खूप चिडायची बाबावर की ते मला सोडून गेले. पण ते ह्या परिस्थितीत गेले आणि ते नेमक कशाने गेले हे आजपर्यंत कुणाला माहितीच नव्हतं. " कावेरी भावुक होऊन म्हणाली.

तिची भावनिक बाजू नितीन पहिल्यांदाच बघत होता.  तिच्या जवळ येऊन बाजूला बसला आणि तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि दोन्हीही हात त्याच्या दोन्हीही हातात पकडले. ती मात्र शांत डोळ्यातून टीप गाळत होती. तितक्यात दरवाजात कुणाल आणि त्याचे वडिल दत्त म्हणून दरवाजात हजर झाले.

नितीन ने स्वतःला सावरून कावेरीचे हात सोडले आणि चेहऱ्यावर खोटं स्मित झळकावून दोघंच ही घरात आल्यानंतर अभिवादन केल. कावेरीने देखील डोळे पुसले आणि काहीशी सावरली होती.

पण समोरच दृश्य बघून कुणालच्या मनावर आघात झाला. वडिल सोबत असल्याने तो काही व्यक्त झाला नाही पण त्याने नक्कीच गैरसमज करून घेतला होता. इतक्या दिवसाच्या धावपळीत कावेरीकडे बघायला ही वेळ नव्हता आणि आज कावेरी नितीनच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. कदाचित कुठंतरी कुणालच्या मनात सुरुवात झालेली प्रेम कहाणी तिच्यापर्यंत न पोहोचताच मनातच विरून गेल्याची काहीशी जाणीव त्याला झाली.

नितीन ने त्यांना ग्रीट करून बसवलं आणि गेस्ट रूमच्या दिशेने आजोबाना बोलवायला गेला. कावेरी अजुन ही तिच्या आघातातून बाहेर आली नव्हती कुणाल मात्र खिन्न नजरेने फक्त तिलाच बघत होता. जसे आजोबाचा निरोप घेऊन नितीन बाहेर आला. आणि मिस्टर रणधीर यांना घेऊन गेस्ट रूम कडे गेला.

"कावू...! आता मला कळलं, की तू मला का नकार दिलास.." कुणाल चाचारत म्हणाला.

" काय..? " ती स्वतःला सावरत म्हणाली.

" तुला नितीन आवडतो ना..!" कुणालने विचारलं.

" तो माझ्या बेस्ट फ्रेंडचा बॉयफ्रेंड आहे. " कावेरी उत्तरली.

"तरीही तू..!" कुणाल म्हणाला.

"तो लहानपणी पासून माझा मित्र आहे. एकत्र वाढलो आम्ही. त्याची फॅमिली माझी आहे आणि माझी फॅमिली त्याची." कावेरी उत्तरली.

" ओह..!" कुणाल तिरकसपने म्हणाला.

" तुझ्या डोक्यात फरक पडलाय. आहे तेवढंच डोकं चालवत जा. " कावेरी त्याचा आवेग पाहता म्हणाली.

एवढं बोलून तीही नितीन च्या मागे गेली आणि गेस्ट रूम बाहेर त्याच्यासोबत उभ राहून कान देऊन ऐकू लागली. कुणाल ही तिच्या पाठोपाठ आला.क्रमशः
©संध्या भगत

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  18
जिल्हा:  नाशिक

कावेरी 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//