Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 16.0

Read Later
कावेरी 16.0


कावेरी

भाग सोळा


" सर आपल्या बिनी मॅम, त्या ही कुमारिका आहेत आणि अचेतन आहे सध्या. " नितीन मधेच म्हणाला.

" होय.. " प्रशांत सरांची पण ट्यूब पेटली.

" म्हणजे हे रक्ताने बनवलेले चिन्ह बघता ह्यांची किडन्यापिंग फक्त आणि फक्त त्यांच्या रक्तासाठीच करत आहे, त्यामुळे ह्या वरून तरी हे सिद्ध होतंय कि ह्या मागे काळ्या जादूचा उपयोग होणार आहे, आणि काळ्या जादूमध्ये रक्ताचाच जास्त वापर होतो, किती तरी वेळा ह्याचा उपयोग जादू करण्यासाठी होतो आणि काही वेळा आपल्या जादूचं अजून सामर्थ्य वाढवण्यासाठी करतात. तो खुनी त्या रक्ताने जे काही करणार आहे त्याची तीव्रता केवढी असेल मला माहित नाही. पण त्याने ह्या वह्यावर बनवलेल्या नंबर्स आणि चिन्हांनी फक्त एवढंच सांगू शकतो कि ती व्यक्ती एक जुनी खेळाडू आहे काळ्या साम्राज्याची... खूप वर्षांपासून ती व्यक्ती हे काम करत आली असेल... हे काळी जादू शिकवणारी कोणती संस्था किंवा शाळा तर नाही आहे, त्यामुळे हि  गुपचूप लपून छपून शिकावी लागते, पण ह्या व्यक्ती ला तर आपल्या जन्म झाल्या पासून हि काळी जादू ध्यानी आहे..."घाडगे आजोबांच्या स्पष्टीकरणाने नितीन आणि प्रशांत  दोघेही अस्वस्थ झाले.

" पण आजोबांना रक्ताचं आणि काळ्या जादूचं काय घेणं देणं...? काळी जादू तर कोणाचं केस घेवून किंवा त्याचे कपडे घेवून मग स्मशानात बसून काही मंत्र उच्चारून होते ना...?" नितीनने आपली आशंका जाहीर केली.

"मी तर एवढंच सांगेन कि तुमचे ज्ञान ह्या विषयी खूप कमी आहेत, माझ्या सोबत या..." एवढं बोलून घाडगे आजोबांना आपल्या घरातील छोट्याश्या ग्रंथालयात गेले आणि त्यांच्या मागोमाग ते दोघेही.

"आमच्या विषयाच्या भाषेत काळ्या जादूला डार्क ऍक्ट म्हणतात, तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं तर खूप खालच्या स्थराच काम आहे... पण तुमच्या विचारांच्या हि पलीकडे काळ्या जादूचं साम्राज्य आहे. तुम्ही जे काही सांगितलं ते फक्त एक सामान्य माणसाचं एक साधारण काम आहे पण जर तुम्ही अजून खोलवर जाल तर काळ्या जादूत पण किती तरी वेगवेगळे प्रकार आहेत, जसं कि नाईट मॅजिक , डेथ मॅजिक , ब्लड मॅजिक आणि सर्वात भयानक डेमॉनिक (आसुरी) मॅजिक... खरं म्हणजे ह्याचे असले अजून खूप सारे प्रकार आहेत पण अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगणं मी जरुरी नाही समजत. पण जसं कि त्या चित्रात पाहिलं आहे, मुलांची किडन्यापिंग करण्यात आणि रक्त काढण्यात आलं आहे त्याचा उपयोग सोप्प्या भाषेत सांगणं म्हणजे तो ब्लड मॅजिक आणि ब्लॅक मॅजिकचा एकत्र प्रयोग म्हणजे डेमॉनिक (आसुरी) मॅजिक पूर्ण करण्यासाठी करत आहे." घाडगे आजोबाच्या ह्या माहितीने त्या दोघांचे शरीर थरारले होते.

"डेमॉनिक (आसुरी) मॅजिक असतं तरी काय...?" ह्यावेळी नितीनने प्रश्न विचारला... जो पूर्ण वेळ गप्पच होता.

"कोणत्या हि आत्म्याला बंदीतून सोडवून त्याला पुन्हा आणणे." घाडगे आजोबानी त्याला स्पष्ट शब्दांत समजावून सांगितलं.

"तर तुमचं म्हणणं असं आहे कि, हा जो कोणी किडन्यापिंग करत आहे तो मुहूर्त बघून त्यांना मारून कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा ह्या जगात आणायला पाहत आहे."

"हो, आणि ह्या चिन्हांकडे पहा ज्या कि ह्या चित्रांमध्ये दोन हाडं क्रॉस ठेवून बनवले आहेत, सगळ्यात वरती काही नंबर्स आहेत, त्याच्या डाव्या बाजूला एक चिन्ह आहे, काही गोलाकार आणि Ω असा. मग खालच्या बाजूला आणखीन एक चिन्ह आहे = असा जो कि दोन रेघांनी बनलेला आहे जो कि सरळ सरळ आत्म्याशी निगडीत आहे. पहिली रेघ शरीराला दर्शवते आणि दुसरी आत्माला, ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होता कि हि काळी जादू कोणत्या ना कोणत्या तरी आत्म्याला पुन्हा बोलावण्यासाठी केली जात आहे.." घाडगे आजोबानी चिन्ह एका कागदावर बनवत त्यांना समजावून सांगितले.

"आता हे दुसऱ्या चित्रात पहा, इथे नंबर्स वेगळे आहेत आणि उजव्या बाजूला Ð असल्या प्रकारचं चिन्ह आहे आणि त्याच्याच खाली एक = ह्या चिन्हा मधलं अंतर पहिल्यापेक्षा थोडं कमी झालं आहे, ह्याचा अर्थ असा आहे कि ती आत्मा आता शरीरापासून जास्त लांब नाही आहे..." त्यांचं हे स्पष्टीकरण ऐकून ते दोघे अचंबित झाले.

"पण हे नंबर्स काय सांगतात...?"

"मी नंबर्स विषयी काही सांगू शकत नाही, हे नंबर्स स्वतःच एक गुपित आहे, पण ती माहिती सर्वात मोठं रहस्य आहे. मी बोललो नव्हतो तुम्हाला हा खूप जुना खेळाडू आहे... काळ्या जादूमध्ये आत्माला संदेश पाठवण्यासाठी पहिल्या चरणात नंबर्सचा उपयोग होतो, हे एक कोड प्रमाणे असतात, जशी बायनरी भाषा नसते कॉम्प्युटरमध्ये तशीच, बस त्याच प्रकारे आपल्यांना हे नंबर्स पण डिकोड करायला लागतील..."

"पण मग Ω आणि Ð ह्या चिन्हांचा अर्थ काय होतो...?"

"Ω ह्या चिन्हाचा असा खास काही अर्थ नाही आहे, हा चिन्ह तर प्रत्येक काळी जादू करणारा माणूस आपापल्या परीने वापर करतो, हा चिन्ह कदाचित कोणत्या तरी शहराचं नाव दर्शवत आहे किंवा कोणत्या तरी शहराची माहिती यात दिली आहे किंवा असंच काहीतरी जे मी व्यवस्थित सांगू शकत नाहीये..."

"ह्याचा अर्थ असा कि त्या व्यक्ति मागे कोणती ना कोणती तरी भयाण शक्ती त्याच्या पाठीशी आहे." प्रशांतने पुन्हा आपली शंका जाहीर केली.

"होय लक्षपूर्वक ह्या नंबर्स ना पहा सुरुवातीला हे सांगतात कि हे कुठून आहेत आणि त्यांचा काय संबंध आहे. जर त्या व्यक्तीला पकडायचं असेल तर आपल्यांना पहिले हे नंबर्स डिकोड केले पाहिजेत." डॉ. अवधूत अजूनही ते नंबर्सच पाहत होते.

"म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो कि ह्या केसमध्ये तुम्ही आमची मदत करायला तयार आहात...?" प्रशांतने एका नवीन जोशात विचारले.

"होय माझ्याकडे ह्याच्या पलीकडे काहीच उरलं नाही आहे."

\"मी अजून कोणत्याच मुलाला ह्या हिंसक माणसाचा शिकार होतांना नाही पाहू शकत." घाडगे आजोबा आपल्या मनातल्या मनातच बोलले.



क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  16
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//