Feb 22, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 15.0

Read Later
कावेरी 15.0


कावेरी


भाग पंधरा


कॉलेजमध्ये जय्यत तयारीला सुरुवात झाली. कुणालही वडिलांची इभ्रत वाचवण्यासाठी पूर्ण वेळ कॉलेजच्या कामकाजातं लक्ष देत होता. कावेरीला बघून काही क्षण मोह होई पण तिने तिच्या कामात स्वतःला अगदी पुरेपूर झोकून दिल्याने तिला त्याच्या बघण्याकडे लक्ष द्यायला बिल्कुल वेळ नव्हता.

प्रशांत आणि नितीन इच्छित स्थळी पोहोचले.

पाहुणचार घेऊन थोडावेळ ओसरीत वाट बघत बसले. तितक्यात कोल्हापुरी चपलेचा कर्रर्रर्र कर्रर्रर्र आवाज आला नी मागे वळून पाहिलं. तर पिळदार मिशा, सावळासा आणि धीप्पड असा वयस्कर व्यक्तिमत्व समोर उभ राहील.

" घाडगे आजोबा, मीं शशिकांत रावांचा नातू. आणि हे माझे सर आहे, आम्हाला तुमची मदत हवी आहे." नितीन म्हणाला.

"तर मग तुमच्या त्या आजोबानी तुम्हाला हे नाही सांगितलं का कि मला मदत आणि मैत्री करणे दोन्हीही पसंत नाही आहे आणि खास करून जर शिक्षक असतील तर..." आता ते जरा चिडून मोठ्याने बोलायला लागले होते.

" पण आम्हाला  सध्या खरच गरज आहे.. ह्यावेळी एक तुम्हीच आहात जे आमची मदत करू शकता." प्रशांत म्हणाला.

"मी तुमची मदत जरूर करू शकलो असतो पण क्षमा करा मला आपलं उरलेलं जीवन शांतीपूर्वक व्यतीत करायचं आहे." घाडगे आजोबा म्हणाले.

"प्लीज सर मी काय बोलतोय ते एकदा ऐकून घ्या. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही करण्यासाठी रस वाटत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा त्रास नाही देणार... ह्यामध्ये खूप साऱ्या मुलांचं जीवन अवलंबून आहे..." प्रशांत म्हणाला.

"हे जग खूप खराब आहे.  इथे प्रत्येकाचं जीवन कोणावर ना कोणावर तरी अवलंबून आहे आणि कोणालाच माहिती नाही कि कधी काय होईल आणि काय नाही ते... आणि जाणाऱ्यांना कोणीच थांबवू शकत नाही..." आजोबा उत्तरले.

"जर तुम्ही आम्हाला सहकार्य कराल तर खूप लोकांचा जीव वाचेल, तुम्ही हे करू शकता हे तुम्हाला पण माहित आहे. माणुसकीच्या नात्याने ह्यांना वाचवा..."प्रशांत ने विनवणी केली.

"कोण बोललं तुम्हाला कि मी माणूस आहे, मी तर फक्त एक शरीर आहे जो फक्त श्वासोश्वास करतोय, माझी आत्मा कधीच निघून गेली आहे. माझ्या सोबत तुमचा वेळ नका वाया घालवू, कोणीतरी दुसरा शोधा जो खरोखर तुमची मदत करू शकेल." एवढं बोलून घाडगे आजोबा त्यांची कोल्हापुरी चप्पल कर्रर्रर्र र्कर्रर्रर्र वाजवत आत गेले.

दोघांचाही भ्रमनिरास झाला. ते निराश होऊन वाड्यातून बाहेर पडले. त्यांचा खिशातील छोटासा नोकिया 66-00 वाजला. आणि ते अजूनच चिंतेत पडले.

" काय झालं सर.? " नितीन ने विचारलं.

" तुमच्या सिनियर वर्गातील सुमित नावाचं मुलगा पण गेली दोन दिवस बेपत्ता आहे. " प्रशांत सर निराश होऊन म्हणाले.

" ओह माय गॉड..! सर काहीतरी करायलं हवं. " नितीन ही घाबरला होता.

प्रशांत सर चिंतेत अगदी डोक्याला फोडणी देत होते की आता नक्की काय करायला हवं.

"एवढ्यात झालेला हा तिसरा प्रकार आहे , इथे बसून हातावर हात ठेवून विचार करण्यापेक्षा, ते जे घाडगे सर आहेत त्यांना आग्रह करून, लवकरात लवकर ह्यावर तोडगा काढण्यासाठी सांगायला पाहिजे...?" प्रशांत सरांचा आवाजात चिंता साफ दिसत होती.

" एवढी सारी किडन्यापिंग एवढ्या चतुराईने केल्या गेल्या आहेत आणि आजपर्यंत त्याने त्याच्या विरुद्ध सांकेतिक भाषा सोडली तर एकही पुरावा सोडला नाही, इथे काही न काही तरी असं आहे जे आपल्यांना दिसत नाही आहे एक अशी शक्ती जी ह्या सर्वांच्या मागे आहे. "

"हे बघ मी पण एकदम पक्का नाही सांगू शकत कि शेवटी कोण करत आहे तरीपण घाडगे सर ह्याविषयी जाणकार असतील तर त्यांची मदत घेणं गरजेचं आहे.. ह्या बाबतीत काळ्या जादू विषयी काहीच नसेल तर ते एका क्षणात सांगतील आणि जर असेल तर त्यांच्या पेक्षा अधिक चांगला कोणीच नाही जो आपली मदत करू शकेल." प्रशांत म्हणाला.

" ते ह्या बाबतीत आपली मदत करू शकतात तर ह्यासाठी त्यांना आग्रह करण्यासाठी आपल्याकडे खूप कमी वेळ आहे." नितीन शांत स्वरात बोलला.

"मी सांकेतिक चिन्हांच्या वह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आशा आहे कि ते त्यांना पाहून आपल्याला नक्कीच मदत करतील. पण जर असं नाही झालं तर आपल्याला कोणी दुसरा शोधला पाहिजे जो आपली मदत करू शकेल. पण ह्या वेळी अजून कुणी नक्कीच बेपत्ता होऊ देणार नाही."  प्रशांत काहीतरी विचार करत बोलला.

त्यांनी त्या दोन्हीही वह्या एक पिशवीत टाकून वाड्याच्या बाहेर नोकराला बोलवून घाडगे आजोबांना द्यायला सांगितले.

तो नोकर ती पिशवी घेऊन आत गेला आणि अवघ्या पाचच मिनिटात घाडगे आजोबा बाहेर आले. आणि गूढ नजरेने दोघांनाही न्याहाळु लागले.

"आजोबा, तुम्ही आम्हाला मदत करायला तयार पाहून मी एवढा आनंदित आहे कि काय सांगू तुम्हाला आजोबा" नितीन एकदम खुश होत बोलला.

आजोबानी नितीनकडे सर्रास दुर्लक्ष केल आणि प्रशांत सरांकडे बघुन बोलू लागले.

"हे पहा... मला कोणाला भेटायला नाही आवडत पण तुम्ही जे काही चित्र पाठवले होते त्यांना मी टाळू पण नाही शकत, शेवटी संपूर्ण मानवजातीचा प्रश्न आहे. " आजोबा आपल्या त्याच ओळखीच्या गंभीर शैलीत बोलले.

"आत या, आणि तुमच्या जवळ आणखीन किती माहिती आहेत त्या सर्व मला जाणून घ्यायच्या आहेत."

प्रशांत सरांनी घडलेली सगळी घटना इत्यांभूत सांगितली.

" पण हे घडण्यापूर्वी शहरात कुठे एक कुमारीकेचा गूढ मृत्यू झालंय का. किंवा अचेतन अवस्थेत कुणी सापडलं आहे का. " घाडगे आजोबांनी विचारलं.

" ह्याची काहीच कल्पना नाही. कदाचित पोलिस सांगू शकतील की असं कुणी बेपत्ता आहे का. " प्रशांत सर म्हणाले.


क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  15
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//