Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 14.0

Read Later
कावेरी 14.0


कावेरी

भाग 14


संपूर्ण दिवस शोध मोहिमेत पालथा घातला. मुलांनी तर सगळं शहर पिंजून काढलं पण कुठेच सापडले नाहीत. कॉलेज मध्ये सगळ्यांना शिक्षकांची यावर मिटिंग झाली. मुलींनी मिळून प्रशांत सरांना देखील भेटले आणि कुठे कुठे शोधलं ह्याची खबर दिली.

जर काही बरं वाईट होणार असत तर एव्हाना झालं असत. तरीही कॉलेज मध्ये प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवण्यासाठी मुलांना सुचवलं. कावेरीला न राहवून सतत नवीन आलेल्या शिक्षकांवर संशय होता. मिसिंग केस झाल्याने शहरात कॉलेजच नाव खराब झालं होत आणि त्याची झळ अर्थातच कुणाल आणि त्याच्या परिवाराला लागली होती.

त्रिवेणीने कुणालच्या कुटुंवा बाबत ही गोष्ट कावेरीच्या ग्रुपला सांगितली होती. अर्थातच दोन्हीही मुलं ही त्यांच्याच ग्रुप मधले होते. पोलीस केस ही झाली पण पोलिसांच्या नजरेत सगळेच संशयित होते आणि नव्हते ही. त्यांनी प्रशांतला सांगून सगळ्यावर अगदी करडी नजर ठेवली होती.

कुणालचे वडिल आणि प्रिन्सिपलं मात्र खूप घाबरले होते. कारण पंधरा वर्षांपूर्वी असच काहीस घडलं होत आणि आता पुन्हा हे मुलं गायब होण्याच्या प्रकरणाने त्यांची पाचावर धारण बसली. प्रशांत एक निडर व्यक्तिमत्व आणि आजतगायत शिस्तीसाठी कॉलेजमध्ये प्रख्यात होते. त्यामुळं फक्त पोलिसांवर विसंबून  न राहता मिस्टर रणधीर ह्यांनी त्यांची मदत घेण्याचं ठरवलं.

प्रशांत ने ही विशाल आणि आकाश ज्यांच्यासोबत नेहमी दिसत, त्यांची कसून चौकशी केली. नितीन आणि प्रणिता ला सोबत घेऊन त्यांच्या घराचीही झडती घेतली. तर विशालच्या घरी झडती घेताना वही पुस्तकाच्या खणात एक वेगळंच चिन्ह आणि नंबर असलेली वही दिसली. त्यांनी ती बघितली तर टे सांकेतिक चिन्ह आणि नंबर हे रक्ताने लिहिलेले होते.

" सर ही अशी सेम मीं आकाशकडे पण पाहिलीय." नितीन प्रशांत सरांना म्हणाला.

" हो, मीं पण. आणि मीं विचारलं सुद्धा होत ह्याबाबत आकाशला.. पण तो काहीच बोलला नाही." प्रणिताने नितीनच्या बोलण्याला दुजोरा दिला.

प्रशांतच्या डोक्यात वेगळाच किडा वळवळत होता. तिघेही लगेचच आकाशच्या घरी जाऊन ती वेगळ्या भाषेतील सांकेतिक चिन्ह आणि नंबर असलेली वही घेऊन आले. त्यांना नेमक आठवत नव्हतं नक्की कुठे.. पण कुठेतरी त्यांनी ह्याला चिन्हाना बघितल्याच जाणवलं होत.

ते दोन्हीही व्ही घेऊन ते कॉलेजच्या दिशेने निघाले.

" सर, माझे आजोबाच्या मित्राला विचारायचं का, ते ह्याबाबत काही सांगू शकतात. त्यांना सांकेतिक भाषा काही प्रमाणात समजते. आपण ही भाषा डिकोड केली तर आपल्याला विशाल अन आकाश लवकरच सापडतील. " नितीन दृढतेने म्हणाला पण त्याची नजर त्या सांकेतिक चिन्हवरून जरा ही हलली नव्हती.

" पण नितु, ते गावी राहतात ना, आणि कुणासोबत बोलत ही नाहीत." प्रणिता म्हणाली.

" पण एकदा मदतीसाठी विचारायला काय हरकत आहे. आणखी एक गोष्ट, सध्या कुठे ही ह्याची वाच्यता करू नका. " प्रशांत सर म्हणाले.

" ठिक आहे सर, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. " प्रणिता म्हणाली.

"सर आपण उद्या सकाळीच निघू कारेगाव ला. तीन तासात पोहोचू आरामात. " नितीन म्हणाला.

" हो, आपण दोघेच जाऊ. प्रणिता तू बाकीच्यांच्या मदतीने कॉलेज मध्ये नवीन आलेल्या लोकांवर बारकईने नजर ठेव. " प्रशांत सर म्हणाले.

" ठिक आहे सर." प्रणिता उत्तरली.

" आपण एक कार्यक्रम घेणार आहोत कॉलेजमध्ये अशी अनाउंसमेंट करू शहरात, म्हणजे गायब झालेल्या दोघांना शोधायला आपल्याला बराचसा वेळ मिळेल आणि कॉलेजची होणारी बदनामी थांबेल. हे आपण कावेरीला सांगू. तुम्ही मुलांत कळवा, मीं स्टाफ आणि मॅनेजमेंट मध्ये कळवतो. "

कार्यक्रम काय असेल ह्यावर त्यांनी चर्चा केली आणि ठरवलं.

दोघांनीही होकारार्थी मान डोळवून दुजोरा दिला.

दोघांना ही प्रशांत ने कॉलेज गेट पासून काही अंतरावर गाडीतून उतरवल जेणेकरून कुणाला संशय नको यायला.

नंतर नितीन आणि प्रणिता ने फक्त कार्यक्रम संबंधित सगळी माहिती ग्रुप ला सांगितली.

" मॅम ची कंडिशन खराब आहे त्यात दोन मुलं गायब आहेत, आणि आपण काय तर धिंगाणा करायचा. "कावेरी म्हणाली.

" मला ही नाही पटल हे. " रुद्रा, प्रिया, पल्लवी नीलम, विनय सगळ्यांनी आपल मत दर्शविले.

नितीन तर डोक्याला हात लावून बसला. पण त्रिवा आणि कुणालने मात्र ह्यावर पॉजिटीव्ह मत दिल.

" बरोबर आहे तुमचं. जर रेग्युलर लेक्चर असले तर आपल्याला त्या दोघांना शोधता येणार नाही. प्रोग्राम च्या तयारीत बिझी असले तर आपण आपल शोधण्याचा काम करू शकतो. आणि आपल्या कॉलेज च जे नाव खराब झालंय. ते ही लोक विसरतील. "

सगळ्यांना त्याचा मुद्दा पटला आणि अर्धे लोक पार्टीसिपेट करतील तर अर्धे मोहिमेत काम करतील असा एकमताने निर्णय ठरला.

नितीनने घरी येऊन त्याच्या त्याच्या आजोबाना सांगीतलं, पण काहीसे उदासीन होते कारण ते मदत करतील की नाही ह्याची अजिबात गॅरंटी नव्हती. तशी कल्पना देखील नितीनला दिली होती. नितीन आणि प्रशांत दोघांनीही भल्या पहाटे कारेगावाकडे कुच केल.


कार्यक्रमची रूपरेषा ठरवण्याची संपूर्ण जबाबदारी कावेरीला दिली. तिने आणि ग्रुपने मिळून सगळं काही व्यवस्थित ठरवून सांस्कृतिक मंडळ समोर रूपरेषा मांडली. कार्यक्रम शहरी स्थरावर होणार म्हणून तिने चेअरमन ला विश्वासात घेऊन आपल्या रेडिओ स्टेशन मध्ये त्याची संपूर्ण जाहिरात आणि मांडणीची जबाबदारी घेतली. आणि ती पूर्णतःवास नेली 


क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  14
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//