Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 13.0

Read Later
कावेरी 13.0


कावेरी

भाग 13


दुसऱ्या दिवशी देखील मुलांनी कॉलेज मधील लेक्चर झाल्यानंतर दवाखान्यात आजी बाबांची मदत करण्याचा निर्णय घेतला. अर्थात जोपर्यंत मॅम ठिक होत नाहीत तोपर्यंत त्यांचा हाच दिनक्रम असणार होता.

*****

दुसऱ्या दिवशी सगळी मुलं कॉलेजला गेली पण कुणाचाच मस्तीचा मूड नव्हता. सगळे अगदी शांत झाले होते. स्पेशली पहिले दोन तास बिनी मॅम चे असल्याने त्यांना अजूनच वाईट वाटत होत. तरीही नवीन शिक्षक येणार म्हणून त्यांना लेक्चर मिस करून पण इलाज नव्हता.

दरवाजात तोच कालचा हँडसम व्यक्ती उभा होता. सहाफूट, रंगाने गोरा, घारे डोळे, डोळ्यांवर अगदी बारीक राउंड ट्रान्सपरेन्ट फ्रेमचा चष्मा, उजव्या हातांच्या तर्जणीने अलगद चष्मा वर केला आणि क्लासरूम मध्ये प्रवेश केला. सगळी मुलं उभी राहून गुड मॉर्निंग बोलून अभिवादन केल.

क्लास रूम मध्ये कावेरीला बघून तो एक क्षण एकटक बघितलं पण कावेरीच त्याकडे लक्षच नव्हतं पण नितीन च्या मात्र ते लगेच लक्षात आल आणि त्याने एकदा सरांकडे आणि एकदा कावेरीच्या दिशेने बघितलं. त्याला ती नजर काहीशी गूढ  वाटली. पण सध्या काहीच अंदाज नं लावण्याच ठरवलं.

कॉलेज झाल्यावर कालच्याप्रमाणे आज ही ते दवाखान्यात आजी बाबांच्या मदतीला गेले. सगळी मस्ती मजाला जणू अंकुश लागला होता.

******

"कावू..! काय करतेस."! नितीन येऊन कावेरीच्या बाजूला बेंचवर बसला.

"साले भेंडी, काव काव ची कावू कधी झाली. " कावेरी डोळे बारीक करून काहीस संशयित नजरेने बघू लागली 

" तू त्या अमरला ओळखतेस का.!" नितीन ने विचारलं.

"कोण अमर?" कावेरीने प्रतिप्रश्न केला.

"अरे तो नवीन टीचर आलाय बिनी मॅम च्या जागी. " नितीन बारीक डोळे करून सांगू लागला.

" तुला फालतुगिरी करायची असेल तर मला बिलकुल वेळ नाही, निघ तू कडेकडेने, नायतर कडेलोट होईल तुझा. आधीच डोकं खूप दुखतय. " कावेरी वैतागून म्हणाली.

"ऐक तर. " नितीन तिला मनवू लागला.

" मीच जाते.!" कावेरी तिचं बुक्स बॅग मध्ये टाकून चालती झाली.

नितीन कडे हताश होऊन बघण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नव्हता.

तितक्यात कुणाल क्लास मध्ये आला. कावेरी दिसली नाही म्हणून तो ही निघून गेला.

पुढे जाऊन कावेरी अमरला धडकली. तो तिच्याकडे पाहू लागला. आणि तितक्यात कुणाल तिथे आला. त्याने मागूनच कावेरीला आवाज दिला आणि तिने मागे वळून पाहिलं.

" एक्सक्युज मीं मिस...! डु यु हैव् मॅनर्स टू से सॉरी.? "

" पार्डन..! मीं भिंतीच्या बाजूने समोर बघूनच चालत होती. आपणच हायवे सोडून भिंतीच्या कडेला आलात हातातली पुस्तक बघत. मग मीं का सॉरी बोलू. " कावेरी शांतपणे म्हणाली.

" नॉन सेन्स. " अमर संवाद वाढावा म्हणून तिला डिवचत होता.

" एक्सट्रीमली सॉरी सर. फ्रॉम बेहाल्फ ऑफ हर. " कुणाल कावेरी जवळ जातं म्हणाला.

कावेरी त्याच्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहू लागली. अमरने प्रश्नांकित नजरेने कुणालकडे पाहिलं.

"मायसेल्फ मिस्टर कुणाल रणधीर. " कुणाल म्हणाला.

" ओह, वन अँड ओन्ली ओवनर ऑफ दिस कॉलेज. नाईस मिटिंग यु!" अमर त्यासोबत हात मिळवत म्हणाला.

कावेरी मात्र पुढे निघाली.

"इट्स माय डॅड.. नॉट मीं सर..!" कुणाल उत्तरला.

" हाऊ पोलाईट यु आर...!" अमर पुढे बोलत होता पण कुणालच लक्ष जाणाऱ्या कावेरीकडे होत हे त्याच्या ध्यानात आलं.

"मे आय..!"

"शुअर मिस्टर कुणाल..!" तिरकस स्माईल देत अमर म्हणाला.

कुणालने मोजक स्मित दिल आणि कावेरीला आवाज देत निघून गेला.

" इंटरेस्टिंग...!" अमरने त्याचा स्पेक्ट तर्जनीने अलगद वर केला. आणि दोघांना नजरेआड होईपर्यंत बघत राहिला.

*****


आज सकाळी लवकर कॉलेजला येऊन ही कुणीच लेक्चरला गेलं नव्हतं. सगळे कट्ट्यावर चिंतेत बसले होते.

" कुठं असेल तर आपला विशल्या...!" रुद्र चिंतेत विचार करत होता.

" हो नाही बिचाऱ्याची आई खूप रडत होती सकाळी..!" नितीन काळजीने म्हणाला.

" काय झालं... कोण रडत होत. " कावेरीने लांबूनच विचारले.

" अरे विशाल गेले दोन दिवस घरी नाही गेलाय. कुठंय.. काय.. काहीच माहिती नाही. " नितीन उत्तरला.

"अरे पण असं कस... तो तर रोज येतो ना कॉलेजला.?"

" त्याच्यासोबत काही अघटीत झाल असेल तर..!" नीलम काहीशी गूढ बघत म्हणाली.

ती असं म्हणताच कावेरीला तिचं स्वप्न आठवलं... आणि अंगावर सर्रकन काटा आला.

" ए मंद..! जरा शुभ बोलत जा ना. इकडं सगळे टेन्शन मध्ये आहेत. " कावेरी नीलमवर डाफरली.

" अरे नितीन भाई.. तो त्रिवाच्या वर्गातला आकाश आहे ना... तो पण नाहीये गेले दोन दिवस " रुद्र धावतच नितीन जवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.

"काय...! रुद्रा फेकत असशील तर तुला फेकीनं मीं." नितीन म्हणाला.

\"अरे खरच..!" आता त्याचे पेरेंट्स आले होते आणि तीन दिवस झाले तो घरी नाही गेला. आजचा रात्र अभ्यासासाठी विशाल कडे जाणार म्हणाला होता घरी. आणि विशाल पण नाही आणि तो पण नाही.

" काहीतरी तर गडबड सुरु आहे. असे एकच वेळी दोन मुलं गायब.!" नितीन गोंधळाला.

" मला वाटत आपण पण शोधायला पाहिजे. कावेरी लगेच तुझ्या रेडिओ स्टेशन ला कळवते. " प्रणिता म्हणाली.

" नाही, अति घाई होईल. आपण आधी शोधू जिकडे टे फिरत होते. सगळीकडे.. " नितीन म्हणाला.

" आणि जर किडन्याप झाले असेल तर किंडन्यापर अलर्ट होऊ शकतो पण." कावेरीने शक्यता वर्तविली.

" आपण स्प्लिट होऊन शोधू म्हणजे लवकरच शोधता येईल. " प्रणिता म्हणाली.

" हो. तूम्ही मुली कॉलेज कॅम्पस पिंजून काढा. मीं रुद्र, विनय, अनी बाहेर बघतो. " नितीन म्हणाला.

सगळ्या मुलींनी कुणी कॉलेजच्या आत तर कुणी संपूर्ण कॅम्पस पालथा पाडला पण कुठेच विशाल आणि आकाश सापडले नाहीत.


क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  13
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//