Mar 01, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 9.0

Read Later
कावेरी 9.0


कावेरी

भाग 9

पावसाची बारीक रिप रिप सुरु होती. रस्त्याच्या दुतर्फा ऊंच आणि दाट झाडे. अशा निरव शांततेत आणि लख्ख काळोखात रस्त्याच्या बाजुला उभ्या एका झाडावर बसलेले घुबड आपल्या मोठ्याशा डोळ्यांनी दुर रस्त्यावरुन येणारा एका प्रकाशाच्या दिशेने एकटक पहात होते. तो एका दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश होता.

निर्जन रस्त्यावरुन एक दुचाकी सुसाट वेगात धावत होती. दुचाकीवर बसलेला मुलगा साधारण वीस, बावीस, वर्षाचा असेल. गोरापान, ऊंची ५.७", पाणीदार स्वच्छ डोळे, टी शर्ट जिन्स असा आकर्षक पेहरावा असलेला तो तरुण खुपच वेगात आपली दुचाकी चालवत होता. त्याच्या चेह-यावर कसलीशी भीती दाटली होती. कोणीतीही दूसरी गाडी, वाहन त्याच्या मागे दिसत नव्हते तरही आपला पाठलाग होत असल्यासारखा तो आपला वेग कमी न करता वाढवतच होता.

पावसाच्या पाण्याचे थेंब बारीक असले तरी वेगामुळे ते तडतड करत त्याच्या चेह-यावर आपटत होते. बाजुच्या आरशातुन मागे पाहुन तो आणखी भयभीत होऊन गाडीचा वेग वाढवायचा. झप, झप, झप करत वेगात रस्त्याच्या बाजुची झाडे मागे पडत होती. भयान काळोख आणि घोंगावणारा वारा भेदत दुचाकीवर बसलेला युवक देवाचा धावा करत होता. जणु मृत्युची झडप कोणत्याही क्षणी त्याच्यावर बसणार. काही अंतर पुढ येताच रस्त्याच्या दुस-या बाजुने अतिशय वेगाने एक पांढरी आकृति त्याच्या बाईकच्या आडवी गेल्याचा भास झाला. आणि त्याच क्षणी खिशातील मोबाइल व्हायब्रेट झाला. एकदम दचकुन त्याने ब्रेक्स दाबले तसा त्याचा बाईक वरील ताबा सुटला.

ओलसर रस्त्यावरून बाईक स्लिप झाली आणि खडखड, कर्ररर्रर्रर्रर कर्ररर्रर्रर्र आवाज करत तशीच घसटत पंचवीस ते तीस फुटावर जाऊन रस्त्याच्या बाजुला आडवी पडली. शेजारच्या झाडावर बसलेले ते घुबड पंखांची फडफड करत थोडे दुर जात पुन्हा खाली त्या मुलाकडे पाहु लागले. बाईकचा आवाज थांबला तशी पुन्हा सर्वत्र निरव शांतता पसरली, बाईकवरील तो तरुण तिथेच बाजुला जखमी अवस्थेत विव्हळत पडला होता.

रस्त्यावरुन घसटत गेल्यान त्याच शरीर सालटल होत. चमडे गेल्याने हाताचे आणि गुडघ्याची हाडे स्पष्ट दिसत होती. चेहराही जखमानी भरलेला आणि इतकी वाईट अवस्था असुनही तो एका अनामिक शक्तिच्या जाणिवेने थरारून जायचा तर कधी भयभीत नजरेने आजुबाजूच्या भयान काळोख पहात दचकुन जात होता. तसाच तो हळु हळू उठुन उभा राहात चालु लागला. त्याला नीट चालताही येत नव्हत. त्याचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले आणि रक्ताने भीजले होते.

मदत भेटेल म्हणून खिशातून मोबाइल काढला तर त्याचे तुकडे झाले होते. पडत धडपडत बाजुला पडलेल्या आपल्या बाईक जवळ जात बाईक उभी करण्याचा प्रयत्न करु लागला पण त्याच्या जखमी शरीरात इतकी शक्ती राहीली नव्हती. बाईक उभी करण्यासाठी शरीरातली सारी शक्ति एकवटली पण व्यर्थ... हतबल होऊन तसाच जमीनीवर बसुन तो युवक आता अक्षरशा: रडु लागला तसाच आभाळकडे हात जोडून म्हणाला, " देवा... खुप मोठी चुक झाली माझ्याकडून, पुन्हा अशी चुक नाही करणार. मला वाचव देवा... मला मरायच नाही." आणि मान खाली घालुन पुन्हा रडू लागला.

अचानक काहीतरी आठवल तशी त्याच्या चेह-यावरील भीती आणखी गडद होऊ झाली. थरथरत तो उठून उभा रहीला सारी शक्ति एकवटून त्यान गाडी उभी केली आणि पुन्हा गाडी सुरू करु लागला पण गाडी सुरू होत नव्हती. त्यान गाडीकडे पाहल तर तीच खुप नुकसान झाल होत. तोच बाजुच्या झाडीत कसलीशी हलचाल होत असल्याच जाणवली. एकटक समोरची ती हलचाल पाहु लागला. तसे सर्वकाही शांत झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाहिल पण एकही वाहन दिसत नव्हते.

तोच त्याच्या चेह-यावरील भाव बदलले. मन घट्ट करत त्यान आपला टी शर्ट काढला बाईकच्या पेट्रोलची पाईप काढुन टीशर्ट पेट्रोलने भिजवला आणि स्वताच्या अंगावर पिळु लागला. काही वेळातच तो पेट्रोलने पुर्ण भिजला, आणि जोरात ओरडला. " तु देणार आहेस ते भयानक मरण मला नको. माझ मरण मी ठरवणार." एवढ बोलुन आपल्या खिशातील लायटर काढुन खट्ट खट्ट आवाज करत लायटर तो पेटवू लागला पन तो चालूच होत नव्हता. भयभीत नजरेन आजुबाजुला पहात तो जोरजोरात लायटरचे बटन दाबत होता, आता त्याच्या डोळ्यातुन अश्रु येत होते पण काही केल्या तो लायटर चालू होत
होत नव्हता.

भयभीत नजरेन आजुबाजुला पहात तो जोरजोरात लायटरचे बटन दाबत होता, आता त्याच्या डोळ्यातुन अश्रु येत होते. पण काही केल्या तो लायटर चालू होत नव्हता. रागाने जोरात त्यान लायटर जमीनीवर आपटला आणि जोरात ओरडून मदतीची भीक मागु लागला तोच त्याला समोरच्या दाट झाडांमधे सळसळ होत आसल्यासारख वाटू लागल. श्वास रोखुन तो समोर पाहू लागला. त्या भयान काळोखात आणि दाट झाडीमधुन कोणीतरी येत असल्याच स्पष्ट जाणवत होत. तसा तो युवक तिथुन धावण्याचा प्रयत्न करु लागला पण शरीर साथ देत नव्हत. लंगडत धावताना तो खाली पडला तशी त्याची नजर समोर गेली. तसे त्याच्या काळजाचे ठोके वाढु लागले. त्या आकृतीकडे पहात तो मागे सरकु लागला तोच पाय घसरल्याने तसाच जमीनीवर पडला. तोच ती भयान आकृती क्षणात त्याच्या समोर आली. काळेभोर लांब केस, अंगभर ओरबडलेल्या, कापलेल्या जखमा, त्यातून वहाणार रक्त, लाल रक्ताळलेले डोळे जणु आग ओकत होते. हे भयान रुप पाहुन त्या युवकाची दातखिळीच बसली. शरीराला लकवा मारून जावा तसा तो समोर पहात होता. छाती फाडून बाहेर याव अस ह्रदय धडधडू लागल. इतक्यात त्या आकृतीने आपला भयान लाल रक्ताळलेला जबडा पसरून त्या युवकाच्या अंगावर ओनवा झाला. त्याच संपुर्ण शरीर घट्ट अशा रक्तान भिजुन गेल. त्या आकृतीने तें संपूर्ण रक्त चट्टम करू लागला आणि युवकाच्या शेवटच्या एका भीषण किंकाळीने आसमंत थरारून गेला. आणि पुन्हा एकदा वातावरणात एक भयान शांतता पसरली.

कावेरी खडकन मोठ्याने ओरडून झोपेतून जागी झाली. आज तिसऱ्यांदा हें स्वप्न तिला पडलं होत. रात्रीचे सव्वाबारा झाले होते. तिच्या आवाजाने आई देखील जागी झाली होती आणि प्रचंड घाबरली. काकूने लगेच येऊन कावेरीला पाणी दिल. आईच्या खांद्यावर हात ठेऊन दिलासा दिला आणि दोघीनी लागोलग जोशी गुरुजींना कावेरीची पत्रिका दाखवून मागमूस लावायचं ठरवलं. काकूने घड्याळात बघितलं आणि तरीही प्रयत्न म्हणून जोशी गुरुजींना फोन केला.

क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  09
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//