Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 7.0

Read Later
कावेरी 7.0


कावेरी

भाग 7


" हो ना. नाही घाबरत ना. पण मग मी कस विश्वास ठेवू ना तुझ्यावर कि तु खरच घाबरत नाहीस डॉक्टरला. " कुणाल तिला वेढत म्हणाला.

"चल तर मग.. आत जाउया नाहीतर डॉक्टर निघून जातील." कावेरी म्हणाली.

दोघही आत जातात. फार कुणी जास्त पेशंट नसतात. काही वेळाने डॉक्टरांच्या रूम मधे जातात.

" या या कावेरी ताई..! अलभ्य लाभ...आज तुम्ही स्वत: आमच्या क्लिनिकला पाय लावायला कश्या आलात. धन्य झालो हो आम्ही." सावंत काका नेहमीप्रमाणे तिला चिडवत म्हणाले.

" मला वेड लागलय का काका स्वतः इथे यायला. हे महाशय घेउन आलेत मला, बळजबरीने"कावेरी बळजबरी शब्दावर जोर देत म्हणाली.

" नमस्कार डॉक्टर तुम्ही ओळखता यांना?"कुणालने  आश्चर्याने विचारलं.

"हो, हे आमचच लेकरू आहे म्हणजे हिचे वडील माझा मित्र..! आता तो नाही आमच्यात पण मैत्री आहे." डॉक्टर म्हणाले.

" मला घरी जायला उशीर होतोय. तु रात्रभर इथे बस गप्पा मारत... तस ही काकाना घरी करमत नाही, इथंच पडीक असतात. " कावेरी मधेच पचकली. डॉक्टर काकांना तिचं तिरकस बोलण बरोबर समजलं. ते ही हसतच कावेरीकडे वळले.

" ह्म्म्म कुठे धडपडलीस.? चल आत, बघुया किती लागले आहे ते." डॉक्टर कावेरीला घेऊन पडद्याआड गेले. आणि तिच्यासोबत गप्पा मारत चेक करू लागले.

थोड्यावेळाने बाहेर येउन बसले.

"मी औषध लावून पट्टी केली आहे तिटनेस चे इंजेक्शन ही दिले आहे. जखम थोडी खोल असल्याने जरा रक्त गेले पण.. तशी आमची कावू फार स्ट्रॉंग आहेच सो होईल एक आठवड्यात बरी. काही काळजी करण्यासारखे नाहीये."

त्यांनी कुच कावेरीकडे केल आणि तीला उद्देशून अगदी दरडावून म्हणाले, " मी गोळ्या देत आहे त्या निदान आठवडाभर तरी घेतल्या पाहिजेत कळल का..?"

"मी नाही घेउन जाणार तुमच्या गोळ्या.. राहुद्या तुमच्या कडेच..! कुणा गरजूला उपयोगी पडतील."

कुणालला काय चालले आहे तेच कळत नव्हतं. काय लहान मुल्लांसारखे वाद करत आहेत हे दोघ असा विचार करत तो मधेच बोलला, " औषधा शिवाय बरे वाटणार आहे का..? "

" मला वाटते बर,, मी औषध खात नाही. काय हो  काका तुमचा घरी काकी किती छान खायला बनवून देते मला आणि तुम्ही ही कडू कडू औषध देत असता.. याक" कावेरी तोंड वाकड करत म्हणाली.

"पुरे झाले तुझ फाजील नाटक..! मुकाट्याने ही औषधे घे नाहीतर वहिनीला फोन करेन." डॉक्टर म्हणाले.

"ओह गॉड… द्या ती इकडे! " आणि नाटकी स्वरात I hate u.. असे म्हणत ती सरळ उठून बाहेर निघाली तसा कुणाल उठला आणि ती जात असल्या दिशेने पाहू लागला.

" गोंधळु नका. आमच हे दर वेळेच असत. औषधांचा भारी तिटकारा आहे हिला, मोठ मोठे दुखणे अंगावर काढेल, कितीही बर नसले तरीही स्वताहून कधी कोणत्या डॉक्टरकडे जात नाही पण आईचा शब्द मात्र काटेकोर पाळते. " ह्यावर कुणाल फक्त हसला.

" फीज..? "

"माझ्या मुलीची कसली फी घेउ मी.? आणि थोडं हळू चालवा गाडी. पावसाळ्याचे दिवसात पायपीट करणाऱ्याचे आधीच हाल होतात त्यात दुखणं मागे लागलं कि कल्याणच. " डॉक्टरांनी कुणालला समजावलं. तो काहीसा ओशाळला.

"हो, सॉरी डॉक्टर. चला मी ही निघतो आता." कुणाल डॉक्टरांना निरोप देऊन निघाला.

गाडीत शांतता होती कुणाल मनात विचार करत होता की “ही काय धड बोलत नाही, आता आपण ही नाही बोलायचे उगाच ” आणि अबोली खिडकी बाहेर चा निर्मनुष्य रस्ता न्याहळात होती तेवढ्यात तिला काही सुचल्यासारखे झाले.

"खूप उशीर झाला आहे तर तु मला सरळ घरीच सोडशील का.?" कावेरीने विचारलं.

कुणालला हा अचानक सौम्य प्रश्न ऐकून नवलच वाटल, " हो चालेल पण मग ही साइकल?" त्याने विचारलं.

"घराजवळ आहे एक दुकान,, मी उद्या सकाळी करून घेईन रिपेर" कावेरी उत्तरली.

" बर..! तुला घरी फोन करून कळवले पाहिजे होते.(थोड सावधपणे तिचा मूड चा अंदाज घेत) म्हणजे अस मला वाटते" कुणाल म्हणाला.

" मी कळवले मघाशी क्लिनिक बाहेर आल्यावर."

" ओहके, गुड..."

"अम्म्म,एम सॉरी म्हणजे मी फारच रूड्ली बिहेव केल तुझ्या सोबत.. त्याबद्दल..!" काहीस ओशाळून कावेरी म्हणाली.

"इट्स ओके.. आय अंडस्टॅण्ड."एका अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास नाही करू शकत कोणी आणि ते योग्य ही आहे." कुणाल म्हणाला.

"ह्म्म्म..!"

" इथून पुढे कुठे टर्न घेउ.. (त्याला तिच्या घरचा पट्टा कसा माहित असेल ना..)

" राइट" कावेरी म्हणाली.

" ओके, म्युझिक? " कुणाल ने विचारल.

" माझी हरकत नाही." कावेरी उत्तरली.
कुणाल ने रेडिओ ऑन केला.

वो अचानक आगाई यूँ नज़र के सामने
जैसे निकाल आया घटा से चांद..
चेहेरे पे झूल्फे बिखरी हुई थी
दिन मे रात हो गयी
एक अजनबी हसिना से यूँ मुलाकात हो गयी
फिर क्या हुआ ये ना पूछो कुछ ऐसी बात हो गयी

थोड्या वेळाने कावेरीने सांगितलेल्या घरा समोर गाडी थांबली. " आले माझे घर .. प्लीज़ जरा साइकल काढून देतोस का? "
"हो हो.."

दोघ ही गाडी बाहेर उतरले आणि कुणालने तिला साइकल उतरवून दिली.
" थॅंक्स.. बाय कुणाल.. एन हा नाइस टू मीट यू. "

तिने इतकं प्रेमाने त्याला निरोप दिल्याने तो ही अगदी सातव्या आसमंतात पोहोचला.

कावेरी घरचा गेट मधून आत गेली आणि कुणाल गाडीत बसला. एक क्षण त्याने गेटच्या दिशेने पाहिले आणि आपल्या मार्गाने निघाला.

आभाळात वीज कडाडू लागल्या. त्या उजेडात कावेरीच्या घरासमोरील बंगल्याच्या टेरेसवर एक वयस्कर व्यक्ती त्या दोघांना काळजीने बघत होती. दोन टीप नकळत त्याच्या गालावर ओघाळली.
"काय वाढून ठेवलंय ह्या पोरीच्या आयुष्यात देवा, इतका कसा रे निष्ठुर. तुला दया नाही येत का. दोन दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री ती फक्त अठरा वर्षांची होईल आणि तिच्यावर इतकी मोठी जबाबदारी टाकून मोकळा झालास. लहान कोवळी पोर आहे रे, ह्या हातानी अंगा-खांद्यावर खेळवलंय तिला..! जर तिला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव. " ते खूपच भावुक झाले होते.


क्रमशः

©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  07
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//