Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 5.0

Read Later
कावेरी 5.0


कावेरी

भाग 5

दुसऱ्या दिवशी लेक्चर ऑफ असताना कावेरीला पुन्हा टेरेसवर जायची हुक्की आली आणि ती एकटीच सगळ्यांच्या नकळत टेरेसवर आली तर पुन्हा तिला एक मुलगा कठड्यावर उभा दिसला. पण ह्यावेळी तिने त्याला मागे खेचणं टाळलं. 

"अरे स्वस्त झालाय का जीव?" कावेरी जोरात ओरडली आणि त्याने मागे वळून पाहिलं तर तो कुणालच होता. तिला बघून तो खूप खुश झाला.

"हेय कावु!" कुणालने आवाज दिला.

कावेरीने मोठे डोळे केले.

"आय मिन कावेरी..." कुणाल घाबरतच म्हणाला. आजूबाजूला कुणी नाही हे बघताच तिने स्वतःचा राग ताब्यात घेऊन त्याला लेटरचं विचारायचं ठरवलं. पण तिच्या तोंडून तिची सरस्वती नीट थोडीच वदणार होती.

"च्यायला भेंडी, आईच्या गावात, जेव्हा बघावं तेव्हा जीव द्यायच्या पावित्र्यात असतोच..! तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे..?" कावेरीने वैतागून विचारलं.

"नाही तसं काही नाही... अरे कॉलेजचा परिसर बघत होतो. अजून कुठं कुठं आपल्याला झाडं लावता येतील ते बघत होतो. ही टेरेस उंच असली तरीही समोर पाण्याच्या टाकीमुळे दिसत नाही म्हणून वर चढतो आणि एकदम सेफ आहे हे. एक मिनिट..? तुला माझी काळजी वाटते ना..? खर बोल..आ आ..?"

" न.. नाही.. मी का तुझी काळजी करू? तुला घरचे नाहीत का?" कावेरी त्याला उडवत उत्तर देत म्हणाली.

"काहीतरी लपवतेस..! तुझे डोळे वेगळंच बोलताय आणि जीभ.. जीभ कसली लवंगी मिरची.. वेगळंच.." शंकीत नजरेने बघत कुणाल म्हणाला.

"तुझं अक्षर बघायचंय, ह्यावर लिहून दाखव." कावेरी विषय डावलत म्हणाली.

"मी.?" कुणालने  स्वतःकडे छातीवर बोट करत विचारलं.

"मग इथं दुसरं कुणी आहे?" कावेरी आजूबाजूला बघत कुत्सितपणे म्हणाली.

"नाही, पण का..?"

"असंच..!"

त्याने कठड्यावरून आत उडी घेतली आणि तिच्या हातातली वही मागितली. तो लिहिणार तोच ती बोलू लागली.

"हे लेटर तू लिहिलं होतं?" आता मात्र तो चपापला. पण खोटं बोलणं, वागणं हे त्याच्या स्वभावातच नव्हतं. त्यामुळे थोडे आढेवेढे घेत तो हो म्हणाला. त्याचं हो ऐकताच कावेरीच्या डोक्यात तिडीक गेली.

"मला टच कर.." कावेरी रागातच म्हणाली तसा कुणाल घाबरला.

"कर.." ती जवळजवळ खेकसलीच त्याच्यावर तसा त्याने घाबरून तिचा हात धरला.

"काय गेंड्याची कातडी आहे की मुलीची?" तिने रागात भुवया ताणून विचारलं.

"हाऊ सॉफ्ट यू आर!" त्याच्या तोंडून नकळत बाहेर पडलं. तशी ती अजूनच चिडली. दोन चार ठेवून द्याव्यात वाटत होतं. पण तिने स्वतःवर कंट्रोल केलं आणि पुढे चालत जाऊन डोक्यावर हात ठेवून तोच हात केसांवर फिरवत भडकली. "कुणी सांगितल होत अशी भंकस करायला?"

"मला तू खरंच खूप आवडतेस. अगदी पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसापासून." कुणाल म्हणाला.

"अरे मग असं लेटर लिहायचं का?" कावेरी चिडून म्हणाली.

"तुझ्या आवडत्या प्रत्येक गोष्टीला अंडरलाईन केलं होतं त्याच होत्या सगळ्या." कुणाल निरागसपणे म्हणाला.

"तुला कुणी सांगितलं..?"

"मला तू खरंच खूप आवडतेस. अगदी पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसापासून." कुणाल म्हणाला.

"अरे मग असं लेटर लिहायचं का?" कावेरी चिडून म्हणाली.

"तुझ्या आवडत्या प्रत्येक गोष्टीला अंडरलाईन केलं होतं त्याच होत्या सगळ्या." कुणाल निरागसपणे म्हणाला.

"तुला कुणी सांगितलं..?"

"त्या तुझ्या डायरीत..!"

"अरे मंद! ती माझी नाही माझ्या लहान भावाची नोटबुक होती. दुसरीत आहे तो... चुकून त्यादिवशी माझ्याकडे आली आणि ती तू चोरलीस..?"

"चोरली नाही. इथे पडली होती." कुणालने असं म्हणताच कावेरीने डोक्याला हात मारला. "पण चूक तुझीच होती ना?"

"माझी..? नाही, म्हणजे.. हो, म्हणजे नाही, "

"अरे होती की नाही..?"

"पण मी प्रेमात केलं."

"माझी किती इज्जत गेली! तसं अशीही काही इज्जत नाहीच म्हणायला.." कावेरी डोळे फिरवून म्हणाली.

"मग काय आवडतं तुला..? म्हणजे मी तसं लेटर लिहितो."

"अरे माझं काय सुरू? तुझं आपलं भलतंच.."

"भलतंच कसं, माझा रस्ता चुकला तर दुरुस्त नको व्हायला चूक?"

"नको करुस नाहीतर भलतंच होऊन बसायचं."

"नाही. फक्त तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ दे मला. "

"नाही जमायचं."

"का ..? घाबरलीस..? की तुला ही माझ्यावर प्रेम होईल ह्याची भीती वाटते.."

"मी कुणाच्या बापाला भीत नाही."

"दॅट मिन्स यू आर इन्.."

"नॉट ऐट ऑल.."

"बघ एकदा प्रयत्न करून. "

"मला नाही करायचा प्रयत्न...आणि तू कधी बोलावलस तर मी अजिबात येणार नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की तू मला आवडत नाहीस.."

कुणाल मात्र लाजतच सातव्या आसमंतात पोहोचला आणि कावेरी गोड हसत तिथून निघून गेली.  आता मात्र कावेरीला पटवण्याचा प्रयत्न तो नक्कीच सोडणार नव्हता पण भिंतीआड लपून ऐकणाऱ्या त्रिवाचे मात्र भरून आलेले डोळे ओसंडून वाहत होते.

*******


अजब है दिवाना ना दर्द ना ठिकाना,,
जमी से बेगाना फलक से जुदा..
अजब है दिवाना ना दर्द ना ठिकाना,,
जमी से बेगाना फलक से जुदा..
ये एक तूटा हुआ तारा नजाने किस पे आयेगा,
है अपना दिल तो आवरा, न जाने किस पे आयेगा..

पंक्चर झालेली सायकल हाताने ओढत, कानात इयरफोन टाकून हे गाणं ऐकत आणि गुणगुणत कावेरी घरी चालली होती. इतर काही अंदाज यायच्या आतच गाडीचा धक्का सायकलला बसला आणि त्याच्या धक्क्याने ती थेट सायकलसहित जमिनीवर कोसळली.

“आहह! आई गं!” कावेरी क्षणभर कळवळली. टचकन डोळ्यात पाणीही आलं. पण लगेच स्वतःला सावरत, “आईच्या गावात! काय यार बाप्पा.... आधीच ती पंचर होती. आता तर फॅक्चर झाले तिला!" ती सायकलच्या वाकड्या झालेल्या हँडलकडे बघत म्हणाली. "सॉलिड ओरडा पडणार आहे आज आईचा!”क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  05
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//