Mar 02, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 4.0

Read Later
कावेरी 4.0


कावेरी

भाग 4


दोघींनी बॅग कट्ट्यावर ठेवून टी शर्टच्या बाह्या वर करून जीन्स गूढघ्यापर्यंत वर करून त्यांना जॉईन केलं. त्रिवाही तिथेच होती. त्यांनी लगेच त्रिवा सोबत गवत काढून कुदळीने खड्डे करायला सुरुवात केली आणि एक एक झाड लावू लागल्या. कुणाल कावेरीला बघून मुद्दाम तिच्यासमोरून गेला. तिने ही चांगली स्माईल दिली. त्यानंतर कुणाल काम करत करत त्रिवासोबत गप्पा मारत होता. मधूनच कावेरीला न्याहाळत होता.  कुणालला मात्र कावेरी आपल्यावर खुश होऊन आपली साथ द्यायला आली असं वाटलं. पल्लवीचं काहीसं लक्ष त्रिवा आणि कुणालकडेच होत. तिला सतत \"पडवळ , पडवळ\" ऐकू येत होतं. मग अचानक तिची ट्यूब पेटली की अरे कुणालचं आडनाव तर रणधीर आहे आणि लेटरच्या मजकुराच्या शेवटी \"तुझाच पडवळ - के आर.\" अस लिहिलेल होत. के म्हणजे कुणाल आणि आर म्हणजे रणधीर.. नाही, नाही.. काहीही अंदाज नको लावायला. तरीही तिने ह्यावेळी सबुरीने घेतलं आणि कुणाल सोबत बोलायला गेली.

"हाय, मी पल्लवी, त्रिवादि माझी \"दि\" आहे..!" पल्लवी म्हणाली.

"कळलं, त्रिवा दि म्हणालीस तेव्हाच समजलं." कुणाल म्हणाला.

"मला तुझं अक्षर बघायचंय..!" पल्लवी घाईत म्हणाली.

त्रिवाचं मात्र लक्षच नव्हतं.

"अरे आता माझे हात खराब आहेत. नंतर दाखवेन आणि काय करणार बघून..? म्युजियम मध्ये ठेवण्यासारखं बिलकुल नाही माझं अक्षर.." कुणाल स्वतःचीच खिल्ली उडवत म्हणाला आणि हसू लागला. सोबत पल्लवी देखील हसली.

पल्लवी स्वतःला खात्री झाल्याशिवाय कुणालाच सांगणार नव्हती. कारण कावेरी अशी गरम डोक्याची मालकीण होती आणि कुणाल शांत, प्रेमळ असला तरीही एक ट्रस्टीचा मुलगा. दोन्हीकडून आग आणि पाण्यासारखा धोका होता.

पण पल्लवी म्हणजे अतिशय चटोर... जोपर्यंत तिच्या पोटातली गोष्ट कुणाला सांगत नाही तोपर्यंत तिचं पोट सतत दुखत राहणार..! ह्याचं एकमेव कारण म्हणजे तिच्या अतरंगी रेसिपीज..! सगळेच तिच्या टिफिनमधल्या वेगवेगळ्या पदार्थाना वैतागले होते. पण फक्त प्रणिता ही गोष्ट जाणून होती. पल्लवीने तिकडून लवकरात लवकर कल्टी मारली आणि कॅन्टीनमध्ये प्रणिताच्या बाजूला बसली.

"काय गं पल्ले.. कुठं होतीस..? कावू कुठंय?" प्रणिताने विचारलं.

"इतकं कांड झाल्यावर रागाने उकळत शोधत असेल लेटर देणाऱ्याला.." नितीन जोरजोरात हसत म्हणाला.

"ती वृक्षारोपण करतीये.. त्रिवूदि सोबत. आणि थोडावेळ मला शांत बसू द्या. भयंकर त्रास होतोय मला." पल्लवी पोट जोरात दाबत कळवळत म्हणाली.

"काय होतंय तुला.? दवाखान्यात जायचं का..?" इमाने विचारले.

"ओह माय गॉड..! लेडीज प्रॉब्लेम गाईज..! मी आलीच. उठ पल्ले..!" प्रणिता घाईने म्हणाली.

"नाही प्लिज बसू दे मला.." पल्लवी कळवळून म्हणाली.

"चल उठ..!" प्रणिता जबरदस्ती तिला ओढत घेऊन बाहेर पडली. दोघीही येऊन बाहेर कट्ट्यावर बसल्या.

"हम्म..!आता सांग काय झालं..!" प्रणिताने बारीक नजर करून विचारलं.

"कुठं काय...? काही नाही." पल्लवी नजर लपवत म्हणाली. "आई.. गं!" ती पुन्हा पोट धरून बसली.

"मला माहिती होईलच. त्रिवू मला सांगेलंच. पण तुझा त्रास बघ.. किती लपवणार..! जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत दुखत राहणार.!" प्रणिता काहीशी हसतच म्हणाली.

"शुभ बोल नाऱ्या, म्हणे मांडवाला आग लागली." पल्लवी इतकं पोट दुखत असूनही कळवळत म्हणाली.

"नको सांगू.. चल येते मी. बस पोट धरून की टॉयलेटला जायचंय?" प्रणिता तिरकसपणे म्हणाली.

"नितु थांब ना.. सांगते मी..!" पल्लवी हळूच म्हणाली.

"नको सांगू.. चल येते मी. बस पोट धरून की टॉयलेटला जायचंय?" प्रणिता तिरकसपणे म्हणाली.

"नितु थांब ना.. सांगते मी..!" पल्लवी हळूच म्हणाली.

मग पल्लवीला माहीत झालेलं सगळं गुपित तिने प्रणिताला सांगितलं आणि काळजीने त्यांच्याकडे येत असणाऱ्या निलमने ते ऐकलं. तशी ती आल्या पावली मागे वळली आणि कावेरीला शोधू लागली. ती कॅन्टीन मागे रिकाम्या जागेत झाडांची रोपटी लावताना तिला दिसली आणि कावेरी जवळ जाऊन तिच्या कानात कुजबुजली. पण नक्कीच हाच आहे का हे तिला ही कन्फर्म नव्हतं. तिने एक युक्ती योजली. कारण तिचं कुणाल बद्दल मत अतिशय चांगल झालं होतं. त्यामुळे तीने तीच गरम डोकं थंड घेऊन सबुरीने घ्यायचं ठरवलं.

"निलू शोधलंस का ग त्याला? कुठं असेल गं तो माझा पडवळ?" कावेरी मोठ्याने म्हणाली.

"हो ना इतकं भारी लव्हलेटर दिलं आणि अचानक मिस्टर इंडिया झाला." नीलम तिच्या सुरात सूर मिसळत म्हणाली.

काहीसे शब्द कुणालच्या कानी पडले. पण तरीही त्याला वाटत होतं की काहीतरी गोम आहे. त्रिवुने दिलेल्या माहितीनुसार कावेरी इतक्या सहजासहजी मानणारी नव्हती. खरतर त्रिवू आणि कुणालला बघून कोणालाही ते एकमेकांचे परफेक्ट जोडीदार वाटत होते, त्रिवाला कुणाल आवडायचं पण तिने कधी त्याला बोलून दाखवल नाही. कुणालनेही त्याला कावेरी आवडते ही देखील कल्पना तिला दिली नव्हती पण गप्पा मारत कावेरीबद्दल सगळी माहिती काढून घेतली होती.

पण इकडे प्रणिता मात्र फारशी खुश नव्हती. कारण तिला माहीत होतं की तिच्या त्रिवाला कुणाल आवडतो. अर्थात दोघी दोन शरीर होत्या पण मन मात्र एकच, दोन वेगवेगळ्या शरीरात एकच हृदय धडधडत होतं. तरीही तिने एकदा खात्री करून घ्यायचं ठरवलं आणि लगेच त्रिवाच्या क्लासरूमकडे कूच केलं. बॅगमध्ये कुणालची एखादी नोटबुक असणारच ह्याची तिला खात्री होती. त्यात त्रिवाही बाहेर असल्याने तिचं काम सोपं झालं होतं. तिने त्रिवाची बॅग चेक केली आणि फायनली तिला त्याची बुक सापडली आणि ती शॉक झाली. खरंतर अक्षर तंतोतंत मॅच होत होतं. तिच्या डोळ्यातली अडवून ठेवलेली टीप गालांना स्पर्शून खाली कोसळली. पण कुणावर प्रेम हे जबरदस्ती लादता येत नाही हे ही ती जाणून होती.क्रमशः
©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  04
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//