Feb 23, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी 2.0

Read Later
कावेरी 2.0


कथामालिका : कावेरी

भाग 02"देवा हा जो कुणी आहे वाचव रे त्याला..!" नितीनने मनोमन देवाला काकुळतीने विनवणी केली. कदाचित नितीनला त्या मुलाचे भाव जाणवले होते. कावेरी तशीच पुढे निघून गेली. तो मुलगा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीला एकटक बघत होता. इमा देखील नितीन सोबत गप्पा मारत क्लासरूमच्या दिशेने निघाली.

कावेरी क्लास रूम मध्ये पोहोचली.

"हे कावू... तुझी गर्लफ्रेंड..?" पल्लवीने इमा सोबत दिसत नाही म्हणून विचारलं.

"तिच्या बॉयफ्रेंड सोबत.." कावेरी खांदे उडवत उत्तरली आणि नीलमच्या बाजूला बेंच वर बसली. नीलम आपली काजू चरण्यात बिझी होती.

"यू नो व्हॉट.. इमा डिझर्व बेटर दॅन हिम." पल्लवीलाही नितीनच्या मस्तीचा खूप राग यायचा.

"पल्लो तुला आणि मला वाटून काय उपयोग..? हे तिला कळायला हवं ना..!" कावेरी खांद्यावरची बॅग काढून बेंचवर ठेवत उसासा टाकत म्हणाली.

"हर लाईफ , हर चॉईस..!" प्रणिता नेहमीप्रमाणे दोघींच्या मधेच बोलत नितीनच संवेदन पत्र घेऊन आली.

"तुला आर आय पी करून देतो , स्टिकर बनवून देतो, म्हणून तू कायम त्याच वकील पत्र घेते." कीर्ती त्यांचं संभाषण ऐकून त्यांच्या बेंचला टेकून स्टाईलमध्ये कमरेवर हात ठेवून चुइंगम चघळत उभी राहिली.

"ए अस काही नाही, ही इज नाइस गाय, अँड टॉपर आहे क्लासचा.." प्रणिताने वकील पत्रातील पहिला आणि महत्वाचा मुद्दा मांडला. अर्थात ते ही तितकंच खरं होत. त्यामुळेच तो सगळ्या टीचर्स चा लाडका होता. थोड्या वेळातच इमा, नितीन, मेघा, त्रिवा, रुद्र, विनय सगळेच क्लास मध्ये हजर झाले. विनय क्लासरूम आत येताच सगळ्या मुली कृष्णाच्या गवळणी बनून त्याला ताडत होत्या.

तितक्यात वर्गात सगळ्यात खडूस मॅमची एन्ट्री झाली.  बेनिवाल मॅम..! नावाप्रमाणेच घंमंडी.. पेशन्स आणि अंडरस्टँडिंग लेव्हल झिरो विथ झिरो टोलरन्स.! वर्गात पाऊल ठेवताच पिन ड्रॉप साइलेन्स.. तिने ही वेळ न दवडता शिकवायला सुरुवात केली आणि बोर्ड वर लिहू लागली आणि मुलांना नोट्स लिहायला सांगितलं.

नीलमने वही उघडताच जोरात किंकाळी फोडली. पुन्हा उभं राहून दोन्ही कानांवर हात ठेवून अजून जोरात ओरडली. तिच्या बाजूलाच बसलेल्या कावेरीचं लक्ष उघड्या नोटबुककडे गेलं आणि उभी राहून जोरात ओरडली पण ह्यावेळी नीलम नाही तर कावेरी पण जोरात ओरडली होती.

कावेरीने नोटबुक काही एक न बघता बेंच वरून समोर भिरकावून दिली. लहानपणापासून तिला झुरळाची जाम भीती वाटायची.

"हुश्श..!" नीलम निःश्वास सोडून खाली बसणार तोच तिच्या चारपट मोठी किंकाळी समोरून ऐकू आली. ती दुसरं तिसरं कुणाची नाही तर बेनिवाल मॅमची होती!

ती उडालेली नोटबुक सरळ मॅम च्या साडीवर धडपडली आणि झुरळ मॅम च्या खांद्यावरच्या पदरावर!

खरंतर आज त्या झुरळाच आभार मानायचे होते कावेरीला, पण तिला स्वतःलाच त्याच्या मिशांची भीती वाटायची त्यामुळं तिने ते सर्वस्वी टाळलं.

"रिलॅक्स मॅम..!" शायनिंग मारत नितीन मॅमच्या दिशेने निघाला.

"बावळट कुठला.. थोडावेळ अजून ओरडू द्यायचंस की.." कावेरी हळूच पुटपुटली.

त्याने अलगद त्या झुरळाच मिशी धरली आणि  कावेरी आणि नीलमकडे कुत्सितपणे हसून बघत खिडकीतून बाहेर फेकलं आणि पुन्हा मॅम कडे जाऊन कानात काहीतरी कुजबुजला.

मॅम आणि नितीनला बोलताना बघून कावेरीने नीलमला खुणावले.

"कळेलच थोडा वेळात काय चालू आहे ते..!" नीलम हळूच बोलली.

"झुरळाची घर झालीत निलु वही पुस्तकात, कधीतरी उघडत जा अभ्यासाला." पल्लवी खिसपीस करत म्हणाली, तसे सगळे जोरजोरात हसू लागले.

नीलमने डोळे मोठे करून गाल फुगवत मागे वळून पल्लवीला अगदी खाऊ की गिळू नजरेने बघितलं.

कावेरी विचार करू लागली की, हा असा का हसला.? म्हणजे..! ह्याचाच काहीतरी कांड असणार..! कावेरीने त्यावरची नजर फिरवून  डोळे मोठे करून मॅमकडे बघितलं पण मॅम मात्र तिच्यावर आणि निलमवर जाळ फेकत होत्या. कारण ते झुरळ नकली होत हे नितीनने मॅडमला सांगितलं. त्यामुळं मॅडम आणखीनच कावल्या. कावेरी आणि नीलमने अक्षरशः निमूटपणे खाली डोकं घातलं. मॅडमची शब्दसुमने फायनली संपली आणि तिने ओरडून दोघीनाही बसायला सांगून शिकवायला सुरुवात केली.

"एक मिनिट, तुझी वही तर नित्याकडे होती ना..?" कावेरीने विचारलं.

"हो थोडावेळपूर्वी गेटवरच दिली मला." नीलम म्हणाली.

"त्याच्या तर..!" कावेरी अजूनच चिडली. नितीन अजून ही कुत्सितपणे बघून हसून दोघींची मजा घेत होता.

"इतकी मस्ती करूनही तुमच मन भरत नाही? आधी ते नकली झुरळ आणि आता गप्पा मारताय दोघी..! आत्ताच्या आत्ता माझ्या क्लासमधून बाहेर निघा." मॅडम तर आता अगदी पेटल्याच होत्या.

दोघी बॅगमध्ये नोटबुक कोंबून वर्गाबाहेर निघून गेल्या.  पण जाताना नितीनवर रागाने जाळ फेकायचा मात्र विसरल्या नाहीत. निलू तर तिचे काजूचे बचके हातात घेऊन खात खात पडत्या फळाची आज्ञा म्हणून कावेरीसोबत बाहेर पडली. कावेरी आता रिकाम्या वेळात काय करायचं म्हणून विचार करू लागली.

"कॅन्टीनला जाऊ..!" नीलम म्हणाली.

"नाही...! प्रशांत सरांनी बघितलं तर घरी सांगतील." कावेरी काहीसा शून्यात बघत विचार करत म्हणाली. "चल तू.."

दोघी बॅगमध्ये नोटबुक कोंबून वर्गाबाहेर निघून गेल्या. कावेरी आता रिकाम्या वेळात काय करायचं म्हणून विचार करू लागली.

"कॅन्टीनला जाऊ..!" नीलम म्हणाली.

"नाही...! प्रशांत सरांनी बघितलं तर घरी सांगतील." कावेरी काहीसा शून्यात बघत विचार करत म्हणाली. "चल तू.."

क्रमशः

©संध्या भगत


ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  02
जिल्हा:  नाशिक

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//