Feb 29, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

कावेरी

Read Later
कावेरी


कथामालिका : कावेरी

भाग 01

पावसाळ्याचे दिवस, त्यात आधीच कॉलेजला जायला खूप उशीर झाला होता. त्यात सायकलची चैन दोन वेळा पडली आणि कावेरीने ती पुन्हा लावली होती. जोपर्यंत कॉलेजच्या जवळपास हॉस्टेलची व्यवस्था होत नाही तोपर्यंत हीच पायपीट होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्यात गेटवर एक मुलगा एका सुंदर मुलीचा हात धरून खेचत तिला छेडत होता. दोघेही पाठमोरे असल्याने कोण होतं ते दिसलंच नाही. त्यात आधीच डोकं सटकल होतं. जाताच काहीही एक न बघता त्या मुलाला वळवून खाडकन कानामागे लावून दिली.  काय एक्सप्रेशन होते त्याचे अहाहा... आणि कावेरीचेही! ती मुलगी अगदी गळ्यात पडून रडूच लागली. कावेरीने तिला जवळ घेऊन डोक्यावर अलवार हात फिरवला.

"तू नितीन भाऊला कानफटात का टाकली?" अनि शर्टाच्या बाह्या वर करत मधेच हजर झाला.

"एय पावकिलो,चल हो माग..! आला मधेच." कावेरी जवळजवळ डाफरलीच.

" मी नाही तूच आली, बोलतायत ना ते दोघ." अनि काहीसा घाबरून म्हणाला.

" हे अस बोलणं..! डोळे बघ तिचे किती लाल झालेत. चल निघ नायतर डोक्यात घालीन काहीतरी." तो तसाच निमूटपणे कावेरीपासून दूर जाऊन उभा राहिला.

नितीन कावेरीकडे लाल होऊन रागाने बघू लागला. " शट अप नितु... ती माझी स्वीट हार्ट आहे आणि तू दिसलाच नाही तिला... तिला वाटलं दुसरं कुणीतरी आहे." इमा नितीनच्या खतरनाक लूक कडे बघून कावेरीला प्रोटेक्ट करण्यासाठी बहाणा देत म्हणाली.

"ही स्वीट हार्ट..? स्वीट हार्ट नाही..! हार्ट अटॅक आहे ती..!" नितीन कावेरीकडे रागाने बघत म्हणाला पण त्याच्याच जोक वर तो वेडयागत हसू लागला.

नितीन कावेरी शाळेपासून एकत्र होते पण दोघांचं एक मिनिटं ही जमायचं नाही. त्याची छंद होता येता जाता खोड्या काढायचा, इन्सल्ट करायचा आणि अगदी एखाद्या सासूला लाजवेल इतका त्रास तो तिला द्यायचा..!

कावेरीने त्याला बारीक डोळे करून अजून चिडून बघितलं तसं त्याने तिला डोळा मारला. तिच्या तर डोक्यात तिडीक गेली अगदी आता त्याचे डोळे काढून गोट्या खेळते की काय.. तिच्या हातात एखादी वस्तू असती तर फेकून मारली असती पण तिच्या एकुलता एक मोबाईलची तिला दया आली आणि मोबाईल इमाच्या हातात देऊन तिने जोरदार ठोसा नितीनच्या पोटात मारला.

"काय करतीय कावू?"  तिची डिअर फ्रेंड इमा गरजली.

"काही नाही. चेक करत होते पोटात दगड तर नाही ना." एक गोड अशी स्माईल देऊन इमाकडे बघत कावेरी म्हणाली.

नितीनचे एक्सप्रेशन बघता ठोसा बराच जोरात लागलं होतं त्याला.
"माय गॉड ..! किट्टी..! हात आहे की हातोडा तुझा?" तो पोटाला धरून कळवळला. दोघीही एकमेकींकडे बघून हसू लागल्या.

" ओह कमॉन , नीतू..! तिचा जीव केवढासा.. तिचा हात केवढासा..! काहीही नको बोलू..!" इमा कावेरीची बाजू घेत म्हणाली. तशी कावेरीने तिला एक झप्पी आणि पप्पी दिली. तसं तर ती नेहमीच कावेरीची बाजू घ्यायची.

"आता कळलं ना तुला , माझ्या पोटात दगड नाहीत ते?" नितीन रागातच म्हणाला.

"आंह...! पोटात नाही डोक्यात आहेत.." कावेरी खिदळत म्हणाली.

"झाली ना इथं काव काव करून? जा आता. ती निलू वाट बघतेय तुझ्या बेंचवर." अर्थात कावेरी रोज नीलम सोबत बसायची.

ती आणि इमा हातात हात घालून क्लासरूमकडे निघाल्या. नितीन त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत कुत्सितपणे वरचा ओठ तिरपा करत हसला.

"दिसायला केवढी नाजूक, पण बुक्का केवढा मारते यार.." नितीन त्याचे कपडे नीट करत त्यांच्या मागोमाग निघाला.

तो मागून येताच, इमा आणि नितीन त्यांच्या गुलुगुलु गप्पा सुरु झाल्या. मग कावेरी ही पुढे निघून गेली तेही मोबाईलमध्ये बघत उलट चालू लागली.

इमा आणि नितीन कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये होते हे सगळ्या कॉलेजला माहिती होतं.

इमा आणि कावेरी एकमेकींच्या बेस्टी, सगळी दुनिया कावेरीचा विरुद्ध असली तरीही इमा फक्त कावेरीचीच बाजू घेणार. दिसायला अगदी एखाद्या हिरोईनला लाजवेल इतकी सुंदर पण ना तिला स्वतःच्या सौंदर्याचा गर्व होता ना श्रीमंतीचा. कावेरी वर खूप जीव होता तिचा.

"अगं म्हैस, पडशील ना..! उगाच कॉलेजच्या कॉरिडॉरमधल्या फरश्या तुटतील आणि तू त्यात रुतून बसशील ते वेगळंच..!" नितीन म्हणाला.

कावेरीने खाऊ की गिळू लूक दिला आणि पुन्हा मोबाईलमध्ये गुंतली आणि नितीनच्या भविष्यवाणीनुसार काही अंतर चालून ती पडणार तोच तिला एका मुलाने पकडलं. तो तिला कधी न पाहिल्यागत तसाच पकडून उभा राहिला. तीही उलट वाकड्यात अवघडून गेली. इमा ही घाईने ती पडणार म्हणून तिला सांभाळायला गेली. आणि कावेरी इमा च्या आधाराने उभी राहिली.

" काय..? पोरगी पहिली नाही का या आधी, की ह्या ग्रहावर पहिल्यांदाच आलाय..?" कावेरी डोळे बारीक करून त्या मुलाकडे बघू लागली.  तो मात्र मंत्रमुग्ध होऊन तिला बघत होता. त्याच्या नजरेत तीच बोलणं हालचाली अगदी मंद झाल्या होत्या. सगळंच स्लो मोशनमध्ये सुरू होत.

"देवा हा जो कुणी आहे वाचव रे त्याला..!" नितीनने मनोमन देवाला काकुळतीने विनवणी केली. कदाचित नितीनला त्या मुलाचे भाव जाणवले होते. कावेरी तशीच पुढे निघून गेली. तो मुलगा मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीला एकटक बघत होता. इमा देखील नितीन सोबत गप्पा मारत क्लासरूमच्या दिशेने निघाली.


क्रमश:


©संध्या भगत

ईरा राज्यस्तरीय करंडक स्पर्धा
विषय : रहस्यकथा
कथामालिका : कावेरी
भाग:  01
जिल्हा:  नाशिक


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//