Jan 23, 2022
वैचारिक

कौतुकाचे बोल

Read Later
कौतुकाचे बोल

एखादी गोष्ट नाही आवडली नाही पटली तर पटकन सांगून मोकळं होतो आपण पण दोन शब्द कौतुकाचे बोलायचे असले तर ते मात्र बोलताना खूप विचार करतो.  खूप महत्वाचं असतं.

एखाद्याचं कौतुक केलं की त्याचं मन खूप आनंदी होतं. एखादीला' तू किती छान दिसतेय 'असं म्हंटलं तर तिच्या चेहऱ्यावर नविन झळाळी येते ❣️.एखादीला म्हणा अगं काय dishes बनवतेस तू.... नविन जोमाने कामाला लागते ती....????

प्रत्येकीला कौतुक हवंच असतं, कौतुक नविन उत्साह,  नविन जोश देतो. अगदी मनापासून करा, तुमच्यातही बघा किती positivity येईल. तुमचंही मन प्रसन्न होईल. अर्थात कौतुक करायला आपलं मन मोठं असायला हवं. 

एखादं नातं दृढ व्हायला हे कौतुकाचे दोन शब्द खूप महत्वाचे ठरतात. ♥️मग ते नातं सासू सुनेचं, नवरा बायकोचं किंवा दोन मैत्रिणीचं असू देत ????.दोन शब्द छान बोलले, कौतुक केलं की तुमच्या मनाचा मोठेपणाही कळतो आणि समोरच्याबरोबर तुमचं जिव्हाळ्याचं नातंही निर्माण होतं. तुम्हाला जशी तुमची स्तुती केलेली आवडते तशी समोरच्यालाही आवडते याची नेहमी जाणीव ठेवा आणि अगदी खुल्या दिलाने कौतुक करा ????

मला तर वाटतं कधी कधी अनोळखी माणसाने केलेलं कौतुकही आपल्याला सुखावून जातं. मी मानसशास्त्र शिकलेली नाही पण वाचलंय कुठेतरी की दोन स्तुती सुमनांनी तर समोरच्याचं विश्वच बदलू शकतो आपण !!!

अहो, बघा नं तान्ह्या बाळाला पण केवढा आनंद होतो आपण त्याचं कौतुक केलं तर..... लगेच मस्त साद देतं ते आपल्याला !!मग कळत्या वयात कौतुक केलं तर किती आनंद होईल ❣️!!!!

आपल्या मित्र मैत्रिणीचं कौतुक करताना ईर्षा न ठेवता अगदी मोकळं मन ठेवा, बघा तुमचं नातं किती छान बहरतं ❣️. जसं सख्यासोबतिणीचं कौतुक करतो, तसंच आपल्याला न आवडणाऱ्या लोकांचंही करून बघा अर्थात त्यासाठी फारंच मन मोकळं आणि मोठं करायला लागेल आपल्याला.समोरचाही अचंबितच होईल जरा आपण असं केलं तर.....

चांगल्याला चांगलं म्हणायला काय एवढा विचार करायचा? आत्ता तर कित्ती सोप्पं झालंय एखाद्याचं कौतुक करणं fb, whtsapp, insta वर एखादा comment,  like केलं की सुद्धा समोरच्याला खूप आनंद होतो.... मन प्रफुल्लित होतं त्याचं !!! बघा तर करून..... तुम्हालाच खूप कौतुक वाटेल स्वतःचं ????????

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Trupti Likhite

Homemaker

I hav two daughters. Now wanted to explore myself