Oct 16, 2021
सामाजिक

कौस्तुकी... भाग 1

Read Later
कौस्तुकी... भाग 1
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


एका मोठया अश्या बंगल्यात एक सुंदर अशी मुलगी... एका बाहुलीला घेऊन खेळत होती...पिंक ब्लू कॉम्बिनेशन चा पंजाबी ड्रेस घालून ती एका झोक्यात बसली होती...घारे डोळे,चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होते...गोरी गोमटी असल्याने एकदम सुंदर दिसत होती...मेकअपचा लवलेशही तिच्या चेहऱ्यावर नव्हता पण तस असलं तरीही तू खूप मस्त दिसत होती...फक्त एकच प्रॉब्लेम तिच्यात होता...(कळेल काय होता ते पुढे....)ती मस्तपैकी तिच्या बाहुलीला धरून नाचवत होती...

"चिऊ चिऊ कौस्तुकी गुड गर्ल आहे ना..."ती मुलगी हसतच त्या बाहुली सोबत बोलत होती...

"चिऊ पण कौस्तुकी ला कोणीच फ्रेंड्स नाही...लोक...कौस्तुकी ला पागल बोलतात ना...म्हणून कोणीच friendship करत नाही...."कौस्तुकी थोडी नाराज होत बोलते...

"कोण बोललं कौस्तुकीला फ्रेंड्स नाही...मालती दि आहे की कौस्तुकीची फ्रेंड..."एक बाई तिच्याजवळ येत थोडीशी हसतच तिला बोलते...

"दिदि तू कौस्तुकीची फ्रेंड्स आहे...पण कौस्तुकीला मोठी फ्रेंड नको छोटी हवी आहे..."कौस्तुकी झोक्यातुन उठून  तिच्याजवळ जातच तिला बोलते...

"कोण बोललं अस तुला मी मोठी आहे...दीदी तुझ्यासोबत खेळायला तयार आहे...काय खेळायचं बोल तू...मी खेळते तुझ्यासोबत...तू पागल नाही आहे हा कौस्तुकी you are special गर्ल..."मालती दि थोडीशी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलते...तिचे बोलणे ऐकून कौस्तुकी तिला मिठी मारते आणि ती विचित्र हसतच एका रूममध्ये जाते...ती गेल्यावर मालती दि चे डोळे भरतात...

"देवा का अस केलं रे या एवढ्याश्या जीवासोबत एवढं वाईट...एवढ्याश्या वयात किती काय भोगल आहे हिने...कोणाची कोण आहे पण जीव मात्र भरपूर लावला आहे हिने...लोकांसाठी जरी ही पागल असली तरीही माझ्यासाठी ही स्पेशल आहे...आज मी इथे आहे ते पण हिच्यामुळेच...माझ्या जगण्याचे कारण आहे ही...मी कधीच तीच अजून वाईट होऊ देणार नाही...मी कौस्तुकीच चांगलं करणार तिला या समाजात वावरण्याचा पूर्ण अधिकार आहे...ते मी तिला मिळवून देणारा..." मालती दि स्वतःशीच बोलते...ती तशीच विचारात गुंतलेली असते...तेवढ्यात कौस्तुकी तिचे खेळणे घेऊन मालती जवळ येते...

"दीदी आपण घर घर खेळूया...मी जेवण बनवते...तू पण मला मदत कर हा...चिऊ ला भूक लागली असेल ना म्हणून..."कौस्तुकी थोडी हसतच खेळणे काढत बोलते...तिची ती निरागसता पाहून मालती दि ला चांगलं वाटत होतं...पण त्यांच्या डोळ्यात एक वेगळंच दुःख देखील होते...ते दुःख काय होते हे त्यांनाच माहिती...कौस्तुकीच्या खेळण्याच्या आवाजाने मालती दि लगेच विचारातून बाहेर येते...

"चल खेळूया..."मालती दि अस बोलत साडीचा पदर कंबरेत खोचते आणि सगळी तिची खेळणी(भातुकली) व्यवस्थित लावून देते...मालती दि हसतच तिला खोटं खोट  जेवण बनवायला शिकवत असते...

"दि दि...मी करू का?मला पण करायचे आहे ना..."कौस्तुकी खुश होत विचारते...

"नाही तू नको करू...गॅस कडे जायचे नाही हा..."मालती दि थोडीशी काळजीने तिला बोलते...मालती दि चे बोलणे ऐकून तिचा चेहराच पडतो...ती तशीच चेहरा घेऊन मालती दि काय काय करते ते पाहत बसते...मालती दि तिला सगळं खोटं खोटं जेवण बनवून देते आणि एका छोट्याशा प्लेट मध्ये ती वाढण्याचे नाटक करते...वाढून झाल्यावर ती प्लेट कौस्तुकी कडे देते...

"चिऊ हे तुझं जेवण....दि ने केलं आहे..."कौस्तुकी प्लेट तिच्या बाहुलीकडे सरकवत बोलते...ती काहीवेळाने हसतच त्या बाहुलीला भरवत असते...

"दि दि...चिऊने सांगितले जेवण मस्त झालं आहे...आता आपण पण करू ना...कौस्तुकी ला भूक लागली आहे..."कौस्तुकी हसतच मालती दि ला बोलते...

"ओ कौस्तुकीला भूक लागली आहे तर...पण मालती दि ने आज काहीच बनवलं नाही..."मालती दि थोडस नाटकी स्वरात बोलते...तिचे ते बोलणे ऐकून कौस्तुकी नाराज होते...ते पाहून दि दि हसू लागते...

"अग मज्जा केली ग तुझी..चल मस्त तुला केक केला आहे आणि तुझ्या आवडती बटाट्याची भाजी पण आहे...हे आवरुन घेऊ आणि मग जाऊ जेवायला..." मालती दि हसतच कौस्तुकीला बोलते...तिच्या तोंडून केक ऐकून कौस्तुकी पळतच जाऊन डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर बसते...ते पाहून मालती दि हसते...दीदी हसतच तिच्या सगळ्या खेळण्याचा पसारा आवरते...ती आवरुन सगळं व्यवस्थित ठेवून कौस्तुकी कडे येते...

"कौस्तुकी hand wash करून ये जा....जम्स पोटात जातील नाहीतर...त्यानंतर मग पोट दुखेल ना तुझं..."मालती दि प्रेमाने तिला बोलते...

"हा कौस्तुकी हॅन्ड वॉश विसरली होती...पण आता जाणार आहे मी..."कौस्तुकी हसतच बोलत किचनमध्ये जाते आणि तिथे ठेवलेला हॅन्ड वॉश घेऊन ती हाताला लावते...नंतर पाणी ऑन करून ती हात व्यवस्थित धुते...
मस्त असे हात धुवून ती पुन्हा खुर्चीवर बसते...मालती दि तिला हसतच जेवण वाढते...कौस्तुकी खुश होऊन ते जेवण हळूहळू एक घास करत करत खात असते...तिच्यासोबत मालती दि पण स्वतःच जेवण घेऊन बसते आणि ती पण कौस्तुकी कडे पाहत जेवण करते...

जेवण झाल्यावर मालती दि सगळं आवरुन घेते आणि ती तशीच कौस्तुकीला आणि तिच्या चिऊला स्वतःच्या रूममध्ये झोपायला घेऊन जाते...काहीवेळाने दिदि पण तिला जवळ घेऊन झोपी जाते...

मालती खुराना एका मोठया कंपनीची मालकीण होती... एवढी मोठी मालकीण असल्याने तिचे घर देखील तसेच मोठे होते...एकदम राजवाड्यासारखे...पण घरात ती आणि कौस्तुकी शिवाय कोणीच नव्हते...कौस्तुकी एक अशी मुलगी होती जी वयाने आसपास 22,23 ची होती... पण मेंटली थोडी डिस्टर्ब असल्याने ती अजून लहानच वागायची...लहान मुलांसोबत खेळायला गेली किंवा बाहेर गेली की ती थोडीशी विचित्र वागायची त्यामुळे लोक तिला वेडे म्हणायचे...म्हणून आजपर्यंत तिला कोणीच friend मिळाले नव्हते...मालती दि आणि तीच काहीच रक्ताचे नाते नव्हते...पण अस काहीतरी नक्कीच त्यांच्या जीवनात घडले होते ज्या घटनेने त्या दोघी एकत्र आल्या...मालती दि जवळपास 28,29 ची होती...ती देखील दिसायला सुंदर होती...बिझनेस वूमन असल्याने तिच्यात एक वेगळाच attitude असायचा...पण तो फक्त बाहेर...घरात आली की ती कौस्तुकी सोबत तिची मैत्रीण,बहीण,आई ,वडील सगळं बनायची...खूप जीव होता मालती दि चा तिच्यात...तिच्यासाठी ती सगळं करत होती...तिची स्वतःच्या मुलाप्रमाणे दि काळजी घेत होती...लोकांनी मालती दि ला कौस्तुकी ला वेड्याच्या दवाखान्यात टाकण्याचा सल्ला दिला पण मालती दि ने त्यांचे कधीच ऐकले नाही...तिला तिच्यात काहीच कमी वाटत नव्हती...कौस्तुकी तिला खूप जवळची वाटायची म्हणून ती कधीच तिच्याबद्दल वाईट विचार करायची नाही...मालती दि ने तिला व्यस्थित समजावून सांगितले की कौस्तुकी सगळं करायची...हे पाहून दि ला बरे वाटायचे...
*******************

अमेरिका:-

एक सावळा असा साधारण 6 फूट उंचीचा हॅन्डसम असा माणूस चेअरवर style मध्ये बसला होता...दिसायला तो सावळा होता...म्हणजे कृष्णवर्णीय पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होते...त्याचे ते निळे डोळे कोणत्याही मुलीला प्रेमात पाडतील असे होते...जिमने कमावलेली बॉडी,मसल्स पाहून त्याच्या समोर असलेल्या मुली तर डोळे फाडून त्यालाच पाहत होत्या...पण त्याला काहीच फरक पडत नव्हता...तो आपला style मध्ये बसून कसला तरी विचार करत होता...

"तर मिस रिटा माझी भारतात जायची तयारी करा...मला भारतात जाऊन माझे हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे..."तो व्यक्ती थोडस शांत होत बोलतो...त्याच्या बोलण्याने सगळे जण भानावर येतात...

"सर बट तुम्ही तिकडे कधीच जाणार नव्हता ना? मग मध्यचे असे अचानक कसे ठरले?"एक व्यक्ती त्याच्या समोर बसून थोडस घाबरत विचारतो...

"बॉस कोण आहे Jordan तू की मी...सांगितले ना एकदा तर करा तयारी मला यावर काहीच प्रश्न नको आहे...निघा लवकर इथून सगळे"तो व्यक्ती रागातच बोलतो...त्याचा तो रागिष्ट चेहरा पाहून सगळे घाबरून बाहेर निघून जातात...सगळे बाहेर गेल्यावर तो व्यक्ती त्याच्या डेस्कवर असलेली फोटो फ्रेम उचलतो...त्यावर तो स्वतःचे ओठ टेकवतो आणि त्या फ्रेमला स्वतःच्या हृदयाशी लावतो...

"मालू दि मी येत आहे तुला भेटायला...तुझा उमंग तुला पाहायला माझ्या घरी घेऊन यायला येत आहे तुझ्याकडे...मला माहिती आहे तुझ्यावर खूप मोठा अन्याय झाला...पण याची मी शिक्षा दिली ती लोकांना....आता फक्त तू आणि मी एकत्र राहू या...बाकी कोणीच नको आहे मला तुझ्याशिवाय..."तो व्यक्ती थोडस इमोशनल होत बोलतो...त्याचे बोलणे चालू असताना एक मुलगी येऊन त्याला मागूनच मिठी मारते...तिच्या त्या स्पर्शाने तो भानावर येतो...तिचा तो स्पर्श त्याला नकोसा वाटतो म्हणून तो रागातच तिचे दोन्ही हात काढून टाकतो...मागे होऊन तो त्या मुलीच्या सनकन कानाखाली वाजवतो...त्याने कानाखाली मारल्याने ती मुलगी खाली पडते...काहीवेळ तिच्यासोबत काय झालं हे तिला समजत नसते...जेव्हा तिला समजते तशी ती गालाला हात लावतच उभी राहते...पाहते तर उमंग चे डोळे अंगावर ओतत होते...रागाने त्याचे डोळे लालभडक झाले होते...ज्वालामुखी सारखी त्याच्या अंगाची लाहीलाही होत होती...त्याला तस रागात पाहून ती मुलगी घाबरली...पण उमंग मात्र रागातच नजर रोखून तिच्याकडे पाहत होता...
पुढे तीच काय होईल या विचाराने ती आता खूप घाबरली होती...तिला आता ac च्या रूममध्ये पण दरदरून घाम फुटला होता...तिचे हातपाय देखील त्याला रागात पाहून कापत होते...पण उमंग ला मात्र याचा काहीच फरक पडत नव्हता...तो रागातच अजूनही तिलाच पाहत होता...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
   ©®भावना
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

[email protected]@[email protected]

Bsc Cs

माझ्या कल्पनेच्या विश्वात तुमचे स्वागत आहे...