कठोर प्रेम... का कळत नाही पण हल्ली मन जरा कठोर झालंय "प्रेम" या शब्दातला जिव्हाळा थोडा कमी झालाय, प्रेम प्रेम प्रेम बस झाल आता अरे ! एखादी गोष्ट आयुष्यात आपली होणारच नाही मग त्या गोष्टीचा विचार करावा का??? तिलाही माहितीये कि ती माझी होऊ शकत नाही आणि मलाही माहितीये कि मी तिचा होऊ शकत नाही. दोघांची कळकळ अशी झालीये जस अळूच पान आणि त्यावरचा थेंब स्पर्श होऊ शकेल पण एकजीव माञ उभ्या जन्मात शक्य नाही. माझ्या मनातल्या भावना तिच्या मनात कधीच पोचल्यात आणि तिच्या मनातल्या भावनाही माझ्या मनात कधीच पोचल्यात. दोघांच्याही भावनेत प्रेम आहे दोघानाही माहितीये पण या भावना व्यक्त का होत नाहीत ??? नाही ! त्या कधीच होणार नाहीत त्यामागे एकच कारण असावं दोघानाही एकाच बंधनान जखडून ठेवलंय ते म्हणजे "संस्कार" !!! कारण संस्कार जर मोडले तर आमच्या प्रेमाला किंमत राहणार नाही.प्रेम केले आहे ते निभवायचे पण आहे सगळ्याच्या संमतीने.सगळ्याची साथ असेल तर प्रेम शेवट पर्यंत नेण्यात अर्थ आहे. भावना विरहित प्रेम करणे म्हणजे तडजोड नाही का??