
शितल ठोंबरे( हळवा कोपरा )
कथा तुझी अन माझी...प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग3)
इकडे शामलची उत्सुकता शिगेला पोहोचलेली...कसा दिसत असेल बरं मुलगा...काळा ..गोरा..उंच..की बुटका..ताईला शोभेल असाच असेल ना?? एक ना अनेक विचार शामल च्या डोक्यात पिंगा घालत होते...
काहीही करून नवरया मुलाची एक तरी झलक पहायचीच असं शामल ने मनाशी पक्क ठरवलं...
इकडे शामल च्या घरात पाहुण्यांची गर्दी झालेली...दाखवण्याचा कार्यक्रम सुरु झालेला...
पण शामल ची मात्र नुसती घालमेल सुरु होती...सरळ घरी जाता येत नाही...बाबांना ते पटलं नसतं..उगाच बोलणी खावी लागतील...
शामल ज्या काकूंच्या घरी अभ्यासाला बसली होती...त्यांच्या दारातून शामल च्या घराची बाल्कनी दिसत होती...दरवाजाच्या अगदी समोरच नवरा मुलगा बसला होता...
शामल कंटाळा आल्याचा बहाणा करत बाहेर आली...तोच समोरच बसलेल्या नवरया मुलाशी तीची नजरानजर झाली...
बापरे!शामल ने जीभ चावत काकूंच्या घरात धूम ठोकली....
'काय विचार करेल नवरा मुलगा माझ्याबद्दल...
मला असं चोरून त्याच्याकडे पाहताना नेमकं त्याने पाहिलं...त्याला आत्ताच बाहेर पाहायचं होतं...बाबांना समजलं तर चांगलाच ओरडा बसेल..
जाऊ दे ओरडू देत ...थोडा वेळ बोलतील मग गप्प बसतील...' शामल स्वत:शीच पुटपुटली...
पण शामल जाम खुश होती...ताईला पहायला आलेला मुलगा ती पाहू शकली...मुलगा पाहून तिला हायसं वाटलं...कारण मुलगा तिने कल्पना केलेला त्यापेक्षा खूपच छान होता...
गोरा रंग,भरदार शरीरयष्टी एकदम ऐटबाज,रूबाबदार दिसत होता...त्यात त्याने घातलेला डार्क नीळ्या रंगाचा शर्ट ...काय खुलून दिसत होता त्याला...
'आपल्याला तर जिजू पसंत आहे'...शामल मनाशीच म्हणाली...
पाहण्याचा कार्यक्रम उरकला...पसंती कळवतो म्हणत ...पाहुणे मंडळी गेली...
घरात नुसती मुलाबद्दलच चर्चा सुरु होती...मुलगा सगळ्यांनाच पसंत होता...आता फक्त मुलाकडच्या होकाराची प्रतिक्षा होती...पाहुणे मंडळींचा एकून अंदाज घेता त्यांचा ही होकारच असेल असं सगळ्यांच मत होतं...
शामल मात्र मनातल्या मनात खुश होती...आपल्या ताईचा नवरदेव आपणही पाहिला...पण कोणाला काही समजल नाही याचीच तिला भारी मज्जा वाटतं होती...
रात्री झोपताना शामल ची आपल्या ताई जवळ नुसती कुजबुज सुरु होती...'ताई तुला पसंत आहे न मुलगा...उगाच आई बाबा म्हणतात म्हणून नको चढू बोहल्यावर'...
'आई बाबांची पसंती तिच माझी पसंती आहे '...रेश्मा म्हणाली...
'हो का ?? सरळ सरळ सांग न मुलगा पसंत आहे म्हणून'...शामल रेश्मा ला छेडू लागली...
'ए ताई पण एक सांगू का? निळ्या रंगाच्या शर्ट मध्ये काय ह्यांडसम दिसत होता मुलगा..'
रेश्मा ने हे ऐकलं अन ती जोरजोरात हसायला लागली...शामल ला समजेना हिला नेमकं काय झालं??
'ए ताई लग्न ठरण्याच्या आनंदात वेड बीड तर नाही न लागलं तुला...'
रेश्माचं हसू काही केल्या थांबेना मग मात्र शामल चिडली...
'ताई काय झालयं मला काही सांगशील का?? तू अशीच हसत राहिलीस तर मी बोलणारच नाही मुळी तुझ्याशी...
असं म्हणत शामल ने गाल फुगवले अन कूस बदलली...
मग मात्र रेश्मा आपलं हसू दाबत शामलला म्हणाली...'अगं वेडाबाई तू ज्याला चोरून पाहिलसं तो नवरा मुलगा नव्हता काही...नवरया मुलाने तर ब्राऊन रंगाचा शर्ट घातलेला...आणि तू ज्याच्या बद्दल बोलत आहेस तो मुलाचा मावस भाऊ होता..
नवरया मुलाला सोबत म्हणून आलेला...आणि तू त्यालाच नवरा मुलगा समजलीस'...असं म्हणत रेश्मा पुन्हा हसू लागली...
मग मात्र शामल जागेवरच उडाली...काय?? म्हणजे मी चुकिच्या मुलाला नवरा मुलगा समजले...
अरे!देवा ...मी किती खुश होते...तुझ्या नवरया मुलाला पाहिलं म्हणून...माझा तर चांगलाच पोपट झाला म्हणं की...
आता मात्र दोघी बहिणींना हसू अनावर झाले...
'ए पण त्याला काय गरज होती असं नवरया मुलासोबत यायची... त्याच्यामुळे मी माझ्या होणारया जिजूंना नाही पाहू शकली...'
थोडा वेळ शांत होतं..शामल पुन्हा म्हणाली..'ए ताई पण तो दुसरा मुलगा पण भारी होता हा...मी तर पाहिल्या बरोबरच पसंत केला...जिजू म्हणून... पण काय यार तो रोँग नंबर निघाला...'
'इतका आवडला का आमच्या शामल बाईंना...मग आईशी बोलून तुझ्या लग्नाचं ही ठरवूयात...एकाच मांडवात दोघी बहिणी..काय बोलू का आईशी बोल! बोल!'...रेश्मा शामल ला चिडवू लागली...
इतका वेळ दोघींची बडबड चाललेली बघून....आईने आवाज दिला ...'काय गं झोपायचं नाही का आज ...का रात्र भर गप्पाच मारत राहणार आहात...'
मग मात्र दोघींनी पांघरूण घेत डोळे मिटले...रेश्मा झोपली पण शामल ला आज काही झोप लागेना...तिने दुपारी पाहिलेल्या मुलाची झलक काही तिच्या नजरेसमोरून जाईना...
रात्री कितितरी वेळ शामल जागीच होती...तीची अन त्याची झालेली नजरानजर...त्याने तिला पाहिलं तशी शामलने धूम ठोकली...
हेच सगळं रात्र भर तिच्या नजरेसमोर नाचत होतं...रात्री उशिरा कधी झोप लागली तीचं तिलाच कळलं नाही...
सकाळी जाग आल्यावर... रात्री आपण त्या मुलाचा इतका का विचार करत होतो बरं म्हणून शामलला स्वत: चाच राग आला...
कोण कुठला मुलगा मी एवढा काय विचार करतेय त्याच्याबद्द्ल जाऊ दे नको तो डोक्यात विचार म्हणतं शामलने त्या मुलाचा विचार पुन्हा करायचा नाही असं स्वत: लाच बजावलं...
दुसरयाच दिवशी रेश्माला पहायला आलेल्या पाहुण्यांचा होकार आला...शामलची बारावीची परिक्षा होती...त्यामुळे परिक्षा होऊ द्यावी मगच लग्नाची तारीख ठरवायची...असं निश्चीत करण्यात आलं...
शामलची परिक्षा झाली ....अन रेश्माच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु झाली...
लग्नाचा दिवस उजाडला...हॉल वर जिकडे तिकडे सगळ्यांची गडबड सुरु होती...शामल ने आज हिरव्या रंगाची,बुट्ट्याबुट्ट्या ची साडी नेसली होती...त्या साडीत ती खूपच खुलून दिसत होती...
स्टेजवर रेश्माच्या आसपासच ती वावरत होती...अचानक तिचं लक्ष कोपर्यात बसलेल्या एका घोळक्याकडे गेलं...काही मुलं मुली तिथे बसले होते...त्यांचा दंगा सुरु होता...बहुतेक मुलाकडची मंडळी असतील असा विचार करत असतानाच...शामलला जाणवलं त्या घोळक्यातून कोणी तरी नजर रोखून तिलाच पाहत आहे...
त्या नजरेला नजर भिडली अन शामलच्या काळजात धस्स झालं....तीच नजर ,तोच चेहरा ...अरे! हा तर तोच आहे ...जिजूंचा मावस भाऊ...ज्याच्यामुळे माझा पोपट झाला...ज्याची नजर मला रात्रभर त्रास देत होती...
आता मात्र शामलची हिम्मत झाली नाही पुन्हा तिकडे पाहण्याची...
लग्न लागलं अन शामल आपल्या मैत्रिणींसोबत जेवणासाठी गेली...
तोच मागून एक अपरिचित आवाज आला...
'हाय!'
शामलने मागे वळून पाहिलं ...तर तोच मुलगा...पुन्हा तिच्या समोर उभा होता... काय बोलावं... शामल ला काही सुचेना...
'हाय! मी प्रशांत'...तुझ्या जिजूंचा भाऊ...त्याने आपली ओळख सांगितली...
शामल आणि प्रशांतची भेट तर झाली..पुढाकार घेऊन प्रशांत शामल बरोबर बोलायलाही आला पण पुढे काय??? या दोघांची ही भेट शेवटची तर नसेल न??? पुढे कथेत काय ट्विस्ट असेल बरं?? जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या भागापर्यंत थांबाव लागेल..
कथेचा हा भाग कसा वाटला ?? तुमचे अभिप्राय नक्की कळवा? तुमच्या प्रतिक्रियेची मला प्रतिक्षा आहे...तोपर्यंत सायोनारा भेटुया पुढच्या भागात...शामल आणि प्रशांत सोबत...