शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
कथा तुझी आणि माझी...प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग15)
शामलला कळून चुकलं ताईला आता काही समजावण्यात अर्थ नाही...तिने ती रात्र कशी बशी ताईच्या घरी काढली...दुसर्या दिवशी ती घरी निघाली तोच रेश्मा तिच्या कानात म्हणाली...काल मी तुला समजावलं आहे ते सगळं तू लक्षात ठेवशील अशी आशा करते...हा विषय आता पुन्हा काढू नकोस त्यातच तुझं भलं आहे...
खूप आशेने शामलने ताईला सगळं सांगून टाकलं होतं...तिच्या साठी तीची ताई खूप मोठा आधार होती...पण हा आधार एका क्षणातच संपला होता...दुखी: मनाने शामल घरी आली...येताना तिने बसमधूनच प्रशांतला फोन केला...
प्रशांत ला तिने सारं काही सांगितलं....आणि ती रडू लागली...प्रशांत तिला समजावत होता...पण शामल त्याच कुठे ऐकत होती...तिला वाटत होतं आता... इथेच सारं काही संपलं...कारण एक ताईच होती जी घरात शामल च्या बाजूने ऊभी राहिली असती...तिने जर आईबाबांना समजावलं असतं..तर आईबाबा लग्नाला तयार झाले असते...तिच एकटी आहे जी आईबाबांना खूप छान हैण्डल करू शकली असती...पण आता सर्व काही संपलं होतं...
प्रशांत ने कसंबसं तिला शांत केलं...शामलला दिलासा दिला की तो स्वत: ताईशी या विषयावर बोलेल...त्यांना समजावेन ...कनविंस करेन...काहीही करेन पण त्यांचा होकार मिळवेन....शामल तू अजिबात काळजी नको करूस...मी तुला आधीही म्हटलं होतं आणि आताही पुन्हा सांगतोय...सिच्युएशन काहीही असो मी नेहमी तुझ्या सोबत असेन...
प्रेम केलय तुझ्यावर...कोणत्याही प्रॉब्लेम ला तू एकटी फेस नाही करणार समजलं...कारण हे प्रॉब्लेम तुझ्या एकटिचे नाहीत...ते आता आपले आहेत...त्यामुळे आता कसलही
टेंशन घेऊ नकोस..फक्त लक्षात ठेव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो...I LOVE U SO MUCH शामल...
प्रशांतच्या बोलण्याने शामलला थोडा धीर येतो...पण तिच टेंशन काही कमी होत नाही...घरी येऊन दोन दिवस झाले तरी शामल शांत शांतच असते...आईच्या हे लक्षात येतं आणि ती विचारते...
आई: काय गं शामल काय झालयंं...अशी शांत शांत का आहेस...
शामल: काही नाही गं आई असच
आई: असच कसं...तुझ्या बर्थडे पर्यंत ठिक होतीस पण ताई कडून जशी आली आहेस तसं पाहते आहे मी गप्प गप्प आहेस...काही झालय्ं का??
शामल: काही नाही झालं...तब्ब्येत थोडी ठिक नाही वाटतं आहे ...( असं म्हणत शामल तिथून उठून गेली)
आई: ( स्वत: शीच बडबडते) काय बिनसलय हीच कोणास ठाऊक...कसं होईल हीच पुढे जाऊन देवालाच माहित...
प्रशांत शामलला कॉल करतो...
प्रशांत: हाय शामल कशी आहेस आता...
शामल :ठिक आहे आता .....पण राहून राहून ताई चे बोलणे डोक्यात घुमतय सारख...
प्रशांत :तू आधी रिलैक्स हो आणि बोल काय काय झाले ताई कडे....
शामल : प्रशांत ला सर्व काही सागुंन टाकते आणि पुन्हा रडायला लागते...
प्रशांत: अरे शामल रडु नकोस थांब जरा... मी करतो काही तरी... आधी मला एक सांग....की तू ताईला का नाही सांगितलस की तुला आवडणारा मूलगा दुसरा तिसरा कोनी नसुन मीच आहे म्हणून...
आणि हे तू मला का नाही सांगितलेस की तू ताईला माझ्या बद्दल काहिच बोलली नाहीस...
इकडे मी रेश्मा वहिनीच्या कॉल ची वाट बघतोय की त्या मला कॉल करून काही विचारतील....
शामल: नाव सागुंन काही फरक पडला नसता ताई ने नाहीच म्हटले असते....
प्रशांत: अरे शामल खूप फरक पडतो.. .कदाचित त्यांना माझे नाव समजले असते तर त्या वेगळं काही बोलल्या असत्या....
शामल :अरे तसे तुला वाटते मी जे ऐकले आहे त्या वरुन तर नाहिच बोलली असती ताई...
प्रशांत:मी ही रेश्मा वहिनींना चांगले ओळखतो त्या तश्या नसत्या बोलल्या माझे नाव ऐकून ...
आता मी स्वत: बोलतो त्यांच्याशी या विषयावर.....
शामल :बघ प्रयत्न करून तुझे ऐकले तर चांगलेच होईल
प्रशांत: होईल चांगले तू नको टेंशन घेऊ... ओके ...मला 2दिवस दे मी बोलतो त्यांच्याशी ओके...
शामल : ठिक आहे... होप सो ताई हो म्हणेल....
प्रशांत:ओके बाय...
प्रशांत विचार करु लागतो की ...आता वहिनीना सांगू तरी कसे ऐण्ड बोलू तरी काय.... थोडी भीती होतीच मनामध्ये पण थोड मन घट्ट करून बोललच पाहिजे...आज ना उद्या हे करावच लागेल......जे होईल ते होईल ...प्रेम केले आहे काही गुन्हा नाही... जाऊ सामोरे...
प्रशांत दुसर्या दिवशीच वहिनीच्या घरी जातो.... नेमक्या अश्या वेळी जातो जेव्हा त्याचा रमेश दादा कामावर गेला असतो....
रेश्मा :आहो भावोजी आज आमच्या कडे कसे काय अचानक आलात काही कळवल नाही काही नाही..तुमचे दादा पण आताच गेले कामाला...तुम्ही येणार आहात माहित असतं तर थांबले असते थोडा वेळ....
प्रशांत : खर तर माझं काम तुमच्याकडेच आहे म्हणूनच दादा नसताना आलो आहे...
रेश्मा:माझ्या कडे आणि महत्वाचे कामं...बापरे काही खर नाही मग... बोला काय काम आहे.....
प्रशांत थोडा वेळ शांतच बसतो...
रेश्मा:बोला भवोजी काय कामं काढले आहे...
प्रशांत :5सेकंद डोळे बंद करून दिर्घ श्वास घेतो आणि मग सुरुवात करतो.....
वहिनी माझे एका मुलीवर खूप प्रेम आहे....
रेश्मा:(आश्चर्य व्यक्त करते) काय बोलता भाओजी...
प्रशांत :हो वहिनी माझे एका मुलीवर खूप प्रेम आहे तिच ही माझ्यावर खूप प्रेम आहे.... फक्त दोघांच्या घरी अजून माहीत नाही आहे...
रेश्मा : खूश होऊन मग मी बोलू का तुमच्या आईशी.... नका टेन्शन घेऊ तुम्ही... मी बोलते त्यांच्याशी
प्रशांत :माझ्या घरी काही प्रॉब्लेम नाही आहे...
प्रॉब्लेम तिच्या घरी आहे....
रेश्मा :पण मी कसे बोलू त्यांच्याशी मी ओळखत पण नाही त्या मुलीला मग माझे बोलने ते कसे ऐकतील...
प्रशांत :वहीनी ओळखता तुम्ही तिला चांगलेच ओळखता...
रेश्माला शामल ने दोन दिवसापूर्वी जे सांगितलं होतं... सर्व आठवते..... म्हणजे आमची शामल का ती मुलगी...
प्रशांत :हो वहिनी शामलच ती.......
रेशमा :(सर्व एक्सायटमेंट निघून जाते आणि गंभीर होऊन)
नाही ते शक्य नाही.... सॉरी भाओजी....
प्रशांत :पण का वहिनी???...
रेश्मा प्रशांतला रेवा ची सर्व हकीकत सांगते व बोलते की त्या मुळे माझे घरचे आणि मी पण कधीच प्रेम विवाहाला होकार देणार नाही...
प्रशात :पण इतर कोणी केलेल्या चुकांची शिक्षा आम्हाला का??
रेश्मा:ते मला काही माहीत नाही पण तुम्ही शामल चा नाद सोडून द्या.....
प्रशांत: नाद ??आहो वहिनी अगदी मना पासून प्रेम केले आहे शामल वर मी तिला विचारायच्या आधी सर्व काही विचार केला होता .... की सर्व काही रितसर करु घरच्यांची परवानगी घेऊन मगच लग्न करु... ना कोणाला दूखवायचे ना कोणाशीं भाडंण करायचे.... प्रेम केले आहे एकमेकांवर... गुन्हा नाही केला आहे ...आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही प्लीज वहिनी मी तुमच्या कडे खूप आशेने आलो आहे.... असे आम्हाला निराश नका करु प्लीज.... तुम्ही सांगाल ते सर्व ऐकू पण यातुन काही मार्ग काढा....
रेश्मा :मी सांगेन ते ऐकाल का तुम्ही दोघे ??.......
प्रशांत :हो नक्की ....
रेश्मा :मग शामल ला विसरून जा.....
हे शब्द ऐकताच प्रशांत च्या डोळ्यातून टचकन पाणी येते..
डोळे पुसतच बोलतो ठिक आहे.. आम्ही दोघे पुन्हा कधी नाही भेटणार ना कधी बोलणार ....पण शामल ला विसरणं या जन्मी तरी मला शक्य नाही आहे... तुम्ही आमच्यावर दडपण आनून आम्हाला वेगळे करु शकता पण आमची मनं जूळलेली आहे.. त्यांना तुम्ही कधीच वेगळे करु शकत नाही... तुमच्या अश्या वागण्याने तुम्ही फक्त आमच्या दोघांचे आयुष्य खराब नाही करत आहात ...तर 4 आयुष्य बरबाद करत आहात... कारण मी उद्या जरी इतर कोनाशी लग्न केले तरी माझे पहीले प्रेम शामलच राहिल ....आणि हे शामलच्या बाबतीत पण असेच होईल ...शामल ची जागा इतर कोनी ही घेउ शकत नाही .... मला माफ करा जर मी जास्त बोललो असेल तर ....आणि पुन्हा एकदा माफ करा की मी तुमच्या शामल वर प्रेम केले...तसेच डोळे पुसत रेश्माच्या घरातून निघून जातो.....
इकडे रेश्मा विचारात पडते नक्की कोणाची साथ देऊ??? ...शामल आणि प्रशांतची की आई बाबांची....रात्र भर ती विचार करत असते...शामल आपली लहान बहिन लहानपणापासून आपण तिला पहात आहोत...ती कधीच काही चुकिच वागली नाही...लहान बहिन म्हणून सगळे हट्ट पुरवलेत मी आजवर तिचे...पण प्रशांत बरोबर तिच लग्न कसं शक्य आहे....
पण नेहमी सरळमार्गी असणारी आपली बहिन प्रेमात पडलीच कशी???... खरच प्रशांत तिच्या साठी जोडीदार म्हणून योग्य असेल???...पण घरातले कसे तयार होतील या लग्नाला??? ...प्रशांतला मी माझं लग्न झाल तेव्हापासून पाहते आहे....सगळ्यांना हसवनारा प्रशांत...इतका इमोशनल असू शकतो स्वप्नातही वाटलं नव्हत...खरच ते दोघे जर एकमेकांवर खूप प्रेम करत असतील तर त्यांना वेगळे करणारे आम्ही कोण?? रेवाच्या बाबतीत जे घडल ते तिच नशीब शामल बाबतीत तसच होईल कशावरून??
खूप आशेने त्या दोघांनीही त्यांची मने मोकळी केली...त्यांना हेच वाटलं की मी त्यांची काही मदत करेन...काय करावे रेश्माला ही काही कळेना....शेवटी तिने मनाशी काही निश्चय केला...आणि ती निवांत झोपी गेली....
इकडे प्रशांत ने शामल ला त्याच आणि ताई च जे काही बोलणं झालं ते सगळं सांगितल....आता तर शामलला फार टेंशन आले...दोघांनाही प्रश्न पडला आता पुढे काय करायचे???...पण काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही असच दोघांनी ठरवलं...
आठवड्याभराने रेश्मा काही निमित्त काढून दोन दिवसासाठी माहेरी आली...खरेदीचा बहाणा करून ती रेश्मा ला बाहेर घेऊन गेली...स्टेशन जवळच असणारया आलोक हॉटेल मध्ये शामलला नेले... शामलला समजेना खरेदी करायची म्हणून
बाहेर पडलो ...मग ताई आपल्याला इथे का बरं घेऊन आली...तिने तसं रेश्माला विचारलही...थांब थोडा वेळ कळेलच तुला...तेवढ्यात रेश्माला कोणाचा फोन आला...फोन वर बोलून झाल्यावर रेश्मा शामल ला म्हणाली...
रेश्मा:तू विचारत होतिस ना आपण इथे का आलोय??... तर ऐक मी तुझ्यासाठी मुलगा पाहिलाय आणि तो इथे येतोय...तुम्ही दोघे एकदा एकमेकांना पाहून,भेटून घ्या...बाकी सर्व मी बघते...
शामल: ताई मी तुला सगळं सांगितलं असताना तू असं कसं करू शकतेस...तुला जराही माझ्या भावनांचा विचार करावासा वाटला नाही...तूझ्याकडून तरी ताई अशी अपेक्षा नव्हती...(शामल रागातच बडबडते)...
रेश्मा: हे बघ झालं गेलं सोडून दे...भूतकाळात डोकावू नकोस...तुझ्या भविष्याचा विचार कर...मी जे काही करेन तुझ्या भल्यासाठीच करेन...
शामलचे डोळे भरून येतात...ईतक्यात प्रशांत तिच्या समोर येऊन उभा राहतो...शामल एकदा प्रशांत कडे पाहते एकदा ताई कडे ...दोघेही गालातल्या गालात हसत असतात...
शामल: काय गं ताई ....अशी मस्करी करत का कोणी...माझा जीव जायचाच बाकी होता...थँक्स म्हणत ताई च्या गळ्यात पडते...सॉरी तुला रागाच्या भरात खूप काही बोलले...शामल ने आपले कान पकडले...
रेश्मा: असा कसा जाऊ देईन मी तुझा जीव...
शामल : प्रशांत तू पण काही बोलला नाहीस...
प्रशांत: कसं बोलणार?? (ताईने त्याला इथे कसं बोलावलं आणि शामल ला काहिच सांगायच नाही अशी तम्बीच दिली होती...याचा सगळा वृत्तांत सांगितला...)
तिघेही हसू लागले...
रेश्मा: माझा या नात्याला होकार आहे याचा अर्थ असा नाही की सारे अडसर दूर झाले...मी होकार केवळ एकाच अटी वर देईन...तुम्ही दोघांनीही आधी तुमच शिक्षण पूर्ण करा...मगच पुढच्या गोष्टी आपण ठरवू...तोपर्यंत तुम्ही दोघांनीही कोणतही चुकिच पाऊल उचलायच नाही...मी तुमच्या सोबत कायम असेन...पण माझ्या विश्वासाला तडा जाता कामा नये...घरच्यांना कसं तयार करायचे ते मी बघते...
शामल आणि प्रशांत ने ताईला वचन दिले की ताई जसे म्हणेल तसच वागतील ते...आज खूप दिवसांनी तीघांना ही शांत झोप लागली...
शामल आणि प्रशांत ने एक होकार तर मिळवला...पण दोघांचा रस्ता इतका साधा सोपा नव्हता...काय असेल बरं दोघांच्या आयुष्यात पुढे वाढून ठेवलेलं?... जाणून घेण्या साठी भेटूयात पुढच्या भागात...तोपर्यंत सायोनारा...
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा... धन्यवाद...