Aug 09, 2022
प्रेम

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 14

Read Later
कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 14

शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी.....प्रेमापासून लग्नापर्यंत... (भाग14)

प्रशांतला असं अचानक पाहून रेश्मा ला आश्चर्य वाटलं...

रेश्मा: भावोजी तुम्ही इकडे कसे काय???

विक्की ला पुढे करत ....वहिनी हा माझा मित्र विक्की ...त्याच काम होतं म्हणून आलेलो...विक्की पुढे येऊन रेश्मा आणि शामलला हाय करतो...

प्रशांत:तुम्ही खरेदीला बाहेर पडला आहात....काही स्पेशल...

रेश्मा :स्पेशल म्हणजे शामल चा आज बर्थडे आहे त्याचीच शॉपिंग करायला आलेलो.. 

प्रशांत :(आश्चर्य व्यक्त करत )हो का ......अरे happy birthday शामल...मग आज काय जंगी पार्टी असेल...(हर्ष कडे हसून पाहत )नाही का हर्ष मज्जा आहे आज मस्त मस्त केक खायला मिळणार...

बरं तुम्ही करा शॉपिंग आम्ही निघतो वहिनी...प्रशांत वरवर बोलतो...

अरे निघालात कुठे ?? इथून घर जवळच आहे. ...घरी चला चहापाणी घ्या मग निघा...

तेवढ्यात हर्षपण त्याला बोट धरून खेचू लागतो....

रेश्मा: हर्ष पण मागे लागलाय चलाच आता घरी

प्रशांत: ठिक आहे चला येतो म्हणत विक्की कडे पाहतो...

विक्की: देख भाई तू जा पर मुझे यहाँ से दुसरे जरुरी काम  के लिये निकलना हैं तो तू एन्जॉय कर मैं निकलता हूँ...

शामल ला बर्थडे विश करून...सगळ्यांचा निरोप घेऊन विक्की निघतो...

प्रशांत: वहिनी तुम्ही करा शॉपिंग तोपर्यंत मी ही एक राउंड मारून येतो...

इकडे शामल आपल्या चेहर्यावरील आनंद लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते...प्रशांत ला असं अचानक आलेलं पाहून तिला काय करावे काही सुचत नाही...

शामल चा बर्थडे म्हटल्यावर प्रशांत खूप एक्सायटेड  असतो... त्याला मिळालेल्या वेळात तो शामल साठी गिफ्ट घ्यायचे ठरवतो....  पण घ्यायचे काय???आणी घेतले तर .....द्यायचे कसे???याच विचारात असतो.... आपण खास गिफ्ट घेतले आणी दिले तर लोकांना संशय येईल पण  घ्यायचे तर आहे आणि ते शामलला द्यायचे ही आहे....काय करु?? ....काय करु???... प्रशांतचे काही डोकच चालत नाही.. गिफ्ट शोधता शोधता त्याला ज्वेलरी शॉप दिसते.... त्यात शामल साठी मस्त  चांदीचे एक लवबर्ड चे लॉकेट  घेतो.... आणी एक चॉकलेट चा बॉक्स घेतो.....

आता प्रशांत हे गिफ्ट शामलला द्यायचे कसे याचा विचार करत असतो.....

ऐण्ड  नेमकी त्याला हेमांगी आठवते ती पण ठाण्यामध्येच रहात असते.... तो हेमांगी ला फोन करतो...

प्रशांत :हाय  हेमांगी..

हेमांगी :हाय  आज आमची आठवण कशी काय आली....

प्रशांत :अरे आज शामलचा बर्थडे आहे....

हेमांगी :मला माहीत आहे.... मी केले आहे विश तिला कालच....

प्रशांत :कॉंग्रटस त्या साठी????एकदा ऐकून घेशील का आधी     
काय म्हणतोय ते....

हेमांगी: (चिडून) बोल

प्रशांत: माझेएक काम आहे तुझ्या कडे...

हेमांगी :काम ऐण्ड माझ्या कडे 

प्रशांत: हो हो तुझ्या कडे....

हेमांगी: बोल ना काय काम आहे ...

प्रशांत  काल पासून घडलेले सगळा  घटनाक्रम तिला सांगतो..

हेमांगी: अरे मग काम काय आहे... ते तर सांग...

प्रशांत : मी शामल साठि गिफ्ट घेतले आहे आणि ते तिला द्यायचे आहे...तेही आजच द्यायचे आहे ...नंतर आम्ही कधी भेटू सांगू शकत नाही.. . सो आज तू पण  माझ्यासारखे शामल ला सरप्राईज दे ....तिच्या घरी येउन... ऐण्ड मी आणलेले गिफ्ट तू तुझ्या कडून तिला दे....

हेमांगी:( थोडा विचार करून बोलते) पण  तू ते गिफ्ट आधी मला कसे देणार.... 

प्रशांत: तू तिच्या घरी आल्यावर देईन तुला....तू आधी ये तरी...

हेमांगी :चल ठिक है... शामल ऐण्ड  तेरे लिये कुछ भी....

प्रशांत :ओहह  थँक्स यार.. चल बाय मी तुझी वाट बघतोय ओके....

हेमांगी :मी येते वेळेत.... चल बाय.....

प्रशांत  आता खूप खुश असतो......

अर्ध्या पाऊण तासात सगळी खरेदी करून सगळे शामलच्या घरी पोहचतात...

प्रशांत अचानक असा घरी आलेला पाहून शामलचे आई बाबा ही आश्चर्यचकित होतात...रेश्मा त्यांना सगळी हकीकत सांगते...की कसा प्रशांत त्यांना मॉल मध्ये भेटला....

चहा वगैरे करेपर्यंत सात वाजले होते...प्रशांत उगाच निघण्याचा बहाणा करतो...पण सगळेच आग्रह करतात...आणि केक कटिंग पर्यंत थांबायला लावतात...

प्रशांत आणि शामल खूश असतात की आज कसे का होईना पण ते दोघेही एकत्र आहेत...

तेवढ्यात हेमांगी  येते..... शामल च्या घरी....
शामल हेमांगी ला बघून खूप आनंदी होते

शामल : तू तर एकदम सरप्राईजच दिलस...

हेमांगी:येस डीयर  सरप्राईज ....तुझ्या बर्थडे ला मी नाही येणार असे होईल  का....  

शामल खूप खूश असते रेश्मा ताई ,हर्ष त्यात प्रशांत ऐण्ड हेमांगी ने दिलीले सरप्राईज ...

तेवढ्यात रेश्मा ताई केक कटिंग  करायला आणते... वेळेचा फायदा घेऊन प्रशांत शामल साठी आणलेल गिफ्ट हेमांगी च्या हातात देतो...आणि चॉकलेट बॉक्स मात्र शामलला बर्थडे विश करत  स्वत: च देतो....

हेमांगी प्रशांतने दिलेले गिफ्ट पुढे करत शामल ला बर्थडे विश करते...शामल ते गिफ्ट लगेच ओपन करते...आत असलेलं लव्हबर्ड च लॉकेट पाहून शामल ला आश्चर्य वाटत....की हिने असं काय गिफ्ट आणलयं...तिच्याकडे हसून पाहत हेमांगी विचारते...आवडलं का?? 

खूप आवडलं म्हणत शामल ते आपल्या गळ्यातही घालते...इकडे प्रशांत आणि हेमांगी चोरट्या नजरेने एकमेकांकडे पाहत हसतात...

बर्थडे झाल्यावर हेमांगी जायला निघते....तिला सोडायला शामल तिच्यासोबत जाते...त्या दोघी गेल्यावर पाच मिनिटात प्रशांत ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघतो...

बसस्टॉप वर शामल आणि हेमांगी दोघी उभ्याच असतात...प्रशांत त्या दोघींना भेटतो ....गप्पा मारत असतात तोच हेमांगीची बस येते...प्रशांत हेमांगीला थँक्स बोलतो...हेमांगी त्याच्याकडे पाहून फक्त हसते...शामलला कळत नाही की प्रशांत हेमांगीला थँक्स कशाबद्दल बोलला...

ती प्रशांत ला काही विचारणार तोच प्रशांतची बस येते...शामलला बाय करून प्रशांत निघतो...

शामल आणि प्रशांत आज खूप खूश होते...घरी पोहचताच प्रशांत ने शामल ला मेसेज केला...काय रानीसरकार कसं वाटलं सरप्राईज...

शामल: खूप खूप खूप मस्त होतं ...थँक्स प्रशांत ईतकं गोड सरप्राईज दिल्याबद्दल...

प्रशांत: गिफ्ट आवडलं का तुला ??

शामल: हो ( हसत) मी आणि हर्ष ने ते संपवलं ही...

प्रशांत: त्याबद्दल नाही बोलत आहे मी

शामल: मग कशाबद्दल...

प्रशांत: आता सध्या तुझ्या गळ्यात जे लव्हबर्डच लॉकेट आहे ना त्याबद्दल बोलतोय...

शामल: काय? ते तू दिलं आणलं होतस...म्हणजे ही तुझी आणि हेमांगी ची सगळी मिलिभगत होती का?? आणि मला थांगपत्ता ही लागू नाही दिलात...तरिच बसस्टॉप वर तू तिला थँक्स म्हणालास...

प्रशांत: हो हेमांगी मुळे मी तुझ्यापर्यंत ते गिफ्ट पोहचवू शकलो...पण आवडलं का तुला...

शामल: हो खूप आवडलं थँक्स प्रशांत...आणि 

प्रशांत: तू खूश आहेस न मग तर झालं...चला आता तुझ्या सोबत घालवायला मिळालेले हे काही क्षण...तुझे वेकेशन संपेपर्यंत पुरवून पुरवून एन्जॉय करायला हवेत...कारण आता पुन्हा असं सरप्राईज द्यायला ना काही कारण आहे ना तुझी ताई पुन्हा येईल...

शामल: मला वाटतं मी ताईशी आपल्या बद्दल बोलायला हवं...तिला दुसर्या कोणाकडून समजल तर फार वाईट वाटेल...मी तिच्या पासून कधी काही लपवल नाहिये...
आज ही राहून राहून मला असच वाटतं होतं की तिला संशय येतोय की काय आपल्यावर...

प्रशांत: शामल तुच काय तो निर्णय घे...शेवटी तुझी ताई आहे ती...तुला तिला हवं तेव्हा आपल्या नात्याबद्दल सांगू शकतेस..पण भीती इतकीच वाटतेय की त्या आपल्या या नात्याला समजून घेईल का??

शामल: मी ताईला चांगलच ओळखते...तीला जर तू माझ्या साठी योग्य वाटलास तर ती आपल्याला सपोर्टच करेल..

प्रशांत: तुला हवं ते कर ...मी कायम तुझ्या सोबत आहे मग कोणतीही सिच्युएशन येवो...

शामलला तिच्या आणि प्रशांतच्या नात्याबाबत कोणालाही दुखवायचे नव्हते...ना कोणाला फसवायचे होते...ती मनाचा निश्चय करते आणि ताईला सगळं सांगायच ठरवते...

दुसर्या दिवशी रेश्मा आपल्या सासरी जायला निघते...तिच्या जवळ सामान बरेच असल्याने पुन्हा हर्ष ला कसं सांभाळणार हा प्रश्न निर्माण होतो...तशी शामल पटकन म्हणते मी जाऊ का ताईला सोडायला...कारण तिला संधीच हवी असते ताईशी बोलण्याची...

बसमध्ये बसल्यावर संधी मिळताच शामल ताईशी बोलण्याचं ठरवते...काहीही झालं तरी आज ताईशी बोलायचच असं मनाशी ठरवते खरं ...पण ताईशी बोलणं इतकही सोप्प नव्हतं...ती कशी रियाक्ट होईल सांगता येत नाही...ती तयार नाही झाली तर?? मग पुढे काय ?? मोठं प्रश्नचिन्ह होतं...शामल पुढे...पण आज ना उद्या सांगावं तर लागेलच..त्यातही चुकिच्या पद्धतीने ताईच्या समोर सगळ्या गोष्टी गेल्या तर अजून प्रॉब्लेम व्हायचा...

बसमध्ये बसल्यावर बाहेरून येणारया थंडगार वार्याच्या झुळकेने हर्ष झोपी गेला...आता ताईशी आपल्याला व्यवस्थित बोलता येईल ...शामलने दिर्घ श्वास घेतला...आणि रेश्माशी बोलू लागली...

शामल: ताई मला तुझ्याशी खूप महत्वाच बोलायच आहे...

रेश्मा: बोल नं काय म्हणते आहेस...

शामल:कसं बोलू समजत नाहिये पण काहीही झालं तरी आज मी तुला सगळं खर खर सांगणार आहे...

रेश्मा: शामल काय झालाय?? सांगशील का मला...काही प्रॉब्लेम झालाय का??

शामल: (डोळे घट्ट मिटते आणि एका दमात सर्व काही बोलून टाकते...) ताई मला एक मुलगा आवडतो...म्हणजे त्याला ही मी खूप आवडते...आमच दोघांचही एकमेकांवर खूप खूप प्रेम आहे...त्याने मला प्रपोज केलं आणि मी त्याला नाही म्हणूच शकले नाही...तो खूप चांगला आहे...(शामल ने आपले डोळे उघडले...

शामल असं काही बोलेल याची कल्पनाही नसलेली रेश्मा शामल कडे नूसतं पाहातच राहिली...तिचा आपल्या कानावर विश्वासच बसेना की हे सारं शामल बोलत आहे...भानावर येत ती शामलला म्हणाली..

रेश्मा: शामल वेड लागलय्ं का तुला...हे प्रेमबीम काय प्रकरण आहे...तुला चांगलं माहित आहे आपल्या घरातून ह्या गोष्टीला कधीच मान्यता मिळणार नाही...त्यातही रेवाताईच्या प्रकरणा नंतर तर नाहीच नाही...

तुला हे सगळं माहित असताना तू प्रेमाच्या फंदात पडलीच कशी?? 

शामल: मला सगळं माहित आहे गं ताई ...पण मी स्वत: ला नाही रोखू शकले त्याच्यावर प्रेम करायला ...आणि तो खूप चांगला आहे गं...माझ्यावर खूप प्रेम करतो...आम्ही नाही राहू शकत एकमेकांशिवाय...

रेश्मा: शामल तुझं हे काय चाललं आहे न ते इथल्या इथे थांबव...हे प्रकरण जर घरपर्यंत गेलं तर तुझं शिक्षण आणि तुझी स्वप्न सगळ्यालाच इथेच रामराम ठोकावा लागेल तुला...बाबा तर सरळ एखादा मुलगा पाहून तुझं लग्नच लावून देतील...

शामल: ताई मला वाटलेलं किमान तू तरी मला समजून घेशील...(शामलला आता रडूच कोसळते)

रेश्मा: मी लाख समजून घेईन पण घरातले नाही समजून घेणार शामल...मी हे सगळं पुढे उभ्या राहनारया सन्कटापासून तुझा बचाव व्हावा यासाठीच बोलत आहे...या सगळ्यात सर्वात जास्त त्रास तुलाच होणार आहे...वेळीच सावरलीस तर ठिक नाही तर फक्त वेदनाच होतील...यापेक्षा वेगळं काही मिळनार नाही तुला...

शामल साठी तीची ताई तिचा खूप मोठा सपोर्ट होता पण रेश्माच बोलणं ऐकून शामलला धक्काच बसला...शामलला वाटत होतं तीची ताई तिला समजून घेईल पण झालं सगळं उलटच...ताईने शामलला साध त्या मुलाच नाव ही विचारलं नाही ...ना त्याची चौकशी केली...त्याआधीच आपला नकार कळवला...

शामल आता काय निर्णय घेईल???शामल आणि प्रशांतची लव्हस्टोरी कोणतं नवं वळण घेईल...?? रेश्मा होईल का तयार शामल च्या प्रेमासाठी...काय असेल प्रशांत आणि शामलच पुढच पाऊल...?? पण हे जाणून घ्यायला तुम्हाला पुढच्या भागाची वाट पहावी लागेल...तोपर्यंत सायोनारा भेटूयात पुढच्या भागात ....

तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...धन्यवाद....

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते