Mar 01, 2024
प्रेम

कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 12

Read Later
कथा तुझी अन माझी प्रेमापासून लग्नापर्यंत भाग 12

शितल ठोंबरे( हळवा कोपरा )

कथा तुझी अन माझी...प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग12)

शामल सोबतच प्रशांतच्या आयुष्यातील पहिलं वहिलं संकट चालत येतं होतं....शामल ने जवळ येताच प्रशांत हे बघ तुझं सरप्राईज....प्रशांत पाहतच राहिला...कारण समोर उभ्या असलेल्या मुलीला तो पहिल्यांदाच पाहत होता...

शामल ने  प्रशांतची त्या मुलीशी ओळख करून दिली....प्रशांत ही आहे माझी सगळ्यात खास फ्रेंड....माझी जान...हेमांगी...अगदी बालवाडी पासून आम्ही एकत्र होतो...ग्रज्युएशन नंतर मी एम.ए ला अडमिशन घेतले आणि हेमांगीने कम्प्यूटर कोर्स ला (चेहरा उदास करत) तिथेच आमची ताटातूट झाली....

तिला तुझ्या बद्दल सांगितलं तर तिने हट्टच केला ....तुला भेटायचं आहे म्हणून...तू आज येणार नाहीस म्हणालास आणि आमचा मूडच ऑफ झाला...पण मग आम्ही दोघीनीच भेटायचं ठरवलं....तुला सरप्राईज द्यायच ठरवलेलं ...इथ तर तुच आम्हाला सरप्राईज दिलस...तिघेही हसू लागतात...

प्रशांत: हाय मी प्रशांत..

हेमांगी: हाय माझी ओळख तर शामल ने तुला करून दिलीच आहे...आणि तुझ्याबद्दल ही खूप ऐकलं आहे मी..

प्रशांत: (हसत) सगळी ओळख परेड इथेच करायची आहे का?? कुठे तरी निवांत बसून बोलुयात का??

शामल: सॉरी ...आपण कँटीन मध्ये जाऊयात का?? मला जाम भुक लागली आहे...आणि तिथे बसून आपल्याला बोलत ही येईल...

काहिदिवसांपूर्वीची गोष्ट:: शामल ने प्रशांतला होकार दिल्यानंतर तिने आपल्या आयुष्यातील ही सगळ्यात मोठी गोष्ट आपली जिवलग मैत्रीण हेमांगी ला सांगितली...आज पर्यंत तिने हेमांगी पासून काहीच लपवलं नव्हतं...प्रशांत बद्दल ऐकल्यावर हेमांगीला खरेच वाटेना की शामल कोणाच्या प्रेमात पडू शकते...

हेमांगी:राणी आज दिवसभरात पकवायला तुला दूसरं कोणी भेटलं नाही का?? तू आणि प्रेमात शक्यच नाही...आज नाही काही ओळखत आहे मी तुला..

शामल: काय यार मी तुला माझ्या लाइफ मधली इतकी महत्वाची गोष्ट सांगितली आणि तुला खर वाटत नाही....अग मी जे सांगतेय ते एक सो एक टक्का खर आहे...

हेमांगी: तू खरच खरं बोलते आहेस...घे बरं माझी शपथ..

शामल: तुझी शपथ आता तरी विश्वास बसला...

हेमांगी: बसला पण फिफ्टी फिफ्टी....जोपर्यंत या प्रशांत ला मी माझ्या डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत तरी माझा विश्वास नाही बसणार...

शामल: बरं बाई भेटवेन तुला ओके

हेमांगी: कधी भेटायच उद्या...बघू तरी माझ्या बेस्ट फ्रेंड च हृदय चोरनारा नक्की आहे तरी कोण आणि कसा??

शामल: उद्या लगेच नाही...माझी एक्जाम जवळ आली आहे...सो आता मला अभ्यास करायचा आहे ...एक्जाम झाली की मग भेटूयात...

हेमांगी: नक्की...ना तुझा लास्ट पेपर असेल त्याच दिवशी भेटव...आता मला रहावनार नाही या प्रशांत ला भेटल्याशिवाय...

शामल: नक्की भेटूयात...

  आणी आज तो दिवस आला....

ते तीघे कँटीन मध्ये जाऊन बसतात ...इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होतात...प्रशांतला जाणवतं की हेमांगी त्याला खूपच खोदून खोदून प्रश्न विचारतेय...एक दिड तास गप्पा मारल्यावर तिघेही तिथून निघाले...शामल ला खूप उत्सुकता होती...हेमांगी प्रशांत बद्दल काय बोलेल याची...प्रशांत ने दोघींना बसमध्ये बसवून दिले...आता आपली लवकर भेट नाही होणार याविचाराने शामल आणि प्रशांत दोघेही उदास झाले...

बसमध्ये बसल्यावर शामलने हेमांगी ला विचारले...कसा वाटला प्रशांत ???

हेमांगी: तुला एक सांगितलं तर ऐकशील माझं...

शामल: बोल ना यार तुझं नाही ऐकणार तर मग कोणाचं...

हेमांगी: मग ऐक माझं प्लीज तू प्रशांत बरोबर लग्न नको करू...

शामल: काय ??? अगं काय बोलते आहेस तू हे...वेड बीड लागलं का तुला? तू ठिक तर आहेस ना??

हेमांगी: मी एकदम ठणठणीत आहे...समजलं...

शामल: मग अशी का बरळते आहेस तू...तुला मी त्याच्याबद्दल सर्व काही सांगितलं....आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो ग..मग तू असं का बोलते आहेस...तुला माहित आहे माझ्या लाइफ मधे तू खूप इम्पॉर्टंट आहेस...पण प्रशांत ही आता माझा जीव की प्राण झालाय...

हेमांगी: मला ते समजलय की तू त्याच्यावर खूप प्रेम करते आहेस आणि म्हणूनच मी तुला सांगतेय आताच या नात्यात माघार घे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच शहाणी हो...

शामल: तू प्रशांत ला भेटली आहेस ....बोलली आहेस त्याच्याशी....काय वाईट आहे बरं त्यात...खूप चांगला आहे गं तो...स्वभावाने ही...

हेमांगी: स्वभाव चांगला असून उपयोग  काय शामल...ना त्याच शिक्षण ,ना काही स्वप्नं...ना आयुष्यात कसले ध्येय...पुढे जाऊन तुच दुखी: होशील...आणि तुला त्रास झालेला मला चालणार नाही...

हे बघ मी तुझी मैत्रीण आहे बालपणापासून आपण एकत्र आहोत...तुझी स्वप्न तुझा स्वभाव मला चांगलाच माहित आहे...म्हणून तुला मनापासून हे सजेशन देतेय....सोड त्याचा नाद...

शामल: नाद??? अगं प्रेमात आहे मी त्याच्या आणि तो ही माझ्यावर खूप प्रेम करतो...

हेमांगी: तुला कसं समजावू?? त्याने त्याच्या भविष्याचा अजूनही काही विचार केलेला नाही...मग विचार कर तुमच भविष्य कसं असेल??

शामल: आजपर्यंत विचार नाही केला पण या पुढे करेल...मी त्याला तस करायला भाग पाडेन...मी घडवेन त्याच्यात बदल...आणि आमच्या भविष्याचा विषय असेल तर तो माझं नक्कीच ऐकेल...माझ्यावर त्याच इतकं प्रेम आहे की तो माझ्यासाठी काहीही करेल खात्री आहे माझी...

हेमांगी: आणि तसं नाही झालं तर??

शामल: मी नकारार्थी विचार करणारच नाही...कारण आता हे भविष्य त्याच माझं नाही तर आमचं आहे...

हेमांगी: शामल मला माहित आहे तुला वाईट वाटलं असेल पण तुला माहित आहे मला गोष्ट उगाच मनात ठेवायला नाही आवडत आणि तू तर माझी जान आहेस मी तुला हर्ट झालेलं नाही पाहू शकतं...

शामल: मला माहित आहे तू हे सगळं माझ्या काळजीपोटी बोलते आहेस...पण टेंशन घेऊ नकोस ( असं म्हणत शामल ने हेमांगी चा हात आपल्या हाती घेतला..आणि तिला विश्वास देण्याचा प्रयत्न केला.)

हेमांगी शामल बरोबर जे काही बोलली ते तिच्या काळजीपोटीच ....त्यात तिच काहिच चुकलं नव्हतं...

प्रशांत ला भेटून आल्यानंतर शामल थोडी उदासच होती... वेकेशन सुरु झालेले त्यामुळे ती आता प्रशांत ला भेटू शकत नव्हती...प्रशांत ची आठवण खूप येत होती...त्याचबरोबर हेमांगी च बोलणं तिच्या डोक्यात पिंगा घालत होतं...
प्रशांतने अजूनही आपल्या लाइफ ला सिरियसली घेतलं नव्हतं...शामल ने याबाबतीत प्रशांतशी बोलायच ठरवलं...आज नाही तर उद्या यावर बोलावच लागेल...दुसरयाच दिवशी तिने प्रशांतला फोन केला...

प्रशांत: हेलो बोल...तुझाच विचार करत होतो..ईतक्यात तू फोन केलास कशी आहेस ?? तू भेटणार नाहीस या विचारानेच तुझी अजून आठवण येतेय... miss u yaar love u तुझ्याशिवाय ही सुट्टी कशी जाईल विचारच करवत नाहिये गं...

शामल: love u too मला ही तुझी आठवण येतेय रे कालच भेटलो तरी असं वाटतय कित्येक दिवस झालेत आपल्याला भेटून...तुझ्याशिवाय एक एक दिवस काढणं कठीण आहे रे...अजून पहिला दिवस ही सरला नाही तोच ही अवस्था...( आवाज थोडा रडवेला होतो)

प्रशांत:( शामल चा रडवेला आवाज ऐकून) ए वेडाबाई रडते काय अशी...माझी ही काही वेगळी अवस्था नाही गं...पण आपल्याला काही दिवस असाच विरह सहन करावा लागेल...आणि तसही जितके लांब राहू तितकं आपलं प्रेम अजूनच घट्ट होईल...

(शामल हसते...तिचा हसरा आवाज ऐकून प्रशांत ला ही बरे वाटते...)

शामल: प्रशांत आज मला तुझ्याशी खूप महत्वाच बोलायचयं...

प्रशांत: बोल ना काय झालं काही प्रॉब्लेम झालाय का??? सगळं ठिक आहे ना शामल...

शामल : हो रे सगळं ठिक आहे...पण मला आपल्या भविष्याबद्दल तुझ्याशी बोलायच आहे....

प्रशांत: आपल्या भविष्याबद्दल??? त्यात काय बोलायचयं ( हसतो) तुझं माझं लग्न...

शामल: प्रशांत तस नाही रे ...

प्रशांत: मग कसं शामल( हसतो)

शामल:( चिडून) प्रशांत मी मस्करीच्या मूड मध्ये अजिबात नाही ओके...

शामल चा बदललेला आवाज पाहून प्रशांत ही सिरियस होतो..

प्रशांत: सॉरी बोल काय म्हणायचय तुला मी ऐकतोय...

शामल:माझ्या आई बाबांना मनवायची जबाबदारी तू घेतली आहेस खरी...पण जेव्हा माझा हात मागायला त्यांच्यासमोर उभा राहशील तेव्हा स्वत: ची काय ओळख करून देणार आहेस...एक वेळ ते आपल्या लग्नाला होकार देतील...पण तुझं शिक्षण तुझा जॉब या सगळ्या गोष्टी जोवर व्यवस्थित नसतील तोपर्यंत ते तरी त्यांच्या मुलीच लग्न तुझ्याशी का लावतील बरं...

प्रशांत:  अरे यार शामल तू पण तेच बोलते आहेस...थांब ना थोडं...करेन मी सगळं ठिक...

शामल: असे का बोलतो आहेस ऐण्ड  हे तू पण  म्हणजे काय तुला अजून कुणी काही बोलले का....?

प्रशांत : हो बोलले... हेमांगी चा फोन आला होता काल मला....

शामल:काय ती कशाला करेल तुला फोन...

प्रशांत :आला होता खूप काही बोलली मला....

शामल :अरे काय  झाले ?? सांगशील का मला....

प्रशांत: हो सांगतो  काल जेव्हा मी घरी आलो संध्याकाळी... तेव्हा हेमांगी ने मला कॉल केला होता...

( आदल्या संध्याकाळी हेमांगी चा फोन आल्यावर त्या दोघात काय बोलणं झाले ते प्रशांत ने शामल ला सांगितले)

प्रशांत: हेलो...

हेमांगी : प्रशांत मी   हेमांगी शामलची मैत्रीण...

प्रशांत: अरे बोल न काय म्हणते आहेस...

हेमांगी: प्रशांत मी आता काही बोलेण त्याचा राग नको मानूस... 

प्रशांत:बोल ना नाही मानत  राग.. काय बोलायचे आहे...

हेमांगी:  माझे शामल शी आजच बोलने झाले खूप प्रेम  करते तुझ्यावर ती... ऐण्ड  तुझ्या वागण्यावरुन पण  वाटते की तू पण  तेवढेच प्रेम करतो आहेस तिच्यावर... 

पण  शामल मात्र करियर ओरियेंटेड  मुलगी आहे तिला माहीत आहे तिला लाइफ मध्ये काय करायचे आहे ते... तिला शिक्षक व्हायचे आहे...ऐण्ड ते तिचे लहानपना पासूनचे स्वप्न आहे... मात्र तुझे काय तू तर 13 वी पास कसे होईल तुमचे तू किती ही चांगला असलास किवा तुझ्या घरचे किती ही चांगले असले तरी कोणी नुसत्या चांगूलपणाला आपली मुलगी नाही देत.... 

त्या साठी चांगले शिक्षण चांगली नोकरी पाहूनच विचार केला जातो... नुसते प्रेम असून नाही चालत ...

कोणते ही पालक आपली मुलगी देताना तिच्या सारखा उच्च शिक्षित किंवा तिला साजेसा नवरा मुलगा पाहतील... तू जेव्हा शामल च्या आई वडिलांकडे  शामलचा हात मागण्या साठी जाशील  तेव्हा काय सांगणार आहेस??.... ते का म्हणून  तुला मुलगी देतील  त्यांची....? 

समजतयं ना प्रशांत मी काय म्हणते आहे ते....

प्रशांत: हो गं ...समजतय सर्व मला शामलला विचारण्या  आधीच मी ह्या सर्व गोष्टींचा विचार केला होता.. तेव्हाच तिला विचारले... बघ शामल कडे अजून 2 वर्ष आहेत तिचे शिक्षण पूर्ण करायला तो पर्यंत मी माझे ग्रज्युएशन पूर्ण करीन ऐण्ड चांगली नोकरी मिळवीण.... मगच माझ्याआई वडीलांना तिच्या घरी रितसर बोलणी करायला पाठवेन...

माझ्या आयुष्यात काहि  ध्येय नव्हते त्यामूळे मी जरा मागे राहीलो ... पण  आता एकच ध्येय आहे ते म्हणजे शामल... ऐण्ड  ते  मिळवायला मी  कोणत्या ही प्रकारची मेहनत घ्यायला तयार आहे... माझ्यासाठी तिचा आंनंद...  तिचे सुख... ऐवढेच इम्पॉर्टंट आहे... तुझी  शामलसाठी  असणारी काळजी  पाहून खूप बरे वाटले...  पण तू नको काळजी करुस.... आता ती  माझी जबाबदारी आहे....

हेमांगी मी तुला वचन देतो मी तिचे काही ही वाईट होऊ देणार नाही तीची जी काही स्वप्न असतील ती मी पूर्ण करीन तिच्या शी रितसर  लग्न करीन ऐण्ड सुखाचा संसार करीन.....

प्रशांत:तू खूप चांगला विचार केला आहेस जसा बोलला आहेस तसाच वाग.... ऑल द बेस्ट तुमच्या दोघांच्या आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी....काहीही मदत लागली तर सांगा मला... मी नेहमी तुमच्या साठी ऊभी असेन.... जर मला समजले की तू शामल चे मंन दुखवलेस तर गाठ माझ्याशी आहे प्रशांत...

प्रशांत:  थँकू आमच्यासाठी तुमच्या शुभेच्छा खूप महत्वाच्या आहेत.... 

हेमांगी:माझ्या  शुभेच्छा सदैव असतील... बाय बोलू नंतर...

प्रशांत ने एका दमात सारं काही सांगितलं...

शामल:हुश्श्श्श्श्श्श्श्ह्श्श्श( सुटकेचा निश्वास घेतला) बर झाले पटले तिला.....

प्रशांत:  फारच डेंजर आहे तुझी मैत्रीण ...

शामल :  शेवटी मैत्रिण आहे कोणाची ??? (हसते)

प्रशांत : अजून  काय काय डेंजर गोष्टिंचा सामना करावा लागतोय तुझ्या  सोबत काय माहीत...आणि जोरजोरात हसतो...

शामल: काही  डेंजर नाही   ओके.... पण प्रशांत जसे बोलला आहस तसेच वाग तरच सर्व ठिक होईल.

प्रशांत:हो ग राणी तसेच करायचे आहे...

शामल: गुड.... चल मी तुला  नंतर फोन करते... पाहिले त्या हेमांगी च्या बच्चीला बघते माझ्या प्रशांत ला धमकी देते काय...??

प्रशांत :ओय तिला नको काही बोलू.... छान आहे ती... 

शामल :अरे व्हा ती कधी पासून छान झाली...????

प्रशांत :माझ्या शामलची बेस्ट फ्रेंड आहे ती तिला काळजी वाटते  तीची... तिच्या बॉयफ्रेंड् ची ????????????

शामल:बर बर ठिक आहे तिच्याशी बोलते जरा ओके

प्रशांत :ओके ठिक  नंतर बोलू आपण.....

प्रशांत बरोबर बोलून होताच शामल हेमांगी ला फोन लावते...

शामल: ( हेमांगी हेलो बोलण्याआधीच) थँक्स डियर...love u jaan ....

हेमांगी: बापरे! (आश्चर्य व्यकत करत) काय झाल काय सांगशील का???मी काय केलं...

शामल: प्रशांत ने मला सांगितलं सर्व तू त्याच्याशी बोललीस त्याला ही आवडल तुझी माझ्याबद्दल अशी काळजी पाहून...आता तरी तुझा होकार आहे न ...प्रशांतशी बोलून झाल्यावर....

हेमांगी: (हसते)... चांगला मुलगा आहे गं फक्त मला तुझी काळजी वाटली म्हणून जरा...

शामल: माहित आहे गं...त्याने आता सांगितलय तो आमच्या लाईफबद्दल सिरियस आहे...आणि पुढचा सगळा विचार करून ठेवलाय त्याने...

हेमांगी: होप सो तो जसं म्हणतोय तसच होऊ दे...

शामल: अगदी तसच होईल गं...चल ठेवते आता बोलू नंतर बाय...
हेमांगी: चल बाय....

चला एक प्रॉब्लेम तर सॉल्व झाला...पण आता पुढे काय?? प्रशांत आपले दिलेले शब्द पाळेल??? की अजून एखादी परिक्षा बाकी आहे शामल आणि प्रशांत च्या आयुष्यात पण ते जाणून घ्यायला आपल्याला पुढच्या भागाची वाट पहावी लागेल...तुमच्या साठी पुढचा भाग नक्की लवकर घेऊन येईन तोपर्यंत सायोनारा...
तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Shital Prafful Thombare

Teacher

आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते

//