Feb 29, 2024
नारीवादी

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 75

Read Later
काटेरी वाटेवरून चालताना... भाग 75

काटेरी वाटेवरून चालताना भाग 75

आधीच्या भागात आपण पाहिले की,

आनंदीच्या लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती, संगीतचा कार्यक्रम झाला, मेहंदी पण झाली. आता दिवस उजाडला लग्नसोहळ्याचा. सकाळी सगळे पहाटे उठून आवरायला लागले. आनंदीने पण सकाळी उठून अंघोळ करुन पूजा केली. त्यानंतर ती तयार झाली. जसा जसा वेळ सरकत होता आनंदीची धडधड वाढत होती. आनंद होत होता पण ती तेवढीच अस्वस्थ होती.

आता पुढे,


लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती. नवरदेव ही घोड्यावरून आलेला होता. नवरदेव स्टेजवर आला, पंडितजीने नवरीला पण बोलवायला सांगितले. काही क्षणात नवरी स्टेजवर आली. मंगलाष्टका सुरू झाले, मंगलाष्टक संपल्यानंतर नवरदेव नवरीने एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालायचे होते. पण निनादने हार घालण्यास नकार दिला. सगळे एकमेकांकडे बघायला लागले, पाहुण्यांची कुजबूज सुरू झाली. आनंदी निनादला 

“तुम्ही काय बोलताय तुम्हाला तरी कळतय का? हार घाला निनाद.”
आनंदीच्या बोलण्यावर निनादने काहीच रिऍक्ट केलं नाही. तो फक्त उभा होता. स्टेजवर, स्टेजच्या खाली सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. निनादची आई समोर आली.

“निनाद काय झालं? हार घाल आनंदीला, मुहूर्त टळतोय.” आई बोलली तरी तो गप्पच होता. निनादचे बाबा आले. त्यांनी सांगितलं तरी निनाद गप्पच होता.


शेवटी आनंदीला आवरलं नाही आणि ती बोलली.

“निनाद काय झालं? हार का घालत नाही आहात, हार घाला निनाद.”

आता मात्र निनाद बोलायला लागला,

“मला आनंदीशी लग्न करायचं नाहीये, मला या मुलीशी लग्न करायचं नाहीये. निनादने स्पष्ट केलं.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.

“काय..” आनंदीने आश्चर्य व्यक्त केलं.
पुन्हा सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघू लागले आणि त्यांच्यामध्ये कुजबुज सुरु झाली.

निनादची आई
“तुला कळतय का तू काय बोलतोस? काय झालं अरे? हाल घाल, लग्नाची वेळ टळतेय. शुभ वेळी अशुभ बोलू नकोस.”

“आई मी अशुभ बोलत नाहीये, मला खरंच या मुलीशी लग्न करायचं नाहीये.”

तितक्यात निनादचे बाबा समोर आले,

“या मुलीशी या मुलीशी काय बोलतोस, आनंदी तिचं नाव आहे ती होणारी बायको तुझी. काय झालं तू असा का वागतोस? हार घाल आता, इथे वेळ घालवण्याची वेळ नाहीये.” असं म्हणून बाबा त्याला रागवले.


“बाबा मला हिच्याशी लग्न करायचं नाहीये. कुणी कितीही सांगितलं तरी मी या मुलीशी लग्न करणार नाही. हे माझं ठरलेल आहे.”

हे सगळं ऐकून आनंदीला रडायलाच आलं, तिच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.

निशा समोर आली,

“ निनाद काय बोलत? काय झालं? का अस लग्नाला नकार देताय. याच कारण मला कळेल का आणि अस हे वेळेवर कुणी करत नाही, काय झालं? असं काय घडलं?”


“हे बघा काकू मला खरंच लग्न करायचं नाहीये.” असं म्हणून त्याने डोक्यावरचा टोप काढला आणि तो जाण्याकरिता निघाला. विक्रमने त्याचा हात पकडला,

“एक मिनिट निनाद, तू असा जाऊ शकत नाहीस. तुला आम्हाला कारण सांगावेच लागेल. माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊन असा तू तिला सोडून जाऊ शकत नाहीस. काय झालं काय नाही आम्हाला कळल्याशिवाय आम्ही तुला इथून जाऊ देणार नाही.” असं म्हणून विक्रमने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला.

निनादने त्याचा हात सोडवण्याचा खूप प्रयत्न केला आता निशा आणि आनंदी त्याच्यामागे ठामपणे उभ्या राहिल्या.

“आम्हाला कारण समजल्याशिवाय आम्ही तुला जाऊ देणार नाही आहोत.” निशा बोलली.

“अच्छा ऐकून घ्यायचं का तुम्हाला कारण, तर मग ऐका. अशा कॅरेक्टरलेस मुलीसोबत मला लग्न करायचं नाहीये.

“निनाद ..” विक्रमने जोरात निनाद म्हणून त्याच्यावर हात उचलला.
“माईंड युवर लैंग्वेज, तू काय बोलतोस तुला तरी कळते का? तुझी होणारी बायको आहे ती.” विक्रम


“नाही ती माझी होणारी बायको नाहीये, अशा मुलीसोबत मी कधीच लग्न करणार नाही जी कॅरेक्टरलेस आहे. तुमची मुलगी लग्नाआधी माझ्या सोबत झोपू शकते तर ती कुणासोबतही काहीही करू शकते. मला अशा मुलीसोबत लग्न करायचं नाहीये.” निनाद भडाभडा सगळं बोलून गेला.

“निदान डोक्यावर पडलास का तू? काय बोलतोस तू तुला तरी कळतय का?” विक्रम

“मला नीट कळते मी काय बोलतो. मी पूर्ण शुद्धीत आहे आणि जे काही बोलतो ते खर आहे.” निनादने भुवया उंचावल्या.
विक्रमने त्याच्या गालावर जोरात थापड मारली तसा निनाद विक्रमवर ओरडला.

“तुम्ही कितीही ओरडलात तरी सत्य बदलणार नाही. तुमची मुलगी चरित्रहीन आहे.  विचारा ना तिला तिने काय केलं, लग्नाआधी जे करायला नको ते तिने केले, विचारा तिला.”
आनंदीकडे बघून
“बोल ग काय केलस तू? सांग तुझ्या बाबांना, तुझ्या बापाची लाडकी आहेस ना तू, सांग काय गुल खिलवलेस ते.”
“निनाद तुम्ही काय बोलताय ते सगळं तर..” आनंदी बोलता बोलता थांबली. तिला कळलं आता इथे काहीही बोलून अर्थ नाही. कुणीही आपल्यावर विश्वास ठेवणार नाही, आता आपण काहीही करू शकणार नाही, म्हणून ती शांत उभी राहिली.

निशा तिच्याजवळ आली,

“आनंदी बोलता बोलता का थांबलीस? बोल बोल, या व्यक्तीने तुझ्यासोबत काही चुकीचे केले का? सांग सगळ्या जगाला ओरडून की तू चुकीची नाहीये. बोल आनंदी बोल.”
आनंदी गप्पच होती.

“आनंदी बोलत का नाहीस? बोल ना, काय झालं? कुठे गेला होतात का तुम्ही? काय झालं सांग ना. याने जबरदस्ती केली का तुझ्यावर?”

आनंदी  काहीच बोलायला तयार नव्हती,  निशा तिच्या छातीवर हात ठोकून ठोकून रडायला लागली.

“बोल ग, जीव देशील का माझा? बोल ना. असं म्हणत निशा जोरजोरात रडायला लागली.


निनाद काहीही न बोलता तिथून निघून गेला, त्याच्या मागोमाग त्याच्या आई बाबा पण तिथून निघून गेले. आणि मूलाकडचे सगळे पाहुणे एकामागोमाग एक निघून गेले. आनंदी तिच्या जागेवर खाली बसून रडायला लागली.

विक्रमने सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करून जायला सांगितले. निशा हतबल होऊन बसली.

विक्रमने निशाच्या डोक्यावर हात ठेवला.
भर लग्नमंडपात मुलीचं लग्न मोडलं ही छोटीशी गोष्ट नव्हती. त्याचा त्या दोघांनाही खूप त्रास झाला. बराच वेळ शांतता पसरली होती. आधी कोणी काहीच बोललं नाही.

प्रिन्सि धावत आनंदीकडे आली, तिने तिला सावरलं.  आणि तिला सगळे विचारले,

“मला काही सांगणार होतीस तू पण मला काहीच बोलली नाहीस. काय झालं होतं? त्याने काही केलंय का तुझ्या सोबत?”


“आनंदी तरीही गप्पच होती.

“आनंदी गप्प बसू नकोस, गप्प राहण्याची वेळ नाही आहे  तुझ्यासोबत जर काही चुकीचं झाल असेल तर तू बोल. असं गप्प बसून चालणार नाही. आज त्याने तुझ्यासोबत असं केलं, उद्या तो चार मुली सोबतही असा करू शकतो.


आनंदी प्रिंसीच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडायला लागली, तिने निनाद हॉटेलमध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर जे काही घडलं ते सगळं सविस्तर पणे सांगितलं.


“काय..? इतक सगळं घडलं आणि तू मला सांगितलं  देखील नाहीस.”

“प्रिन्सि मी मुद्दाम काही केलं नाही ग, तो मला तिथे घेऊन गेला होता. मी नाही नाही म्हणत असताना त्याने मला हॉटेलवर नेले. मी काहीच केलं नाही.” आनंदी तिचे डोळे पुसत बोलली.


आनंदी तुझ्या लक्षात येतंय का? हा सगळा त्याचा डाव होता, त्याने फसवलं तुला.” प्रिन्सि

“आता काय करायचं? मला काहीच कळत नाही आहे, आई बाबांना कळलं तर? ते काय विचार करतील माझ्याबद्दल?” आनंदी

“हे बघ आनंदी, आता ही वेळ घाबरायची किंवा गप्प बसण्याची नाहीये. तुला तुझ्या आई बाबांना सगळं सांगावच लागेल.”

प्रिन्सिने तिला धीर दिला, आनंदी सगळ सांगायला तयार झाली.

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//