काटेरी वाटेवरून चालताना...भाग 69

Abhijit nayar

काटेरी वाटेवरून चालताना भाग 69


आधीच्या भागात आपण पाहिले की,


आनंदीला कॉलेज कॅम्पस थ्रू जॉब मिळाला. सगळ्यांना खूप आनंद झाला. पहिल्या दिवशी विक्रमने तिला ऑफिसला नेऊन दिलं. दिवसभराचं काम निपटवून आनंदी घरी आली, तर घरी लॉक होता. ती थोडी कंटाळली पण थोड्या वेळाने विक्रम आणि निशा घरी आले.

निशाला रात्री झोप लागेना, का कुणास ठाऊक ती विचारत होती. पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. तेच निशाने तिला उठवलं आणि तिला ऑफिसला पाठवलं. ऑफिसला गेल्या नंतर हरीश काकांनी तिला कॉफी दिली, तिला हरीश काका बोलण्यातला नम्रपणा खूप आवडला.


आता पुढे,

थोड्या वेळाने हरीश काका पुन्हा तिच्या टेबल जवळ आले.
“काका आता मला काही नकोय.”

“मी तुम्हाला काही द्यायला आलेलो नाही आहे, सरांनी तुम्हाला बोलावलं.”

आनंदी थोडी घाबरली कारण तिने तिच्या सरांबद्दल खूप काही ऐकलं होतं.

अभिजीत नायर तिच्या बॉसचं नाव, उंचपुरा, हट्टाकट्टा तीस वर्षाचा मुलगा, दिसायला हँडसम, गोरा रंग, उंच बांधा, चाफेकळी नाक, कर्ली केस असं अजून काही वर्णन तिने सगळ्यांकडून ऐकलं होतं. अभिजीत खूप कडक आहे, त्याला कामात चुका आवडत नाहीत. आणखी बरंच काही ऐकलं होतं. ती घाबरत घाबरत अभिजीतच्या केबिनकडे गेली.

“मे आय कम इन सर?”
“एस.”

आनंदी आत गेली,
“सर तुम्ही मला बोलावलंत?”

“प्लिज हॅव अ सीट.”

“नो थँक यु सर.”
“मिस आनंदी बसा.” 
आनंदी घाबरतच समोरच्या चेअरवर बसली.
“सर बोला ना काय काम होतं?”

“हो, मला त्या मेहता कंपनीच्या फाईल विषयी तुझ्याशी डिस्कस करायचं होतं. रीड केली का ती फाईल?”

“हरीश काकांनी मला आणून दिली पण मी अजून रीड केलेली नाहीये.”

“ओके, त्याचे टेंडर मला बघायचे आहेत. तू एकदा  पूर्ण चेक कर आणि त्याच्यातले अकाऊंट टॅली करून तुला जर ते ओके वाटत असेल तर मला सांग आणि त्यात तुला काही चेंज हवे असतील तर तेही कळवं आपण इतरांशी बोलून फायनल करूया.”


“चालेल, सर मी निघू?”
“बसा तुम्ही थोडा वेळ.” अभिजीतने फोन वरून दोन कॉफी सांगितली.

“एक्सक्युज मी सर, इफ यु डोन्ट माईंड मी आत्ताच कॉफी घेतलेली आहे तर आता पुन्हा..”

ती समोर काही बोलणार अभिजीतचा बोलला.

“इट्स ओके, काही हरकत नाही यू मे लिव्ह नाऊ.”

“थँक यु सर.” आनंदी केबिन बाहेर गेली, तिच्या डेस्कवर जाऊन बसली.

केबिनमध्ये गेल्यानंतर तिला जे टेन्शन आलं होतं ते टेन्शन आता कमी झालं. ती रिलॅक्स होऊन बसली. तिच्या बाजूला पस्तिशीची बाई बसलेली होती. तीही तिथेच काम करत होती.

“हलो आनंदी, मी रेवा.”

आनंदीने स्माईल केली आणि तिला हाय केलं.

“काय ग सरांच्या केबिनमध्ये गेली होतीस?” रेवाने विचारलं.

आनंदीने होकारार्थी मान हलवली.
“काय म्हणाले सर?” रेवा
“काही नाही थोडं कामाच बोलायला बोलवलं होतं.” आनंदी
“मग मी कुठे म्हटलं की पर्सनल बोलायला बोलवलं होतं.” असं म्हणून ती हसायला लागली.

आनंदीचा चेहरा लगेच उतरला.
“अगं गंमत केली, टेन्शन काय घेतेस? गंमत केली मी तुझी.” तस पुन्हा आनंदीच्या चेहऱ्यावर हास्य आलं.

“आनंदी तुला एक सांगू का? तुझ्याकडे चान्स आहे. माझं लग्न झालंय, त्यामुळे माझ्याकडे चान्स नाही आहे. तू समोर काही करू शकतेस” अस ती अडखळत आनंदीला चिडवण्याच्या भाषेमध्ये बोलली. 

“अहो ताई तुम्ही काय बोलताय?”
रेवाने डोक्यावर हात ठेवला,


“केलंस ना, मला म्हातारी केलंस ना. अग फक्त रेवा म्हण मला. किती वय वाढवणार आहेस माझं. अग रेवा ताई म्हटलं ना की मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतं. आता वय वाढवू नकोस.  लग्न झाले मुलं झाले म्हणून एकदम वयस्कर नाही झाले मी. असं म्हणून तिने तिच्या केसावरून हात फिरवला आणि हसायला लागली.


तिचं हसणं बघून रेवा आणखी हसायला लागली. आता रेवाशी आनंदीची छान गट्टी जमली. दोघ्याही छान गप्पा मारायच्या. दोघ्या सोबतच डबा शेअर करायच्या. कामाचं बोलण झाल्यानंतर दोघ्याही एकमेकींशी त्यांच्या घरचं, बाहेरचं इतरही गोष्टी करायच्या. दोघींच छान जुळायला लागलं होतं. सर्व काम निपटवून आनंदी घरी आली.


आज तिला घरी निशाला खूप काही सांगायचं होतं, काय सांगू नी काय नाही असं झालं होतं.


घरी आल्या आल्या ती निशाला बिलगली,

“आई आज माझा दिवस खुप छान गेला.”
निशाने आनंदीला बाजूला केलं
“अरे वा, स्वारी तर आज खूप खुश दिसत आहे. काय ग एवढा कसला आनंद? एवढं काय घडले? ऑफिसमधून आल्यानंतर थकन्या ऐवजी आनंद दिसतो तुझ्या चेहऱ्यावर.”

“काही नाही ग आई, माझा दिवस छान गेला. माझ्या बाजूला ती रेवा बसते ना ती खूप छान आहे, खूप क्युट आहे. लग्न झाले आहे तीच.” आनंदी

“नाव काय घेतेस मोठी आहे ना तुझ्यापेक्षा.”

“चालते ग तिनेच मला सांगितलं की मला ताई वगैरे म्हणायचं नाही, मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतं, वयस्कर झाल्यासारखं वाटतंय. तू मला फक्त रेवा म्हण आणि आई तुला माहित आहे आमच्यात छान मैत्री पण झाली. आज आम्ही खूप गप्पा मारल्या. दोघींनी डबे पण शेअर केले. खूप छान वाटलं मला.” आनंदीने अगदी उत्साहात सांगितलं.


“चला तुझा दिवस छान गेला ना मग सगळं सार्थकी झालं. आता असच छान काम करत राहायचं आणि स्वतःची प्रगती करायची.” निशा

“आई आधी मी खूप घाबरले होते, सरांनी मला केबिनमध्ये बोलावलं होतं ना. त्यांच्या बद्दल खूप काही ऐकले होते की ते खूप कडक आहेत, शिस्तप्रिय आहेत, त्यांना सगळं वेळच्यावेळी हवं असतं, थोड्याही चुका चालत नाही आणि त्यांना परफॉर्मन्स चांगला हवा असतो. त्यांच्याबद्दलचा खूप काही ऐकून मी खूप घाबरले होते. त्यांच्या केबिनमध्ये गेले ना त्यांनी मला खूप छान वागणूक दिली.”


“चला म्हणजे एकंदरीत तुझं सगळ छान झालं.”.
“हो आई.”

“जा तू फ्रेश होऊन ये, मी तुला काहीतरी खायला देते.”

आनंदी फ्रेश झाली, तिने नाश्ता केला आणि तिच्या रूम मध्ये गेली. थोड्यावेळात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. आनंदीने बघितलं एक वेगळा नंबर होता. फोन उचलु कि नाही या अविर्भावात तिने फोन उचलला.
“हलो.” आनंदी
“हॅलो, कोण बोलतंय?”
“आनंदी बोलते, आपण कोण?”

“आनंदी, अभिजीत नायर बोलतोय.”

“सॉरी सर, सॉरी तुमचा नंबर सेव नव्हता ना त्यामुळे मला कळलं नाही की तुमचा कॉल आहे. बोला ना सर काही काम होतं का?”

“हो, कामाव्यतिरिक्त मी कुणाला कॉल करत नाही. मला मेहताची फाईल अजून मिळालेली नाही. काय झालं त्याच? तुम्ही ऑफिसमधून आज लवकर गेलात, मी तुमच्या डेस्क जवळ आलो होतो तुमच्याशी बोलायला पण तुम्ही तिथे नव्हताच.”

“सॉरी सर, काम व्हायचे अजून.”
“का? का नाही झाले अजून?”

“सर माझ्या लॅपटॉपच्या सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळे ती फाईल मेल होत नव्हती. सर तुमचं काम करून देते मी डोन्ट वरी.”

“ओके लॅपटॉपचा कारण सांगता आहात म्हणून ठीक आहे, नाहीतर मला कामात दिरंगाई केलेली आवडत नाही.”

“हो सर, मला माहित आहे आणि माझ्याकडून कधी अशी चूक होणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा उद्या आले की मी हे काम करून देते.”

“ओके गुड नाईट.”
“गुड नाईट सर.” आनंदीने फोन ठेवला. नंतर तिच्या लक्षात आले की उद्या तर संडे आहे आणि मी उद्या सांगितलं. अरे देवा आता मला पुन्हा फोन लावावा लागेल. तिने अभिजीतला फोन केला आणि सांगितलं.
“सर सॉरी उद्या संडे आहे आणि मी तुम्हाला उद्या बोलली.”

“इट्स ओके, मी माझ्या घरचा ऍड्रेस तुम्हाला सेंड करतोय, तुम्ही उद्या माझ्या घरी या आणि ते काम पूर्ण करून द्या.” असे म्हणून त्याने फोन ठेवला. आनंदी मात्र विचारात पडली.


क्रमशः

🎭 Series Post

View all