काटेरी वाटेवरून चालताना... भाग 65

Anandine vikramla baba mhnun hak marli.

काटेरी वाटेवरून चालताना भाग 65


आधीच्या भागात आपण पाहिले की,


आनंदीने खूप मेहनत करून तिचे इंजीनियरिंग कम्प्लीट केलं. आता तिला समोरचं शिक्षण घ्यायचं होतं. तिने एमबीए ची तयारी केली. त्यासाठी इन्ट्रान्स पास होऊन तिला ऍडमिशन मिळाली.
घरापासून कॉलेज दूर असल्यामुळे तिने हॉस्टेलवर राहायची इच्छा दर्शवली. विक्रमने परमिशन दिली पण निशाच्या मनाला ते पटत नव्हतं. तिथे सगळे असतील पण तिची काळजी घ्यायला मी नसेल हा विचार तिच्या मनात येऊन गेला.

आता पुढे,

“काय झालं निशा? का इतकी अपसेट आहेस? विक्रमने तिला विचारलं.


“मी आनंदी पासून कधीच लांब राहिलेले नाहीये. तिथे तिच्या सगळ्या मैत्रिणी असतील पण तिथे मी नसेल, माझ्याशिवाय ती कशी राहू शकेल?” निशा

“तिला सवय होईल तुझ्याविना राहायची.” विक्रम 

“पण मी तिच्याशिवाय कशी राहील? एक क्षण तिच्या बद्दल विचार जात नाही, ती मोठी झाली तरी माझ्यासाठी ती लहानच आहे. मनात तिचेच विचार घोळत असतात, काळजी लागलेली असते.” निशा

“कधी ना कधी हे होणारच होतं, आज आनंदी शिक्षणासाठी जाते आहे उद्या लग्न होऊन सासरी जाईल, मग काय करशील? बिन लग्नाची ठेवशील?” असा म्हणून विक्रम हसायला लागला.

“हसण्यावारी नेऊ नकोस विक्रम.” निशा चिडली.

“सॉरी खरच सॉरी पण तुला खरं सांगू का? तिला जाऊदे, तिला वातावरण चेंजेसची गरज आहे. तिला बाहेरचं जग बघू दे, काही अडथळे आले तर त्याच्याशी तिला लढू दे. तिच्या पंखांना बळ देऊन तिला उडायला शिकू दे. निशा तुज जर तिचे पाय दाबून ठेवलेस ना तर ते जमिनीवरच रेंगाळत राहील. आपल्याला तिला जमिनीवर ठेवायचे नाही आहे, तिला उंच आकाशात भरारी घेऊ दे, तिच्या पंखांना बळ दे. तुला भीती आहे ती परतून येणात नाही याची. ती तिच्या घरट्यात नक्की परत येईल. माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला वाटते तू ही ठेवावास.” विक्रमने तिला समजावलं.


निशा आनंदीला हॉस्टेलवर ठेवायला तयार झाली. ती आनंदी जवळ गेली,

“आनंदी झाली का तुझी पॅकिंग?”
निशाला असं बोलताना बघून आनंदी समजून गेली कि आईने परमिशन दिली आहे. तिला खूप आनंद झाला ती लगेच बेडवरून उठून आईला जाऊन बिलगली. 

“थँक यु सो मच आई. यु आर माय बेस्ट आई.”


“थँक्यू मला नाही विक्रमला बोल. हे सगळं त्याने केलंय. त्यानेच मला समजावून सांगितले, माझं मन तयार होत नव्हतं. तू माझ्यापासून दूर गेलेली मला बघवणार नाही ग. पण विक्रमने खूप सपोर्ट केला तो आहे म्हणून आज हे सगळं शक्य झालं. तुला जर खरच थँक यु म्हणायचं असेल तर त्याला जाऊन बोल.”

“ओके आई.” असं म्हणत आनंदी रुमच्या बाहेर गेली.
ती विक्रमच्या खोलीत गेली, विक्रम पुस्तक वाचत बसलेला होता.


आनंदी आत गेली, त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
“बाबा...” त्याच्या कानावर हा शब्द पडताच तो दचकला आणि त्याने लगेच वळून बघितले.


“काय म्हणालीस तू? पुन्हा एकदा बोल.”

“बाबा..”
“विक्रम भावुक झाला.
“पुन्हा एकदा म्हण ना.”
“बाबा...”
आनंदी मला ना हा शब्द ऐकतच राहावंसं वाटतोय. तू किती मोठा आनंद दिलास मला.


“बाबा थँक यु. तुम्ही आईला सांगितलंत, तिने मला परमिशन दिली. थँक यु.” आनंदीने विक्रमचा हात पकडला. तुम्ही खूप छान आहात. मी तुमचा कधीच अपेक्षाभंग करणार नाही.”
दोघांचा सवांद झाला आणि आनंदी तिथून निघून गेली.

आठ दिवसानंतर आनंदीला होस्टेलवर नेऊन पोहोचवलं एक दिवस निशा तिच्या सोबत तिथे राहिली. तिच्या मैत्रिणीशी ओळख करून घेतली, तिथलं वातावरण बघितलं, तिथल्या वॉर्डनशी ओळख करून घेतली. सगळं झाल्यानंतर निशा घरी परत आली.

आज घरात आल्यानंतर तिला निरव शांतता जाणवत होती. दिवसभर घरभर फिरणारी आनंदी नव्हती. तिला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तिला आज घर रिकाम वाटत होतं.
दुसऱ्या दिवशी पासून पुन्हा तेच रुटीन सुरू झालं. दोघे ऑफिसला जायचे आणि निर्मला एकटी घरी असायची.
आनंदीच कॉलेज सुरू झालं, ती विक्रमला फोन करायची. त्याच्याशी बोलायची. आता ती निशासोबत कमी आणि विक्रमशी जास्त बोलायची. याचं निशाला वाईट वाटायचं. विक्रमशी फ्रेंडली नातं झालं होतं. ती विक्रमशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची. कॉलेजच्या गमती जमती सांगायची, अभ्यास सांगायची, कुठे गेली होती, काय करत होती सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विक्रमला सांगायची. निशाशी काही शेअर करायची नाही याचं तिला खूप वाईट वाटायचं.

असेच काही दिवस गेले. कॉलेजमध्ये आनंदीला एका मुलाने प्रपोज केलं. तो मुलगा तिच्या क्लासचा होता, पण ती कधी त्याच्याशी कधी बोलली नव्हती, कधी बोलण्याचा योग आला नव्हता. अचानक तो एक दिवस आनंदी समोर येऊन उभा राहिला आणि तिला बोलला.

“आनंदी आपण एकाच क्लासमध्ये आहोत पण आपण कधी एकमेकांशी बोललेलो नाही. पण मी तुला रोज बघतो, तुझं हसणं.. तुझं बोलणं.. तुझं वागणं... तुझं चालणं.. तुझे ते  नाशिले डोळे, गालावरची खळी, ओठावरची तीळ.. सगळ सगळ मला खूप आवडतं. आनंदी मला तू खूप आवडतेस, माझ्याशी लग्न करशील का?”

खरं तर हे सगळं ऐकून आनंदी स्तब्ध झाली कारण तिला त्या मुलाचं नाव देखील माहिती नव्हतं. त्यामुळे आनंदी त्याला बोलली,

“पण आपण तर एकमेकांना ओळखतही नाही.”

“आनंदी मला माहित आहे तू मला ओळखत नाही पण मी तुला पूर्णपणे ओळखतो, ओळखतो म्हणजे तुझा स्वभाव वगैरे नाही म्हणत आहे मी पण तुझ्याविषयी मला पूर्ण कल्पना आहे. आणि राहिला प्रश्न माझ्याविषयी तर मी तुला माझा परिचय देतो.
मी राजीव कुलकर्णी. तुझ्याच क्लास मध्ये शिकतोय, कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी चांगल्या पोस्टवर काम करेल यात शंका नाही. माझ्या घरी माझे आई-वडील, माझा एक भाऊ आणि लहान बहीण एवढं छोट कुटुंब आहे. बाबा बिझनेसमन आहेत, आई गृहिणी आहे, मोठा भाऊ इंजिनियर झालाय मोठ्या हुद्द्यावर काम करतो. लहान बहीण मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे. माझा प्रश्न मी तुला पुन्हा विचारतोय
माझ्याशी लग्न करशील?”

“राजीव मी तुला आता उत्तर नाही देऊ शकत, मला विचार करायला वेळ हवा आहे.”

“येस ऑफकोर्स, तू तुला हवा तितका वेळे घे. त्यानंतर दे तू तुझं उत्तर, चालेल मला. जेवढा निवांत वेळ हवा असेल तेवढा घे. निवांत विचार कर, शांतपणाने विचार कर आणि त्यानंतर माझ्याशी बोल आणि हो तुला कुणाशी डिस्कस करायचं असेल तर तेही करू शकतेस. मी माझा बायोडाटा तुला दिलाय, फोटो हवा असेल तर मोबाईल नंबर दे फोटो सेंड करतो.” असं म्हणून तो हसला.

आनंदीने त्याला तिचा मोबाईल नंबर दिला. त्याने फोटो सेंड केला. आनंदी होस्टेलवर आली, तिने लगेच तो फोटो विक्रमला सेंड केला. त्याला फोन केला आणि सगळी घटना सांगितली. विक्रम त्यावर तिला फक्त एवढेच बोलला की,
“तू आता फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आपण याचा विचार नंतर करूया.” हे सगळं त्यांचं बोलणं निशाने ऐकलं. विक्रम फ्रेश व्ह्यायला गेलेला असताना निशाने विक्रमचा मोबाईल चेक केला. त्यात तिला त्या मुलाचा फोटो दिसला आणि आनंदी- विक्रमचं कन्वर्सेशन दिसलं. निशाला आता भयंकर राग आला, ती बेडवर एका साईडने जाऊन झोपली.


विक्रम फ्रेश होऊन आला,
“अरे निशा तू झोपली सुद्धा इतक्यात.”
निशाने काहीच उत्तर दिले नाही.


विक्रमला थोडं विचित्र वाटलं कारण निशा पडल्यापडल्या झोपत नाहीये त्याला माहिती होतं. त्याने पुन्हा आवाज दिला.
“निशा झोपलीस का?”
ती काहीच बोलली नाही, शेवटी त्याने तिच्या जवळ बघितल तर तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्याला बघताच तिने डोळे बंद केले आणि कुस बदलुन झोपली.

क्रमशः

🎭 Series Post

View all