काटेरी वाटेवरून चालताना... भाग 56

Tuzya ajubajula barych chandnya aslya tri tya dur ahet

काटेरी वाटेवरून चालताना भाग 56


आधीच्या भागात आपण पाहिले की,


ऑफिसमध्ये लेटर आलं, लोणावळाच्या फ्लाईटच्या तिकीट्स आल्या होत्या.
निशाने आदल्या दिवशीच सगळी पॅकिंग करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सकाळी निशाला घ्यायला दारासमोर गाडी आली आणि ते निघाले.


 निशा फ्लाईट मध्ये पहिल्यांदा बसली होती, ती खूप घाबरली. तिने विक्रमला घट्ट पकडलं पण नंतर  स्वतःला सावरलं.
हॉटेलवर पोहोचले, दोन रूम बुक केल्या होत्या पण एकच रूम मिळाली.

आता पुढे,


निशा विक्रमकडे बघतच राहिली, दोघे काही वेळ तसेच उभे राहिले. त्यानंतर विक्रमने चावी घेतली आणि दोघे रूममध्ये गेले. तिथे बॅग ठेवून,

“निशा तुम्ही फ्रेश होऊन जा, मी बाहेर थांबतो.” विक्रम
“नाही सर तुम्ही इथे थांबा, मी आत वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होते.” निशा


“अगं नाही नाही,  उगाच तुला ऑक्वॉर्ड व्हायला नको. तू पहिल्यांदाच अशी माझ्याबरोबर बाहेर आलीस, उगाच माझ्यामुळे तुला त्रास नको. मी खाली वेटिंगमध्ये बसतो, तू फ्रेश हो मग आपण बाहेर लंचला जाऊया.” असं म्हणत विक्रम बाहेर गेला.


निशा फ्रेश झाली, तिने ड्रेस चेंज केला आणि छान तयार होऊन खाली गेली.
“सर आय एम रेडी, तुम्ही फ्रेश होऊन या, मी थांबते.” निशा

“ओके.”

निशा खाली बसली आणि विक्रम फ्रेश व्हायला गेला, तो थोड्यावेळाने फ्रेश होऊन आला.


दोघेही बाहेर लंचला गेले. निशा खूप वेगळं फील करत होती. आज कितीतरी वर्षांनी अशी कुठेतरी कुणातरीसोबत ती बाहेर आलेली होती. त्यामुळे तिला खूप वेगळं वाटत होतं आणि भितीही वाटत होती. ती घाबरत घाबरत आजूबाजूला बघत होती. तिची भिरभिरणारी नजर विक्रमने ओळखली.

“काय झाले निशा? काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला?” विक्रम
“नाही सर काही नाही.” निशा

“मग इकडे तिकडे काय बघताय?” विक्रम
“नाही सर काही नाही.” निशा

“मला माहितीये तुम्ही पहिल्यांदाच बाहेर पडलात ना म्हणून तुम्हाला विचित्र वाटत असेल. आणि हे माझं रोजचंच काम आहे, मी नेहमी बाहेर कॉन्फरन्सला जात असतो. त्यामुळे मला सवय झालिये तुम्हाला पण लवकरच सवय होईल आणि नाहीच झाली तर लावून घ्या.” विक्रम

निशाने स्मितहास्य केलं.
जेवणाच्या डिश आल्या, दोघांनी जेवण केलं आणि कॉन्फरन्ससाठी निघाले.


मीटिंग संपेपर्यंत रात्र झाली. फ्लाइट दुसऱ्या दिवशी सकाळी असल्यामुळे त्यांना रात्रभर थांबणे भाग होते.
दोघेही रात्री हॉटेलवर गेले. निशाला चेंज करायचं होतं. तिला पुन्हा ऑक्वॉर्ड वाटलं, विक्रमला ते कळले आणि तो बाहेर गेला. 
निशा फ्रेश झाली, चेंज केलं. थोड्या वेळाने विक्रम रूममध्ये आला, त्याने एक उशी आणि पांघरून घेतलं आणि तो बाहेर जायला निघाला.
“सर एक मिनिट, तुम्ही कुठे चाललात?” निशा
“मी साईडला बालकनी आहे तिथे झोपतोय, तुम्ही निवांत झोपा इथे.” विक्रम

“नाही नाही सर, असं काय करताय? कोणी बघितले तर काय विचार करतील? नाही नाही तुम्ही इथे वरती बेडवर झोपा, मी खाली जमिनीवर झोपते.” निशा

“नाही निशा तुम्ही वर झोपा मी बाहेर झोपतो.” विक्रम
“नाही सर, प्लिज असं करू नका. मला वाईट वाटेल. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. प्लिज तुम्ही बेडवर झोपा. मला खाली झोप येईल. प्लिज, प्लिज सर.” निशाने रिक्वेस्ट केली म्हणून विक्रम रूममध्ये झोपायला तयार झाला.

दोघे आपापल्या जागेवर झोपले, निशाला काही झोप लागेना. ती बराच वेळ जागी होती, तिला झोप येत नव्हती म्हणून ती उठली आणि बालकणीत जाऊन उभी राहिली.
बाहेर काळ्याभोर आकाशात तो चंद्र तिच्याकडे बघून बघत होता. त्याच्या आजूबाजूला बऱ्याच चांदण्या होत्या पण असं वाटत होतं जणू तो निशावर हसतोय,


‘बघ माझ्या आजूबाजूला किती चांदण्या आहेत, तुझ्या आजूबाजूला कोणीच नाही तू तर एकटीच आहेस’ असा निशा विचार करत होती.
तिला चंद्राचा खूप राग आला,
“तू मला छळतोय, मी एकटी नाहीये. माझ्यासोबत माझी आई आणि माझी मुलगी पण आहे. हे सांगूनही तिला असेच वाटत होते की चंद्र हसतोय ती पुन्हा चंद्राशी बोलायला लागली. तेव्हा तिथे विक्रम आला. विक्रम तिथे येताच निशाने विक्रमचा हात पकडला.


“हे बघ माझ्यासोबत पण कुणीतरी आहे, माझा साथीदार. हसू नकोस तुझ्या आजूबाजूला इतक्या चांदण्या असतील पण त्या सगळ्या तुझ्यापासून दूर आहेत. माझ्याजवळ एकच व्यक्ती आहे पण ती माझ्याजवळ उभी आहे. त्यामुळे तुला माझ्यावर हसण्याची गरज नाही. आता मी तुझ्यावर हसते.”


असं म्हणून निशाने विक्रमचा हात घट्ट पकडला. विक्रमला तिचं बोलणं ऐकून हसायला आलं. तो मोठ्याने हसायला लागला.
“काय झालं सर? असं का हसताय?”निशा

“तुम्ही हे जे काही वेड्यासारखं बोललात ना ते पाहून हसायला आलं.” विक्रम

निशाने स्वतःच्या डोक्यावर टिचकी मारली. तिच्या लक्षात आले की आपण काय केलं. तिने दोन्ही हाताने कान पकडले आणि विक्रमला सॉरी केलं. निशा तिच्या जागेवर जाऊन झोपली.

बऱ्याच वेळानंतर निशाला झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा फ्रेश झाली, विक्रमही झोपून उठला.
निशा विक्रम कडे बघून,
“सर एक विचारू का?”निशा
“बोला ना.” विक्रम

“आपला टूर जास्त दिवसाचा होता ना? नाही म्हणजे मला तुमच्या बोलण्यावरून वाटलं.” निशा

“हो खरं तर जास्त दिवस होता पण मी विचार केला आपण पहिल्यांदा जातोय तर तुम्हाला जास्त अडचणी यायला नकोत म्हणून बाकीच्या कॅन्सल केल्या. बघूया ही डिल क्रॅक झाली की मग आपण समोरचा विचार करूया.” विक्रम

दोघेही हॉटेलमधून बाहेर पडले, एअरपोर्टला पोहोचले. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर निशाला आता थोडं रिलॅक्स वाटत होतं, तिच्या मनातली भीती गेली होती. काही तासाने फ्लाईट टेकऑफ झाली.
विक्रमने निशाला तिच्या घरापर्यंत पोहोचवून दिलं.
“सर इथं पर्यंत आलाच आहात तर प्लीज माझ्या घरी या ना.”  निशा
“नाही आता नको नंतर कधीतरी येणार.” विक्रम

“सर प्लिज आता आलाच आहात तर या ना प्लीज सर, आईला बरं वाटेल तुम्हाला भेटून.” निशाने रिक्वेस्ट केली म्हणून विक्रम निशाच्या घरी आला.

“आई..आई आले ग मी.” निशा
“कोण आहे.”निर्मला

“आई मी आहे आणि माझे सर आलेत विक्रम सर.” निशा

“या या बसा.” निर्मला 
निर्मलाने दोघांनाही पाणी दिलं.
“आई आनंदी कुठे आहे?” निशा
“अजून झोपून आहे, तू नव्हतीस ना मस्त पोरीने एन्जॉय केलं. आई नव्हती ना रागवायला तिला खूप मस्त वाटत होतं. अजून झोपलीच आहे.” निर्मला

“ठीक आहे तू काहीतरी नाश्त्याचं बघ मी तिला उठवून येते.”

“निशा प्लिज नाश्ता वगैरे नको आता.” विक्रम
 
“सर प्लिज.” निशा
“नको खरच नको.” विक्रम

“ओके चहा ठेव गं”
“आता तरी चालेल ना सर.” 
“हो..”

तिघेही हसले, निशा आनंदीच्या खोलीत गेली.

“आनंदी किती उशीर आज? का उशीर का लावलास आणि कॉलेजमध्ये जायचं नाहीये का तुला? मी नाहीये म्हणून  अभ्यासाकडे दुर्लक्ष केलंस. मी सांगितलं होत ना आजीची काळजी घ्यायची उलट तिला काळजी करायला लावली. उठ आता पटकन…” निशा

“तू कधी आलीस?” आनंदी


“आत्ताच आले, बाहेर विक्रम सर आलेत. तुझी भेट करून देते.” निशा

“आत्ता नको आई अशा अवतारात मला नाही यायचं.” आनंदी

“काही हरकत नाही, चेहऱ्यावर पाणी घे आणि ये.” निशा

आनंदीने चेहऱ्यावर पाणी घेतलं, ब्रश केला आणि बाहेर गेली.

“सर ही माझी आई आणि ही माझी मुलगी आनंदी.”
विक्रमला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला, चहा घेतला आणि विक्रम तिथून निघाला.
निघताना दारातून निशाला सांगून गेला.
“निशा आज तुम्हाला ऑफिसला यायची गरज नाही, तुम्ही आज आराम करा आणि उद्यापासून या.” विक्रम

“पण सर..” निशा

“मी सांगतो तेवढेच करा.” विक्रम

“ओके सर.”

विक्रम तिथून निघाले, 

“आई तुझे सर खरच खूप चांगले आहेत.” आनंदी

“त्यांनी मला खूप सपोर्ट केला खूप चांगली वागणूक दिली.”

निर्मलाने चहा आणला, तिघ्याही चहा पीत बसल्या.
क्रमशः

🎭 Series Post

View all