काटेरी वाटेवरून चालताना... भाग 43

Sayline pan ektine sagal karnyacha nishchay kela

काटेरी वाटेवरून चालताना भाग...
43 
आधीच्या भागात आपण पाहिले की,
परीवर अत्याचार झाला, तिची ट्रीटमेंट न केल्यामुळे तिच्या बॉडीमध्ये क्लाटिंग तयार झाले आणि ते क्लाटिंग ब्रेन मध्येही झाले. वेळीच उपचार केले नाहीत तर ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता दर्शवली होती.

मेघाला आज बघायला पाहुणे येणार होते, मेघा तयार झाली. थोड्यावेळात पाहुणे आले सगळ्यांचं बोलणं झालं. नंतर नवरा मुलगा आणि मेघा एका खोलीत बोलायला गेले. मेघाने तिच्या मनातलं सगळं सांगितलं. तिला समोर शिकायचंय, नोकरी करायची आहे, तिच्या पायावर उभे राहायचं आहे. त्यावर तो मुलगा बोलला जर मी यातलं तुला काहीही करु दिले नाही तर...

आता पुढे,

त्या मुलाच्या बोलण्यावर मेघा स्तब्ध उभी राहिली, तिला काय बोलावं कळेना.

“मी तुम्हाला खरं सांगू का तुम्ही जर मला लग्नाला होकार दिला तर मी नकार नाही देऊ शकणार नाही कारण तुम्ही होकार दिला तर माझी आईपण होकार देईल पण मग हे लग्न माझ्या इच्छेने होणार नाही. मग माझी जी इच्छा आहे ती माझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. आणि जर माझी इच्छा आकांक्षा पूर्ण होणार नसेल तर मी आनंदी कशी असेल. तुमचं आणि माझं लग्न झालं तर ती फक्त एक कमिटमेंट असेल. स्वखुशीने काहीच नसेल. ना तू आनंदी राहू शकशील ना मी आनंदी राहू शकेल. निर्णय तुला घ्यायचं आहे, असं म्हणत मेघा बाहेर पडली.
मागे मागे तो मुलगा पण बाहेर गेला.

मुलाची आई,
“काय मग काय बोलणं झालं तुमचं? काही ठरलंय का? काय रे साहिल ( मुलाच नावं ) आवडली का तुला मुलगी? पसंत आहे का मेघा? समोर बोलणी करायची का?”

साहिलने खाली मान घातली,
त्यानंतर तो उभा झाला, मेघाच्या समोर जाऊन उभा राहिला. मेघाचा हात हातात घेतला आणि आणि 

“मेघा मला तू आवडलीस, मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे. माझ्याशी लग्न करशील मेघा?”

मेघा स्तब्ध उभी होती, तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. होकार दिला तर समोरच एज्युकेशन जाईल पण आलेल्या स्थळाला नकार कसा देऊ. कारण आई असं काही होऊ देणार नाही असा विचार तिच्या मनात आला. तिने आईकडे बघितलं आणि आईने तिला इशाराने होकार द्यायला सांगितलं. तिला असं शांत बघून,

काय झालं? मी तुला आवडलेलो नाही आहे का? साहिल

मेघा मान डोलावत,

“नाही नाही तसं काही नाहीये.
“तुम्ही थोडे इकडे येता का?” मेघा
साहिल मेघाच्या मागे मागे गेला.
“बोल ना ,काही बोलायचं राहिलंय?” साहिल

“मी म्हणाले होते ना की समोरच एज्युकेशन म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं ते. मेघा अडखडत बोलली.
त्यावर साहिल हसला.
अग हो, तसच होणार आहे..
“नाही तुम्ही आधी सगळ्या समोर या गोष्टींचा उलगडा करा  उगाच नंतर आम्हाला माहीतच नव्हतं अस व्हायला नको.”
साहिल जोरजोरात हसायला लागला.
“काय झालं?” मेघा
“अग तू किती पॅनिक होतेस, सगळं सांगणार आहे मी,आधी लग्न तर ठरू दे.” साहिल
“पण तुम्ही आधी सांगा, उगाच नंतर राडा नको.” मेघा
साहिलने त्याच्या घरच्या मंडळींना सगळं सांगितलं आणि मेघा आणि साहिलंच  लग्न ठरलं.

आनंदात त्यांच्या सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला.

...........................

निशाच्या ऑफिस मध्ये काम करणारा राजपाल निशाला मुलगी मानायचा, त्या नात्याने निर्मला त्याची बहीण झाली. बहिणीच्या  नात्याने त्याचं निशाच्या घरी येणं जाणं सुरू झालं.

आनंदीचा पण लाड करायचा, तिच्यासाठी काही घेऊन यायचा. 

असेच दिवस सरत गेले. बघता बघता आनंदी सहा महिन्याची झाली. 
दिवस आनंदात जात होते, निशाचा जॉबही चांगला सुरू होता, पण एकट्या बाईला पाहून माणसांची नजर खवखवते, निशाही याला चुकली नव्हती. तिलाही प्रत्येक क्षणाला अश्या संकटांना फेस करावं लागायचं. सिंगल पॅरेटिंग सोपं नसतं. हे तिला पदोपदी जाणवत होतं.

 ........................

सायलीची डिलीव्हरी झाली, सायली आणि प्रथमेशला  पहिली मुलगी झाली.  घरी लक्ष्मी आली म्हणून दोघेही खूप आनंदात होते. पण प्रथमेशची आई  ती मात्र राग धरून होती. पहिली मुलगी झाली हे तिला आवडलेलं नव्हतं. पहिल्या दिवशी प्रथमेशची आई दवाखान्यात आलीच नव्हती. सायली वाट बघत बसली होती की कुणीतरी येईल. पण  कुणी आलंच नाही. सायलीच्या चेहऱ्यावरून प्रथमेशला सगळं कळलं, त्याने लगेच सगळ्या मैत्रिणींना  फोन केला. त्याने त्यांना सगळं सांगितल.

काही तासातच सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या.
रागिणी आणि नितिन परीला घेऊन पोहोचले. 
रागिणीने येताच सायलीला मिठी मारली.
सायली भावुक झाली, तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. रागिणीने तिचे डोळे पुसले.

“सयु तू खूप नशीबवान आहेस, तुझ्या घरी लक्ष्मी आली. भाग्य लागतं ग याला. तू नशीबवान आहेस.” रागिणी


नितिन प्रथमेश सोबत बोलला. 
“काय झालं? सायली का इतकी अपसेट आहे?”
प्रथमेशने त्याच्या आईबद्दल सगळं सांगितलं.

“ठीक आहे रे, काही हरकत नाही. मुलगी काय नी मुलगा काय? दोन्ही सारखेच असायला हवे.” 

नितिनने  प्रथमेशला समजावलं.
“प्रथमेश तू आईशी बोल, त्यांना समजावं. आता सायलीला त्यांच्या आधाराची गरज आहे. तिला मानसिक त्रास व्ह्यायला नको. तुलाही तिला धीर द्यायचा आहे.”

दोघांच बोलणं सुरू असताना, परीचा विषय निघाला. आणि परीबद्दल इतकं सगळं ऐकून  प्रथमेशच मन हेलावलं. तो शॉक झाला. त्या चिमुकल्या जीवाला इतका त्रास होत होता.

“बापरे, यु आर ग्रेट. किती ग्रेट काम करताय तुम्ही दोघे. परी बद्दल ऐकून खरच माझं मन भरून आलं, डोळे पाणावले. परीच सगळं छान होऊ दे. हीच देवा चरणी प्रार्थना करतो.”

परीसाठी काही मदत लागली तर नक्की सांग, मी माझ्या परीने सगळी मदत करेल.

प्रथमेशने  परीला कळे घेतलं,तिच्या गालाची पापी घेतली आणि तिच्या हातात खाऊ साठी पैसे दिले.
काही वेळानंतर, निशा आणि मेघा पोहोचल्या. त्यांनी सायलीची समजूत घातली.
निशा आणि मेघा पाच दिवस सायली जवळ दवाखान्यात थांबल्या.
सुट्टी होणार होती त्या दिवशी,
निशा आणि मेघाने सायलीची खोली  छान फुलांनी आणि फुग्यांनी सजवली.
गेट पासून सगळी सजावट केली. 

“काय उपयोग एवढी सजावट करून? शेवटी परक्याचं धन ते, एवढा खर्च कशाला करायचा? प्रथमेशच्या आईने टोमणा मारला.

“काकू मुलगा काय नी मुलगी काय? दोन्हीही देवाघरचीच फुले आहेत, देवाचाच आशीर्वाद आहे. आपण फक्त निमित्त असतो, कर्ताकरविता तोच आहे. तोच सगळं घडवतो.” मेघा

“हो का, मग तू का इतक्या दिवासापासून अशीच आहेस? तुझं लग्न का नाही जमलं.?” सायलीची सासू

“कस आहे ना काकू, प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते. आणि ती वेळ आली की सगळं छान घडतं आणि ती विशिष्ट वेळ माझ्या आयुष्यात आली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू  नका.” मेघा जरा चिडूनच बोलली.

प्रथमेशची आई तिथून निघून गेली, हॉलमध्ये छान वेलकम बेबी बॉय अस फुग्यांनी लिहिलेलं होतं. सगळी तयारी झाली.
प्रथमेश सायलीला घेऊन घरी आला. निशा आणि मेघाने तिचं वेलकम केलं. सायलीची सासू नातीचं तोंड बघायलाही दारात आली नव्हती. निशाने औक्षण केलं. छोट्या बाळाचे कुंकूच्या पावलांचे ठसे उमटवले.
मैत्रिणींनी इतकं छान सरप्राईज दिलं, हे बघून सायलीला खूप बरं वाटलं.
पण सासू आली नाही म्हणून तिला दुःखही झालं, ते सगळ विसरून तिने बाळासोबत आनंदी राहायचं ठरवलं.
मेघा आणि निशा नेहमी तिच्या सोबत राहतील याची तिला खात्री होती म्हणून ती निश्चिंत झालेली होती.
मेघा आणि निशा काही दिवस सायली जवळ राहून त्या परतल्या. सायलीने पण एकटीने सगळं करण्याच्या निश्चय केला. 
क्रमशः

🎭 Series Post

View all