काटेरी वाटेवरून चालताना... भाग 22

Nitinchya sparshane ragini sukhavli

काटेरी वाटेवरून चालताना... भाग 22


आधीच्या भागात आपण पाहिले की,


निशा आश्रमात गेली, रडत बसलेली असताना सरू आजीनी तिला आधार दिला. निशा सरू आजीच्या कुशीत खूप रडली, तिला खूप रिलॅक्स वाटलं, आजीच्या कुशीतच तिला झोप लागली.


त्या गुंडांनी निशाचा खूप शोध घेतला. शेवटी थकून ते कुसुमकडे आले, तिला सगळं सांगितलं.

सायली आणि प्रथमेशने लग्न केलं. घरी वाद सुरू झाले, प्रथमेशने सायली समजावलं. दोघांनी पुन्हा एकमेकांना मिठी मारली.


आता पुढे,

निशाने आश्रमात राहण्याचं ठरवलं.


निशा आता आश्रमात रुळायला लागली होती. सरू आजी,गोपिका काकी, मीनल ताई ह्या तिची खूप काळजी घ्यायच्या. निशाला अगदी फॅमिली सारखच वाटायचं.
एके दिवशी निशा बागेत बसली असताना मीनल बाजूला येऊन बसली.


“काय ग, काय विचार करत बसली आहेस?” मीनल
“मीनल ताई मी काहीतरी काम करण्याचा विचार करत आहे.” निशा


“अग  आता या अवस्थेत?” मीनल


“काय झालं? सगळ्याच तर करतात. मग मी का नाही?” निशा
“सगळ्याच करतात, मान्य आहे. पण आता तुला तीन महिनेही झालेले नाहीत त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नकोस. सुरुवातीचे तीन महिने खुप काळजी घ्यावी लागते.

हलगर्जीपणा करायचा नसतो, बाळ  दगावण्याची शक्यता असते. काही दिवस थांब, मग जोमाने कामाला लाग.” मीनलने तिला समजावलं.


“मीनल ताई एक विचारू का?” निशा
“हो हक्काने विचार.” मीनल
“तुम्ही इथे...म्हणजे..कस काय?” निशा


“अग डायरेक्ट विचार ना मी इथे कशी काय राहते?” मीनल
निशाने होकारार्थी मान हलवली.


“मी पण तुझ्यासारखी दुर्भागी आहे ग. पंचविशीत आई वडिलांनी लग्न ठरवलं, एकही शब्द न बोलता लग्न केलं. सुरुवातीचे दिवस छान गेलेत. पण हळूहळू सगळं चित्र बदलायला लागलं, घरच्यांचं वागणं बदललं, नवराही विचित्र वागायला लागला, छोट्या छोट्या गोष्टीत चूका काढायचा. कधी कधी हात पण उगारायचा.
सहा महिन्यात मला दिवस गेले, सुरुवातीला सगळे खुप आनंदी झाले, सगळ्यांनी माझं कोड कौतुक केलं. सगळे आता बरे वागायला लागले. बघता बघता तीन महिने उलटले. आणि घरचे मला चेकअपला घेऊन गेले. माझ्या ध्यानी मनी नसताना त्यांनी माझं गर्भ निरीक्षण करवून घेतलं. अणि त्यात त्यांना कळलं की माझ्या गर्भात मुलीचा अंश वाढतोय. त्यांनी मला गर्भपात करायला सांगितलं, मी ऐकले नाही तर मला मारहाण केली आणि खोलीत डांबून ठेवलं. चार दिवस पोटात अन्नाचा एक कणही नव्हता की पाण्याचा एक थेंब नव्हता. तहानलेला गळा, थकलेलं शरीर किती वेळ राहणार. शेवटी मी बेशुद्ध झाले आणि त्यांनी मला दवाखान्यात नेलं. यांनी काही कारायच्या आधीच सगळं घडून गेलं होतं. माझं बाळ गेलेलं होत. मला सोडून ते खूप दूर गेलेलं होत. खरतर त्या लोकांनी माझ्या निष्पाप बाळाला मारून टाकलं होतं. खुनी होते ते, त्यांनी माझं बाळ माझ्यापासून हिरावून घेतलं होतं. ज्याक्षणी मला हे कळलं मी ठरवलं आता यांच्यासोबत राहायचं नाही.
आणि मी दवाखान्यातून पळून गेले.” बोलता बोलता मीनलचे डोळे पाणावले.

“ बापरे, किती भयानक. मग पुढे?” निशा


“पुढे, पुढे असच दारोदार भटकत राहिले आणि एक दिवस इथे येऊन पोहोचले.’ मीनल


“मग त्यांनतर कधी लग्नाचा विचार नाही केला?” निशा
“तू करू शकणार आहेस?.” मीनल
“माहीत नाही.” निशा


दोघींनीही स्माईल दिली.
“चल आत जाऊया.”
दोघीही आत गेल्या.

.................................

रागिनीकडे  गॅदरिंग पासूनच बवाल झालेला होता. रागिणीला डान्स साठी सक्त मनाई करण्यात आली. रगिनीच्या बाबांनी तिला होस्टेलवर पाठवलं. नितिनने खुप थांबवण्याचा प्रयत्न केला पण रागिणीचे बाबा ऐकले नाहीत. ती होस्टेलवर राहू लागली, तिथे तिला नवीन मैत्रिणी मिळाल्या पण तिथे तीच मन रमेना झालं होतं. सारखी घरची आणि मैत्रिणींची आठवण येत होती.


होस्टेलवर स्वतःजवळ मोबाईल ठेवायची पण सक्ती होती त्यामुळे रागिणीला कोणाला फोनही करता येत नव्हतं. एक दिवस तिने होस्टेलच्या वॉर्डनला सांगून मेघाला फोन केला.
“हॅलो मेघा, अग रागिणी बोलतीय.”


“रागिणी कशी आहेस ग?”
“तुमच्या सगळ्यांशिवाय कशी असेन मी. इथे नाही ग करमत मला. असं वाटतं कुठेतरी दूर निघून जावं. मेघा तू तरी भेटायला ये ना ग.”


“येईल ग,नक्की येईल. तू मला पत्ता सांग, मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईल तिकडे.” 
“ओके.” 


दोघींनी फोन डिस्कनेक्ट केला.
काही दिवसानंतर रागिणीला नितिन भेटायला गेले. पण तिथे वॉर्डनने भेटण्यास सक्ती केली. तरी नितिनने आडमार्गाने भेट घेण्याचा निश्चय केला. ते मागच्या भागाने खिडकीतून आत गेले.  त्यांना बघताच रागिणीची मैत्रीण किंचाळली.  तसच नितिनने तिचं तोंड दाबलं, काय झालं म्हणून रागिणी बघायला आली तिने त्या दोघांना असं बघितलं आणि ती किंचाळली. नितीनने शु$$$ रागिणी मी आहे. 


“सर तुम्ही इथे? इथे काय करताय? आणि असे इथून का आलात?” रागिणी
“मला दोन मिनिटं बसू देशील?.” नितिन
नितिन खुर्चीवर जाऊन बसले.


“तू ओळ्खतेस यांना?.” रागिणीची होस्टेल मैत्रीण शिल्पाने विचारलं.
“ हो, हे माझ्या कॉलेजचे डान्स टीचर आहेत.” रागिणी
“सर ही माझी मैत्रीण शिल्पा. आणि शिल्पा हे नितीन सर.” रागिणी


“सर इथे कसे काय आलात? तुम्हाला माहीत आहे का इथे असं कोणालाही भेटता येत नाही.” रागिणी
“माहीत आहे मला, मी त्याला प्रेमाने परमिशन मागितली होती पण त्याने दिली नाही म्हणून मी असा खिडकीतून आलो.” नितिन


रागिणीने डोक्यावर हात ठेवला
“सर मी तेच म्हणतीय, तुम्ही इथे का आलात?”


“रागिणी खर सांगायचं तर मला तुला भेटायचं होतं.”  नितिन
रागिणी थोडी ओक्वॉर्ड झाली, तिने प्रश्नार्थक चिन्हाने नितिनला प्रश्न केला.
“म्हणजे मला कळलं नाही.”


“रागिणी मला तुला कसं सांगू कळत नाही आहे पण तू जेव्हापासून कॉलेजला येत नाही आहेस ना तेव्हापासून मला त्या कॉलेजमध्ये काहीच रस वाटत नाही, मला जावसं पण वाटत नाही. खरं तर तुझ्याशिवाय आता मला करमत नाही. रागिणी तू शांतपणे नीट सगळं ऐकून घे आणि मग रिऍक्ट हो. रागिणी मला तुझी खूप आठवण येत होती, सतत तुझ्याशी बोलावसं वाटत होतं. अस वाटलं तुला भेटावं आणि खूप खूप बोलावं आणि मन मोकळं करावं. मला ना तुझेच भास होतात म्हणजे तू तिथे नसतेस पण मला वाटतं की तू तिथे आहेस. तुझा चेहरा डोळयासमोर येत असतो. सारखी तुझी आठवण येत असते. हे सगळं का होत असावं रागिणी.? मला ना खूप प्रश्न पडत आहेत आणि त्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे मिळत नाही आहे. तू सांग रागिणी असं का होत असेल?” नितिन सगळं बोलून गेले.

रागिणीने शांतपणे सगळं ऐकलं पण त्यांच्या बोलण्यावर काय रिऍक्ट करावं हेच तिला कळेना, ती गप्प उभी होती, शिल्पा लगेच बोलली.


“नितिन सर यालाच तर प्रेम म्हणतात.” शिल्पा उत्साहात बोलली.


“रागिणी यू आर लकी यार. आय एम सो हॅपी फॉर यु.”
“शिल्पा गप्प बस, तुला कळतंय का तू काय बोलते आहेस? अग बाबांना यातलं काही कळलं ना ते मला घरात कोंडून ठेवायलाही मागेपुढे बघणार नाहीत.”


“रागिणी अग पण त्यात चुकीचे काय आहे? त्यांचं तुझ्यावर प्रेम आहे तर तू विचार करायला काय हरकत आहे, अग आता फक्त विचार करायचा आहे, तुला लग्न करायला सांगत नाही आहे.”


“नाही शिल्पा मी असा काही विचार करुच शकत नाही, हे सगळं चुकीचं आहे.” 


“नितिन सर तुम्ही माझ्याबद्दल असा विचार कसा काय करू शकता, अहो तुम्ही माझे गुरू आणि मी तुमची शिष्या आहे, सर हे पाप आहे. हे कधीच होऊ शकत नाही.” रागिणी
नितिन खुर्चीवरून उठले, रागिणी जवळ जाऊन तिला घट्ट मिठीत घेतलं.


“आय लव यु रागिणी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
नितिनच्या स्पर्शाने रागिणी सुखावली...

क्रमशः

🎭 Series Post

View all