काटेरी वाटेवरून चालताना... भाग 27

Tyane meghachy khandyavar hat thevla tashi megha dachkun ubhi zali

काटेरी वाटेवरून चालताना भाग 27


आधीच्या भागात आपण पाहिले की,


रोहित निशाला भेटायला आला, त्याने सांगितलं की त्याचं आजही निशावर खूप प्रेम आहे पण त्याला हे बाळ नको आहे.
निशाने त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं तिला त्याची गरज नाही. ती एकटी राहीलं पण त्याच्यासोबत राहणार नाही. निशाला मेघाबद्दल कळलं तिने जाब विचारला मेघाने सगळं सत्य निशाला सांगितलं.


नितिनचा अक्सिडेंट झाला आणि त्याच्या ऑपरेशनसाठी रागिणीला पैशाची गरज होती. पण कुणीही मदतीला तयार नव्हते. शेवटी सगळ्या मैत्रिणी धावून गेल्या आणि ऑपरेशन सक्सेस झालं.


आता पुढे,


सगळ्या मैत्रिणी आपापल्या घरी परत आल्या.


निशा आणि निर्मला आराम करत असताना दारावरची बेल वाजली.


‘आता इतक्या उन्हात कोण आलंय मरायला.’ निशा बोलतचं खोलीतून बाहेर आली.


निशाने दार उघडला.


डोळे चोळतच तिने वर बघितलं तर समोर एका बाईला बघून ओरडली.


“आई बघ कोण आलंय? आई बाहेर ये लवकर.”
“काय निशा, भूत बघितल्यासारखं काय ओरडतेस?” अस म्हणत निर्मला बाहेर आल्या.
“आई, समिधा ताई..” निशा
निर्मलाने समिधाकडे बघितलं.


“समिधा तू?”
समिधा आत येऊन निर्मलाला बिलगली.
बाजूला तीनेक वर्षांचा मुलगा उभा होता.


“समिधा किती वर्षांनी आलीस ग? कुठे होतीस इतके दिवस?” निर्मला


“आई बाबांचं कळलं ग, पण बघ ना कळलं तेही इतक्या उशिरा. मला बाबांना शेवटचं बघताही आलं नाही.” समिधा
“सगळं अचानक घडलं ग. अग आत ये, बस निवांत आधी.” निर्मला


समिधा निशाची मोठी बहीण, निशापेक्षा सात वर्षांनी मोठी होती.


पाच वर्षांसाठी समिधाने लव मॅरेज केलं होतं आणि त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडले. सासरच्यांनी पण या नात्याचा स्वीकार केला नाही. नंतर दोघेही विदेशात शिफ्ट झाले. आणि तिथेच स्थायिक झाले. लग्नानंतर आज  समिधा पाहिल्यांदा माहेर आली होती.


“हा गोडुला? काय नाव याचं?”
“आरव..”


“अरे वा, खूप गोड आहे ग.”


“आरव आजीच्या  पाया पड.”
आरव निर्मलाच्या पाया पडला तशी निर्मला भावुक झाली.


त्याने त्याच्या गोड आवाजात आजी… आजी....म्हणाला
आजी शब्द ऐकून निर्मलाला खूप भरून आलं.


सगळी विचारपूस झाली, बोलणं झालं.
निशा बद्दल समिधाला सगळं कळलं.


“निशु इतकं सगळं घडलं आणि तू मला सांगितलं देखील नाही. इतकी परकी झाली का ग मी तुमच्यासाठी?” समिधा


“नाही ताई, अस काही नाही. तुझ्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा होता ग, तुझा काहीच पत्ता नव्हता. आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तू गेली तेव्हाची एकदाही फोन केला नाहीस की कधी भेटायला आली नाहीस.” निशा


“निशु, आई.. मला माफ करा ग, मी तुम्हाला खूप मिस करत होते. पण फोन करण्याची कधी हिम्मत झाली नाही.” समिधा
सगळ्यांमधला मनमुटाव संपला.


काही दिवस आईकडे राहून समिधा विदेशात गेली.


.............................

नितिन आता थोडा बरा होता. डॉक्टरने काही दिवस आराम करायला सांगितलं होतं. तो घरी आराम करायचा आणि रागिणी क्लासेस घ्यायची.


नितिन एकदा पेपर वाचत असताना त्याने डान्स कॉम्पिटेशनची ऍड बघितली.  विजेत्याला एका लाखाचं बक्षिस होतं.


नितिनने विचार केला की 
‘मी जर भाग घेतला आणि जिंकलो तर मिळालेल्या पैशातून रागिणीचे दागिने सोडवू शकतो.’ हा विचार करून नितिनने कॉम्पिटेशन मध्ये भाग घेतला रागिणीला काहीही न सांगता त्याने हे सगळं केलं.


रागिणी क्लासला गेल्यानंतर नितिन घरी प्रॅक्टिस करायचा.” कधी कधी शरीर दुखायचं त्याचं पण दुखणं अंगावर काढून तो आणखी जोमाने प्रॅक्टिस करायचा त्याच्या डोळ्यासमोर फक्त रागिणीचा चेहरा असायचा. 


‘मला जिंकायचं आहे माझ्या रागिणीसाठी मला जिंकायचंच आहे’ हे त्याने मनोमन ठरवले होते.


कॉम्पिटेशनचा दिवस उजाडला. रागिणी बाहेर गेल्यानंतर नितिनने लगेच मित्राला फोन केला. मित्र आल्यानंतर दोघेही गेले.
नेमकी आजच रागिणी घरी लवकर आली. आणि दाराला कुलूप बघून तिला आश्चर्य वाटलं.


‘नितीन कुठे असेल? असा कसा बाहेर गेला? कुणासोबत गेला? मला काहीच का सांगितलं नाही?’ रागिणीचे प्रश्न  सुरू झाले पण उत्तर द्यायला नितिन समोर नव्हता. रागिणी जवळ चाबी होती, ती कुलूप खोलून आत गेली.


खूप वेळ अशीच बसुन होती.


इकडे नितिन कॉम्पिटेशनच्या ठिकाणी पोहोचला.
थोडया वेळाने कॉम्पिटेशन सुरू झाली.
दोन डान्स झाल्यानंतर नितिनच नावं आलं. नितिन स्टेज वर अगदी हळू आणि पाय लंगडून गेला. सगळा प्रेक्षक वर्ग हसायला लागला.


“अरे हा बघा लंगडा डान्स करणार.” त्यातला एक माणूस हसला तसे सगळे हसायला लागले पण नितिनने कुणाकडेही लक्ष दिले नाही.


म्युजीक सुरू झालं आणि सगळ्यांच्या नजरा नितिन वर खिळल्या. बॉलीवूड प्लस क्लासीकल फ्युजन इतकं सुंदर परफॉर्म केला की सगळे बघतच राहिले.


कॉम्पिटेशन संपली, आता रिझल्ट सांगायची वेळ झाली. नितिन देवाला प्रार्थना करत होता.


थर्ड आणि सेकंड विनर सांगितल्यानंतर
“अँड फर्स्ट विनर आहे नितिन”
सगळे नितिन.. नितिन.. करू लागले.


नितिन स्टेज वर गेला आणि त्याने पारितोषिक स्वीकारले.
सगळे त्याच्याकडे अभिमानाने बघत होते.


नितिन घरी आला, दार उघड बघून तो सगळं समजला
‘आता आपल्याला ओरडा पडणार’ मनातल्या मनात पुटपुटला.


आत गेला, रागिणीचं लक्ष गेलं, तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.
“नितिन कुठे गेला होतास? मला न सांगता कसा काय जाऊ शकतोस? आणि डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलं आहे ना,मग तू बाहेर का गेलास?”


नितिनने हात समोर आणला आणि रागिणीला ट्रॉफी आणि रोख रक्कम दाखवली आणि सविस्तरपणे  सगळी माहिती दिली.
रागिणीचे डोळे पाणावले. ती लगेच नितिनला बिलगली.


...............................

मेघा सकाळी छान तयार झाली, देवाला नमस्कार केला.
“आई मी निघते ग.”
“अग थांब, हे घे दही साखर.” 
मेघाने आईला नमस्कार केला.


“जाते आई..”
“मेघा जाते नाही येते म्हणावं.”


“ठीक आहे आई येते, तू काळजी घे.”
“आरामात जा ग.”
काही वेळाने मेघा तिथे पोहोचली.


मेघा एका कंपनीत इंटरव्यूला गेली. बरीच मोठी रांग होती, खूप मुलं मुली आले होते. मेघा एका बेंचवर जाऊन बसली.
‘बापरे इतके लोक? आपला काही निभाव लागणार नाही.’ मेघा मनोमन पुटपुटली.


तिच्या बाजूला पंचवीशीतली मुलगी बसली होती. तिने मेघाकडे बघून


“फर्स्ट टाईम?”
“हम्मम..” मेघा


“म्हणजे तुला  अनुभव नाही.”
“नाही..” मेघा


“आज येईल..” अस म्हणत ती हसायला लागली.
“तुम्ही असं का हसताय?” मेघाने विचारलं.


“काही नाही आत गेल्यानंतर कळेलच तुला.” ती मुलगी उठून बाजूला गेली.
इंटरव्यूला सुरुवात झाली,


बरेच इंटरव्यू झाले त्यानंतर ब्रेक झाला. ब्रेकमध्ये चर्चा सुरू झाली जी मेघाच्या कानावर आली.
“या कंपनीचा बॉस काही चांगला नाही, विचित्र नजरेने बघतो म्हणे सगळ्यांकडे.” त्यातली एक मुलगी


“हो ग मी पण असंच काही ऐकलंय. मला तर आतही जायला भीती वाटत आहे.” त्यातली दुसरी मुलगी बोलली.


त्यांच्या चर्चा सुरू होत्या.मेघाच्या मनातही वेगवेगळे विचार यायला लागले.
पुन्हा इंटरव्यू सुरू झाले, 

मेघाच्या  आधी दोघा तिघांचे इंटरव्यू झाले आणि मग मेघाला बोलावण्यात आलं. 


“मे आय कम इन सर?”
समोरचा व्यक्ती पाठमोरा उभा होता.


“येस.”
मेघा आत गेली.


“प्लिज हॅव अ सीट.”
मेघा बसली तिने तिचे डॉक्युमेंट समोर ठेवले. मेघाला नर्व्हस फिल होत होतं. ती पहिल्यांदा  इंटरव्यूला आली असल्यामुळे तिला खूप भीती वाटत होती.
मेघाने समोरची पाटी वाचली.


निशांत देशमुख


तसा तो पलटला.
मेघाच्या लक्षात आलं की ती जोरात बोलली.
“तुम्ही काही बोललात?”
“नाही..”


“प्लिज रिलॅक्स...बी कम्फर्ट.”
मेघाने आर्टिफिशिअल स्माईल देऊन
“येस.” बोलली.


तो त्याच्या चेअरवर  बसला आणि त्याने एक नजर मेघाकडे बघितलं.


त्यांनतर जागेवरून उठला. मेघाच्या बाजूला येऊन उभा झाला.


मेघाला ओक्वॉर्ड फिल झालं.


“माझ्याकडे तुमच्यासाठी स्पेशल जॉब आहे आणि  पगारही चांगला असेल पण त्यात काही अटी आहेत. तुम्हाला त्या सगळ्या अटी मान्य असतील तर आपण पुढचं बोलू.” त्याने मेघाच्या खांद्यावर हात ठेवला.


मेघा एकदम दचकून उभी झाली.


क्रमशः

🎭 Series Post

View all