काटेरी वाटेवरून चालताना... भाग 19

Yatun kahitari marg dakhv deva

काटेरी वाटेवरुन  चालताना... भाग 19 


आधीच्या भागात आपण पाहिले की,

कुसुमावलीची दोन माणसे निशाला उचलून घेऊन गेलीत, त्यांनी तिला एका झोपडीत डांबून ठेवलं होतं.
निशाने स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिथून बाहेर निघायला काहीच मार्ग नव्हता.
सायली आणि मेघा निशाच्या आईला भेटायला गेल्या. त्यांची अवस्था बघवत नव्हती, त्या वारंवार निशाबद्दल प्रश्न विचारत होत्या. निशा कुठे आहे? तुम्हाला भेटते का? वगैरे..

कॉलेजमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायली आणि प्रथमेश घराकडे जायला निघाले तर वाटेत प्रथमेशने गाडी थांबवून सायलीला प्रपोज केलं.

आता पुढे,

प्रथमेशने प्रपोज केल्यानंतर सायलीने एक क्युटसी स्माईल दिली. तिची स्माईल बघून प्रथमेश मनोमनी खूप खुश झाला त्याला वाटलं आता आपल्याला सायली होकार देणार. पण सायलीने स्माइल देऊन दुसऱ्या क्षणी प्रथमेशच्या कानशिलात पेटवली. प्रथमेश एकदम शॉक झाला. आपल्या गालाला हात धरला आणि उभा झाला.

सायली हाऊ डेयर यू? तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? प्रथमेश सायलीवर खूप चिडला पण त्याच क्षणी सायली जोरजोरात हसायला लागली. 


“हेच बघायचं होतं मला, मी तुझ्या कानशिलात पेटवल्यावर तुझी पहिली रिएक्शन काय असेल? हेच मला बघायचं होतं. तू आता मला थोडावेळा आधी बोलला की तू माझ्यावर खूप प्रेम करतोस. हेच आहे तुझं प्रेम? किती चीडलास रे तू माझ्यावर? अरे तुझ्या मनात माझ्याबद्दल जर प्रेम असतं तर तू माझ्यावर चिडला नसतास. मला विचारलं असतं, 


“सायली काय चुकी झाली माझ्याकडून.”
पण नाही तू सरळ सरळ चिडलास माझ्यावर आणि हे तुझं खरं प्रेम असू शकत नाही.”

“काय बोलतेस तू? तू असं काही वागल्याल्यावर मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. मी खरच तुझ्यावर प्रेम करतो ग, आय लव यू सायली आय लव यू सो मच.” प्रथमेश

त्याचा असा मुरझलेला चेहरा बघून तिला खरंच हसायला आलं आणि तिने त्याला जास्त त्रास न देता घट्ट मिठी मारली.
“आय लव यू प्रथमेश.”
“आय लव यू टू सयु.”
दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी केली.
.......................…........

दुसऱ्या दिवशी मेघाने ठाम निश्चय केला, 
‘मी आता निर्मला काकूला सगळं खरं खरं सांगणार आहे, तिने पूर्ण बळ एकटवल आणि ती निर्मलाकडे गेली.
“मेघा बेटा, आज इकडे कसं काय येणं केलं.?”
“काकू मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे.” मेघा

“बोल ना.” निर्मला

“मला तुम्हाला निशाबद्दल काही सांगायच आहे.”
निशाच नाव ऐकताच निर्मला खूप  भावुक झाली.
“निशाबद्दल काय सांगायचे आहे तुला?”

मेघाने निर्मलाला सविस्तर घटना सांगितली. हे सगळं ऐकून निर्मला धक्का बसल्यासारख्या अगदी खाली बसल्या.
“मला माफ करा काकू, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला असं काही करायचं नव्हतं. मी आता निशाला शोधण्याचा खुप प्रयत्न करते आहे पण मला तिचा पत्ता मिळत नाहीये. काकू मला खरंच माफ करा.” मेघा

“काय केलस तू? काय केलंस? स्वतःच्या मैत्रिणीबद्दल अशी वागलीस? अगदी पक्की मैत्री होती ना तुमची? मैत्रीला काळिमा फासलास तू. तुमच्या अश्या मैत्रीला काय अर्थ आहे? हे काय केलंस तू?” निर्मलाला अश्रू अनावर झाले.


“काकू खरच मला माफ करा. मला त्या कुसुम बद्दल खरच ऐवढी माहिती नव्हती. ती ऐवढी डेंजर असेल असं वाटलं नव्हतं आणि आणि त्यांनी मला ब्लॅकमेल केलं होतो त्यामुळे मी काहीही करू शकले नाही.” असं म्हणत मेघा तिथून निघून गेली. पण हा निर्मलासाठी आणखी एक मोठा आघात होता. निर्मलाला हे कसही करून सहन करावं लागणार होतं. एका मुलाने असं घर सोडून निघून जाणं, मुलीच्या आयुष्यात वादळ येणं हे सगळं बघण्याचे दुर्दैव तिच्या दुर्भाग्यात होतं. निर्मला अगदी हताश झाली.
..............................

निशा हळूच उठून बसली. तिच्या घशाला कोरड पडली होती. अंगात दुखणं भरलं होतं. पोटात अन्नाचा एकही कण नव्हता. तिला चक्कर आल्यासारखं होत होतं. कशीबशी उठून बसली, तिला उभ राहून कुठेतरी काहीतरी बाहेर निघण्याची जागा मिळते का हे बघायचं होतं. पण उठून उभे राहण्यासाठी अंगात त्राणही नव्हत.

कशीबशी भिंतींचा आसरा घेऊन ती उभी झाली. चारही बाजूने हाताने चाचपडू लागली आणि हाताने चाचपडत असताना लक्षात आले की एका ठिकाणी पोकळ जागा आहे. त्या पोकळ जागेतून तिचा हात डायरेक्ट बाहेर निघाला, तसं तिने पुन्हा प्रयत्न केला आणि एका भिंतीला मोठा खड्डा करून ती त्यातून कशीबशी बाहेर निघाली.


झोपडीच्या मागे येऊन समोरच्या बाजूला बघितले तर ती दोन माणसे बसलेली होती. निशा मागच्या रस्त्याने निघाली. तिच्या चालल्यामुळे जंगलातील सुकलेल्या पानांचा आवाज व्हायला लागला आणि तो आवाज त्या माणसांचा कानापर्यंत पोहोचला. त्यांना भनक लागली आणि तसेच उठुन त्यांनी  आजूबाजूला बघायला सुरुवात केली.


निशा खूप दूर गेलेली त्यांना दिसली. ते दोघेही निशाच्या मागे धावले. 

“अरे पकडो पकडो, वो भाग रही है. अपने हात से छूटनी नही चाहिये.”


“दोघेही गतीने निशाच्या मागे धावले निशा समोर आणि ती दोन माणसे मागे. जणू पकडापकडीचा खेळ सुरु झाला.
निशा धावत धावत खूप समोर आली, तिला दम लागला म्हणून ती एका झाडाच्या आडोशाला थांबली. तिला धाप लागली होती, श्वास वाढला होता, दम यायला लागला होता, तिच्याने तर चालण ही  अवघड झालं होत. ती झाडाला पाठ टेकून उभी राहिली, काही मिनिटातच ती माणसे तिच्या पर्यंत पोहोचली.


त्यांनी तिचे दोन्ही हात गच्च पकडले आणि मागे बांधले. 
“किधर भाग रही थी? अभी मिल गयी है ना, अभी तो छोडेंगे ही नही. चलते दोरी से पुरा बांध इसको. इसको इधरच रखते है, चल अपन जायेंगे.”


दोन माणसांनी निशाला झाडाला दोरीने बांधून ठेवलं, आणि ते गेले. दोरी मुळे निशाच्या पोटावर ताण पडत होता. हळूहळू पोट दुखायला लागलं होतं. ती हळू आवाजात पाणी पाणी असं म्हणत होती. 


एका माणसाच लक्ष गेलं आणि तो परत आला. तिच्याकडे बघून त्याला तिची कीव आली आणि त्या माणसाने तिला पाणी आणून दिलं. निशाने भकरल्यासारखं पाणी प्यायल. थोड पाणी चेहऱ्यावरही मारलं आणि ज्या माणसाने पाणी आणून दिले त्याला विनवण्या करू लागली.


“दादा मला सोडा ना, मला जाऊ द्या दादा. मला जाऊ द्या.. सोडा मला दादा.. माझा नाहीतर माझ्या बाळाचा तरी विचार करा हो, मी दोन जीवाची आहे, मला जाऊ द्या हो मला माझं बाळ गमवायचं नाहीये. तुमच्या अशा कृत्यामुळे माझ्या बाळाला काही झालं तर.. नाही नाही... अहो दादा मी हात जोडून तुम्हाला विनंती करते प्लीज मला जाऊ द्या.”

“ये इमोशनल ड्रामा क्रिएट करू नकोस. उगाच तुझ्या ड्रामा मुळे मी फसू शकतो. डोक्याला शॉट देऊ नकोस. हे बघ तुझ्या बाळाला काही होणार नाहीये, त्याची काळजी आम्ही घेऊ. तू फक्त इथे गप्प रहा जास्त हालचाल करू नकोस, पोटात आकसेल तुला.” तो माणूस तिथून निघून गेला.


आता दूरदूरपर्यंत निशाच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. सगळीकडे झाडेच झाडे होती. हळूहळू सूर्य मावळतीला गेला. पक्षांची किरकिर सुरू झाली. पक्ष्यांचा आवाज कानात येऊन गुंजू लागला. सगळीकडे अंधार पसरायला लागला. सगळीकडे काळाकुट्ट अंधार बघून निशाला धडकी भरली.


सगळीकडे शांतता पसरली. आकाशात पक्षांचा उडण्याचा आवाज घुमू लागला. त्या काळोख्या अंधारात निशाचा जीव धक्कं झाला.


ती दोघे माणसे गेली, ती परत आली सुद्धा नाही. निशा तशीच झाडाला बांधून होती.
ती डोळे बंद करुन देवाला प्रार्थना करत होती, 
“यातून काही तरी मार्ग दाखव देवा. मला यातून सोडवं.”
निशाची मनोमन प्रार्थना सुरू होती.


क्रमश:

🎭 Series Post

View all