Feb 26, 2024
नारीवादी

काटेरी वेदना

Read Later
काटेरी वेदना
काटेरी वेदनांवर चालतांना

तिला सासरी मान आहे ,सन्मान आहे ,सुखात नांदत आहे ,मोठे पद आहे...नवरा चांगला आहे असे तिचे सुख मोजत होता तो...तो तिचा नवरा होता

तिला लग्नात घेऊन आला होता ,अत्येबहीणीच्या मुलीच्या..

तिला ह्या लग्नात सोडून तो तिच्या माहेरी असलेल्या काकाच्या मुलीच्या लग्नाच्या हळदीची गेला होता..

तो तिथे गेल्यावर तिच्या माहेरच्यांनी विचारले ,आमची ताई ती कुठे आहे...तिला आणायचे होते..खूप इच्छा होती तिची बहिणीच्या लग्नात मिरवायची..

नवरा म्हणाला तिला सासरच्या लग्नात खूप मानपान द्यायचे ,करायचे होते म्हणून तिला म्हंटले तू तुझी जबाबदारी पाड मी जाऊन येतो हळदीला..

असे म्हणून नवऱ्याने टाळले तिच्या आईने वडिलांनी आणि इतर माहेरच्यांनी विचारलेले प्रश्न..

माहेरच्यांना राग आला होता ,जावई लेकीला घेऊन आला नसल्याचा...म्हणून बरेच जण नेहमीसारखे बोलत नव्हते..ना कोणी हवा तसा मान दिला.

इकडे मुलगी मात्र सासरचे लग्न आहे म्हणून राबत होती , नवरा नसल्याने तिला नेहमीसारखा मान नाही मिळाला तरी ती त्याच्यासाठी करत होती...सगळ्यांच्या नजरा तिला कळत होत्या...कसली तरी खुन्नस आणि ईर्षा जाणवत होती...सगळ्यांना मान दिला पण तिला नाही..

तो नसल्यामुळे तिची चौकशी ही करावी वाटली नाही कोणाला... ह्या सगळ्या काटेरी वेदना तिला खूप टोचत होत्या...परकेपणा ची वागणूक मिळत होती...तरी हसून सहन करत होती

तो तिच्या माहेरातून आला आणि लग्नात तिला भेटून तिच्या माहेरच्यांनी कशी परकी वागणूक दिली हे सांगत होता, त्याला ते सहन झाले नाही म्हणून तो तसाच निघून आला..तिची तगमग तो तिला वैतागुण जाहीर करत होता.

तितक्यात एक जण म्हणजे त्याच्या नात्यातील मावशी जवळ आली आणि त्याच्या सोबत बोलू लागली, तिने जवळ उभ्या असलेल्या बायकोला विचारले ही नाही..तिला टाळले....दुसरी आली तिने दादाचा हात पकडून फोटो काढायला बोलवले पण वहिनीला नाही बोलवले...जेवणासाठी भावाला आग्रह धरला पण वहिनीला कामाला लावले..

हे सगळे तो पहात होता ,तिला किती अपमानित केले असेल आजवर सगळ्यांनी ह्याची जाणीव होताच त्याचा झालेला अपमान विसरला आणि लगेच त्याने तिला भर लग्नातून घरी आणले..

तो तिच्या जवळ बसून म्हणाला ,तू किती करतेस ग ,किती अपमानाचे काटे तुला टोचले असतील इतक्या वर्षात...किती वेदना हसत सहन केल्या असतील तू मग माझा हा क्षुल्लक अपमान मी नाही सहन करू शकलो , त्यात तुझ्या घरच्यांचा राग सहाजिक होताच...

मला ज्या वेदना झाल्या त्यापेक्षा तुझ्या तरी किती तरी पटीने टोचणाऱ्या आहेत....मला हे समजायला किती वर्षे गेले...पण आता नाही सहन करू देणार मी तुला माझ्या घरच्यांकडून होणारा तुझा अपमान....तुझा अपमान तो माझा ही अपमान असेल इथून पुढे..

©®अनुराधा आंधळे पालवे
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Anuradha Andhale Palve

Government Job

... I Search My Identity In Being A Writer Of My Soul

//