काटेरी वाटेवरून चालताना... भाग 74

Mazi aaich maze baba pan aahe

काटेरी वाटेवरून चालताना भाग 74


आधीच्या भागात आपण पाहिले की,

निनाद आनंदीला तिच्या घरी रात्री लपून भेटायला गेला होता आणि त्याने तिच्या ओठांचे चुंबन घेतलं. ही गोष्ट तिला आवडली नाही, ती त्याच्याशी बोललीच नाही. तिने त्याचा कॉलही घेतला नाही. निनाद तिच्या घरी गेला, तिच्या आईची परमिशन घेऊन तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला. दोघांनी जेवण केलं आणि त्यानंतर निनादने तिला सरप्राईज दिलं. तिला डोळे बंद करायला सांगितलं. आनंदीने डोळे बंद केले. 

आता पुढे,

निनाद हॉटेलच्या रूमवर घेऊन गेला, रूमचा दार उघडून तिला आत नेलं आणि त्यानंतर तिच्या डोळा वरून हात काढला. आनंदीने डोळे उघडले. पूर्ण रूम सजवलेली होती, सगळीकडे रेड फ्लॉवर्स आणि रेड बलून्स लावलेले होते. हे सगळं बघून आनंदीला खूप आश्चर्य वाटलं. पण तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तिला हे सगळं बघून प्रफुल्लित वाटलं.

“हे सगळं काय आहे?” आनंदीने आश्चर्याने विचारलं.


“माझी होणारी बायको रुसली होती मग तिच्यासाठी एवढं तर करायलाच हवं ना.” असं म्हणून त्याने तिला दोन्ही हाताने वर उचललं. तिने दोन्ही हात त्याच्या गळ्यात घातले. दोघांची नजरानजर झाली. दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. त्याने तिला हळूच बेडवर ठेवलं, तिच्या चेहऱ्यावरून अलगद हळुवार हात फिरवला तसे तिने डोळे बंद केले. त्याने तिच्या सर्वांगावर हात फिरवला, तिची धडधड वाढली. तिचे अंग शहारले, तिचे हात पाय थरथरायला लागले.


तिने त्याला घट्ट मिठी केली, दोघांचेही ओठ जवळ आले. निनादची मिठी आणखी घट्ट झाली. दोघांची धडधड वाढली. दोघांनी ओठात ओठ घालून चुंबन केले. त्यानंतर दोघेही एकमेकांमध्ये समरस झाले. एक दोन तासानंतर आनंदीने डोळे उघडले, तिने सगळीकडे नजर फिरवली आणि आश्चर्याने ताडकन उठून बसली. तिला लक्षात यायला वेळ लागला नाही. तिने बाजूला बघितले तर निनाद झोपलेला होता. तिने त्याला उठवलं.


“निनाद उठा.. उठा निनाद..
तो गाढ झोपेत होता, आनंदीने स्वतःला सावरलं आणि ती तिथून घरी निघाली.


घरी गेल्यानंतर तिने आंघोळ केली. ‘आपल्याकडून हे कसं काय घडलं?’ या विचाराने ती भांबावली, काय होतंय तिचं तिलाच काही कळत नव्हतं. ती कुणाशी काहीही न बोलता बालकणीत बसलेली होती.

दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे लग्नाच्या कपड्याच्या खरेदीला जाणार होते. निनाद आणि त्याच्या घरचे आनंदी आणि निशाला घ्यायला आले. त्यावेळी आनंदी निनादशी काहीच बोलली नाही. 

“काय झाला आनंदी? बोलत का नाहीस माझ्याशी?” निनाद

“निनाद आपल्यात जे काही घडलं ते मला आवडलेलं नाही आहे.” आनंदी


‘मग काय झाल?  घडलं तर घडलं, लग्नानंतर जे घडणार होतं ते लग्नाआधी घडलं आणि त्यात काहीही वावगं नाहीये. आपण दोघं लग्न करून एकमेकांना सुखी ठेवू शकू की नाही याची तपासणी होती ती.”

“काय?” आनंदीने आश्चर्य व्यक्त केलं.

हे सगळं चुकीच आहे तिला कळत होतं पण आता त्याच्याशी लग्न जमलं तर ही गोष्ट इथे संपवावी म्हणून ती गप्प राहिली.

लग्नाची तयारी झाली दोन दिवसावर लग्न आलं.

संगीत आणि मेहंदीची संपूर्ण तयारी झाली. आज आनंदीला मेहंदी लागणार होती. घरासमोर छान डेकोरेशन केलं, स्टेज तयार केला. सगळे पाहुणे जमले, आजूबाजूचे शेजारी जमले. कार्यक्रमाला सुरुवात झाली. आनंदीने गोल्डन कलरचा लेहंगा घातला होता, त्यावर ऑक्सीडाईज ज्वेलरी घातली होती. संगीतचा कार्यक्रम सुरू झाला. कपल डान्स सुरू झाले, कपल डान्स, सिंगल डान्स, ग्रुप डान्स सगळे झाले. 
आनंदीच्या मैत्रिणींनी पण डान्स केले. त्यानंतर स्टेजवर आनंदी गेली. सगळ्यांनी विक्रमला पण स्टेजवर जायला सांगितलं.


विक्रम स्टेजवर गेला, त्यानंतर गाणं सुरू झालं.

“बाबा मै तेरी मलिका..” आनंदीने गाणं बंद करायला सांगितलं. तिने निशाला आवाज दिला, निशा स्टेजवर आली त्यानंतर तिने दोन्ही हाताने दोघांचे एक एक हात पकडले आणि डान्स ला सुरुवात झाली.

“बाबा मै तेरी मलिका
तुकडा हु तेरे दिल का
एक बार देहलीज 
पार करा दे ना,
“बाबा मै तेरी मलिका
तुकडा हु तेरे दिलं का
एक बार दहलीझ 
पार करा दे ना..


गाण्यावर डान्स झाला आणि त्यानंतर आनंदीने हातात माईक घेऊन बोलायला सुरुवात केली.

“खरंतर हे गाणं एक बाबा आणि मुलगी यांना डेडिकेट केलेला आहे. प्रत्येक जण आपल्या बाबांसाठी हे गाणं म्हणतो. पण मी आज इथे माझे बाबा आणि माझी आई दोघांसाठी करते आहे. माझी आई माझं सर्वस्व आहे, ही माझी आई पण माझं बाबा पण आहे. माझ्या जीवनात जेवढे बाबांचे स्थान आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे स्थान माझ्या आईचं आहे. तिने माझ्यासाठी काय काय केलंय हे सगळं तुम्ही जाणताच आहात.”


आनंदी दोघांच्या पाया पडली आणि दोघांनाही जवळ घेतलं.
 संगीतचा कार्यक्रम पार पडला, त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला. मेहंदी वाली मुलगी आली तिने आनंदीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात केली. हाताच्या मधोमध निनादचं नाव लिहिलं. सगळ्या मैत्रिणी तिला चिडवायला लागल्या.


मैत्रिणी चिडवल्यानंतर नवरीच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो, ती ज्याप्रकारे लाजते तसा आनंद आनंदीच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. प्रिन्सिच्या लक्षात आलं की आनंदीच्या मनात काहीतरी आहे. तिने तिच्या कानाजवळ हळूच विचारलं,

“काय झाल आनंदी? काही प्रॉब्लेम आहे का?” प्रिन्सि
आनंदीने चेहऱ्यावर हास्य आणलं आणि बोलली.
“नाही ग कुठे काय? सगळ मस्त आहे.” आनंदी

“आनंदी खोटं बोलू नकोस, तुझा चेहरा सगळं सांगतोय. काय झालं? तुझ्या मनाप्रमाणे होत नाहीये का? काही राहिले का? काही करायचे आहे का तुला? तू बोल ना. तू बोलणार नाहीस तर कस कळेल.” प्रिन्सि

“प्रिन्सी खरच काही नाहीये ग.” आनंदी

“आनंदी तुला माझी शप्पथ.” असं म्हटल्यानंतर आनंदी तिला सगळं सांगायला तयार झाली पण तिने तिला सांगितलं. 
“प्रिन्सी आपण रात्री बोलूया ही जागा सगळं बोलण्यासाठी नाहीये सो रात्री सगळे झोपल्यानंतर तू मला भेट.” 

आनंदीच्या हातावर पायावर मेहंदी काढून झाली. त्यानंतर सगळ्या बायांनी पण मेहंदी काढून घेतली. जेवणाचा कार्यक्रम झाला आणि सगळे निवांत बसले.

दुसऱ्यादिवशी हळदीचा कार्यक्रम होणार होता, दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे तयार झाले नवरा मुलाकडून हळद लवकर येणार होती. सगळ्यांनी लवकर लवकर आवरून घेतलं. नवऱ्या मुलाची हळद आल्यानंतर आनंदीला हळद लागली. हळदीचा कार्यक्रम झाला, रात्री साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलाकडचे पाहुणे आले. आनंदीने गुलाबी कलरची गोल्डन काठाची साडी घातलेली होती, त्यावर गुलाबी स्टोनचे ज्वेलरी घातलेली होती. त्यात मॅचिंग बिंदी आणि बांगड्या घातलेल्या होत्या. आज आनंदी खूप सुंदर दिसत होती. हळदीने तिच्या चेहऱ्यावर अजून तेज आला होतं. ती खूप सुंदर दिसत होती.

मुलाकडचा साखरपुड्याचा कार्यक्रम झाला, त्यानंतर मुलीकडचे मुलाकडे साखरपुड्याचा कार्यक्रम करायला गेले. कार्यक्रम संपेपर्यंत अर्धी रात्र झालेली होती.

त्यानंतर सगळे झोपले, रात्री निनादने आनंदीला कॉल केला.

“हॅलो बोला निनाद.”

“झोपली होतीस..” निनाद
“नाही अजून.” आनंदी

“आज तू खूप सुंदर दिसत होती, फोटो बघितला मी. आता फक्त एक दिवस, मग आपण दोघं एकमेकांसोबत असू.” निनाद

“हम्मम...”
निनाद बोलत राहिला, आनंदी फक्त ऐकत होती. दोघांचं बोलणं झालं.

सकाळी सगळ्यांची घाई घाई सुरू झाली, अकरा वाजताचा मुहूर्त होता. मुहूर्त टळायला नको म्हणून सगळे पहाटे उठले, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. सगळ्यांच्या तयारी सुरू झाल्या. आनंदीने पण आंघोळ करून पूजा केली. त्यानंतर पार्लरची मुलगी आली, तिने आनंदीला तयार केलं. त्यानंतर पुन्हा पूजेचे विधी झाले.

जसा जसा वेळ सरकत होता तशी तशी आनंदीची धडधड वाढत होती. आनंदीचा मन चलबिचल होत होतं. तिला आनंद होत होता पण तेवढेच अस्वस्थ ही वाटत होतं. तिच्या मनाची घालमेल सुरू होती.


क्रमश:

🎭 Series Post

View all