Feb 23, 2024
नारीवादी

काटेरी वाटेवरून चालताना...भाग 64

Read Later
काटेरी वाटेवरून चालताना...भाग 64

काटेरी वाटेवरून चालताना भाग 64


आधीच्या भागात आपण पाहिले की,

विक्रम परत आला, त्याला मारण्यासाठी षडयंत्र तयार केला होता, पण सुदैवाने तो वाचला.
विक्रम ऑफिसला गेला, त्याच्या सगळं लक्षात आलं, पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करून त्यांना अटक केली. 


निशाने तिच्या प्रेमाची कबुली दिली, दोघांनीही रजिस्टर मॅरेज केलं. दोघेही कुलदैवताच्या दर्शनाला गेले, इकडे आनंदीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. निशा परत आली, तिने तिची समजूत घातली. आनंदीला तिची चूक कळली. आनंदीने विक्रमल त्याच्या फॅमिली विषयी विचारलं, विक्रम भावुक झाला.

आता पुढे,

“काय झालं अंकल.”
“यु आर लकी, की तुझ्याजवळ निशा सारखी आई आहे. तुला एक प्रेमळ आजी आहे. राहायला घर आहे, सुखसुविधा आहेत. अंगावर चांगले कपडे आहेत. माझ्याजवळ यातलं काहीच नव्हतं.” बोलता बोलता विक्रमचे डोळे पाणावले.

“व्हॉट हॅपेंड अंकल.”

“मी अनाथाश्रमात वाढलोय आनंदी.”

“तुम्हाला आई-बाबा नव्हते?”
“मी लहान असतानाचं माझे आई-बाबा मला सोडून गेले. मला तर त्यांचा चेहराही नीट आठवत नाही. आई बाबा गेल्यानंतर कोणीही माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. नातेवाईक म्हणायला सगळे होते, काका मामा आत्या जवळचे दूरचे खूप नातेवाईक आहेत पण ज्यावेळी मला गरज होती त्यावेळी कुणी मला जवळ घेतलं नाही. शेवटी मला शेजारच्या काकांनी अनाथाश्रमात आणून ठेवलं. ते तर परके किती दिवस मला त्यांच्याकडे ठेवणार होते. त्यांनी बरीच मदत केली मला त्यांचे उपकार विसरणार नाही मी कधीच. मी त्यांना मध्ये मध्ये भेटायला जातो, त्यांच्यासाठी काहीतरी नवीन नवीन घेऊन जात असतो. तुला माहितीये आनंदी रस्त्यावरच्या मुलांना मी त्यांच्या आई-बाबासोबत असा बघायचो ना तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. कधी कधी आम्ही सगळे मित्र गार्डनमध्ये खेळायला जायचो, तिथे सगळे मुलं फुटबॉल बॅट-बॉल खेळायचे तेही त्यांच्या आई बाबासोबत, त्यांना खेळताना बघून मला खूप रडायला यायचं. असं वाटायचं की माझ्या सोबतच कुणीच नाही. मलाही हवे होते त्यांचे प्रेम. मला ही माझे आई बाबा हवे होते.” विक्रमचा कंठ दाटून आला.

“आय एम सॉरी अंकल. मी तुम्हाला विचारायला नको होतं.”

“सॉरी काय त्यात, बरं झालं तू विचारलंस. कितीतरी वर्षानंतर मी माझ्या आठवणींना उजाळा देतोय. माझ्या मनातली दारे मी कधीच बंद करून ठेवलेली होती. आज तुझ्या निमित्ताने ती दारे उघडली. तुझ्या निमित्ताने मी माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तुझ्या निमित्ताने मनात साचलेल्या भावना बाहेर निघाल्या. थँक्स टू यू आनंदी.” विक्रमने तिच्या डोक्यावर हात ठेवला.
विक्रम समोर बोलायला लागला,


“तुला माहित आहे आनंदी, मी अभ्यासात हुशार होतो पण माझ्याकडे वाचण्यासाठी पुस्तकं नसायची. अनाथ आश्रम मधून मदत मिळायची पण पुरेशी तेवढी मदत मिळत नव्हती. मला पुस्तक घ्यायला कधी कधी पैसे राहत नव्हते तर मी सकाळी पेपर वाटपला जायचो. त्याचे जेवढे पैसे मिळायचे त्यातून पुस्तक विकत घ्यायचो आणि छोट्या छोट्या हॉटेलमध्ये वेटरचे काम सुद्धा केले होते. दहा रुपये मिळायचे ते मी जमा करून ठेवायचो. असं करत करत मी दहावीपर्यंत पोहोचलो. दहावीचं वर्ष मी नाही विसरणार, तेच वर्षे माझ्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. मी दहावीला असताना रात्र रात्र जागून अभ्यास करायचो. अनाथ आश्रम मध्ये रात्री लाईट सुरू ठेवण्याची परमिशन नव्हती म्हणून मी रस्त्यावरच्या खांबाच्या लाईटच्या खाली बसायचो. तिथे रात्र-रात्र अभ्यास करत होतो पण आजूबाजूचे लोक मला त्रास द्यायचे. कुणी पागल समजून मला गोटे मारायचे. एक-दोनदा जखमीही झालो पण जिद्द सोडली नाही अभ्यास करत राहिलो अगदी जिद्दीने आणि मला दहावीला पंचानवे टक्के मिळाले. सगळे खूप आनंदित झाले. सगळ्यांनी खूप कौतुक केलं माझं. पण जी कौतुकाची थाप मला हवी होती ती मिळाली नाही, जो आशीर्वादाचा हात मला हवा होता तो मिळाला नाही, माथ्यावरचं चुंबन घेण्यासाठी जे ओठ हवे होते ते नव्हते. निकाल लागल्याचा आनंद तर होताच पण जवळ कुणीच नाही याच दुःख जास्त होतं. त्या रात्री मी खूप रडलो खूप रडलो आणि पुन्हा हिमतीने उभा राहिलो. मी मेरिटमध्ये आल्यामुळे मला स्कॉलरशिप मिळाली. माझी ऍडमिशन दुसऱ्या शाळेत झाली. आता माझ्या शिक्षणाचा सगळा खर्च सरकार कडून होणार होता. त्यानंतर मी कधीच मागे वळून बघितलं नाही. फक्त मी माझ्याकडे ध्येयाकडे बघत राहिलो आणि इथं पर्यंत येऊन पोहोचलोय. म्हणून तुला सांगतो आनंदी हिंमत हरू नकोस. खूप अभ्यास कर खूप मोठी हो.” असं म्हणत विक्रम तिथून निघून गेला.

आनंदी पण जिद्दीने अभ्यासाला लागली. सगळ्यांचे रोजचे रुटीन सुरू झाले. नेहा आणि विक्रम सोबतच ऑफिसला जायचे आणि सोबतच यायचे. निर्मलाला आता बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्यासाठी एक बाई लावलेली होती, ती दिवसभर घरचे काम करायची आणि निर्मलाला सांभाळायची. आनंदीने चांगला अभ्यास करून बॅक राहिलेला पेपर काढला आणि तिने सेकंड इयरच्या अभ्यासाला सुरुवात केली. ती दिवसभर कॉलेजला जात असे आणि तिकडुन आल्यानंतर रात्री अभ्यास करत असे. विक्रम तिला अभ्यासात मदत करायचा. आता निशाचं छान चौकोनी कुटुंब, आनंदी कुटुंब तयार झालं होतं.

असेच दिवस सरत गेले आणि आनंदीचं इंजिनियरिंग पूर्ण झालं. तिला पुन्हा समोर शिकायचं होतं. म्हणून तिने एमबीए साठी इन्ट्रान्स परीक्षा दिली आणि त्यात पास होऊन आनंदीला एमबीए मध्ये ऍडमिशन मिळाली. 


आनंदीचं कॉलेज जवळ नसल्या कारणाने रोज अपडाऊन करणे शक्य नव्हते. म्हणून तिने तिघे होस्टेलवर राहण्यासाठी निशाकडे हट्ट धरला.

“आई मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.” आनंदी
“हा बोल ना ग.” निशा


“काही नाही, मी म्हणत होते की आई कोलेज खूप लांब आहे, अपडाऊन करण्यापेक्षा मी तिथेच हॉस्टेलवर राहिले तर? तुला चालेल का आई? माझ्या बाकीच्या मैत्रिणी पण असतात तिकडे. कॉलेजही जवळ आहे. तुला योग्य वाटत असेल तर विचार कर ना.”

“मी विक्रमशी बोलते मग आपण विचार करू , आत्ता नको बाळा मला काम आहे, मी माझं काम टाकून देऊ शकत नाही. मग आपण बोलू थोड्या वेळात.”

विक्रमने बाहेर येऊन आनंदीला विचारलं, त्याने लगेच परमिशन दिली. निशाला हे आवडलं नाही.
“विक्रम तू तिचे जास्त लाड करतोस असं वाटत नाही का तुला? आपण विचार केला असता. परमिशन द्यायची काय गरज होती. आपण विचार करून ठरवलं असतं.”

“निशा असू दे ग, काही गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होऊ दे. आपण उद्या जाऊया आणि हॉस्टेल बघू.”

दुसर्‍या दिवशी निशा, विक्रम आणि आनंदी तिघेही आनंदीच्या कॉलेजमध्ये गेले. तिथे तिच्या सरांशी भेटून, बोलून हॉस्टेलविषयी माहिती काढली. त्यानंतर ते हॉस्टेल बघायला गेले. तेथील वातावरण खूप छान होतं, तिथे राहणाऱ्या मुली, रुम्स, बाकीच्या फॅसिलिटीज चांगल्या होत्या. त्यामुळे विक्रमला काही वावगं वाटलं नाही पण निशाला हे सगळं नको होतं. ती तेव्हा तशी बोलली नाही गप्प होती. तिघेही घरी आले, जेवण वगैरे झाल्यानंतर सगळे आपापल्या खोलीत गेले. विक्रम हॉलमध्ये टीव्ही बघत बसलेला होता. निशा त्याच्या बाजूला जाऊन बसली,

“विक्रम मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे.”

“बोल ना.”

“मला आनंदीला होस्टेलवर पाठवायचं नाही आहे.”

“का? का नाही पाठवायचं निशा?”

“विक्रम तिने इथून कॉलेज केलं तर काय बिघडणार आहे. मी तिला घरी कुठलेही काम सांगणार नाही किंवा तिच्यावर कुठलाही दबाव टाकणार नाही. आपण तिला नको पाठवूयात ना प्लिज.” निशा विक्रमला विनंती करत होती.

“पण काय प्रॉब्लेम आहे निशा? तिच्या एज्युकेशनचा प्रश्न आहे, तिला जर तिथे कम्फर्ट वाटत असेल तर राहू देत ना आणि येण्या-जाण्यात एवढा वेळ जातो तेवढा वेळ ती तिकडे अभ्यास करेल. तिला बाहेरच्या मैत्रिणी भेटतील, थोडं वातावरण चेंज होईल तिला बरं वाटेल.”

“पण विक्रम..” निशा बोलता बोलता थांबली.
“काय झालं निशा? का इतकी अपसेट आहेस?”

“विक्रम तिथे सगळे असतील रे पण मी नसेल.”
हे ऐकून विक्रम स्तब्ध झाला.


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing

//