काटेरी वाटेवरून चालताना भाग 61

Vikram kuthe gela kunalach mahit nvhat

काटेरी वाटेवरून चालताना भाग 61


आधीच्या भागात आपण पाहिले की,

आनंदीच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग झाली, तिथे विक्रम आलेला निशाला आवडलेलं नव्हतं.


निर्मलाने निशाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण निशाला कुणाशीही नवीन नातं जोडायचं नाही असं तिने सांगितलं, तिला आता कुणावरही विश्वास ठेवायचा नव्हता. त्या दोघींचं बोलणं सुरू असताना तिथे आनंदी आली. तिने निशाला प्रश्न केला.
जर मला बाबा हवा असेल तर? त्यावर निशा बोलली, त्याला तुझा बाबा बनविण्यासाठी मला आधी त्याचा नवरा म्हणून स्वीकार करावा लागेल, मला आता नवीन नातं नको आहे.


आता पुढे,


त्यांनतर कुणीही हा विषय काढला नाही. निर्मला आणि आनंदीने ठरवलं होतं, जोपर्यंत निशा स्वतःहून  हा विषय काढत नाही तोपर्यंत आपणही काही बोलायचं  नाही.
समोरचे दोन तीन दिवस निशा ऑफिसला गेली नाही, तिने ऑफिसमध्ये फोन करून कळवलं होतं.
त्यानंतर निशा ऑफिसला गेली. ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली. का कुणास ठाऊक तिची नजर भिरभिरत होती, कुणाला तरी शोधत होती पण तिने तसा कुणाला दाखवलं नाही. ती तिच्या डेस्कवर बसली आणि बाजूच्या नेहाशी बोलायला लागली.

“हाय नेहा..” निशा
“हाय.. कशी आहेस?” नेहा

“मी बरी आहे, तू कशी आहे?” निशा
“मी पण बरी आहे.” नेहा
“कसं चाललय ग ऑफिसमध्ये सगळ?”निशा

“छान चाललंय.” नेहा

“सर वगैरे येत आहेत ना ऑफिसमध्ये.” निशा

“नाही ग, सर दोन-तीन दिवस आलेले नाही.” नेहा

“आले नाही, का ग?”निशा

“आता येणार नाही ते, दुसऱ्या ब्रांचला शिफ्ट झालेत.” नेहा

“काय? कोणी सांगितलं तुला?” निशा

“त्यांनी ऑफिसच्या लॅपटॉपवर मेल केला होता.” नेहा

 “असे कसे गेले ते? असे कसे जाऊ शकतात? मला काहीच बोलले नाही, मला काहीही न बोलता न सांगता असे कसे जाऊ शकतात?” निशा भांबावल्यासारखी बोलायला लागली.

“निशा काय बोलतेस.. निशा..काय ग काय झालं?” नेहा

“काही नाही..” निशा पटकन उठली, बाहेर गेली विक्रमचा नंबर डायल केला. रिंग गेली पण विक्रमने फोन रिसीव नाही केला. निशाने खूपदा ट्राय केलं पण त्याने फोन उचलला नाही. त्यांनतर विक्रमचा फोन स्विच ऑफ दाखवत होता.

निशाचे पेशन्स संपले, तिला आता खूप रडायला आलं. ती आत गेली, पिऊन काकाला विचारलं.

“सर कुठे गेले तुम्हाला माहित आहे का? ते काही सांगून गेलेत का? ते कधी परत येणार आहेत?”

“नाही मॅडम, सर कुठे गेले माहित नाही. त्यांनी फक्त एवढाच मेसेज टाकला की मी दुसऱ्या ब्रांचमध्ये शिफ्ट झालोय.”

“पण ते कुठे गेले? किती दिवसासाठी गेले? कधी परत येणार आहेत?”


“कोणालाच काही माहीत नाही.”

“अहो काका पण असं कसं होऊ शकतं. इथे सध्या कोण आहे?”

“कुणीतरी येणार आहे असं आमच्या कानावर आल आहे.”

“मला सांगा काका तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहित आहे का? त्यांचं घर कुठे आहे? ते कुठे राहतात? काही माहिती आहे का तुम्हाला?”

“नाही मॅडम, मला कसं माहित असणार, मी एक साधा चपराशी.” असं म्हणत तो निघून गेला.
आता निशा हतबल झाली, ती तिच्या डेस्कवर जवळ जाऊन उभी राहिली आणि हतबल होऊन बसली. तिला खूप रडायला येत होतं, धडधड वाढलेली होती. नेहा तिच्याकडे विचित्रपणे बघत होती.

“काय झालं निशा अशी का करतेस? काय झालं?” नेहा

“काही नाही मी घरी जाते.” असं म्हणत तिने पर्स घेतली आणि घरी जायला निघाली.


रस्त्याने बेभान चालत राहिली, तिच्या डोक्यात नानाविध प्रकारचे विचार येत होते. ती कुठे जात आहे  तिचं तिलाच माहित नव्हतं. ऊन, वारा सगळं झेलत ती पायवाट काढत होती. चालता चालता ती एका निर्जन ठिकाणी पोहोचली. 
गाडीच्या हॉर्नने ती भानावर आली.
“ये बाई मरायच आहे का? मरायचं असेल तर विहिरीत जाऊन उडी मारा. माझ्या गाडीसमोर का येता?” गाडीतला माणूस ओरडला.

“सॉरी दादा..” असं म्हणत ती रस्त्याच्या कडेला गेली आणि पुन्हा चालायला लागली. थोडं दुर गेल्यावर तिच्या लक्षात आलं ती खूप दूर कुठेतरी निर्जन ठिकाणी पोहोचली. ती इकडे तिकडे बघायला लागली.

“मी कुठे येऊन पोहोचले? हे विचित्र ठिकाण कुठलं आहे.?”
तिला आता भिती वाटायला लागली, ती तशीच परतली. संध्याकाळ झाली होती, अंधार पडायला आला होता. ऑटोही मिळेना, खूप दूर दूरपर्यंत काहीच दिसत नव्हतं. समोर चालत गेली आणि एक ऑटो दिसला. तिने लगेच हात दाखवला आणि ऑटोमध्ये बसली आणि घरी गेली.

घरी पोहोचल्यानंतर दारातून आत जाताच पर्स सोफ्यावर फेकली.
“आई.. आई..” निशाने आवाज दिला.
“काय झालं निशा? आणि इतका उशीर का केलास?  काय ग अशी काय अवस्था केलीस?”

निशा निर्मलाला बिलगली आणि ढसाढसा रडायला लागली. तिला रडताना निर्मलाला खूप विचित्र वाटलं.
“निशा काय झालं? अशी काय रडतेस?”

“आई विक्रम...” निशा बोलता बोलता रडायला लागली.
“विक्रम...काय झालं त्याला..” निर्मला
निशा रडतच होती
“अगं काय झालं? बोल ना काय झालं विक्रमला?” आता निर्मलाला पण काळजी वाटू लागली.

“विक्रम कुठे गेला? कधी येणार आहे? कुणालाच काही माहीत नाही. तो  फोन उचलत नाहीये. आता स्विच ऑफ दाखवतोय. तो कुठे राहतो हेही मला माहीत नाही. मी कुठे शोधू? कुठे जाऊ? त्याला कुठे शोधायला जाऊ?” निशा खूप भांबावली.
“तुझ्यासाठी तर चांगलंच आहे ना तसही तुला तू नकोच होता, मग आता का रडतेस?” निर्मला

“आई मी त्याला का शोधत आहे मला नाही माहित? पण आता मला असं वाटतं तो माझ्या जवळ असावा. तो दूर गेल्याने मला त्रास होतोय ग. मग मला त्रास का होतोय? का कुणास ठाऊक तो दूर गेल्याचं दुःख होत आहे. मला मला खूप त्रास होत आहे.” निशा

“तू शांत हो, विक्रम येईल.”
निर्मलाने निशाला बसवलं.
“तू शांत बस बेटा, होईल.. सगळं ठीक होईल. देव तुझ्यापासून आता कोणताही आनंद हिरावून घेणार नाही. विक्रम नक्की येईल तू घाबरू नकोस, त्रास करून घेऊ नकोस. तुझ्या मनात त्याच्याविषयी खरं तर चांगल्या भावना असतील पण आता तू अशी खचून जाऊ नकोस. इतक्या संकटांना सामोरी गेली आहेस. मग हे संकट काय आहे तुझ्या समोर काहीच नाही.”

“पण आई कुठे गेला असेल तो, त्याला काही झालं तर नसेल ना? नाही नाही त्याला काही होणार नाही. आई त्याच्याशी बोलल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मी पण जाते त्याला शोधायला.. मी काय करू ग कुठे शोधू? मला काहीच माहित नाही.”

“सगळ्यात आधी शांत हो, प्रार्थना कर तो नक्की तुझ्याकडे धाव घेईल.”
निशा रात्रभर त्याच्याच विचारात होती.
‘कसा असेल? कुठे असेल? त्याला माझ्या वागण्याचा खूप त्रास झाला आणि म्हणून तर तो निघून गेला, अस तर नसेल? इतके प्रश्न निर्माण होत आहेत पण कुठलंच उत्तर मिळत नाही आहे’
आनंदीच्या कानावर सगळं आलं, ती पण खूप उदास झाली होती. तिघीही आपापल्या खोलीत जाऊन उदास बसल्या होत्या. रात्रभर त्याचेच  विचार सुरू होते.


निशा पहाटे उठली, आंघोळ करून तयार झाली आणि देवासमोर बसून प्रार्थना करू लागली.


“हे देवा,विक्रम जिथे कुठे असेल त्याला सुरक्षित ठेव. आणि माझी त्याच्याशी भेट घडवून दे.” 


निर्मला पण देव पाण्यात टाकून बसलेली होती.
आनंदीने पण तिच्या फ्रेंड सर्कल मध्ये सगळ्यांना विक्रम बद्दल सांगितलं आणि त्याचा मोबाईल नंबर दिला. कुणाला जर लोकेशन कळलं तर प्लिज सांगा अस सगळ्यांना सांगून ठेवलं.


निशा ऑफिसला गेली, विक्रमच्या केबिनमध्ये जाणार तो  पाठीमागेहून कुणीतरी आवाज दिला..
निशा पलटली, बघते तर काय.....


क्रमशः

🎭 Series Post

View all