काटेरी वाटेवरून चालताना... भाग 58

Nirmla achanak khali kosallya

काटेरी वाटेवरून चालताना भाग 58


आधीच्या भागात आपण पाहिले की,


विक्रम निशाला डिनरला घेऊन गेला, तिथे त्याने निशाला प्रपोज केलं, लग्नाची मागणी घातली.
निशासाठी हे सगळं अनपेक्षित होतं, ती काहीही न बोलता तिथून निघून गेली.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये विक्रमने तिला केबिनमध्ये बोलावलं, ती गेली व तिथेही ती त्याच्याशी खूप चिडून बोलली.
विक्रमने खूप छान पद्धतीने तिला समजावलं. तिने शांतपणे ऐकलं आणि घरी गेली.
विक्रम विचार करत बसला होता.


आता पुढे,


दुसऱ्या दिवशी निशाला काहीही न सांगता विक्रम तिच्या घरी गेला.
“येऊ का आत?” विक्रम
“विक्रम बेटा, ये ये आत ये.” निर्मला
विक्रम आत येऊन बसला, निर्मला  किचनमध्ये गेली. 
‘आज इतकी शांतता का? निशा, आनंदी दोघ्याही घरात नसतील का?’ मोबाईल बघत विक्रमने विचार केला.
निर्मला आतून ट्रे घेऊन आली,आणि येता येता ती खाली पडली, त्या आवाजाने विक्रम उठला,बघतो तर काय निर्मला खाली कोसळलेली होती.


“निशा...आनंदी..आत कुणी आहे का?” विक्रमने आवाज दिला तेव्हा दोघी बाहेर आल्या.
निर्मलाला असं पडलेलं बघून त्या दोघी खूप घाबरल्या.

“काय झाल आईला? काय झालं अचानक?  एक मिनिटं ( ती विक्रमकडे बघत) तू इकडे कधी आलास? तू काही बोललास का ?”

“अग मी आता पाच मिनिटं झालीत आलोय. आणि मी काहीही बोललेलो नाही आहे. यांना काय झालं काय माहित? त्या आतून ट्रे घेऊन येत होत्या आणि अचानक खाली कोसळल्या. चक्कर आली असेल त्यांना. तुम्ही त्या बाजूने हात पकडा, आपण यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. निशाने एक हात पकडला, दुसऱ्या बाजूने विक्रमने हात पकडला आणि दोघांनी मिळून निर्मलाला गाडीत बसवलं. आनंदीने दाराला कुलूप लावलं, दोघी गाडीत बसल्या आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने निघाली.

हॉस्पिटलजवळ गाडी पोहोचताच विक्रम पटकन खाली उतरला, त्याने एकट्याने दोन्ही हाताने निर्मलाला पकडलं आणि पटापट पाय टाकत आतमध्ये गेला.


“एक्सक्युज मी सिस्टर... सिस्टर प्लिज चेक हर.. ह्या अचानक खाली कोसळल्या, चक्कर आली असेल बहुतेक. प्लिज तुम्ही चेक करा.” विक्रम अगतिक झाला होता.

“एक मिनिट वेट”  त्यांनी स्ट्रेचर बोलावलं. 
विक्रमने निर्मलाला स्ट्रेचरवर ठेवलं आणि त्यांना चेकअपसाठी घेऊन गेले.


दहा मिनिटात डॉक्टर आले,  डॉक्टरांनी चेक केलं.
डॉक्टरांनी त्यांची पूर्ण प्रोसिजर केली आणि काही तासानंतर ते बाहेर आले.
“डॉक्टर कश्या आहेत त्या?” विक्रमने विचारलं.
“माईल्ड अटॅक होता, त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल.”  
हे ऐकताच निशा शॉक झाली, तिने तोंडावर हात ठेवला आणि तिचे पाय आपोआप मागे सरकले, ती खूप घाबरली. 
ती गलंडणार तोच आनंदीने तिला पकडलं.
“आई अग सगळं नीट होईल, आजीला काहीही होणार नाही. तू घाबरू .”


विक्रमचं लक्ष गेलं, तो निशाकडे धावला.
“निशा तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. डॉक्टर आहेत ना, ते सगळं नीट करतील, त्यांनी सांगितलंय की काकू आऊट ऑफ डेंजर आहे. उगाच काळजी करू नकोस तू. तूच जर अशी अवस्था केलीस तर त्यांच्याकडे कोण बघणार? तू काळजी करू नकोस, आता आपल्याला त्यांची काळजी घ्यायची आहे आणि काकूंना काही होणार नाही, मी त्यांना काही होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा?” विक्रम

“निशाने होकारार्थी मान हलवली, आनंदीने तिला बाकावर बसवलं आणि ती आईसाठी पटकन पाणी घेऊन आली.
तिने आईला पाणी दिलं, निशा पाणी प्यायली. 

“निशा  खूप छान तयार केलंस तू आनंदीला.  ती स्वतः घाबरली नाही तर तिने तुला सावरलं. तुझी मुलगी फारच स्ट्रॉंग आहे. खूप छान संस्कार केलेस तू तिच्यावर. मला खूप प्राऊड फील होतंय. हे बघ निशा तू आता माझ्याविषयी काय विचार करतेस मला नाही माहित, मी तुझ्या घरी सहजच म्हणून आलो होतो आणि काकूंचं असं झालं म्हणून मी माणुसकीच्या नात्याने तुझी मदत करतोय, तूला जर याच्यात काही वेगळं वाटत असेल तर असं काही नाहीये. तू तसा वाईट विचार तुझ्या मनात आणूही नकोस. माझ्या मनात असं काही नाहीये माझ्या मनात तुझ्या विषयाची जी काय भावना आहे ते मी तुला स्पष्टपणे बोललोय. तरी तुला जर माझ्या विषय राग असेल , तुझ्या मनात जर राग असेल, तुला मी इथे आलेल आवडलं नसेल तर तू स्पष्टपणे बोल. मी जाईल.
बाजूला उभी  असलेली आनंदी सगळं ऐकत होती.
विक्रम निशाशी बोलून तिथून निघून गेला, तो गाडीचा डोअर ओपन करणार तितक्यात  आनंदी त्याच्याजवळ गेली.
“एक मिनिट अंकल, तुम्हाला अक्कल म्हंटले तर चालेल ना.” निशा

“हो बोल बेटा.”


“अंकल सॉरी, असं कोणाचं बोलणं ऐकू नये असं म्हणतात. पण मी मुद्दाम नाही ऐकलं, तुमच्या दोघांचं बोलणं माझ्या कानावर आलं. नक्की दोघांमध्ये काय झालं मला माहीत नाही. एवढं माहिती आहे की तुम्ही तुमच्या मनातलं जे काही आईला सांगितलं ते योग्यच असेल. तुम्ही असं काय बोललात? तिला काय सांगितलं? तिला काय पटलं नाही? मला यातलं काही माहित नाही पण तुमच्या मनात तिच्या विषयी जी काही भावना आहे ती निर्मळ आहे, असं मला वाटतं. मला अनुभव नाही कुठल्याच गोष्टीचा, मी अजूनही लहान आहे पण तरी आईच्या बोलण्यावरून, तिच्या सांगण्यावरून भावना काय असतात हे कळतं. मी आता फक्त एवढंच म्हणेन  अंकल तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, तुमच्या मनात जे काही आहे सगळं छान घडू देत.”
विक्रमने एक छोटीशी स्माईल दिली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि तो तिथून निघून गेला.

आनंदी पुन्हा आतमध्ये येऊन निशाच्या बाजूला बसली.
“आई आजी बरी होईल, तू काळजी करू नकोस.”
निशाने आनंदीला जवळ घेतलं,


“किती गुणाची ग माझी लेक, मला तुला आधार द्यायला हवा तर तू मला आधार देत आहेस. मला तुझं खरच खूप कौतुक वाटतंय बेटा. असं म्हणत निशाने तिच्या माथ्याचं चुंबन घेतलं.

विक्रम डायरेक्ट ऑफिसमध्ये गेला, दिवसभराचं काम करून त्याने हॉटेलमधून जेवणाचं पार्सल घेऊन तो हॉस्पिटलला गेला.


हॉस्पिटलमध्ये त्याला बघताच निशाने मान फिरवली.
पण आनंदी छान बोलली,
“हॅलो अंकल, आता तुम्ही इथे?”
“हो तुमच्या दोघींसाठी जेवण घेऊन आलोय. तुम्ही दोघी पटापट जेवून घ्या. मी तोपर्यंत काकूजवळ बसतो.
“मला भूक नाही.” निशा पटकन बोलली.


“सकाळपासून काहीच खाल्ल नाही, दुपारी चहा सुद्धा घेतला नाही आहेस. आता तुला जेवावं लागेल आई.” आनंदी

“अंकल घेऊन आलेत ना डब्बा, आपल्याला कुठे जावे लागत नाही आहे. आई तू जेवायला बस मी प्लेट करते.”आनंदी

आनंदीने प्लेटमध्ये जेवण काढलं आणि निशाला घास भरवला.
जेव्हा तिने निशाला घास भरवला निशाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आनंदीने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. निशाने पण आनंदीला घास भरवला.

“आनंदी बेटा, अंकल जेवले नसतील तू त्यांना विचारून ये. ते पण आपल्या सोबत जेवण करतील.”

“आई तुला खरंच असं वाटतं की ते जेवले नसतील.”

“हो मला माहिती आहे ते आपल्यासाठी जेवण घेऊन आलेत पण ते स्वतः जेवले नसतील.”
आनंदी आतमध्ये गेली, विक्रमकडे बघून
“अंकल चला जेवण करायला.”

“अगं नाही आनंदी, मी जेवण करून आलोय.”

आनंदीने स्मितहास्य केलं.


“अंकल मला माहिती आहे तुम्ही जेवण करून नाही आलात, प्लीज चल आमच्या सोबत जेवण करायला.”
विक्रम उठला आणि आनंदी सोबत गेला. तिघांनी जेवण केलं. त्यानंतर विक्रम वॉशरूमला गेला.
तेव्हा आनंदी निशाला बोलली.


“आई काहीही न बोलता तुला कसं कळलं की विक्रम अंकल जेवले नाहीत.”


आनंदीच्या या प्रश्नाचं उत्तर निशाने नाही दिलं पण तिने स्मितहास्य केलं आणि आनंदीच्या डोक्यावर हात ठेवला,
“तुलाही कळेल लवकरच.”


क्रमश:

🎭 Series Post

View all