काटेरी वाटेवरून चालताना... भाग 55

Nisha tyacha hat pkdun tyala bilgali


काटेरी वाटेवरून चालताना भाग 55


आधीच्या भागात आपण पाहिले की,


रागिणी आणि नितीन बद्दल ऐकून आनंदीला धक्का बसला.
निशाच्या ऑफिसमध्ये नवीन बॉस जॉईन झालेत.
स्वभावाने निशाला ते थोडे बरे वाटले.


निशाला ऑफिसला पोहोचताच त्यांनी केबिनमध्ये बोलावलं. नवीन प्रोजेक्टची माहिती दिली आणि प्रोजेक्टसाठी आऊट ऑफ टाऊन जावं लागेल सांगितलं. नवीन प्रोजेक्ट साठी निशाला आनंद झाला पण आऊट ऑफ टाऊन जावं लागणार म्हणून थोडी नर्व्हस झाली.


आता पुढे,


“काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे घरून परमिशन मिळणार नाही असं काही आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता.” विक्रम

“नाही सर तस काही नाही, पण तरीही मला एकदा घरी बोलावं लागेल.” निशा

‘एका परपुरुषासोबत बाहेर जाणं मला जोखीम वाटते.’ निशाच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते.


तिला मेघाची आठवण झाली, मेघाने अश्या अनेक प्रसंगांना तोंड दिलंय, तिच्या जवळ भरपूर कडू गोड आठवणी होत्या.
निशाने पर्स मधून मोबाईल काढला, मेघाचा नंबर डायल केला.
एकदा वाजला, दोनदा टाकला मेघाने फोन उचललाच नाही.
‘मेघा उचल ग फोन’ निशाला स्वतः बोलू लागली.


थोड्या वेळाने मेघाचा फोन आला.
निशाने पटकन रिसिव्ह केला.


“काय ग कधीची फोन करते आहे, उचलता येत नाही का तुला?  समोरच्याला काही महत्वाचं बोलायचं असेल असं तुला वाटलं नाही.” निशा एका दमात सगळं बोलली.


“निशा अग हो हो जरा शांत हो, आधी पाणी पी बघू.” मेघा
निशा पाणी प्यायली.
“हम्म बोल.” निशा
“अग मी मिटिंगमध्ये होते. बोल आता काय एवढं अर्जंट काम होतं?” मेघा

“एका नवीन प्रोजेक्टसाठी बॉससोबत आऊट ऑफ टाऊन जायचं आहे, तस त्यांनी सांगितलंय मला. मला काहीच कळत नाही आहे, मी काय करू?” निशा


“निशा अग चांगली संधी मिळाली आहे तुला, ही गमावू नकोस. स्वतःला प्रूफ कर,हीच संधी आहे स्वतःला प्रूफ करण्याची. तू बिनधास्त जा” मेघा


“पण मेघा तुला माहीत आहे ना, याआधी मला  वाईट अनुभव आलाय.” निशा

“हे बघ निशा, सगळीच माणसं सारखी नसतात, काही काही चांगली पण असतात. एकदा विश्वास दाखवून तर बघ. आणि हे बघ जेव्हा जाशील ना मला कॉन्टॅक्ट कर, मला लोकेशन पाठव. म्हणजे मला कळेल की कुठे आहेस. मला थोडी तरी हलचल जाणवली की मी अलर्ट होऊन तुला मदत करेल.” मेघा


दोघींचं बोलणं झालं, निशाला आता थोडं रिलॅक्स वाटत होतं.
संध्याकाळी घरी गेल्या गेल्या निशाने विषयाला हात घातला.
“आई, आनंदी दोघीही हॉल मध्ये या.” 


“काय झालं आई?” आनंदी

“सांगते आजीला येऊ दे.” निशा

निर्मला पण बाहेर आली, 
“बोल का अशी आवाज देत आहेस.”  निर्मला
“आई मला नवीन बॉससोबत प्रोजेक्टसाठी आऊट ऑफ टाऊन जायचं आहे. सरांनी मला तस आजच सांगितलंय. मी काय करू मला कळत नाही आहे. मेघाला फोन केला ती बोलली जा खूप छान संधी चालून आली आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आता तुम्ही दोघी सांगा मी काय करू? जाऊ की नको.” निशा


“मम्मा जा तू,इट्स ग्रेट अपोर्च्युनीटी.” आनंदी
“हो ग निशा जा तू, उगाच ही संधी वाया घालवू नकोस.” निर्मला
“अग पण आई तुम्हा दोघांना सोडून कशी जाऊ मी. माझ्या मागे तुमची काळजी कोण घेणार? आणि मी अशी तुम्हाला सोडून गेले तर माझं अर्ध लक्ष इकडेच असेल. कामातही लक्ष लागणार नाही.” निशा

“अग तू आमची काळजी करू नकोस. आम्ही करू मॅनेज.” निर्मला
“ओके मी उद्या बॉसशी बोलते. कधी, किती दिवसासाठी आणि कुठे जायचे आहे तेही विचारते.” निशा
“हो तू फ्रेश हो, मी चहा टाकते.” निर्मला

“आजी मला पण.” आनंदी

“हो ग तुला तर देणारच ना आजीबाई.”
तिघीही खळाळून हसल्या.
दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये सगळयांना कळलं की निशा विक्रम सोबत बाहेर जाणार आहे. सगळ्यांची कुजबुज सुरु झाली.


निशाने ऑफिसमध्ये एन्ट्री केली, सगळ्यांची कुजबुज सुरू होती. सगळे निशाकडे विचित्र पद्धतीने बघत होते. निशाला खूप ओक्वॉर्ड फिल झालं. कुणाकडेही लक्ष न देता ती सरळ सरांच्या केबिनमध्ये गेली.परमिशन न घेता थेट आत गेली. चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या टेबल सामोर जाऊन उभी राहिली. विक्रमने बघितलं त्यालाही खूप आश्चर्य वाटलं. पण चेहऱ्याकडे बघून कळलं काहीतरी झालंय.


“निशा प्लिज  बसा ना तुम्ही.”  विक्रम


“नो थँक्स.” निशा

“काय झालंय चेहऱ्यावर इतका राग का दिसतोय?” विक्रम
“सर ऑफिसमध्ये कुजबुज सुरू झालीय, निशा नवीन बॉससोबत फिरायला जात आहे, अजून काय काय चाललंय कुणास ठाऊक. मी आली तेव्हा सगळे विचित्र पद्धतीने माझ्याकडे बघत होते.” निशा


“बडे बडे ऑफिसमध्ये ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है.” विक्रम
विक्रमच्या या डायलॉग वर निशा हळूच हसली.
“सर पण आपल्याला कुठे आणि किती दिवसासाठी जायचं आहे?” निशा
“बहुतेक लोणावळा,पण लेटर यायचं आहे. आज – उद्या येऊन जाईल, ते आलं की मी तुम्हाला कळवतो.” विक्रम
“पण सर ऑफिसमध्ये...”निशा बोलता बोलता थांबली.
“डोन्ट वरी निशा” विक्रम

निशा केबिनच्या बाहेर पडली, तिच्या डेस्क वर जाऊन बसली.
शेजारी बसलेली नेहा पटकन बोलली,
“अरे वा निशा, नवीन बॉस आले तर तुझी तर लॉटरी निघाली.”

“तू काय बोलतेस नेहा, तुझं तुला तरी कळतंय का?” निशा थोडी चिडली.


“न्यू प्रोजेक्ट वर मला काम करायचं आहे त्यासाठीच सर मला तिथे घेऊन जात आहेत. आणि तू एकदम माझ्या बद्दल असा कसा विचार करू शकतेस? तू तर मला समजून घ्यायचीस. माझी परिस्थिती तुला माहीत आहे, माझ्याबद्दल सगळं जाणून आहेस तरीही आज अशी का बोलते आहेस?” 
“सॉरी अग सगळे तुझ्या आणि सरांबद्दल वेगळंच काहीतरी बोलत होते.” नेहा

“म्हणून तुही बोलायला लागलीस, पण हा विचार केला नाहीस की मला किती वाईट वाटेल.” निशा
दोघीनीही तिथेच विषय संपवला, त्याच दिवशी संध्याकाळी लेटर आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होत. फ्लाईटच्या तिकीट बुक होत्या.


निशाने रात्री पॅकिंग करून ठेवली होती. सकाळी उठून निर्मलाने तिच्यासाठी खाण्याचा डबा बनवला, निशा तयार झाली. 
“आनंदी उठ बाळा, मला निघायचं आहे.” 
आनंदी उठली, दोघींनी तिला निरोप दिला, निशाला न्यायला दारासमोर गाडी आली. निशा गाडीत बसली आणि निघाले.
थोडया वेळात एअरपोर्ट वर पाहोचले.


फ्लाईटला थोडा वेळ होता, दोघांनीही स्नॅक्स केला. 
फ्लाईटची वेळ दोघेही आत गेले, चेकिंग झालं. विक्रम आणि निशा फ्लाईटच्या आत बसले. निशा आज पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसली त्यामुळे तिला खूप भीती वाटत होती.
जसा प्लेन उडायला लागला, निशा विक्रमचा हात पकडून त्याला बिलगली. डोळे घट्ट मिटले. त्याच्या अधिकच जवळ गेली.


विक्रम तिच्याकडे बघतच राहिला.  तिचे केस समोर आले, विक्रमने हळूच तिचे केस बाजूला गेला. तिच्या गालावरून हात फिरवणार निशा दचकून पटकन बाजूला सरकली.
“आय एम सॉरी.” असं म्हणत तिने खाली मान घातली.
नंतर दोघेही थोडं अंतर ठेवून बसले पण निशाच्या मनातली भीती गेलेली नव्हती. तिने कसंबस स्वतःला सावरलं होतं.
काही तासाने प्लेन टेक ऑफ झाला, निशा बाहेर आली आणि तिच्या जीवात जीव आला.


एअरपोर्ट वर त्यांना घ्यायला गाडी तयार होती, दोघेही बसले. 
निशा गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत होती, उंचच उंच इमारती बघून तिला खूप मस्त वाटत होतं.
थोड्या वेळात हॉटेलवर पोहोचले.


दोघांच्या वेगवेगळ्या रूम बुक 
केल्या होत्या.
रिसेप्शनिस्टकडे गेले, दोघांची नावे सांगितली.
विक्रमने प्रूफ दाखवले.
“एक्सक्यूज मी सर”
“या..”
“सर आय एम एक्सट्रेमली सॉरी, पण आता ओन्ली वन रूम अवेलेबल आहे.”
हे ऐकताच निशा विक्रमकडे बघतच राहिली.

क्रमशः

🎭 Series Post

View all