काटेरी वाटेवरून चालताना...भाग 54

Navin boss chi entry zali aahe

काटेरी वाटेवरून चालताना भाग 54


आधीच्या भागात आपण पाहिले की,

परी सोबत खूप वाईट घडलं, पोलिसांनी नितिनला सगळं सांगितलं. तो हादरला ,रागिणीला कस सांगायचं याच विचाराने एक एक पाऊल पुढे जात होता.


घरी जाऊन त्याने रागिणीला सगळं सांगितलं. दोघेही अगदी शांत झाले होते. शेजारच्या मुलीने जाऊन बघितलं, दोघेही झोपले दिसले. तिने चहा बनवला आणि दोघांसाठी घेऊन गेली. आवाज दिला पण काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही म्हणुन तिने हाताने हलवलं आणि ती शॉक झाली.


आता पुढे,


दोघेही निपचित पडून होते. दोघेही हे जग सोडून गेलेले होते.
आनंदी जोरात किंचाळली, 


“आनंदी अग काय झालं?” निशा
आनंदी निशाला बिलगली, निशाने तिच्या डोक्यावर हात फिरवत विचार केला.


‘मी आनंदीला असं काही सांगायला नको होतं, ती घाबरली. माझं चुकलं पण आता लक्षात ठेवेल मी.’ निशा मनातल्या मनात विचार करत होती.


आनंदी तशीच तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपली.
दुसऱ्या दिवशी आनंदी कॉलेजला गेली, प्रिन्सि आणि रिया आधीच पोहोचल्या होत्या. आनंदी सगळ्यांना अपसेट वाटत होती.


बाकी मित्र मैत्रिणीचा ग्रुप तयार झाला असला तरी ह्या तिघी बेस्ट होत्या. आनंदीचा असा चेहरा कुणालाच बघवत नव्हता.
“रिया आनंदी साठी काही करायला हवं, ती खुप अपसेट वाटत आहे.” प्रिन्सि

“चल तिला कँटीन मध्ये घेऊन जाऊया, मूड फ्रेश होईल तिचा.”रिया
क्लासेस संपल्यानंतर सगळे कँटीनमध्ये गेले. 
“आनंदी तुझ्यासाठी काय ऑर्डर करायचं.” रिया

“अग तिला ना कारल्याचं ज्यूस आवडतं” प्रिन्सि
ती थोडी तरी हसावी म्हणून दोघींचे प्रयत्न सुरू होते.

पण आनंदीच्या चेहऱ्यावर स्माईल येईना.


“ये लडकी पगली है
ये लडकी पगली है
इसे समजाऊ कैसे
इसे मनाऊ कैसे
हाय अल्ला ये क्या हो गया
दोस्त दोस्त ना रहा..”

रियाने गाणं म्हणायला सुरुवात केली.
तिचं गाणं ऐकून आनंदी खळाखळा हसायला लागली.
तिला हसताना बघून रिया आणि प्रिन्सिचे डोळे  पाणावले.
त्या दोघींनी तिला घट्ट मिठी मारली. 
“तू अशीच हसत रहा ग.” रिया
“हो आम्हाला बघवत नाही तुझा असा नर्व्हस चेहरा. तू नेहमी आनंदी रहात जा नावाप्रमाणे.” प्रिन्सि


तिघींचाही मूड छान झाला आणी तिघीही त्यांच्या त्यांच्या घरी गेल्या.
निशाच्या ऑफिसमध्ये आज नवीन  बॉस जॉईन होणार होते.

स्वागताची तयारी सुरू झाली, सगळे दारात पुष्पगुच्छ घेऊन उभे होते. निशाला काहीच इंटेरेस्ट नसल्यामुळे ती तिच्याच डेस्क वर काम करत बसली होती.


थोड्या वेळाने त्यांची एन्ट्री झाली. सगळ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यांना आत बोलावलं गेलं. थँक यु म्हणत ते समोर आले.


त्यांना निशा तिच्या डेस्क वर बसलेली दिसली. त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या एम्प्लॉईला विचारलं.
“ह्या मॅडम कोण आहेत.” 
“सर त्या निशा मॅडम आहेत, आपल्या ऑफिसमधल्या जुन्या एम्प्लॉई आहेत.”


ते केबिनकडे गेले.
त्यांच्या खुर्चीवर बसले आणि त्यांनी निशासाठी निरोप पाठवला.
“निशा मॅडम नवीन बॉसने आत बोलावलंय.”
निशाने डोअर ओपन केला, तिच्या नजरेस नेमप्लेट पडली. त्यावरच नाव वाचलं.
“विक्रम देशमुख C E O”
“मे आय कम इन सर” निशा
“येस.”
निशा आत गेली.
“सर तुम्ही मला बोलवलतं?” निशा
“येस, प्लिज सीट डाऊन.” विक्रम

“नो, थँक यु.” निशा
विक्रमने भुवया उंचावल्या, 
“ओके.”
तुम्हाला माझं नाव कळलेलंच असेल, तरीही मी सांगतो.
“विक्रम देशमुख.”
“मिस सॉरी मिसेस निशा प्लिज तुम्ही बसा.”
नाईलाजास्तव निशा तिथे बसली.


“जेव्हा मी इथे आलो, सगळे माझ्या स्वागतासाठी समोर उभे होते. पण तुम्ही एकट्याच तुमच्या डेस्कवर काम करत बसला होतात. नाही म्हणजे काम करणं चांगलं आहे. पण मला प्रश्न पडला म्हणून मी बोलतोय. तुमचं इतकं महत्वाचं काम होत की तुम्हाला माझ्या स्वागताला यायचं नव्हतं.” विक्रम

“सर मला खरच काम होतं.” निशा
“नाही तुमचा चेहरा वेगळं काही सांगतय. काही प्रॉब्लेम आहे का?” विक्रम
“सर मी आता स्पष्टच बोलते तेही तुम्ही विचारलं म्हणून” निशा
निशाने समोर ठेवला असलेला ग्लास उचलला, पाणी प्यायली आणि बोलायला सुरुवात केली.


“सर आधी जे बॉस होते, त्यांचा मला काही चांगला अनुभव आला नाही. म्हणून मी ठरवलं होतं आपण फक्त आपलं काम करायचं, इतर कुठेही लक्ष द्यायचं नाही. म्हणून कदाचित आज मी तुमच्या स्वागताला नव्हते. सर आय एम सॉरी, तुम्हाला वाईट वाटावं,किंवा त्रास व्हावा असं माझ्या मनातही नव्हतं. आय एम रियली सॉरी.”


“अहो मॅडम तुम्ही सॉरी म्हणावं म्हणून मी विचारलं नाही,मला कारण जाणून घ्यायचं होतं बस एवढंच. पण मॅडम मी तुम्हाला शब्द देतो तुम्हाला या नवीन बॉस कडून काहीही त्रास होणार नाही. आणि कुठलीही अडचण आली तर या नवीन बॉसला नक्की आठवा.” विक्रम

“थँक यु सो मच सर.” निशा अगदी रिलॅक्स होऊन बाहेर आली. आज ऑफिसमध्ये कितीतरी दिवसांनंतर तिला खूप रिलॅक्स वाटलं.
चेअरवर बसली, लांब श्वास घेतला आणि पाणी प्यायली.

विक्रमने अदर एम्प्लॉई कडून निशाची सगळी माहिती घेतली.
काम संपवून नेहा घरी आली.


“अरे वा, आज अगदी फ्रेश दिसते आहेस.” निर्मला
“आज नवीन बॉस आले, बोलण्यावरून तर बरे वाटले. बघू आता समोर कळेलच. कारण या जगात कोण कधी गिरगिट सारखा बदलेल सांगता येत नाही.” निशा

“काय नाव म्हणायचं तुझ्या नव्या बॉसचं?” निर्मला
“तू काय ग चौकशी करतेस.?” निशा
“घे चहा घे,मी सहज विचारले”निर्मला

“आनंदी आहे ना ?” निशा

“हो तिच्या खोलीत आहे, पण थोडी घाबरलेली वाटत होती. काही झालंय का?” निर्मला
“काही नाही ग, काल रागिणी आणि नितिनचा विषय निघाला आणि मी तिला खरं काय ते सगळं सांगितलं.” निशा

“काय हे,अग तुला कळलं नाही का, तिचं हे वय अल्लड आहे. काय बरोबर काय चूक कधी त्यांना कळणार नाही, आपण त्यांना समजावून सांगायला हवं” निर्मला

“हो आई हे खरं आहे.” निशा
निशा फ्रेश झाली, आनंदीच्या खोलीत गेली, ती बेडवर लोळत पडली होती.
“काय मग काय धमाल केली आज कॉलेजमध्य?” आनंदीचा मूड ठीक व्हावा म्हणून निशाने बोलायला सुरुवात केली. 
तिच्या प्रश्नावर आनंदी काहीच बोलली नाही.
“काय झालं माझ्या राणीला?”निशा


“काही नाही”आनंदी
“मग अशी उदास का बसली आहेस?”निशा
“आई मूडच बनत नाही आहे.” आनंदी

“मी तुला काही सांगायला आली होती पण असू दे तुझा मूड नाही आहे तर बोलण्यात काहीच अर्थ नाही.”
आनंदी बोलावी म्हणून निशाने उगाच तिला खोटं काहीतरी सांगितलं.
आणि खोलीतून निशा बाहेर आली.
“काय ग बनला का मूड तुझ्या लाडलीचा?”निर्मला
“नाही, तिला थोडा वेळ राहू दे एकटी. काही घडलं असेल तर् ती आपल्याला सांगेल.” निशा

दुसऱ्या दिवशी सकाळी निशा सगळे काम आवरून ऑफिसला गेली.
गेल्या गेल्या बॉसने  आत बोलावलं.
निशा विचारात पडली.
“असं का बोलावलं असेल मला”
निशा केबिनकडे गेली.
“मे आय कम इन सर?”

“येस येस, प्लिज.”
निशा आत गेली.
“तुम्ही आत येताना परमिशन नाही घेतली तरी चालेल, म्हणजे सरळ आत आलात तरी चालेल मिस..” विक्रम बोलता बोलता थांबला.
“मी तुम्हाला मिस म्हणू की मिसेस यात मी खूप कॉन्फ्युस झालोय, तर तुम्ही मला सांगा काय म्हणायचं.” विक्रम
“फक्त निशा म्हंटलत तरी चालेल.” निशा
“प्लिज तुम्ही बसा ना.”
“सर कशाला बोलवलं होतं?”


“आपल्याला एका नवीन प्रोजेक्ट साठी आऊट ऑफ टाऊन जावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आधी प्रोजेक्ट साठी प्रिपरेशन करावं लागेल, त्यासाठी बोलावलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये सगळा डाटा आहे,तुम्हाला एकदा स्टडी करावं लागेल. तुम्ही आता बघाल की नंतर.”  विक्रम


नवीन प्रोजेक्ट साठी निशाला खूप आनंद झाला पण थोडयाच वेळात ती नर्व्हस देखील झाली.


क्रमशः

🎭 Series Post

View all