काटेरी वाटेवरून चालताना... भाग 48

Te aplya sanaskutit bast nahi pn baba to mazyavar khup prem karto

काटेरी वाटेवरून चालताना..भाग 48


आधीच्या भागात आपण पाहिले की,

आनंदीने तिच्या आवडीचा ड्रेस घातला आणि छान तयार झाली.निशासोबत  कॉलेजला जायला निघाली.
वाटेत शेजारच्या काकूंनी कापड्यावरून आनंदीला टोमणा मारला. पण निशाने  तिला चांगलंच उत्तर दिलं. निशाने आनंदीला कॉलेजला सोडलं आणि ती परत आली.
पण तिचं सगळं लक्ष आनंदीकडे कडे होतं. आनंदीने सगळे क्लास अटेंड केले आणि ती घरी परत आली. निशाने प्रेमाने तिला जवळ घेतलं.

आता पुढे,

“आनंदी फ्रेश हो, मी जेवायला देते.”
आनंदी फ्रेश झाली, तिने जेवण केलं आणि निशाच्या खोलीत गेली.

“आई काय करतेस?” आनंदी

“जुने अल्बम बघत आहे, ये बस तुही.” आनंदी निशाच्या बाजूला जाऊन बसली.
निशा आनंदीच्या लहानपणीच्या फोटो बघत होती. अल्बममध्ये baryach फोटो, दोघीही जणी एक एक फोटो टक लावून बघत होत्या. एका एका फोटोकडे बघून आठवणी जागा होत होत्या.

“आई ही परी ताई ना? किती क्यूट होती ना? आता कशी दिसते ग? कुठे राहते ती?” आनंदीने निशाला एकावेळी बरेच प्रश्न विचारले.

“ती परदेशी राहते” निशा
“तितक्या लांब? का ग? ती इकडेच का राहत नाही.” आनंदी

“बहोत लंबी कहाणी है बेटा.”निशा
“आई सांग ना.” आनंदी
“परी जेव्हा लहान होती ना, तिच्यासोबत खूप वाईट प्रसंग घडला होता. तिच्या आई बाबांनी तिला टाकून दिलं होतं, मग रागिणी मावशीने तिचा सांभाळ केला. तिची तब्बेत खुप खालावली होती, पण मावशी खचली नाही. ती धीराने सगळ्या संकटांना सामोरे गेली. परीच्या ट्रीटमेंटला खुप खर्च होता पण तो ही खर्च दोघांनी हसतमुखाने केला. कधी कुठे तक्रार नाही की भांडण नाही. परी साठी मावशीने स्वतःच मुलं देखील होऊ दिलं नाही. पण नियती कुठे कसा खेळ खेळेल सांगता येत नाही.” निशा

“काय झालं आई?” आनंदी

“परीचं शिक्षण पूर्ण झालं आणि  कॉलेज थ्रू लगेच तिला जॉब लागला तोही जर्मनीला. नितिन आणि रागिणीने सगळे साठवलेले पैसे परीला दिले, तिथे गेल्यावर खर्चाला लागणार म्हणून. खूप आनंदाने त्या दोघांनी तिला पाठवलं. अर्ध आयुष्य परीसाठी झटले. आता वाटलं सुखाचे दिवस येतील. मागच्या वर्षी जर्मनीला गेले, प्लेनने जाणार म्हणून रागिणी खूप खुश होती. पहिल्यांदा प्लेन मध्ये बसणार होती त्यामुळे खूश पण होती आणि नर्व्हस पण होती. प्लेन मध्ये बसले, रागिणी पूर्ण वेळ नितिनचा हात हातात घेऊनच होती. आज खूप वर्षांनी ती नितिन जवळ सुखावली होती.
काही तासांनंतर ते तिथे पोहोचले. मुलगी एअरपोर्ट वर घ्यायला येईल या भाबळ्या आशेने तिथे वाट बघत उभे होते. बराच वेळ झाला परी तिथे आलीच नाही. दोघेही टॅक्सीने तिच्या राहत्या घरी गेले. 
दार टेकवलं होत, दारावर थाप देणार तर दार आपोआप उघडलं. दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे बघितलं.
आत गेले तर...आतील दृश्य बघून रागिणी हादरली. तिने तोंडावर हात ठेवला. तिचे पाय थबकले, जे पाय रोज नाचायला थिरकायचे ते आज थबकले, आणि मागे मागे गेले.
नितिनने तिचा हात हातात घेतला आणि तिला बसवलं. दोघे रात्रभर तसेच बसून होते. रागिणीला खूप राग येत होता.
“हा दिवस बघण्यासाठी आपण तिला वाढवलं का? काय चुकलं आपलं? का अशी वागली ही? परदेशी आली म्हणजे आपली संस्कृती विसरायची का? रागिणी खूप चिडली.

“रागिणी शांत हो.” नितिन

“तुम्ही मला शांत राहायला काय सांगताय? जा तिच्या थोबाडात मारून या.” रागिणीने आता रडणचं सुरू केलं.
थोड्या वेळाने आतून आवाज आला,
आवाज ऐकताच रागिणी उठली, तिने खोलीत डोकावलं.

दोघे अजूनही नको त्या अवस्थेत होते. आतून बारीक मध्ये आवाज येत होता.
“जानू उठ ना, बेबी बेबी उठ. मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय. आणि  तू ना आता उगाच मला त्रास देऊ नकोस, तू आता जा. मी पटापट तयार होते आणि खाली येते.”

“क्या बेबी थोडी देर रुको ना.”

परीने त्याचा हात पकडून त्याला बाहेर केलं आणि दार लावला. बाहेर येताच या दोघांना बघून जोरात किंचाळला.

“बेबी... देखो बेबी कौन आया है यहा पे? प्लीज कम बेबी लेट्स सी बेबी.”

त्याचा आवाज ऐकून आतून परी बाहेर आली. या दोघांना बघून ती आश्चर्यचकित झाली, तिला अंदाजा नव्हता की हे एवढ्या लवकर येतील. ती तिच्याच धुंदीत होती. त्या दोघांकडे बघुन तिने आवरासावर केली. पटकन आत जाऊन पूर्ण कपडे घालून आली, अंग झाकेल एवढे कपडे घालून आली.

“आई बाबा तुम्ही.”

रागिणी चिडून बोलली,

इतकं आश्चर्यचकित होण्यासारखं काय आहे परी? आम्ही येणार होतो तुला माहिती होतं ना? मग माहिती नसल्यासारखं काय करतेस?”

“नाही तसं नाही, तुम्ही कोणी कॉल केला नाही ना मला म्हणून..” परी बोलता-बोलता थांबली.

“कॉल केला नाही, कितीदा कॉल केला तुला. तुझा फोनच लागत नव्हता, एअरपोर्टवर तुझी वाट बघत बसलो होतो पण तू न्यायला आलीच नाहीस. वाट बघून बघून थकलो आणि शेवटी टॅक्सीने इकडे आलो. तुला तर कुठल्याच गोष्टीचं भान राहिलेलं नाहीये.”

“आई तसं नाहीये तू समजतेस तसं काहीही नाहीये.”

“समजायला काही उरलंय का? जे डोळ्यांनी बघितलं ना त्यावर मी विश्वास ठेवू शकते.”

“हा फक्त माझा मित्र आहे.”

रागिणीने परीच्या एक थोबाडीत मारली. हे बघून तो मुलगा तिथून पळाला.

“बेबी स्टॉप बेबी स्टॉप..” तिचा आवाज ऐकूनही तो थांबला नाही. तो गेल्यानंतर रागिणीने  परीचा हात धरला. तिला आतल्या खोलीत घेऊन गेली आणि तिला व्यवस्थित कपडे घालून दिले.

रागिणी हताश होऊन पलंगावर बसली, तिला आता रडू आवरेना. ती ढसाढसा रडायला लागली, तिचे रडणे बघून परी पण इमोशनल झाली 

“आई आय एम सॉरी आई खरच आय एम सॉरी.”

रागिणीचं रडणं सुरूच होतं, परी तिच्या समोर जाऊन बसली. तिचा हात हातात घेतला,

“आई बघ ना ग माझ्याकडे, अशी रडू नकोस तुला रडताना मला नाही बघवत.”
नितिन आला तो ही तिच्यावर ओरडला.

“नाही बोलणार ती तुला, तू रडवलंस तिला. काय करून बसलीस तू तुझं तुला भान तरी आहे का? ही आपली संस्कृती नाहीये परी. हे सगळं बघण्यासाठी आम्ही झटलो नाही आहोत. आम्हाला तुला चांगलं घडवायचं होतं.”

“बाबा मी काही चुकीचे केलेलं नाहीये. खरच बाबा.. बाबा आम्ही काही दिवसांनी लग्न करणार आहोत. मी तुम्हाला सांगणार होती. मी त्याच्या घरी पण गेलेले आहे त्याच्या घरच्यांनी तर माझा स्वीकार केलेला आहे. तो खुप चांगला मुलगा आहे, मोठ्या कंपनीत जॉबला आहे, लाखोचा पगार आहे. घरचे सगळे चांगले आहेत. दोन मोठे मोठे बंगले आहेत, गाड्या आहेत, नोकर-चाकर आहेत, अजून काय हवंय बाबा?  तुम्हाला वाटत असेल ना तुमची मुलगी लग्न होऊन एखाद्या चांगल्या घरी जावी, सुखाने नांदावी. हे सगळं सुख मला त्याच्यासोबत मिळू शकते, मग तरी तुम्ही का असा विचार का करत आहात?”
“पण ते आपल्या संस्कृतीत बसत नाहीत. त्यांच्यात आणि आपल्यात खूप फरक आहे. आपलं राहणीमान त्यांचं राहणीमान सगळं सगळं वेगळं आहे.”
“तर काय झालं बाबा? तो इतकं प्रेम करतो माझ्यावर, प्रेम महत्वाचं नाहीये का?” 

“कधीकधी काही गोष्टी बाजूला ठेऊन काही गोष्टी कराव्या लागतात बेटा.” 

“मला एक संधी द्या फक्त बाबा, तुम्हाला जर नाही पटलं तर मी तुमच्यासोबत परत येईल. पण एकदा त्याला आणि त्याच्या फॅमिलीला भेटा, बोला त्यांच्याशी. तुम्हाला जर पटलं नाही तर तुम्ही जो मुलगा निवडाल त्याच्याशी लग्न करायला मी तयार आहे, माझा कुठलाही नकार नसेल बाबा.” असं म्हणून परीने नितिनला शब्द दिला.
परी रागिणीजवळ जाऊन बसली,
“आई तू ऐकलं का मी काय बोलले? तुम्हाला जर नाही पटलं तर मी नाही करणार त्याच्याशी लग्न. मी तुमच्यासोबत परत येईल. पण आता तू रडणं थांबव, मला तुला असं बघवत नाही ग.”
असं बोलून परी तिथुन निघून गेली.
क्रमशः

🎭 Series Post

View all